( निकालीपत्र पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या)
(पारीत दिनांक –04 एप्रिल, 2012 )
1. अर्जदार/तक्रारदार यांनी एकत्रितरित्या ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली गैरअर्जदार/विरुध्दपक्ष यांचे विरुध्द प्रस्तूत तक्रार न्यायमंचासमक्ष दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, गैरअर्जदार हे एंजेल बिझीनेस कन्सेप्ट या नावाखाली मल्टी लेव्हल मार्केटींग व्यवसाय करतात, त्यासाठी संबधित ग्राहकांनी गुंतविलेल्या रकमेवर नफा कमवितात. त्यानुसार तक्रारकर्ते हे गैरअर्जदार/विरुध्दपक्षाचे योजनेमध्ये सामिल झालेत त्यांनी आपल्या रकमा गुंतविल्यात. सदर योजने मध्ये संबधित ग्राहकास वि वि ध अवार्ड सुध्दा दिल्या जातात.
3. तक्रारकर्ता क्रं 1 यांनी दि.08.06.2009 आणि दि.29.07.2009 रोजी पावती क्रं 3 व 12 नुसार प्रत्येकी रुपये-10,000/- प्रमाणे एकूण रुपये-20,000/- गुंतविले व त्या मोबदल्यात आज पर्यंत त.क.क्रं 1 यांना रुपये-2,656.70 पैसे फक्त एवढी रक्कम गैरअर्जदार कडून मिळालेली आहे. तसेच त.क.क्रं 1 हिने रुपये-40,000/- रोख गैरअर्जदार कडे गुंतविले परंतु या पैशाची आजपर्यंत गै.अ.यांनी पावती दिलेली नाही वा या संबधाने परतावा दिलेला नाही.
ग्राहक तक्रार क्रमांक: 463/2010
4. त.क.क्रं 2 यांनी गैरअर्जदार कडे पावती क्रं 1, दि.20.06.2009 नुसार रुपये-9600/- गुंतविले.
5. त.क.क्रं 3 यांनी दिनांक 15.09.2009 रोजी प्रत्येकी रुपये-3500/- अनुक्रमे पावती क्रं 53 आणि 54 नुसार एकूण रुपये-7000/- एवढी रक्कम गुंतविली.
6. त.क. यांनी असे नमुद केले की, अशा प्रकारच्या रकमा त्यांनी गैरअर्जदार/वि.प.यांचेकडे गुंतविल्यामुळे त.क. हे वि.प.चे ग्राहक होतात परंतु वि.प.यांनी त्यांना गुंतविलेल्या रकमे संबधाने परतावा न दिल्यामुळे दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
7. त.क.यांनी पुढे असे नमुद केले की, त्यांनी सर्व वि.प.नां दि.10.05.2010 रोजी रजिस्टर पोस्टाने नोटीसेस पाठविल्या असता, वि.प.क्रं 1 व 4 यांची नोटीस कार्यालयात उपस्थित नसल्याचे कारणा वरुन परत आली तर वि.प.क्रं 2 व 3 यांनी नोटीस घेण्यास इन्कार केला या शे-यासह नोटीस परत आली. जेंव्हा की, वि.प.क्रं 2 व 3 नागपूर कार्यालयात आजही कार्यरत आहेत.
8. म्हणून शेवटी त.क.यांनी वि.न्यायमंचात प्रस्तुत तक्रार दाखल करुन तीद्वारे वि.प.यांनी तक्रारदारांना मुद्यल रुपये-77,000/- एवढी रक्कम वार्षिक 18 टक्के दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे. तसेच तक्रारीचे खर्चापोटी प्रत्येकी रुपये-10,000/-
ग्राहक तक्रार क्रमांक: 463/2010
आणि शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल प्रत्येकी रुपये-50,000/- या प्रमाणे नुकसान भरपाई वि.प.कडून देण्याचे आदेशित व्हावे अशा मागण्या केल्यात.
9. वि.प.क्रं 1 व 2 यांनी पान क्रं 38 ते 45 वर एकत्रितरित्या लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर न्यायमंचा समक्ष दाखल केले. त्यांनी उत्तरामध्ये त.क.यांनी त्यांचे विरुध्दची सर्व विपरीत वि धाने नाकबुल केलीत. वि.प.आणि त.क.यांचेमध्ये ग्राहक आणि सेवा देणारे असे संबध निर्माण होत नाहीत. वि.प.यांनी असेही नमुद केले की, वादातील योजनेत सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती ही सदस्य किंवा असोसिएट बनते. त.क. हे स्वतः व्यवसायिक दृष्टीने सदस्य झालेत. प्रत्येक सदस्य स्वतः व्यवहार करुन स्वतःसाठी डाऊनलाईन मध्ये त्याने आणलेले सदस्य जोडतो व त्या आधारे नफा कमावितो. त.क. हे सदर योजने मध्ये व्यवसायिक उद्येश्याने सहभागी झालेत त्यामुळे वि.प.यांनी कोणत्याही प्रकारे परतावा देण्याचा प्रश्न उदभवत नाही. व्यवसायिक कारणासाठीची तक्रार असल्याने खारीज होण्यास पात्र असल्याचे नमुद केले.
