Complaint Case No. CC/20/62 | ( Date of Filing : 10 Jul 2020 ) |
| | 1. Shri.Dhirendra Sudhakar Nampalliwar | Divakar Printing press jawal, Tukum road, chandrapur,Tah.Dist.Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Reliance Retail Limited | Tisara Mala,Court House,Lokmanya Tilak Marg,Dhobi Talav,Mumbai-400002 | Mumbai | Maharashtra | 2. R.R.L. D.X. Mini | Shop no 2, Plot no20,Nirman Nagar,Biyani Petrol Pump Jawal,Tukum,Chandrapur,Tah.Dist.Chandrapur442401 | Chandrapur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक २३/०३/२०२२) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ निर्मित रिलायन्स रि-कनेक्ट ४३ इंच एल.ई.डी. टिव्ही मॉडेल क्रमांक ४३ एफ ४३८२, विरुध्द पक्ष क्रमांक २ विक्रेता यांचेकडून दिनांक १३/०४/२०१९ रोजी रुपये २४,९९०/- ला खरेदी केली. उपरोक्त टिव्ही तक्रारकर्त्याने खरेदी केल्यापासून त्यावर दोन वर्षाची वॉरंटी होती. टिव्ही खरेदी केल्यावर विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी त्यांच्या कर्मचा-याला तक्रारकर्त्याचे घरी दिनांक १३/०४/२०१९ रोजी पाठवून उपरोक्त टिव्ही इन्स्टॉल करुन सुरु करुन दिला. उपरोक्त टिव्ही सुरु केल्यापासून व्यवस्थित सुरु होता माञ दिनांक १४/०३/२०२० रोजी अचानक उपरोक्त टिव्ही मध्ये उभ्या रेषा दिसू लागल्या व टिव्ही आपोआप बंद पडला. तक्रारकर्त्याने दिनांक १४/०३/२०२० रोजी विरुध्दपक्ष क्रमांक २ यांचेकडे जावून उपरोक्त टिव्ही बंद पडल्याबाबत माहिती देवून दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली तेव्हा विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी त्यांचा कर्मचारी तक्रारकर्त्याचे घरी टिव्ही तपासणी करण्याकरिता पाठवतो म्हणून सांगितले होते परंतु त्यांनी त्यांचा कर्मचारी पाठविला नाही. तक्रारकर्त्याचा टिव्ही हा वॉरंटी कालावधीमध्ये असून सुध्दा विरुध्द पक्षाने दुरुस्ती करुन दिला नाही. विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्यास निर्मिती दोष असलेला टिव्ही दिला आणि दुरुस्ती करण्याचे टाळले. त्यामुळे दिनांक १४/०३/२०२२ पासून उपरोक्त टिव्ही तक्रारकर्त्याच्या घरी बंद अवस्थेत आहे. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास टिव्ही दुरुस्त करुन दिला नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक १५/६/२०२० रोजी अधिवक्ता श्री संजय खोब्रागडे यांचे मार्फत नोटीस पाठविला. परंतु विरुध्दपक्षांनी त्याची दखल घेवून पूर्तता न केल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्द आयोगासमक्ष प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्यास उपरोक्त टिव्ही दुरुस्ती करुन द्यावे किंवा टिव्ही परत घेवून त्याच मॉडेलचा नवीन टिव्ही द्यावा किंवा टिव्ही करिता घेतलेली रक्कम रुपये २४,९९०/- आणि त्यावर दिनांक १३/०४/२०१९ पासून १८ टक्के व्याजासह रक्कम विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला देण्याचे तसेच शारीरिक व मानसिक ञासाकरिता रक्कम रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- देण्याचे आदेशीत व्हावे.
- तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ विरुध्द नोटीस काढण्यात आले. नोटीस प्राप्त झाल्यावर विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ हे आयोगासमक्ष हजर होवून विरुध्द पक्षांनी आपल्या लेखी उत्तरात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडून टिव्ही खरेदी केला व सदर टिव्ही वर खरेदी दिनांकपासून २ वर्षाची वॉरंटी आहे, याबाबत वाद नाही. विरुध्दपक्षांनी तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबूल करुन पुढे आपल्या विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडून दिनांक १३/०४/२०१९ रोजी उपरोक्त टिव्ही खरेदी केल्यावर विरुध्द पक्षांच्या तंञज्ञाने तक्रारकर्त्याच्या घरी जावून टिव्ही Install करुन चालू करुन दिला. त्यानंतर तक्रारकर्त्याने उपरोक्त टिव्ही मध्ये बिघाड झाल्याने विरुध्द पक्षाकडे तक्रार दिली असता विरुध्द पक्ष यांच्या कंपनीचा Engineer तक्रारकर्त्याचे घरी गेला असता त्यांनी उपरोक्त टिव्ही ची संपूर्ण तपासणी केली. तेव्हा सदर टिव्ही मध्ये छेडछाड (Physical Damage) झाल्याचे निदर्शनास आले. सदर बिघाड हा टिव्ही मध्ये छेडछाड केल्याने झालेला आहे असे त्यांच्या निदर्शनास आले आणि सदर दोष हा निर्मिती दोष नसून छेडछाड केल्याने टिव्ही मध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे अश्या टिव्ही च्या संचामध्ये झालेल्या बिघाडाबाबत कंपनी वॉरंटी देत नाही व तसे वॉरंटी कार्डच्या अटी व शर्तीमध्ये सुध्दा नमूद आहे. छेडछाड केल्यामुळे टिव्ही मध्ये बिघाड झाल्यामुळे त्याला दुरुस्त करावयाचे असल्यास अश्या दुरुस्तीला चार्जेस द्यावे लागतात. जर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला टिव्ही दुरुस्ती करण्याबाबत चार्जेस दिले तर ते दुरुस्त करुन देतील असे विरुध्द पक्ष यांचे Engineer यांनी सांगितले. त्यामुळे तक्रारकर्त्याने सांगितले की मला जेव्हा टिव्ही दुरुस्ती करावयाचा असेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलावतो. तक्रारकर्त्याला सदर बाब माहिती असून सुध्दा त्यांनी दिनांक १५/०६/२०२० रोजी खोटी नोटीस पाठविली. विरुध्द पक्ष यांनी उत्तर नोटीसमध्ये सांगितले की टिव्ही मध्ये निर्मिती दोष नसून आपण त्यामध्ये छेडछाड केल्यामुळे दोष निर्माण झाला आणि अशा दुरुस्तीला चार्जेस लागतील असे उत्तर नोटीस मध्ये कळविले. तक्रारकर्त्याचा टिव्ही मध्ये अयोग्य हाताळणीमुळे बिघाड आल्याने वॉरंटीच्या अटी व शर्ती मध्ये येत नाही म्हणून तक्रारकर्त्याच्या टिव्ही ची दुरुस्ती ही वॉरंटी च्या शर्ती व अटी मध्ये बसत नाही. तक्रारकर्त्यास टिव्ही दुरुस्ती करावयाची असल्यास विरुध्द पक्ष हे दुरुस्ती करुन देण्यास तयार आहे आणि त्याकरिता चार्जेस द्यावे लागतील. तक्रारकर्त्याच्या अयोग्य हाताळणीमुळे टिव्हीचे नुकसान झाले असेल तर कंपनी जबाबदार राहत नाही. तक्रारकर्त्याने खोटी तक्रार दाखल केल्याने खर्चासह खारीज करण्यात यावी.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे लेखी उत्तर आणि लेखी उत्तर आणि दाखल केलेल्या दस्तऐवजालाच त्यांचा पुरावा व लेखी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुर्सिस दाखल तसेच उभयपक्षाचा तोंडी युक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष १. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्याप्रति होय न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ २. विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्याप्रति नाही न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ॽ ३. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्ता यांनी दिनांक १३/०४/२०१९ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ निर्मित रिलायन्स रि-कनेक्ट ४३ इंच एल.ई.डी. टिव्ही मॉडेल क्रमांक ४३ एफ ४३८२, विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचेकडून रुपये २४,९९०/- मध्ये खरेदी केला. याबाबत उभयपक्षात वाद नाही. उपरोक्त टिव्ही विरुध्द पक्ष क्रमांक २ यांच्या तंञज्ञाने दिनांक १३/०४/२०१९ रोजी तक्रारकर्त्याचे घरी जावून Install करुन सुरु करुन दिला. सदर टिव्ही मध्ये दिनांक १४/०३/२०२० रोजी उभ्या रेषा दिसू लागल्या व टिव्ही अचानक बंद पडला सदर टिव्ही करिता विरुध्द पक्षांनी दिलेल्या वॉरंटी कार्ड प्रमाणे टिव्ही घेतलेल्या दिनांकापासून दोन वर्षाची वॉरंटी आहे आणि टिव्ही मध्ये बिघाड हा २ वर्षाच्या वॉरंटी कालावधीत आल्याने तक्रारकर्त्याने दिनांक १४/०३/२०२० रोजी विरुध्द पक्ष क्रमांक २ यांना टिव्ही मध्ये बिघाड झाल्याबाबत व टिव्ही दुरुस्त करुन देण्यास सांगितले. परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास आश्वासन देवूनही टिव्ही दुरुस्त करुन दिला नाही आणि टिव्ही दुरुस्त करण्याकरिता चार्जेस लागतील असे सांगितले कारण टिव्ही मध्ये जो बिघाड झालेला आहे तो तक्रारकर्त्याच्या चुकीच्या हाताळणीमुळे निर्माण झालेला असल्याने आणि तसा बिघाड वॉरंटीच्या अटी व शर्ती मध्ये येत नसल्याने दुरुस्त करण्याकरिता चार्जेस लागतील असे विरुध्द पक्ष यांनी सांगितले. विरुध्द पक्षाने दिनांक ३/२/२०२१ रोजी निशानी क्रमांक ११ सह दाखल केलेल्या दस्तऐवजासोबत वॉरंटी कार्ड आणि टिव्ही चे काढलेले फोटोची नक्कल/झेरॉक्स दाखल केलेली आहे. याचे अवलोकन केले असता फोटोमध्ये सुध्दा टिव्हीच्या स्क्रीन वर रेषा असल्याचे निदर्शनास येते. यावरुन तक्रारकर्त्याच्या टिव्ही मध्ये बिघाड आल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याच्या टिव्ही मध्ये दिनांक १४/०३/२०२० रोजी बिघाड आला तेव्हापासून विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास टिव्ही दुरुस्त करुन दिला नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडील टिव्ही मध्ये तक्रारकर्त्याने स्वतः एल.ई.डी टिव्ही ची अयोग्य हाताळणी/छेडछाड केल्याने बिघाड झाल्याचे विरुध्दपक्षाच्या अभियंत्याने सांगितल्याचे त्यांच्या लेखी उत्तरामध्ये नमूद आहे. तक्रारकर्त्याने स्वतः अयोग्य हाताळणी करुन टिव्ही मध्ये बिघाड झालेला असल्याने वॉरंटी कार्डच्या अटी व शर्ती नुसार दुरुस्त करुन देण्यास विरुध्द पक्ष जबाबदार नाही असा आक्षेप घेतला आहे. परंतु सदर टिव्ही मध्ये निर्मिती दोष नसून तक्रारकर्त्याच्या अयोग्य हाताळणीमुळे बिघाड झालेला आहे, ही बाब विरुध्द पक्षांनी कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल करुन सिध्द केली नाही. तसेच तंञज्ञ यांचे सुध्दा शपथपञ वा अहवाल दाखल केला नाही. वॉरंटी कार्ड निशानी क्रमांक ११ सह दस्त क्रमांक २ वर दाखल असून त्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये “ The product is guaranteed to be free from defects in workmanship and parts for a period of 24 months on product from the date of purchase. Defects that occur within this warranty period, under normal use and care will be repaired, replaced or refunded at our discretion, soley are our option with no charge for parts or labour” असे नमूद आहे. तक्रारकर्त्याने दिनांक १३/०४/२०१९ रोजी टिव्ही खरेदी केला व त्यामध्ये दिनांक १४/०३/२०२० रोजी बिघाड होऊन बंद पडला. सदर टिव्हीची टिव्ही खरेदी केल्यापासून २ वर्षाची वॉरंटी आहे त्यामुळे तक्रारकर्त्याच्या टिव्हीमध्ये वॉरंटी कालावधीमध्ये बिघाड आलेला आहे आणि विरुध्द पक्ष यांनी तो दुरुस्त करुन दिलेला नाही. टिव्ही दुरुस्त न झाल्यामुळे तक्रारकर्ता सदर टिव्ही चा उपभोग घेऊ शकला नाही त्यामुळे तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक ञास झाला अशा परिस्थितीत विरुध्द पक्ष क्रमांक १ उत्पादक कंपनी यांनी टिव्ही मध्ये दोष असल्यापासून १ वर्षापर्यंत दुरुस्त वा बदलवून न देऊन तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली आहे, या निष्कर्षाप्रत आयोग आल्याने तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून टिव्ही खरेदी केल्याची पावती निशानी क्रमांक ४ सह दस्त क्रमांक अ-१ नुसार टिव्हीची किंमत रुपये २४,९९०/- तसेच शारीरिक व मानसिक ञासाकरिता नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे. विरुध्द पक्ष क्रमांक २ हा विक्रेता असल्याने त्याच्यावर कोणतीही जबाबदारी निश्चीत करता येत नाही. सबब मुद्दा क्रमांक १ व २ चे उत्तर त्याअनुषंगाने नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेंचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. ६२/२०२० अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्याला रिलायन्स रि-कनेक्ट ४३ इंच एल.ई.डी. टिव्ही मॉडेल क्रमांक ४३ एफ ४३८२ ची किंमत रक्कम रुपये २४,९९०/- द्यावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये ३,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २,०००/- द्यावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ विरुध्द कोणताही आदेश नाही.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावेत.
| |