तक्रारदार : वकील श्री.आंबेरकर हजर.
सामनेवाले : --
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*--*-
तक्रार दाखल करुन घेण्यासंबधीचा आदेश
1. सा.वाले ही विद्युत पुरवठा करणारी कंपनी आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारांचा दुकान गाळा असून त्यामध्ये तक्रारदार आपला व्यवसाय करीत आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून त्या दुकानाच्या गाळयाकरीता विद्युत पुरवठा घेतला होता. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना भरमसाठ रक्कमेचे विद्युत बिल दिले. व त्या बिलाचा भरणा करणेकामी सा.वाले हे तक्रारदारांवर दबाव टाकू लागले. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे त्या बद्दल पत्र पाठविले व आपला आक्षेप नोंदविला. परंतु सा.वाले यांनी बिलामध्ये दुरुस्ती केली नाही व आपल्या मागणीमध्ये फरक केला नाही.
2. तक्रारदारांच्या वकीलांनी दाखल सुनावणीकामी युक्तीवाद केला की, तक्रारदारांनी तक्रारीमध्ये असे मान्य केले आहे की, तक्रारदार त्या दुकान गाळयामध्ये व्यवसाय करीत आहेत. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत सा.वाले यांच्या कडून प्राप्त झालेल्या विद्युत देयकाची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये सा.वाले तक्रारदारांना वाणिज्य व्यवसायाकामी(Commercial )
उद्देशाकरीता विद्युत पुरवठा करीत होते अशी नोंद आहे.
3. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी)(ii ) प्रमाणे एखाद्या व्यक्तीने वाणिज्य व्यवसायाकामी सेवा स्विकारली असेल तर ती व्यक्ती ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे ग्राहक या संज्ञेत बसत नाही. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या दुकान गाळयाकरीता जिथे तक्रारदार व्यवसाय करतात त्या जागेकरीता विद्युत पुरवठा केलेला आहे व त्या जागेवरील मिटरमध्ये दाखविण्यात येणा-या नोंदी बद्दल तक्रारदारांचा वाद आहे. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना वाणिज्य व्यवसायाकामी पुरविलेल्या सेवेबद्दल तक्रारदारांनी वाद उत्पन्न केलेला असल्याने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(डी)(ii ) प्रमाणे तक्रारदार सा.वाले यांचे ग्राहक ठरत नाहीत.
4. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये कोठेही ते सदरहू व्यवसाय आपल्या उपजिविकेसाठी व स्वयंरोजगार म्हणून हा व्यवसाय करीत आहेत असे कथन केलेले नाही. सहाजिकच प्रस्तुत ग्राहक तक्रार निवारण मंचास तक्रारदारांची तक्रार सुनावणीकामी दाखल करुन घेण्याचा अधिकार नाही.
5. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्र.71/2012 दाखल करुन घेण्यात येत नाही व ती ग्राहक संरक्षण कायदा कलम 12(3) प्रमाणे रद्द करण्यात येते.
2. आदेशाच्या प्रमाणित प्रती तक्रारदारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.