10. वि.प.यांनी असेही नमुद केले की, सदर योजना त्यात सहभागी होणा-या सदस्यांनी, सदस्यांचे फायदयासाठी, सदस्यांसाठी चालविलेली आहे, यात ग्राहक किंवा गुंतवणूक करणे अशी काहीच संकल्पना नाही. त.क. म्हणतात त्या प्रमाणे त.क. यांनी कोणतीही गुंतवणूक वि.प.कडे केलेली नाही कारण गुंतवणूक असा काहीच प्रकार या योजने मध्ये नाही. एन्जेल बिझीनेस कंसेप्ट ही कंपनी नसून योजनेचे नाव आहे
ग्राहक तक्रार क्रमांक: 463/2010
व त्यात सहभागी होणारे सदस्य म्हणविले जातात. त.क. या योजनेत ग्राहक म्हणून सहभागी झालेले नाहीत. सदर नावाची कोणतीही कंपनी अस्तित्वात नाही. योजने अंतर्गत सदस्यत्वाची जी रक्कम दिली जाते तिची त्याच वेळेस पावती दिली जाते. योजने मध्ये पॅकेज दिले जाते. त.क. पात्र असलेले पॅकेज देण्यास गैरअर्जदार तयार आहेत.
11. वि.प.यांनी असे नमुद केले की, त्यांनी त.क.यांचे कडून रक्कम घेतल्यावर नफा कमविला हे म्हणणे चुकीचे व खोटे आहे. त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. त.क. यांनी दिलेली नोटीस त्यांना प्राप्त झालेली नाही त्यामुळे ती अमान्य करण्यात येते. योजनेच्या अटी व शर्ती नुसार त्यांनी सदस्यत्व नोंदणी न केल्यामुळे त्यांना दावा केल्या प्रमाणे फायदा मिळण्याचा प्रश्नच येत नाही. वि.प. त.क.नां कोणतही रक्कम देणे लागत नाही.
12. वि.प.यांनी असेही नमुद केले की, वादातील योजनेत प्रत्येक सदस्याला सदस्य होताना रुपये-3500/- एवढी रक्कम जमा करावयाची होती. सदर रक्कम जमा केल्यास सदस्याचे नोंदणी शुल्का व्यतिरिक्त जाहिर केल्या प्रमाणे त्याच्या पसंतीचे पॅकेज मिळते. त्यानंतर जर अशा सदस्यांनी बायनरी इन्कम प्लॅन प्रमाणे त्याच्या खाली सदस्यांची साखळी निर्माण केल्यास प्रत्येक सदस्याच्या नोंदणीचे वेळेस मिळणा-या रकमेतून काही हिस्सा संबधित योजने प्रमाणे परावर्तीत करण्यात येतो व अशा प्रकारे साखळी उत्पन्नातून ही योजना राबविली जाते. म्हणजेच
ग्राहक तक्रार क्रमांक: 463/2010
डाऊन लाईनमध्ये जितके अधिक सदस्य जोडले जातील त्या प्रत्येकाचे मागे अप लाईन मधील सदस्यास उत्पन मिळते. सदरचे उत्पन्न प्रत्येक सदस्याचे स्वतःचे प्रयत्नावर अवलंबून असते. डाऊन लाईनमध्ये जास्त सदस्य जोडल्यास जास्त उत्पन्न व कमी सदस्य जोडल्यास कमी उत्पन्न व काहीही न जोडल्यास उत्पन्न प्राप्त होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारकर्त्यांनी या योजनेत जी रक्कम भरली असा दावा केला आहे ती पूर्ण रक्कम सदरील योजनेत सदस्यत्वासाठी भरलेली नाही व तसे अभिलेखा वरुन दिसून येत नाही.
13. वि.प.यांनी पुढे असेही नमुद केले की, वि.प.क्रं 1 व 2 यांचा त.क.यांचेशी काहीही व्यवहार झालेला नाही. निर्माण केलेल्या साखळी प्रमाणे लाभ प्राप्त होतो. त.क.क्रं 2 यांनी या संबधात दिनांक 06.02.2010 रोजी लेखी दिलेले आहे परंतु त्याचा तक्रारीत उल्लेख केला नाही. सदर योजना सदस्यांनी सदस्यांसाठी व सदस्यांचे स्वतःचे फायदयासाठी चालविलेली स्वतंत्र योजना आहे व त्याचा वि.प.क्रं 1 व 2 यांचे इतर व्यवसायाशी काहीही संबध नाही. त.क.यांनी योजने मध्ये भरलेल्या रकमा संबधाने पावत्या योजनेच्याशिक्क्यासह दिलेल्या आहेत. त.क.यांची तक्रार खोटी, चुकीची असून ती खर्चासह खारीज व्हावी, असा उजर वि.प.क्रं 1 व 2 यांनी घेतला.
14. वि.प.क्रं 3 व 4 यांचे नावाने दैनिक नवभारत दि.16.02.2011 रोजी वृत्तपत्रातून जाहिर नोटीस प्रकाशित करण्यात आली परंतु वि.प. क्रं 3 व 4 हे न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी उत्तरही दाखल केले नाही म्हणून
ग्राहक तक्रार क्रमांक: 463/2010
वि.प.क्रं 3 व 4 विरुध्द सदरचे प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश वि.न्यायमंचाने दिनांक 10.10.2011 रोजी प्रकरणात पारीत केला.
15. त.क.यांनी एकत्रित तक्रार प्रतिज्ञालेखावर न्यायमंचा समक्ष दाखल केली. सोबत पान क्रं 6 वरील यादी नुसार एकूण 13 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये पेमेंटचे विवरण, वि.प.यांना पाठविलेली नोटीस, पोस्टाच्या पावत्या, रजि.नोटीसचे परत आलेले लिफाफे, वि.प.यांचे योजनेचे विवरण, त.क.यांनी वि.प.यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, वि.प.तर्फे दिलेले चेक, वि.प.तर्फे दिलेली पावती क्रं 12 व क्रं 3, त.क.क्रं 1 चे मुखत्यारपत्र अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. तसेच पान क्रं 55 वरील यादी नुसार वि.प.यांनी दिलेल्या 02 चेकच्या प्रती दाखल केल्यात. पान क्रं 59 वरील यादी नुसार वि.प.क्रं 3 व 4 यांनी त.क.यांना दिलेले समझोता पत्र दाखल केले. तसेच वृत्तपत्रीय नोटीसची मूळ प्रत दाखल केली.
16. वि.प.क्रं 1 व 2 यांनी एकत्रित लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर न्यायमंचा समक्ष दाखल केले. सोबत पान क्रं 46 वरील यादी नुसार त.क.क्रं 2 ने दिलेली पावती दाखल केली.
17. प्रस्तुत प्रकरणात उभय पक्षांना युक्तीवादा करीता अंतिम संधी देऊनही, उभय पक्ष युक्तीवादाचे वेळी गैरहजर राहिल्याने प्रकरण निकाला करीता बंद करण्यात आले.
ग्राहक तक्रार क्रमांक: 463/2010
18. त.क.यांची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, वि.प.क्रं 1 व 2 यांचे प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तर तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष ::
19. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी, गैरअर्जदार/वि.प.यांचे "एंजल बिझीनेस कन्सेप्ट" या मल्टी लेव्हल मार्केटींग योजने मध्ये सामील होऊन रक्कम गुंतविली आणि त्यामु्ळे मंचाचे मते, तक्रारदार क्रं 1 ते 3 हे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांचे ग्राहक आहेत. तसेच वि.जिल्हा ग्राहक न्यायमंचास प्रस्तुत तक्रार चालविण्याचे पूर्ण अधिकारक्षेत्र येते. गैरअर्जदार/विरुध्दपक्षांनी आश्वासीत केल्या नुसार योजनेचा फायदा तक्रारदारांना दिलेला नाही, ही बाब दाखल प्रकरणातील दाखल दस्तऐवजा वरुन स्पष्ट होते.
