तक्रार क्रमांक – 515/2009 तक्रार दाखल दिनांक – 01/08/2009 निकालपञ दिनांक – 17/04/2010 कालावधी- 00 वर्ष 08 महिना 16 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री.अर्जुन कृष्णा कुमार जैसवाल बि-6, डफोडिलअपार्टमेंट, कॅथलीक बँकेच्या समोर,झेंडा बाजार, वसई रोड(पश्चिम), जिल्हा - ठाणे. .. तक्रारदार विरूध्द 1. दि. चेअरमन रिलायन्स इन्फोकॉम लि., ए ब्लॉक, पहिला मजला, धिरुभाई अंबानी नॅलेज सिटी, ठाणे बेलापुर रोड, कोपर खैरने, नवी मुंबई 400 709. 2.प्रोपराईटर- श्रीजी कम्युनिकेशन एम.जी.रोड,पारनाका, वसई रोड(पश्चिम), जिल्हा - ठाणे 401 201. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील – अध्यक्षा सौ. भावना पिसाळ - सदस्या श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीःतक्रारकर्ता स्वतः वि.प स्वतः आदेश (पारित दिः 17/04/2010) मा. सदस्य सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्री.अर्जुन जयसवाल यांनी चेअरमन रिलायन्स इन्फोकॉम लि., व इतर यांचे विरध्द दाखल केली आहे यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकारकडुन फसवुन दिलेल्या SIM कार्डचे रु.147/- परत मागितले असुन नुकसान भरपाई रु.50,000/- मागितली आहे. 2. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार नं.2 डिलर कडुन GSM SIM रु.147/- एवढी रक्कम देऊन विकत घेतले होते व त्यावर तक्रारदार यांनी रु.5/-चा टॉकटाईम पुढील 3 महिने मिळणार लाईफ टाईम व्हॅलीडीटी व रात्रीचे रिलायन्स वर केलेले कॉल्स फ्री असणार या विरुध्द पक्षकार नं.2 यांनी घातलेल्या अमिषामुळे विकत घेतले. तसेच सदर नंबरचे दिलेले SIM हे .. 2 .. आगोदरच रिया मोबाईल सर्व्हीसेस यांनी दुस-याच ग्राहकास श्री.दिपक रा.मिश्रा यांना विकलेले होते व तरीही सदर नंबरचे दुसरे सीम. GSM नं.09022841863 व CDMA नं.9322186758 तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार नं.2 यांनी विकले अशा प्रकारे विरुध्द पक्षकार नं.2 यांनी दोषयुक्त सेवा दिली (unfair trade practice) असल्यातुळे तक्रारकर्ता यांनी सदर वादीत SIM ची खरेदी केलेली रक्कम रु.147/- परत मागितली आहे. विरुध्द पक्षकार नं.1 यांनी त्यांची प्रथम हरकत मंचापुढे दाखल केली आहे. परंतु त्यांचे कोणतेही शपथपत्र दाखल केलेलेच नाही. यामध्ये इंडियन टेलिग्राफ अक्ट 1885 प्रमाणे तक्रार ग्राहक मंचाला चालवता येणार नाही असे म्हटले आहे व तक्रारकर्ता हे त्यांचे ग्राहक नाहीत असे म्हणणे मांडले आहे. मंचाच्या मते तक्रारकर्ता ग्राहक आहेत कारण विरुध्द पक्षकार नं. 1 यांच्या वितरकाने सदर सीम तक्रारकर्ता यांस विकले आहे. विरुध्द पक्षकार नं. 2 यांना मंचाने नोटीस बजावणी करुनही ते मंचापुढे हजर न राहिल्यामुळे त्यांचे विरुध्द मंचाने दि.28/10/2009 रोजी 'नो डब्ल्यु एस' आदेश पारीत केला त्यामुळे एकतर्फा चौकशी हाऊन सदर प्रकरणात हे मंच पुढील अंतीम आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश 1. तक्रार क्र. 515/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत असुन विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ती यास तक्रारीचा खर्च रु.200/- (रु.दोनशे फक्त) द्यावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यास त्यांनी विकलेले सिमकार्ड परत घेऊन त्याची घेतलेली किंमत रु.147/- (रु.एकशे सत्तेचाळीस फक्त) तक्रारकर्तायास परत करावी. वरील आदेशाचे पालन ह्या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 1 महीन्याच्या आत परत करावेत. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यास मानसिक त्रासाचे रु. 200/-(रु. दोनशे फक्त) द्यावेत. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 17/04/2010
ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ) (सौ. शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे D:\judg.aft.02-06-08\Pisal Madam
|