जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 272/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-20/05/2011.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 11/02/2014.
संजय कृष्णाजी भोकरडोळे,
उ.व.सज्ञान, धंदाः पत्रकारीता,
रा.9, श्रीकृष्ण कॉलनी, जळगांव, ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. व्यवस्थापक,
रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड,
जळगांव.
2. रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड,
ए, ब्लॉक धीरुभाई अंबानी नॉलेज सिटी,
नवी मुंबई 10. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.एस.के.कौल वकील.
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 एकतर्फा.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः अवास्तव मोबाईल देयकाबाबत तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार हा विरुध्द पक्ष रिलायन्स कम्युनिकेशन लि या कंपनीचा मोबाईल क्रमांक 9370673579 अन्वये ग्राहक असुन विरुध्द पक्षाकडुन आलेल्या सर्व बिलांचा तक्रारदार नियमितपणे भरणा करीत होता. तक्रारदाराला दि.25/03/2010 ते दि.24/04/2010 चे बिल रक्कम रु.655/- चे मिळाले. सदर बिलामध्ये तक्रारदाराने एकुण 28 वेळा 51234 या क्रमांकावर फोन केलेले दाखविले होते. तक्रारदाराने सदर फोन क्रमांक 51234 वर कधीही फोन केलेला नव्हता तरीही वरील कालावधीत एकुण रु.280/- चे जास्तीचे बिल दाखविण्यात आले. तक्रारदाराने सदरची कल्पना विरुध्द पक्षास दिली व बिल निर्धारीत वेळेवर भरणा करणे गरजेचे असल्याने सदर बिलाची रक्कम रु.655/- भरणा केली. तक्रारदाराने दि.5/5/2010 रोजी तक्रार क्रमांक 125809368 अन्वये कॉल सेंटरला फोन करुन कॉल्स डिटेल्स मागविले असता तक्रारदाराने 28 वेळा फोन क्रमांक 51234 वर 9370673579 वरुन फोन केल्याचे दिसुन आले नाही त्यामुळे तक्रारदाराने दि.26/5/2010 चे पत्राने सविस्तर लिहुन विरुध्द पक्षाकडे रु.280/- कमी करण्याबाबत विनंती केली असता त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तक्रारदाराला योग्य बिल देणे विरुध्द पक्षाचे कर्तव्य असतांना त्यांनी दखल न घेऊन तक्रारदारास नाहक त्रास दिला सबब तक्रारदाराचे दि.25/03/2010 ते दि.24/04/2010 पर्यंतचे बिलामधुन रु.280/- कमी करुन ती रक्कम भरल्याने परत करण्याचे आदेश व्हावेत, मानसिक शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रु.2,000/- नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.1,000/-विरुध्द पक्षाकडुन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे या मंचाची रजि.नोटीस स्विकारुनही गैरहजर राहील्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
4. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, व तक्रारदार चे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. तक्रारदारास अवास्तव मोबाईल देयक देऊन
विरुध्द पक्षाने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
5. मुद्या क्र. 1 - तक्रारदाराने विरुध्द पक्ष रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड कडुन मोबाईल क्रमांक 9370673579 अन्वये भ्रमणध्वनी सेवा घेतलेली असल्याचे व त्यावर आलेले दि.25/03/2010 ते दि.24/04/2010 या कालावधीचे 655/- चे देयक अवास्तव रक्कमेचे असल्याबाबतची तक्रारदाराची प्रमुख तक्रार आहे. तक्रारदाराने तक्रार अर्जाचे पुष्ठयर्थ शपथपत्र तसेच इतर कागदपत्रे दाखल केलेली आहे. विरुध्द पक्ष हे या मंचाची रजिष्ट्रर ए.डी.नोटीस मिळुनही गैरहजर राहील्याने व त्यांनी त्यांचे कोणत्याही प्रकारचे लेखी म्हणणे दाखल न केल्याने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार अर्ज निकालासाठी घेतला.
