::: न्यायनिर्णय :::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर, मा. अध्यक्ष
तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीमध्ये मंचाच्या अधिकारक्षेत्रात वाहनाचा अपघात झाल्याने व सामनेवाले यांचे पुणे येथील कार्यालयाकडून वाहन विमाकृत केलेले असल्याने, त्यांना सामनेवाले समाविष्ट करून तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी मा. राष्ट्रीय आयोगाने, डा. एल. नागराजा विरुद्ध द. विश्वभारती हाऊस बिल्डिंग व इतर 2014 CJ (Trib) 104 या न्यायनिर्णयाचा संदर्भ देऊन प्रस्तुत तक्रारीमध्ये मंचाच्या अधिकारक्षेत्रात वाहनाचा अपघात झाल्याने तक्रार दाखल करून घ्यावी, असा युक्तिवाद केला. तक्रारीतील वादकथने व संदर्भित न्यायनिर्णयाचे अवलोकन केले असता, तक्रारदाराच्या वाहनाचा अपघात मंचाच्या अधिकारक्षेत्रात झाला असला तरी, कलम ११(२)(a) अन्वये सामनेवाले यांचे मुख्य अथवा शाखा कार्यालय मंचाच्या अधिकारक्षेत्रात नाही तसेच कलम ११(२)(b) अन्वये सामनेवाले यांचे मुख्य अथवा शाखा कार्यालय मंचाच्या अधिकारक्षेत्रात नसल्याने, परंतु ते आवश्यक सामनेवाले असल्याने त्यांना सामनेवाले म्हणून समाविष्ट करण्याची परवानगी मागणारा विनंती अर्ज देखील तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. कलम ११(२)(a) किंवा (b) ची पूर्तता केल्याशिवाय केवळ कलम ११(२)(c) अन्वये तक्रार दाखल करण्यास कारण घडले, या बाबीमुळे तक्रार दाखल करून घेणे न्याय्य व उचित नाही, असे मंचाचे मत आहे.
सबब, तक्रारदारास, सामनेवाले यांचे कार्यालय असलेल्या जिल्हा मंचाकडे दाद मागण्याची मुभा देवुन तक्रार निकाली काढण्यात येते.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. २५/२०१८ निकाली काढण्यात येते.
२. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
३. खर्चाबाबत आदेश नाहीत.
श्रीमती कल्पना जांगडे श्रीमती किर्ती वैद्य श्री. उमेश वि.जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)