20. प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज क्रं 11 वरुन असे दिसते की, तक्रारदार क्रं 1 ने दि.29.07.2009 च्या पावती नुसार गैरअर्जदार/विरुध्दपक्ष क्रं 2 चे नागपूर येथील कार्यालयात रुपये-10,000/- एवढया रकमेचा भरणा केला होता. तसेच दस्तऐवज क्रं 12 वरील दि.08.07.2009 च्या पावती वरुन तक्रारदार क्रं 1 ने, गैरअर्जदार/वि.प.क्रं 2 चे नागपूर येथील कार्यालयात रुपये-10,000/- चा भरणा केला होता, या बाबी स्पष्ट होतात. त.क. क्रं 1 यांचे असेही म्हणणे आहे की, त्यांना रुपये-2656.70 पैसे एवढीच रक्कम गैरअर्जदार कडून मिळालेली आहे. तसेच या व्यतिरिक्त त.क.क्रं 1 हिने रुपये-40,000/- गैरअर्जदाराकडे रोख रक्कम गुंतविली होती परंतु सदर रकमेची पावती गैरअर्जदार/वि.प.ने आज पर्यंत त.क. क्रं 1 ला दिली
ग्राहक तक्रार क्रमांक: 463/2010
नाही वा रक्कमही परत केली नाही. तक्रारदार क्रं 1 चे तक्रारीतील कथना वरुन त.क.क्रं 1 ने एकूण रुपये-60,000/- चा भरणा गैरअर्जदाराकडे केला होता, असे त.क.क्रं 1 चे म्हणणे आहे. परंतु दाखल पावत्यांच्या प्रतीवरुन त.क.क्रं 1 ने गैरअर्जदाराकडे एकूण रुपये-20,000/- चा भरणा केला होता ही बाब अनुक्रमे दस्तऐवज क्रं 11 व 12 वरुन स्पष्ट होते. . त.क.क्रं 1 ने आपल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, रुपये-40,000/- गैरअर्जदाराला दिल्या संबधाने लेखी पुरावा म्हणून पावती सादर केलेली नाही. गैरअर्जदार/वि.प.ने रुपये-40,000/- एवढया रकमेची पावती त.क.क्रं 1 ला दिलेली नाही असे त.क.क्रं 1 चे म्हणणे आहे. परंतु योग्य पुराव्या अभावी रुपये-20,000/- शिवाय अन्य रकमे संबधाने त.क.क्रं 1 चे म्हणणे मान्य करता येणार नाही, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
21. तसेच त.क.क्रं 2 चे तक्रारी नुसार त्याने दिनांक-20.06.2009 रोजी पावती क्रं 1 अनुसार गैरअर्जदार/वि.प.कडे रुपये-9600/- गुंतविले. परंतु सदर पावतीची प्रत रेकॉर्डवर दाखल केली नाही. परंतु पान क्रं-47 वरील त.क.क्रं 2 विजय चतुर्वेदी यांचे लेखी निवेदना वरुन असे दिसून येते की, त.क.क्रं-2 ला रक्कम आय.सी.आय.सी.आय.बँक, रामदास पेठ नागपूर, चेक क्रमांक अनुक्रमे 045210 आणि 045211 अन्वये प्रत्येकी रुपये-6000/- प्रमाणे एकूण रुपये-12,000/- गैरअर्जदार/वि.प.कडून मिळाले असे लेखी निवेदनात नमुद आहे व त्यावर स्टॅम्प लावून विजय चतुर्वेदी म्हणून सही केलेली आहे. याचाच अर्थ तक्रारदार क्रं 2 ने, गैरअर्जदार/वि.प.क्रं 2 चे योजनेत पैसे गुंतविले होते म्हणजेच त.क.क्रं 2 हा सदर योजनेचा सभासद झाला होता, ही बाब पूर्णतः सिध्द होते.
ग्राहक तक्रार क्रमांक: 463/2010
22. तसेच त.क.क्रं 3 चे तक्रारी नुसार त्याने दि.15.09.2009 रोजी प्रत्येकी रुपये-3500/- प्रमाणे पावती क्रं 53 व 54 नुसार गैरअर्जदार वि.प.कडे रुपये-7000/- एवढी रक्कम गुंतविली. त.क.क्रं 3 ने गैरअर्जदार/वि.प.चे योजनेत प्रत्येकी रुपये-3500/- प्रमाणे रक्कम गुंतविली व त्या बाबत गैरअर्जदार/वि.प.ने अनुक्रमे पावती क्रं 53 व 54 दिल्याचे नमुद केले आहे परंतु सदर पावती क्रं 53 व 54 ची प्रत तक्रारी सोबत जोडली नाही. परंतु वस्तुस्थिती वरुन असे दिसते की, त.क. क्रं 3 हा देखील गैरअर्जदार/वि.प.चा सदस्य होता म्हणजेच तो ग्राहक आहे. अशा प्रकारे त.क.क्रं 1 ते 3 हे गैरअर्जदार/विरुध्दपक्षाचे ग्राहक होतात.