6. तक्रारदाराने नि.क्र.3 लगत दाखल कागदपत्रे पाहीली असता तक्रारदारास विरुध्द पक्ष रिलायन्स कम्युनिकेशन लि यांचेकडुन मोबाईल क्र. 9370673579 चे तक्रारदाराचे नांवे दि.25/03/2010 ते दि.24/04/2010 या कालावधीचे 655/- चे देयक आल्याचे व त्यातील पान क्रमांक 2 वर नमुद कॉल्स डिटेल्स हिस्टरी मध्ये डायल क्रमांक 51234 वर 28 वेळा तक्रारदाराने कॉल्स केल्याचे रक्कम रु.280/- आकारणी केल्याचे स्पष्ट होते. तक्रारदाराने सदरचा क्रमांक डायल न करताच त्याला बिल आल्याने त्याने दि.24/05/2010 रोजी पत्राने व्यवस्थापक,रिलायन्स कम्युनिकेशन,जळगांव यांना कळविले व जादा आलेले बिल रद्य करण्याची मागणी केली असल्याचे नि.क्र.3 लगत दाखल पत्राचे छायाप्रतीवरुन दिसुन येते. तक्रारदाराने त्याचे मोबाईल क्र. 9370673579 चे कॉल्स डिटेल यादी विरुध्द पक्षाकडुन मागविली असता त्यात सदरचा दुरध्वनी क्रमांक 51234 एकदाही डायल केल्याचा तपशिल तक्रारदारास दिसुन आला असे तक्रारदाराचे वकीलांनी त्यांचे युक्तीवादाचे वेळेस या मंचापुढे नमुद केले व मंचाचे लक्ष विरुध्द पक्षाने दिलेल्या कॉल्स डिटेल कडे वेधले. नि.क्र.3 लगत दाखल कॉल्स डिटेल पाहता तक्रारदाराने कधीही दुरध्वनी क्रमांक 51234 वर कॉल्स केल्याचे दिसुन येत नाही. त्यानंतर तक्रारदाराने दि.26/05/2010 रोजी पुन्हा व्यवस्थापक, रिलायन्स कम्युनिकेशन,जळगांव यांना पत्राव्दारे कळवुन डायल न केलेल्या दुरध्वनी क्रमांकाचे बिल कमी करुन मिळणेची विनंती केली असल्याचे नि.क्र.3 लगत दाखल पत्राचे छायाप्रतीवरुन स्पष्ट होते. विरुध्द पक्ष यांना तक्रारदाराने वेळोवेळी पत्राव्दारे लेखी कळवुनही त्यांनी तक्रारदाराचे तक्रारीची दखल न घेतल्याने तक्रारदारास विद्यमान ग्राहक मंचापुढे तक्रार घेऊन यावे लागले असे तक्रारदाराचे वकीलांनी नमुद केले.
7. उपरोक्त एकुण विवेचन व दाखल कागदपत्र यावरुन तक्रारदारास त्याने कधीही न डायल केलेला क्रमांक 51234 वर 28 कॉल्स केल्याचे दाखवुन त्याआधारे त्याचेकडुन रक्कम रु.280/- जादा बेकायदेशीरपणे वसुल केल्याचे तक्रारदाराने सबळ कागदोपत्री पुराव्यावरुन शाबीत केलेले आहे. यास्तव मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
8. मुद्या क्र. 2 - तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचेकडुन दि.25/03/2010 ते दि.24/04/2010 पर्यंतचे बिलामधुन रु.280/- कमी करुन ती रक्कम भरल्याने परत करण्याचे आदेश व्हावेत, मानसिक शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रु.2,000/- नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.1,000/-विरुध्द पक्षाकडुन मिळावेत अशी विनंती केलेली आहे. तक्रारदाराकडुन विरुध्द पक्षाने रक्कम रु.280/- बेकायदेशीरपणे स्विकारल्याचे सिध्द होत असल्याने तक्रारदार हा विरुध्द पक्षाकडुन रु.280/-, मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.1,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजुर करण्यात येतो.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना दि.25/03/2010 ते दि.24/04/2010 चे बिलापोटी स्विकारलेली रक्कम रु.280/- तक्रारदारास या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासा दाखल रु.2,000/- (अक्षरी रक्कम रु.दोन हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु.1,000/- (अक्षरी रु.एक हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 11/02/2014.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.