तक्रारदार : स्वतः हजर
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. सा.वाले क्र 1 व 2 हे दुरध्वनी सेवा देणारी कंपनी आहे.
2. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून दुरध्वनी सेवा घेतली. तक्रारदार हे दुरध्वनीचे मासीक बिल दिनांक 19.11.2008 पासून ECS द्वारे भरत होते.
3 तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी दिनांक 03.11.2009 रोजी दुरध्वनी सामुग्री सा.वाले यांना परत देऊन व दुरध्वनीचे उर्वरीत देयके देऊन सा.वाले यांची सेवा बंद केली व सा.वाले यांना ECS बंद करण्याची विनंती केली.
4. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, दुरध्वनी सामुग्री परत दिल्यानंतरही व ECS द्वारे रक्कम कपात न करण्याबद्दल सुचना देऊनही सा.वाले यांनी ECS द्वारे मार्च 2010 पर्यंत खालील प्रमाणे रक्कम कपात केली-
बिल दिनांक | रक्कम | रक्कम भरल्याची तारीख |
11.11.2009 | रू. 168/-, | 30.11.2009 |
11.12.2009 | रू. 460/-, | 29.12.2009 |
11.01.2010 | रू. 551/-, | 22.01.2010 |
11.03.2010 | रू. 551/-, | 26.03.2010 |
5. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदार प्रत्येक वेळी सा.वाले यांचेकडे प्रत्यक्ष जाऊन वरील बाबीबद्दल विचारणा केली असता सा.वाले यांनी तक्रारदारांना अनामत रक्कम रू.1,000/-,सह बिल रक्कम परत करण्यात येईल असे आश्वासन दिले व तसेच बिल रक्कम नजरचुकीने जमा करून घेण्यात आली आहेत असे सांगीतले. त्यानंतरही सा.वाले यांनी बिल रक्कम कमी केली नाही व तक्रारीबद्दल कोणताच प्रतिसाद दिला नाही.
6. म्हणनू शेवटी तक्रारदारांनी 5 मार्च 2010 रोजी सा.वाले क्र. 2 यांचेकडे लेखी तक्रार देऊन ECS द्वारे जमा केलेले संपूर्ण रक्कम 12% व्याजदराने परत देण्याची मागणी केली. या लेखी तक्रारानंतर सा.वाले यांनी 15 मार्च 2010 रोजी सा.वाले यांची सेवा बंद केली व साठ दिवसाच्या आत पैसे परत देऊ असे 17 मार्च 2010 च्या पत्राद्वारे कळविले. या पत्रानंतरही सा.वाले यांनी पुन्हा ECS द्वारे रू.551/-,दिनांक 26 मार्च 2010 रोजी वसुल करून घेतले. म्हणून तक्रारदारांनी पुन्हा 2 एप्रिल 2010 रोजी रक्कम 12% व्याजासह परताव्याबद्दल व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई द्यावे असे पत्र लिहीले. त्यानंतर सा.वाले यांनी पुन्हा 15 मार्च 2010 रोजी सा.वाले यांची सेवा बंद केल्याबद्दल व दिनांक 26.03.2010 रोजी जमा करून घेतलेली रू.551/-,समायोजीत (adjust) केले जातील असे कळविले. त्यानंतरही सा.वाले यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून तक्रारदारांनी 19 एप्रिल 2010 रोजी पत्र पाठवून, सा.वाले यांनी नोव्हेंबर 2009 ते मार्च 2010 पर्यंत चुकीने घेतलेली बिलाची रक्कम रू.2,282/-व अनामत रक्कम रू.1,000/-,12% व्याजदराने व्याजासह व संपर्क साधण्यासाठी एकुण आलेला खर्च रू.5,680/-,व मानसिक त्रासाबद्दल रू.20,000/-,रक्कमेची मागणी सा.वाले यांचेकडे केली. यावर सा.वाले यांनी 27 एप्रिल 2010 रोजी रू.2,455.62/-,रक्कमेचा धनादेश पाठविला. परंतू त्यासोबत रक्कम परताव्याचे तपशिल पाठविले नाही. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले यांनी तक्रारदारांकडून घेतलेली रक्कम व अनामत रक्कम या रक्कमेपेक्षा बरीच कमी रक्कमेचा धनादेश पाठविला. त्याबद्दलही तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 24.05.2010 रोजी पत्र लिहून कळविले. व परत केलेल्या रक्कमेचा तपशिल मागीतला. त्यावर सा.वाले यांनी दिनांक 28.05.2010 रोजी दुरध्वनी सेवा बंद केल्याबद्दल कळविले परंतू तपशिल कळविला नाही. त्यानंतरही तक्रारदारांनी दिनांक 28.06.2010 व 20.09.2010 रोजी पत्राद्वारे पुन्हा संपर्क साधला परंतू त्यानंतरही सा.वाले यांनी कोणताही तपशिल कळविला नाही.
