निकालपत्र :- (दि.04/10/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदारा तर्फे लेखी युक्तीवाद दाखल. तक्रारदारचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकणेत आला.सामनेवाला व त्यांचे वकील गैरहजर. सदरची तक्रार तक्रारदाराचा विमा हप्ता रक्कम मागणी करुनही परत न केलेने दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला ही विमा कंपनी असून विमा संबंधीची सेवा पुरविण्याचा व्यवसाय करते. तक्रारदाराने दि.17/06/2008 रोजी सामनेवालांकडे पॉलीसी क्र.12101303 या नंबरने रक्कम रु.10,000/-भरुन पॉलीसी घेतलेली होती. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. सदर पॉलीसी काढणेपूर्वी ग्राहकास अटी व शर्तीची कल्पना देणेबाबत सामनेवालांची कायदेशीर व नैतिक जबाबदारी होती व आहे. तक्रारदाराची फसवणूक करणेचे दृष्ट हेतुने त्यास संपूर्णत: चुकीची व अपूर्ण माहिती दिली होती. तक्रारदाराच्या अशिक्षीतपणाचा व साधेपणाचा फायदा घेऊन सदर पॉलीसी काढणेस तक्रारदारास भाग पाडले. सामनेवाला यांचे कृत्य हे बेकायदेशीर आहे. रिलायन्स कॅशफ्लो प्लॅन 4 हा पूर्णत: दिशाभूल करणारा आहे. सदर कलॉजची माहिती तक्रारदारास देणेत आली नव्हती. ब) प्रस्तुत तक्रारदार हे अतिशय गरीब असून ते वरचेवर आजारी असतात. सदर रक्कमेची आवश्यकता भासलेने दि.22/06/2009 रोजी प्रथम पॉलीसी बंद करणेची तसेच पॉलीसी रककम रु.10,000/- रिफंड होऊन मिळणेबाबत विनंती केली असता सामनेवालांच्या अधिका-यांनी सदर प्लॅनखाली कमीतकमी 3 वर्षे प्रिमियम भरलेशिवाय रिफंड मिळणार नाही असे सांगितले. सदर रक्कमेची सामनेवालांकडे मागणी करुनही त्यांनी ती देणेस टाळाटाळ केलेने दि.05/08/2009 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठवली व सदरची नोटीस दि.06/08/2009 रोजी त्यांना मिळालेली आहे. दि.07/08/2009 रोजी सामनेवालांनी अपु-या मजकूराचे पत्र पाठवून तक्रारदाराची दिशाभूल करणेचा प्रयत्न केलेला आहे. सबब तक्रारदारास पॉलीसीची रक्कम रु.10,000/-तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवालांकडे तक्रारदाराने भरलेल्या रक्कम रु.10,000/- च्या पावतीची अस्सल प्रत, सामनेवालायांना पाठविलेल्या नोटीसची स्थळप्रत तसेच सदर नोटीसची पोचपावती तसेच उत्तरी नोटीसच्या अस्सल प्रती दाखल केलेल्या आहेत. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी महणणेनुसार तक्रारदाराची तक्रार पूर्णत: खोटी, चुकीची व दिशाभूल करणारी असलेने तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराने सामनेवालांकडे कॅश फ्लो प्लॅन अंतर्गत पॉलीसी मिळणेबाबत मागणी केलेली होती. सदर पॉलीसीची निर्धारित विमा रक्कम रु.1,01,000/- होती. पॉलीसीची मुदत 16 वर्षे व प्रतिवार्षिक हप्ता रक्कम रु.9,640/- असा होता. सदरचे प्रपोजल हे श्री अरविंद बिजवे या अधिकृत अडव्हाईजर/एजंट कोड नं.20099594 यांचेमार्फत आलेला होता. चौकशी अंती सदर प्रपोजल स्विकृत करुन तक्रारदारांना पॉलीसी क्र. 12101303 अदा केली होती व त्यांनी सदर पॉलीसीसाठी एकच वार्षिक हप्ता भरला व तदनंतरचे हप्ते भरणेस तो असमर्थ ठरला आहे. प्रस्तुतचे प्रपोजल मान्य करणेपूर्वी प्रस्तुतच्या अटी व शर्ती या इंग्रजीमध्ये असलेने त्यास वाचता येत नसलेने त्यास सदर अटी व शर्तींची पूर्ण कल्पना व माहिती दिलेली होती. पुढील वार्षिक हप्ते न दिलेने प्रस्तुतची पॉलीसी बंद पडलेली आहे व नमुद पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदार हा प्रस्तुतचा हप्ता रक्कम मिळणेस पात्र नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ तक्रारदाराचे पॉलीसीची अस्सल प्रत दाखल केलेली आहे. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे तसेच तक्रारदाराचे लेखी व तोंडी युक्तीवाद याचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील मु्द्दयांचा विचार करावा लागेल. अ)तक्रारदाराने दि.17/06/2008 रोजी सामनेवालांकडे पॉलीसी क्र.12101303 या नंबरने रक्कम रु.10,000/- भरुन पॉलीसी घेतलेली होती ही वस्तुस्थिती सामनेवालांनी मान्य केलेली आहे. तसेच दाखल रक्कम रु.10,000/- ची भरणा पावती व पॉलीसीच्या प्रतीवरुन निर्विवाद आहे. तक्रारदाराने प्रतिवार्षिक एकच हप्ता भरलेचे मान्य केलेले आहे. तदनंतर त्यांने हप्ता भरलेला नाही. प्रस्तुत पॉलीसीच्या नियमाप्रमाणे तक्रारदाराने प्रतिवार्षिक किमान 3 हप्ते भरलेली नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच तक्रारदाराने दि.17/06/2008 रोजी रक्कम भरणा करुन पॉलीसी घेतलेली आहे व सदर पॉलीसी बंद करुन प्रस्तुत हप्त्यापोटीची रक्कम रु.10,000/- मिळणेसाठी दि.22/06/2009 रोजी म्हणजे जवळजवळ एक वर्षाने मागणी केलेली आहे व सदर मागणीस सामनेवाला कंपनीच्या अधिका-यांनी प्रस्तुत पॉलीसीसाठी प्रस्तुत प्लॅनप्रमाणे कमीत कमी 3 वर्षे प्रिमियम भरलेशिवाय तुम्हास रिफंड मिळणार नाही असे सांगितलेचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत मान्य केलेले आहे. तक्रारदाराने प्रस्तुतचे प्रपोजल समजून उमजून घेतलेनंतरच सही केलेली आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. यामध्ये तक्रारदार किमान 3 प्रतिवार्षिक हप्ते भरण्यास असमर्थ ठरलेला आहे. त्यामुळे प्रस्तुतची पॉलीसी लॅप्स झालेली आहे. या वरील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी सेवा त्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. 2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |