Maharashtra

Nagpur

CC/625/2016

Smt. Swarnlata Rakesh Jain - Complainant(s)

Versus

Reliance Life Insurance Through Branch Manager - Opp.Party(s)

Adv. A.T.Sawal

12 Sep 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/625/2016
( Date of Filing : 01 Oct 2016 )
 
1. Smt. Swarnlata Rakesh Jain
R/o. Gandhkuti, In front of Dayaram Akhada, Telipura, Maskasath, Itwari, Nagpur 440002
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Reliance Life Insurance Through Branch Manager
Office-Kamyani 35-A, LIG, Vikas Nagar, Agra Road, Aligarh 202 001
Aligarh
Uttar Pradesh
2. Reliance Life Insurance Through Branch Manager
Office- Anil Dhirubhai Ambani Group, H-Block, 1st floor, Dhirubhai Ambani Knowledge City, New Mumbai 440 710
MUMBAI
Maharashtra
3. Reliance Life Insurance Through Branch Manager
Office- Civil Lines, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 
For the Complainant:Adv. A.T.Sawal, Advocate
For the Opp. Party:
Dated : 12 Sep 2018
Final Order / Judgement

मा. सदस्‍य, श्री. नितिन एम. घरडे यांच्‍या आदेशान्‍वये

आदेश

 

  1.     तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचे स्‍वरुप असे की, तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडून लाईफ इन्‍शुरन्‍सची पॉलिसी रक्‍कम रुपये1,25,000/- ची 10 वर्षाकरिता दिनांक 21.05.2007 रोजी पॉलिसी विकत घेतली. तसेच सदर पॉलिसीचा परिपक्‍वता कालावधी हा दिनांक 21.05.2016 होता व सदर पॉलिसीचा क्रं. 10750475 असा असून प्रत्‍येक वर्षी रुपये 25,000/- याप्रमाणे तक्रारकर्तीने 3 वर्ष एकूण रुपये 75,000/- विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडे भरलेले होते. त्‍यानंतर तक्रारकर्तीला माहिती पडले की, सन 2014 मध्‍ये दि.17.09.2014 रोजी विरुध्‍द पक्ष 1 चा एजंट श्री. क्रिष्‍णा एस. दुग्‍गड यांनी तक्रारकर्तीची खोटी स्‍वाक्षरी करुन व विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याशी संगनमत करुन तक्रारकर्तीची पॉलिसी सरेंडर करुन दुसरी नविन पॉलिसी तक्रारकर्तीच्‍या संमती शिवाय काढली व त्‍याचा क्रमांक  51721903 हा असून ही पॉलिसी 5 वर्षाकरिता काढलेली  होती. तक्रारकर्तीच्‍या प्रथम पॉलिसीचा क्रमांक 10750475 होता व त्‍या पॉलिसीची परिपक्‍वता 2016 पर्यंत असल्‍या कारणास्‍तव त्‍यामध्‍ये तक्रारकर्तीला व्‍याजासह रक्‍कम परत मिळणार होती. परंतु वि.प. 1 च्‍या व एजंटच्‍या संमतीने  धोकाधडी व जालसामुळे तक्रारकर्तीला प्रथम पॉलिसीची व्‍याजासह मिळणारी रक्‍कम मिळाली नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठविली व तक्रारकर्तीने प्रथम पॉलिसी मध्‍ये एकूण 3 वर्ष प्रति रुपये 25,000/- प्रमाणे भरलेली रक्‍कम रुपये 75,000/- 24 टक्‍के व्‍याजासह व नुकसान भरपाईसह मिळावी अशी नोटीस वि.प.ला बजाविली. परंतु वि.प.ने सदरच्‍या नोटीसचे कोणतेही उत्‍तर दिले नाही. तेव्‍हा त.क.ला वि.प. चा धोकाधडीचा व जालसाचा केलेला प्रयत्‍न लक्षात आला व शेवटी नाईलाजास्‍तव तक्रारकर्तीला सदरची तक्रार मंचात दाखल करावी लागली.
  2.       तक्रारकर्तीने आपल्‍या तक्रारीत अशी मागणी केली की, वि.प. 1 ते 3  यांना आदेशित करण्‍यात यावे की, तक्रारकर्तीची जमा असलेली रक्‍कम रुपये 75,000/- सन 2007 पासून 24 टक्‍के व्‍याजासह परत करावी. तसेच वि.प. 1 ते 3 यांच्‍या सदरच्‍या कृत्‍यामुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 1,00,000/- द्यावे. तक्रारीचा खर्च रुपये10,000/- व नोटीस खर्च रुपये 5,000/- असे एकूण रुपये 15,000/- देण्‍यात यावे.
  3.       वि.प. 1 ते 3 तर्फे नि.क्रं. 7 वर तक्रारीला उत्‍तर सादर केला असून त्‍यांनी आपल्‍या प्राथमिक आक्षेपात नमूद केले की, तक्रारकर्तीची तक्रार हया मंचाला चालविण्‍याचा अधिकार नाही.  तसेच तक्रारकर्तीने सदरची तक्रार ही योग्‍य न्‍यायालया मध्‍ये दाखल करावी. विरुध्‍द पक्षाने पुढे असे ही नमूद केले की, वि.प. 1 रिलायन्‍स लाईफ इन्‍श्‍युरन्‍स तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, आगरा रोड, अलीगड, उत्‍तरप्रदेश येथे अस्तित्‍वात आहे. त्‍याचप्रमाणे वि.प. 2 रिलायन्‍स लाईफ इंशुरन्‍स तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक ही ब्रान्‍च नवी मुंबई येथे असून तक्रारकर्तीने सदरची पॉलिसी ही अलीगड उत्‍तर प्रदेश येथून घेतलेली आहे. त्‍यामुळे सदरचे प्रकरण या मंचाच्‍या अधिकार क्षेत्रा अभावी चालविता येत नाही.  तसेच त.क.ने स्‍वतः प्रथम पॉलिसी सरेंडर करुन दुसरी पॉलिसी काढण्‍याची संमती दिलेली होती व त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दुसरी पॉलिसी काढण्‍यात आलेली होती. त्‍यामुळे त.क. ही खोटे आरोप लावत आहे. तसेच तक्रारकर्तीला दुस-या पॉलिसीची प्रत त्‍यांच्‍या पत्‍त्‍यावर पाठविण्‍यात आलेली होती. त्‍यामुळे वि.प. यांच्‍याकडून तक्रारकर्तीला सेवा देण्‍यात कोणत्‍याही प्रकारची त्रुटी झालेली नाही. म्‍हणून तक्रारकर्तीची सदर तक्रार ही खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
  4.       तक्रारकर्तीने सदरच्‍या तक्रारी बरोबर अ.क्रं. 1 ते 7 दस्‍तावेज दाखल करुन त्‍यात दि.16.05.2007 रोजी काढलेली प्रथम पॉलिसीची प्रत, प्रिमियम भरल्‍याबाबतची दिनांक 07.03.2008 ची पावती, पॉलिसी बॉन्‍ड, तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला दिलेले पत्र, वि.प. 1 ते 3 ला दिलेली नोटीसची प्रत, पोस्‍टाची पोच पावती इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केले.  विरुध्‍द पक्ष यांनी नि.क्रं. 12 वर एकूण 2 दस्‍तावेज दाखल करुन त्‍यात पॉलिसी क्रं. 10750475 ची प्रत व पॉलिसी क्रं. 51721903 लगतचे संपूर्ण दस्‍तावेज व पॉलिसीची प्रत इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केले.
  5.       उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवादाचे  अवलोकन केले असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.