7. म्हणून जरी रक्कम कमी असली तरी तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल तक्रारदारांनी अंतीमतः ग्राहक मंचापूढे तक्रार अर्ज दाखल करून रू.826.38/-,पैसे देईपर्यंत 12% व्याजदराने परत करावे. व नुकसान भरपाई रू.20,000/-,तसेच तक्रार अर्ज खर्च रू.2,000/-,सा.वाले यांनी तक्रारदारांना द्यावे अशी मागणी केली आहे.
8. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी नोटीस मंचाकडुन पाठविण्यात आली. सा.वाले यांना नोटीस मिळाल्याची पोचपावती अभिलेखात दाखल आहे. तक्रारदार यांनी सा.वाले यांना नोटीस पाठविल्याबद्दलचे शपथपत्र दाखल केले. नोटीस मिळूनही सा.वाले हजर झाले नाही. म्हणून सा.वाले क्र 1 व 2 यांचेविरूध्द तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्यात यावा असा आदेश पारीत करण्यात आला.
9. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, याची पडताळणी करून पाहिली व तक्रारदारांचा तोंडीयुक्तीवाद ऐकला असता निकालासाठी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी, टेलिफोन सेवा बंद करण्याबद्दल सूचना दिल्यानंतरही सा.वाले यांनी तक्रारदारांकडून ECS द्वारे टेलिफोन बिलाची रक्कम वसुल करून सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे तक्रारदार सिध्द करतात काय? | होय. |
2 | तक्रार अर्जात केलेल्या मागणीस तक्रारदार पात्र आहेत काय? | होय अंशतः |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येते. |
कारण मिमांसा
10 तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून दिनांक 18.02.2004 पासून दुरध्वनी सेवा घेत होते. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 19.11.2008 मध्ये ECS फॉर्म भरून दिला व जानेवारी 2009 पासून दुरध्वनी बिल ECS द्वारे भरू लागले. अभिलेखात पृष्ठ क्र 12 वर ECS फॉर्मची छायांकीत प्रत दाखल आहे.
11. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार दिनांक 03.11.2009 रोजी तक्रारदारांनी सा.वाले यांना दुरध्वनी सेवा बंद करण्याबद्दल अर्ज भरून दिला व दुरध्वनी बिलाची थकबाकी दिली तसेच दुरध्वनीची सर्व सामुग्री परत केली. वECS द्वारे बिलाची रक्कम घेऊ नये असे तोंडी सांगीतले. पृष्ठ क्र 23 व पृष्ठ क्र.24 वर सेवा बंद करण्याबद्दलचा अर्ज व बिलाची रक्कम भरल्याची पावती दाखल आहे.
12. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार दुरध्वनी सेवा बंद करण्याबद्दल व ECS द्वारे व बिलाची रक्कम न घेण्याबद्दल सूचना दिल्यानंतर व दुरध्वनीची सामुग्री परत केल्यानंतरही सा.वाले यांनी नोव्हेंबर 2009 ते मार्च 2010 पर्यंत ECS द्वारे बिलाची रक्कम खालीलप्रमाणे वसुल केलीः-
बिल दिनांक रक्कम रक्कम भरल्याची तारीख
11.11.2009 रू. 168/-, 30.11.2009
11.12.2009 रू. 460/-, 29.12.2009
11.01.2010 रू. 551/-, 22.01.2010
11.03.2010 रू. 551/-, 26.03.2010
हे तक्रारदारांचे कथन अभिलेखात पृष्ठ क्र. 13 ते 20 वर दाखल केलेल्या बँक पासबुकवरील नोंदीवरून स्पष्ट होते. त्याबद्दल तक्रारदारांनी सा.वाले यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता सा.वाले यांनी दिनांक 27.04.2010 रोजी रू.2455.65/-,रक्कमेचा धनादेश पाठविला. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले यांनी तक्रारदारांकडून एकुण चुकीने घेतलेल्या दुरध्वनी बिलाची रक्कम व अनामत रक्कम यापेक्षा ब-याच कमी रक्कमेचा धनादेश पाठविला. त्यामूळे तक्रारदारांनी पुन्हा सा.वाले यांच्याशी संपर्क साधून वारंवार पाठपुरावा केला व पाठविलेल्या रक्कमेचा तपशिल मागीतला परंतू सा.वाले यांनी कोणताचा प्रतिसाद दिला नाही.
13. तक्रारदारांनी तक्रार अर्जात केलेल्या तक्ररीस सा.वाले यांनी हजर राहून नकार दिला नाही. त्यामूळे तक्रारदारांचे म्हणणे अबाधीत राहते तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरून तक्रारदारांच्या कथनास पुष्टी मिळते. त्यामूळे तक्रारदारांचे म्हणणे ग्राहय धरण्यात येते.
14. सा.वाले यांनी तक्रारदारांची दुरध्वनी सेवा, सुचना दिल्यानंतरही बंद केली नाही त्याउलट ECS द्वारे बिलाची एकुण रक्कम रू.2,282/-,वसुल केली. त्यानंतर वारंवार तक्रार करूनही सा.वाले यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. शेवटी लेखी तक्रार दिल्यानंतर सा.वाले यांनी दिनांक 27.04.2010 रोजी रू.2,455.62/-,एवढया रक्कमेचा धनादेश दिला. परंतू हा धनादेश तक्रारदारांची एकुण चुकीने वसुल केलेली रक्कम रू.2,282/-,+1,000/-,अनामत रक्कम असे एकुण रू.3,282/-,रक्कमेपक्षा कमी रक्कमेचा धनादेश दिला. यावरून सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे सिध्द होते. त्यामुळे सा.वाले हे तक्रारदारांना उर्वरीत रक्कम रू.826.38/-,ही रक्कम 9% व्याजदराने परत देण्यास जबाबदार आहेत.
15. दुरध्वनी सेवा बंद करण्यास सुचना दिल्यानंतर सा.वाले यांनी ECS द्वारे वसुल केलेली बिलाची रक्कम रू.826.38/-,त्यावर 9% व्याज दिनांक 27.04.2010 पासुन ते पैसे देईपर्यंत व्याजासह परत देण्यास जबाबदार राहतील.
16. सा.वाले यांच्या सेवेतील त्रुटीबद्दल तक्रारदारांना बराच मानसिक व शारीरीक त्रास सोसावा लागला. तक्रारदारांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रू.20,000/-,ची मागणी केली आहे परंतू बिलाची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश दिल्याकारणाने नुकसान भरपाई रक्कम रू.3,000/-,राहिल असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
17. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून तक्रार अर्ज खर्चासाठी रू.6,000/-,ची मागणी केली आहे सा.वाले हे तक्रारदारांना तक्रार अर्ज खर्च रू.2,000/-,देण्यास जबाबदार राहतील.
18. वरील विवेचनावरून खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 13/2011 अंशतः मान्य करण्यातयेते.
2. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना सेवासुविधा पुरविण्यात कसुर
केली हे जाहीर करण्यात येते.
3. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना रू. रू.826.38/-, त्यावर 9%
व्याज दिनांक 27.04.2010 पासुनते पैसे देईपर्यंत व्याजासह द्यावे.
4. सा.वाले क्र 1 व 2 यांनी नुकसान भरपाईबद्दल रू.3,000/-, तक्रार अर्ज
खर्च रू.2,000/-, असे एकुण रू.5,000/-, तक्रारदारांना द्यावेत.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात