Maharashtra

Chandrapur

CC/12/18

Srikant Narendra Wallalware - Complainant(s)

Versus

Reliance Life Insurance Co.Ltd through Chandrapur Branch Manager - Opp.Party(s)

Adv A.U.Kullarwar

17 Nov 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/12/18
 
1. Srikant Narendra Wallalware
R/o Area Hospital,Lalpeth
Chandrapur
M.S.
...........Complainant(s)
Versus
1. Reliance Life Insurance Co.Ltd through Chandrap[ur Branch Manager
Raghuwanshi Complex,In front of Azad Garden,Chandrapur
Chandrapur
M.S.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. Kalpana Jangade MEMBER
 HON'BLE MRS. Kirti Gadgil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: नि का :::

(मंचाचे निर्णयान्‍वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक :- 17.11.2014)

 

            अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.          अर्जदाराची पत्‍नी स्‍वर्गीय श्रध्‍दा ही जिल्‍हा परिषद चंद्रपूर अंतर्गत असलेल्‍या शाळेमध्‍ये पदविधर शिक्षिका म्‍हणून नोकरीवर होती.  अर्जदाराचे पत्‍नी स्‍वर्गीय श्रध्‍दा श्रीकांत वल्‍लालवार हीने आपले हयातीत गैरअर्जदार विमा कंपनीने ऑक्‍टोंबर 2010 मध्‍ये रुपये 1,00,000/- चा एक रक्‍कमी वीमा प्रिमियम 15 वर्षाकरीता 2 लाख रुपयांचे विमाछञ  देण्‍यात यईल व मुदतपूर्व मृत्‍यु झाल्‍यास त्‍या व्‍यतिरिक्‍त अॅडिशनल सम अॅशुअर्ड देण्‍यात येईल असे गैरअर्जदाराने सांगीतले व त्‍यामुळे मय्यत श्रध्‍दा वल्‍लालवार यांनी गैरअर्जदाराकडे 1 लाख रुपयाचा विमा प्रिमियम भरणा करुन पॉलिसी क्र.18075553 ऑक्‍टोंबर 2010 मध्‍ये काढली होती.  मय्यत श्रध्‍दा हिचा दुर्देवाने कोणताही ञास नसतांना अचानक दि. 16.9.2011 ला हृद्यविकाराच्‍या झटक्‍याने मृत्‍यु झाला.  मृत्‍युनंतर अर्जदाराने दि. 3.10.11 रोजी गैरअर्जदाराकडे उपरोक्‍त विमा पॉलिसीचा क्‍लेम मिळण्‍याकरीता क्‍लेम फॉर्म आवश्‍यक कागदपञासह सादर केला.   गैरअर्जदाराने अर्जदारास दि. 30.12.2011 चे पञाने मय्यत श्रध्‍दाला लोह कमतरता व अॅनिमीयाचा ञास असल्‍याचे कळवीले.  वास्‍तविक, मुलबांळ व नौकरी  करणा-या भारतीय स्ञिला सरासरीत रक्‍तामध्‍ये लोहाची कमतरता आढळते. हा काही रोग नसून हे काही हृदयविकार उत्‍पन्‍न होण्‍याकरीता कारण राहू शकत नाही व मय्यत श्रध्‍दाला कधीही आय.टी.पी. चा रोग नव्‍हता.  तसेच, आय.टी.पी.मुळे हृदयविकाराचा झटका आला असे म्‍हणता येणार नाही.  गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमाकलेम चुकीचे व खोट्या कारणाकरीता नाकारले.  यामुळे अर्जदाराने दि.10.1.2012 रोजी अधि.अभय कुल्‍लरवार यांचे मार्फत नोटीस पाठवीला.  गैरअर्जदारास नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा विमा क्‍लेम दिला नाही. त्‍यामुळे, अर्जदारास विद्यमान जिल्‍हा ग्राहक मंचात दाद मागावी लागली.  गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेली सेवा न्‍युनतापूर्ण व अनुचीत व्‍यापार पध्‍दती ठरविण्‍यात यावी.  गैरअर्जदारास अर्जदारास स्‍वर्गीय श्रध्‍दाचे  विमा पॉलिसी क्र.18075553 चे रुपये 2,00,000/- दि.16.9.2011 पासून द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह व अतिरिक्‍त फंड व्‍हॅल्‍यु रक्‍कम देण्‍याचा आदेश गैरअर्जदाराविरुध्‍द पारीत करण्‍यात यावा.  अर्जदारास शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 1,00,000/- व केसचा खर्च रुपये 15,000/- देण्‍याचा आदेश गैरअर्जदाराविरुध्दपारीत करण्‍यात यावा, अशी मागणी केली.  

 

2.          अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 15 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.10 नुसार लेखी उत्‍तर व नि.क्र.16 नुसार 1 दस्‍ताऐवज दाखल केले.

 

3.          गैरअर्जदाराने नि.क्र.10 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले की, अर्जदाराची पत्‍नी श्रध्‍दा वल्‍लालवार यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे ऑक्‍टोबर 2010 मध्‍ये प्रस्‍ताव सादर केला हे गैरअर्जदाराने मान्‍य केले.  गैरअर्जदाराने हे नाकबूल केले आहे की, त्‍या प्रस्‍तावावर गैरअर्जदाराने रुपये 1,00,000/- एक रकमी विमा प्रिमियम 15 वर्षाकरीता 2 लाख रुपयाचा विमाछञ देण्‍यात येईल.  मुदतपूर्व मृत्‍यु झाल्‍यास 2 लाख रुपयाचे व्‍यतिरिक्‍त टोटल व्‍हॅल्‍यु वर अपघाती मृत्‍यु झाल्‍यास त्‍या व्‍यतिरिक्‍त अॅडीशनल सम अॅशुअर्ड देण्‍यात येईल, त्‍यामुळे मय्यत श्रध्‍दा वल्‍लालवार यांनी गैरअर्जदाराकडे 1 लाख रुपये विमा प्रिमियम भरणा केला गैरअर्जदाराचे कार्यालयाने 31 ऑक्‍टोंबर 2010 ची विमा पॉलिसी क्र.18075553 जारी केली.  हे म्‍हणणे खोटे असून नाकबूल आहे की, मय्यत श्रध्‍दा या जिल्‍हा परिषद शाळे पदविधर शिक्षिका म्‍हणून कार्यरत होती व तिची प्रकृती अत्‍यंत चांगली होती.  गैरअर्जदाराने लेखी उत्‍तरातील विशेष कथनात नमूद केले की, गैरअर्जदारास अर्जदारास दि.31..10.2010 ला रिलायन्‍स लाईफ इन्‍शुरंस NAV अॅडव्‍हान्‍टेज प्‍लान(सिगल) ही पॉलिसी दिली. सदरचे पॉलिसी मॅच्‍युरिटी दि.31.10.2025 ला होती.  त्‍याचप्रमाणे सिंगल प्रिमियम रुपये 1,00,000/- होती.  पॉलिसी होल्‍डर मरण पावल्‍यानंतर नॉमिनीने पॉलिसी होल्‍डर मृत्‍यु झाल्‍याचे कळवीले व त्‍यात खोटी माहिती गैरअर्जदाराला देवून इन्‍शुरंस क्‍लेम मागीतला आहे.  वास्‍तविक, मृतक श्रध्‍दा एस.वल्‍लालवार हिला लोहाची कमतरता व अॅनीमियाचा रोग होता. ती जुन 2009 पासून इन्‍डीयापॉथीक स्थिम्‍बोसायटोफानीका चा रोगाने आजारी होती.  त्‍याचप्रमाणे पॉलिसी होल्‍डरने पॉलिसी घेतांना ती नेहमी ड्रग किंवा मेडीकल घेत होती. ती डॉक्‍टरच्‍या सल्‍ल्‍याने घेत होती की स्‍वतःच्‍या मताने मागील 5 वर्षापासून रोगाने आजारी होती.  मय्यत श्रध्‍दा हिने पॉलिसीच्‍या अटी पूर्ण न करता पॉलिसीच्‍या होल्‍डर विषयी वैयक्‍तीक माहिती लपवून ठेवली व गैरअर्जदारास मीसलीड केले व पॉलिसी कव्‍हर करुन घेतली.  अर्जदाराचे पॉलिसीचे अटीनुसार अर्जदारास संपूर्ण बेनीफिटसह रुपये 83,698.72 अर्जदाराचे खात्‍यात जमा केले आहे व अर्जदार सदर रकमे करीताच पाञ आहे. अर्जदारास सदर क्‍लेमची रक्‍कम दिलेली आहे, त्‍यामुळे सदर तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घेडले नाही. त्‍यामुळे अर्जदारास तक्रार खारीज करण्‍यात यावी.

 

4.          गैरअर्जदाराने नि.क्र.14 नुसार पुरसीस दाखल केली.  नि.क्र.20 नुसार शपथपञ अर्जदाराने नि.क्र.18 नुसार लेखी युक्‍तीवाद व केस लॉ दाखल केले.  गैरअर्जदाराने नि.क्र.19 नुसार लेखी युक्‍तीवाद व केस लॉ दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्‍ताऐवज, लेखी युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.

 

      मुद्दे                                          :    निष्‍कर्ष

 

1)

         

2)

काय किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला

आहे काय ?    

                                   

3)

 

                        

 

 

 

कारण मिमांसा

मुद्दा क्रं. 1 बाबत ः-

 

5.          अर्जदाराची पत्‍नी स्‍वर्गीय श्रध्‍दा ही जिल्‍हा परिषद चंद्रपूर अंतर्गत असलेल्‍या शाळेमध्‍ये पदविधर शिक्षिका म्‍हणून नोकरीवर होती.  अर्जदाराचे पत्‍नी स्‍वर्गीय श्रध्‍दा श्रीकांत वल्‍लालवार हीने आपले हयातीत गैरअर्जदार विमा कंपनीने ऑक्‍टोंबर 2010 मध्‍ये रुपये 1,00,000/- चा एक रक्‍कमी वीमा प्रिमियम 15 वर्षाकरीता 2 लाख रुपयांचे विमाछञ  देण्‍यात यईल व मुदतपूर्व मृत्‍यु झाल्‍यास त्‍या व्‍यतिरिक्‍त अॅडिशनल सम अॅशुअर्ड देण्‍यात येईल असे गैरअर्जदाराने सांगीतले व त्‍यामुळे मय्यत श्रध्‍दा वल्‍लालवार यांनी गैरअर्जदाराकडे 1 लाख रुपयाचा विमा प्रिमियम भरणा करुन पॉलिसी क्र.18075553 ऑक्‍टोंबर 2010 मध्‍ये काढली होती.  अर्जदाराची पत्‍नीचा विमा क्‍लेमकरीता अर्जदार हे वारसदार आहेत, ही बाब दोन्‍ही पक्षांना मान्‍य असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्‍द होते.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. 2 बाबत ः-

 