 

 

मुद्दे उत्‍तर

  1. प्रस्‍तुत तक्रार मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येते काय?       नाही
  2. 2.    तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय?                  होय
  1.    अंतिम आदेश                                       खालीलप्रमाणे
  2.  
  1. मुद्दा क्रमांक 1 , 2 व 3 चे उत्‍तर -    तक्रारकर्तीने पॉलिसी क्रं. 10750475 दि. 21.05.2007 रोजी काढलेली असून तिची परिपक्‍वता कालावधी दिनांक 21.05.2016 पर्यंत होती व त्‍याकरिता तक्रारकर्तीने प्रति वर्षी रुपये25,000/- प्रमाणे प्रिमियम भरले.  परंतु वि.प. 1 चे एजंट क्रिष्‍णा एस. दुग्‍गड यांनी विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याशी संगनमत करुन  धोकाधडी करुन सदरची पॉलिसी सरेंडर करुन त्‍याबद्दलची कोणतीही सूचना तक्रारकर्तीला न देता दुसरी पॉलिसी ज्‍याचा क्रं. 51721903  ही 5 वर्षाकरिता काढली. त्‍यामुळे तक्रारकर्तीला प्रथम पॉलिसीचा मिळणार लाभ मिळाला नाही व सदरची कृती ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब दर्शविते.
  2.       तक्रारकर्तीने आपल्‍या तक्रारी बरोबर नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता ही बाब स्‍पष्‍टपणे दिसून येते की, तक्रारकर्तीने दि. 16.05.2007 रोजी काढलेली पॉलिसी ही रिलायन्‍स लाईफ इन्‍श्‍युरन्‍स पत्‍ता- कामयानी 35-ए, एल आय.जी. विकास नगर, आगरा रोड, अलीगढ या शाखेतून काढलेली आहे. तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या नि.क्रं. 2 वरील दस्‍त क्रं. 5 चे अवलोकन केले असता दि. 17.09.2014 रोजी तक्रारकर्तीने लिखित अर्ज हा विरुध्‍द पक्ष 3 म्‍हणजेच रिलायन्‍स लाईफ इन्‍शुरन्‍स, सिव्‍हील लाईन्‍स, नागपूर येथे दिल्‍याचे दिसून येते. सदर पत्राचे अवलोकन केले असता त्‍यात तक्रारकर्तीने असे नमूद केले आहे की, तक्रारकर्तीची ट्रान्‍सफर ही अलीगढ पासून नागपूर येथे 4 वर्षा पूर्वी झालेली होती व नविन पॉलिसीवर असलेला पत्‍ता व मोबाईल क्रमांक याच्‍याशी तक्रारकर्तीचा कोणताही संबंध नाही.  परंतु तक्रारकर्तीने सदरचा अर्ज हा नागपूर रिलायन्‍स लाईफ इन्‍शुरन्‍स येथे दिला यामुळे असे गृहीत धरता येत नाही की, तक्रारकर्तीने काढलेली पॉलिसी ही अलीगढ शाखेची असली तरी त्‍याचा संबंध नागपूर शाखेशी आहे.

 

  1.       तक्रारकर्तीच्‍या संपूर्ण पॉलिसीचा व्‍यवहार हा अलीगढ, उत्‍तर प्रदेश येथे झालेला आहे व फक्‍त तक्रारकर्तीने दिनांक 17.09.2014 रोजी नागपूर शाखा येथे लिखीत पत्र दिले असल्‍याच्‍या कारणास्‍तव सदर तक्रार या मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यात येते.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार  मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नाही. म्‍हणून सदर तक्रार तक्रारकर्तीला परत करण्‍यात येऊन नस्‍तीबध्‍द  करण्‍यात येते.
  2. तक्रारकर्तीने सदरचा वाद हा योग्‍य न्‍यायालया समक्ष दाखल करावा.
  3. उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्तीला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ परत करण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.