जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
वसुली अर्ज क्रमांक : 131/2011.
आदेश दिनांक : 17/04/2012.
श्रीमती आशा हनुमंत चव्हाण, रा. सवत-गव्हाण,
ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं., तिसरा मजला,
चेंबर 4, नरिमन पॉईंट, मुंबई.
2. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि., तिसरा मजला,
संगम प्रोजेक्ट कमर्शियल कॉम्प्लेक्स, संगम पुलाजवळ,
डॉ. आंबेडकर रोड, पुणे – 411 001. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
निकालपत्र
सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. खालीलप्रमाणे नमूद अर्ज दि.15/9/2011 रोजी मंचामध्ये दाखल केला आहे. तथापि, अॅडमिशन स्टेजला आजतागायत तक्रारकर्ता, त्यांचे विधिज्ञ अथवा अधिकारपत्र चालविणार किंवा पक्षकार यांनी कोणीही हजर राहून युक्तिवाद केलेले नसल्याने अर्ज पुढे चालविण्यास तयार / उपस्थित झालेले नाहीत. मा. राष्ट्रीय आयोग, दिल्ली यांचे दि.31/5/2005 रोजीचे अधिनियमातील कलम 30 (अ) व कलम 9 (8) प्रमाणे दाखल तक्रार-अर्ज 21 दिवसात दाखल करुन घेणे आवश्यक असल्याने, अद्याप दखल न घेतल्याने सदर तक्रार-अर्ज आहे, त्या स्टेजवरुन काढून टाकण्यात आला आहे.
2. नोटीस बोर्डवर नोटीस लावणेत आली होती, तरीही दखल घेतलेली नाही.
3. यदाकदाचित, तक्रारदार यांना सदर अर्जाची आवश्यकता आहे, असे वाटल्यास नवीन अर्ज दाखल करण्याची मुभा राखीव ठेवणेत आली आहे.
4. अन्य कोणतेही आदेश नाहीत.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/17412)