6.          अर्जदाराने दाखल नि.क्र.4 वर दस्‍त क्र.अ-13 वर पडताळणी करतांना असे दिसून आले की, गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराचा विमा क्‍लेम फक्‍त रुपये 83,698.72 मंजूर केला होता.  सदर तक्रारीमध्‍ये गैरअर्जदाराने अस नमूद केले होते अर्जदाराचे पत्‍नीनेदि.19.10.2010 ला सदर पॉलिसीचे प्रस्‍तावामध्‍ये विचारलेले प्रश्‍न क्र.29 व 31 चे उत्‍तर नकारार्थी दिले होते व त्‍यांचे आजाराविषयी महत्‍वपूर्ण सुचना लपविली होती.  गैरअर्जदाराने नि.क्र.16 वर दस्‍त क्र.अ-1 ची पडताळणी करतांना  परिच्‍छेद क्र.11 मध्‍ये असे दिसले की, मय्यत ही ITP with Anemia with anasorica Paim.HT आजाराने ग्रसीत होती व त्‍याचे उपचार दि.26.11.2010 ते 31.3.2011 पर्यंत डॉ.संजय मस्‍के, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर एरिया हॉस्‍पीटल कडून घेत होती.  तसेच, परिच्‍छेद क्र.8 मध्‍ये अर्जदाराचे मृत्‍युचे कारण हृदयविकार झाले असे नमूद आहे.  सदर तक्रार गैरअर्जदाराने नि.क्र.14 वर दाखल दस्‍त क्र.अ-1 मधील दिलेली माहिती व चौकशी रिपोर्ट सिध्‍द करण्‍याबाबत  कोणत्‍याही साक्षीपुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही.  तसेच अर्जदाराने पॉलिसी प्रस्‍तावामधील विचारलेल्‍या प्रशनाचे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात आले होते या संदर्भात सुध्‍दा गैरअर्जदाराने कोणताही साक्षी पुरावा प्रकरणात दाखल केलेले नाही.

 

           

 

मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने दिलेल्‍या न्‍यायनिवाड्यानुसार

 

REVISION PETITION No. 1304 of 2014

(Against the order dated 03.02.2014 in First Appeal No.634 of 2013 of the State Commission, Haryana)

M/s. ICICI Prudential Life Insurance Company Ltd. –V/s.- Mrs. Veena Sharma and others

PRONOUNCED ON: 05.11.2014

 “The onus to prove that the deceased had obtained policy by suppressing facts relating to his illness was on the Corporation, but no tangible evidence was produced on its behalf to prove that the deceased was suffering from serious liver ailment at the time of taking policy and he deliberately suppressed this fact.  Undisputedly, the policy was issued on 29.3.1998.  The deceased must have filled the proformasome time prior to that date.  Therefore, the Corporation ought to have produced evidence to prove that as on the date of filing the proforma, the deceased was suffering from any identified ailment and he had intentionally written ‘no’ against item Nos. (a) to (d) of clause 11.  This the Corporation had failed to do.”  

 

7.        सदर प्रकरणात सुध्‍दा गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा क्‍लेम नाकारण्‍याचे कारण ‘’ आजाराविषयी महत्‍वपूर्ण सुचना लपविली’’  ही बाब गैरअर्जदाराने सिध्‍द करायचे होते.  त्‍यासंदर्भात गैरअर्जदाराने कोणताही साक्षीपुरावा प्रकरणात दाखल केला नसल्‍यामुळे गैरअर्जदाराचे बचावाकरीता मांडलेला पक्ष मंचाचे मताप्रमाणे ग्राह्य धरण्‍यासारखे नाही.  मंचाच्‍या मताप्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदाराला विम्‍याची पूर्ण रक्‍कम नाकारुन अर्जदाराप्रती न्‍युनतम सेवा व अनुचीत व्‍यापार पध्‍दतीची अवलंबना केलेली आहे असे सिध्‍द होते.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. 3 बाबत ः-

 

8.          मुद्दा क्रं. 1 व 2 च्‍या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्‍ण्‍यात येत आहे.

 

   अंतीम आदेश

 

(1)   अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

(2)   गैरअर्जदाराने अर्जदारास विमा पॉलिसी क्र.18075553 ची विमा क्‍लेमची रक्‍कम आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 45 दिवसांचे आंत द्यावे.

(3)   गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्‍या शारीरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 45 दिवसांचे आंत द्यावे.     

(4)   आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी.. 

 

चंद्रपूर

दिनांक – 17/11/2014

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kirti Gadgil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.