::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 15/01/2015)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार याने तिच्या टाटा डीएलएस इंडिका कार करीता गैरअर्जदार क्रं. 1 कडून दि. 3/10/08 ते दि. 2/10/09 पर्यंतचे कालावधीकरीता वाहनाची विमा पॉलिसी काढली होती. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, सदर वाहन खरेदी करीता गैरअर्जदार क्रं. 2 कडून अर्जदाराने कर्ज घेतले होते. दि. 18/3/09 रोजी अर्जदाराची वरील नमुद असलेले वाहन घरासमोर उभे असतांना चोरी झाले. त्याकरीता अर्जदाराने दि. 20/3/09 रोजी बल्लारपूर येथे पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली. अर्जदाराने दि. 14/4/11 रोजी गैरअर्जदार क्रं. 1 कडे रितसर अर्ज व दस्ताऐवजासोबत विमा दावा दाखल केला. गैरअर्जदार क्रं. 2 ला अर्जदार उर्वरित हप्ता गाडी चोरी झाल्यामुळे व त्याचा विमा क्लेम गैरअर्जदार क्रं. 1 कडून वेळेवर न मिळाल्यामुळे कर्जाचीरक्कम व त्यावरील व्याज भरु शकले नाही. सदर परिस्थिती गैरअर्जदार क्रं. 2 ला माहीत असून सुध्दा अर्जदाराला पञ व नोटीस पाठवून कर्ज व त्यावरील व्याज भरण्याकरीता व कार्यवाही करण्याची धमकी देण्यात येत होती. अशा प्रकारे गैरअर्जदार क्रं. 1 व 2 ने अर्जदाराप्रति न्युनतम सेवा दिली आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 ला सदर विमा क्लेम मागण्याकरीता दि. 22/2/12 रोजी नोटीस पाठविला त्यावर गैरअर्जदार क्रं. 1 ने कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्रं. 1 ने टाटा इंडिका कारचे उतरविलेला विमा रक्कम रु. 5,00,000/- दि. 19/3/09 पासून व्याजासह अर्जदारास देण्यात यावे व सदर रक्कम गैरअर्जदार क्रं. 1 पासून मिळाल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 ला देणे असलेली रक्क्म रु. 98,511/-, अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 ला देण्याचे आदेश दयावे. तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार क्रं. 1 व 2 विरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 हजर होवून नि. क्रं. 21 वर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 1 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदार क्रं. 1 चे विरुध्द लावलेले आरोप हे खोटे असून नाकबुल आहे. अर्जदाराने क्लेम दाखल केल्यावर गैरअर्जदार क्रं. 1 यांनी नियमाप्रमाणे फायनल (अ) मंजूर झालेली प्रत मागितली व ती प्रत अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 कडे दाखल केली नाही तसेच अर्जदाराने सदर गाडीची कोणतीही काळजी न घेता कंम्पाऊडचे बाहेर राञी पार्क केली, सदर कार अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे चोरी गेली. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 शी सदर क्लेम नाकारलेला नाही अर्जदाराने कोणतेही कारण नसतांना सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे ती तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
4. गैरअर्जदार क्रं. 2 हजर होवून नि. क्रं. 12 वर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 2 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 चे विरुध्द तक्रारीत लावलेले आरोप हे खोटे असून नाकबुल आहे. अर्जदार भारतीय रिजर्व बॅंक ऑफ इंडिया यांनी दिलेल्या नियमाचे पालन करणे गैरअर्जदार क्रं. 2 ला बाध्य आहे गैरअर्जदार क्रं. 2 ने अर्जदारापासून सदर कारचे उर्वरित कर्ज व्याजासह रु. 1,86,584.04/- घेणे आहे. या परिस्थितीत गैरअर्जदार क्रं. 2 हे अर्जदारापासून सदर कर्जाची रक्कम मागणी करुन कोणतीही सेवेत ञुटी अर्जदाराप्रति देत नाही. म्हणून गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारास देण्यात येणा-या विमा क्लेमची रक्कम गैरअर्जदार क्रं. 2 ला देण्यात यावी कारण कार वर कर्ज देणारी कंपनी वास्तविक कारची मालक असते अशी मागणी केली आहे.
5. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
(3) गैरअर्जदार क्रं. 2 ने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? नाही.
(4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
6. अर्जदार याने तिच्या टाटा डीएलएस इंडिका कार करीता गैरअर्जदार क्रं. 1 कडून दि. 3/10/08 ते दि. 2/10/09 पर्यंतचे कालावधीकरीता वाहनाची विमा पॉलिसी काढली होती. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, सदर वाहन खरेदी करीता गैरअर्जदार क्रं. 2 कडून अर्जदाराने कर्ज घेतले होते. ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होते असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 कडे रितसर सदर वाहनाकरीता विमा दावा क्रं. 206/068171 दस्तऐवजांसोबत सादर केलेला होता ही बाब अर्जदाराने दाखल नि. क्रं. 5 वर दाखल दस्ताऐवजांवरुन सिध्द होते म्हणून गैरअर्जदार क्रं. 1 चे असे म्हणणे कि, अर्जदाराने सदर विमा दाव्याकरीता दस्ताऐवजांची पुर्तता केली नाही हे ग्राहय धरण्यासारखे नाही. गैरअर्जदार क्रं. 1 ने कोणतेही ठोस कारण नसल्याने अर्जदाराचा विमा दावा प्रलंबित ठेवलेला आहे ही गैरअर्जदार क्रं. 1 ची अर्जदाराप्रति न्युनतम सेवा दर्शविली आहे असे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
8. गैरअर्जदार क्रं. 2 ने अर्जदाराला सदर वाहनाकरीता कर्ज दिले होते व भारतीय रिजर्व बॅंकेच्या नियमानुसार गैरअर्जदार क्रं. 2 ला अर्जदाराकडून सदर रक्कम मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. गैरअर्जदार क्रं. 2 ने अर्जदाराकडून उर्वरित कर्जाची रक्कम करीता मागणी केली किंवा पञाव्दारे सुचना दिली ही बाब गैरअर्जदार क्रं. 2 ने नियमानुसार केली असून अर्जदाराचे प्रति कोणतीही न्युनतम सेवा दिली नाही असे सिध्द होते सबब मुद्दा क्रं. 3 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
9. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारास विमा क्लेमची रक्कम रु. 5,00,000/-
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावे.
(3) अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी गैरअर्जदाराने रु.
5,000/- व तक्रारीचा खर्च 2,500/- रु. आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45
दिवसाचे आत करुन दयावे.
(4) गैरअर्जदार क्रं 2 चे विरुध्द कोणताही आदेश पारीत करण्यात येत नाही.
(5) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 21/01/2015