23. सदर प्रकरणात त.क.क्रं -2 यास गैरअर्जदार/वि.प.कडून रकमा मिळाल्याचे, त.क.क्रं 2 ने लेखी कबुल केलेले आहे (दस्तऐवज पान क्रं-47). तसेच त.क.क्रं 3 यांनी, गैरअर्जदार/वि.प.यांना रकमा अदा केल्या बाबत पावत्या जोडल्या नाहीत. त्यामुळे त.क.क्रं 2 व क्रं 3 हे मुद्यल रक्कम मिळण्यास जरी पात्र नसले, तरी गैरअर्जदार/वि.प.यांनी, त्यांना योजने मध्ये रक्कम गुंतविल्यास जास्तीत जास्त फायदा होईल असे प्रलोभन देऊन, सदर योजनेचे सभासद करुन घेतले, त्यामुळे त.क.क्रं 2 व 3 हे सुध्दा, गैरअर्जदार/वि.प.यांचे कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
24. प्रकरणातील वस्तुस्थिती वरुन असे दिसून येते की, गैरअर्जदार/विरुध्दपक्षाने एंजेल बिझीनेस कन्सेप्ट नावाच्या योजने नुसार ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्याचे प्रलोभन दिले. या योजने नुसार जर ग्राहक त्यांच्या डाऊन लाईन मध्ये जास्तीत जास्त सदस्य जोडून अपलाईन मध्ये येतील तेवढा जास्त त्यांना फायदा
ग्राहक तक्रार क्रमांक: 463/2010
मिळतो. निर्विवादपणे गैरअर्जदार/वि.प.क्रं 1 ते 3 यांनी या योजने नुसार ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा होण्याचे प्रलोभन दिले. तसेच या बरोबर वस्तुस्थिती अशी आहे की, संबधित ग्राहकाने सदस्य न जोडल्यास ग्राहकास कुठलाही फायदा होत नाही व त्याने गुंतवणूक केलेल्या रकमेवर व्याज सुध्दा मिळत नाही वा त्याने गुंतविलेली रक्कम सुध्दा त्यास परत मिळत नाही. अशाप्रकारे हजारो ग्राहकांनी गुंतविलेली रक्कम, संबधित ग्राहकांनी सदस्य न जोडल्यामुळे, गैरअर्जदार/वि.प.नां प्राप्त होत आहे, गैरअर्जदार/वि.प.चीं ही एक प्रकारे अनुचित व्यापारी प्रथा आहे, असे या न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
25. तेंव्हा वरील वस्तुस्थिती पाहता, गैरअर्जदार/वि.प. हे, संबधित ग्राहक म्हणजे त.क.क्रं 1 हिला , तिने गैरअर्जदार/वि.प.यांचे योजने मध्ये गुंतविलेली मुद्यल रक्कम परत करण्यास बाध्य आहेत. तसेच गैरअर्जदार/वि.प.ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामु्ळे ते त.क.यांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत.
26. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करुन, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1)तक्रारदारांची तक्रार गैरअर्जदार/वि.प. एंजेल्स बिझीनेस कन्सेप्ट तर्फे
वि.प. क्रं 1 ते 3 विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात अंशतः मंजूर
करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्रमांक: 463/2010
2) गैरअर्जदार/वि.प. एंजेल्स बिझीनेस कन्सेप्ट तर्फे वि.प.क्रं 1 ते 3 यांनी
तक्रारदार क्रं 1 ला त्यांनी गैरअर्जदारकडे गुंतविलेली रक्कम रुपये-20,000/-
(अक्षरी रुपये विस हजार फक्त ) परत करावी.
3) गैरअर्जदार/वि.प. एंजेल्स बिझीनेस कन्सेप्ट तर्फे वि.प.क्रं 1 ते 3 यांनी ,
तक्रारदार क्रं 1 ते 3 यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई
म्हणून प्रत्येकी रुपये 10,000/- (अक्षरी प्रत्येकी रुपये दहा हजार फक्त )
आणि तक्रारीचे खर्चापोटी प्रत्येकी रुपये 2,000/-(अक्षरी प्रत्येकी रुपये दोन
हजार फक्त) द्यावेत.
4) गैरअर्जदार/वि.प. एंजेल्स बिझीनेस कन्सेप्ट तर्फे वि.प. क्रं 1 ते 3 यांनी वैयक्तिक
आणि संयुक्तिक स्वरुपात सदर आदेशाचे अनुपालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे
दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे.
5) तक्रारदारांच्या अन्य मागण्या या योग्य पुराव्या अभावी नामंजूर करण्यात येत
आहेत.
6) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्या द्याव्यात.