निकालपत्र :- (दि.21/10/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदार उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्या मुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदाराने त्याचे मालकीचे हिरो होंडा स्प्लेंडर MH-09-BD-7167 युनिक अॅटोमोबाईलचे भीर्डी अॅटोमोबार्इ्रल जयसिंगपूर यांचेकडे रु.41,250/- रक्कमेच खरेदी केली होती. सदर दुचाकीचा इंजिन नं.07एल15ई01255 असून सदर दुचाकीचा विमा पॉलीसी क्र.17061172312544375 अन्वये दि.16/01/2008 ते 15/01/2009 चे कालावधीकरिता उतरविलेला होता. तयासाठी रु.883/- इतका विमा हप्ता तक्रारदाराने अदा केलेला होता. वाहनाची आयडी व्हॅल्यू रु.38,668/- होती. नमुद पॉलीसी ही पॅकेज पॉलीसी होती. दि.23/07/2008 रोजी तक्रारदार त्याचे वर नमुद वाहनावरुन के;कांतीलाल आणि कंपनी, गांधी रोड, जयसिंगपूर येथे त्याचे डयूटी करणेसाठी गेलेला होता. तो 5.00 वाजता घरी आला. घराचे समोर त्याने त्याची दुचाकी लॉक करुन घरात गेला. 5 ते 10 मिनीटांनी तो घरातून बाहेर आला त्यास त्याचे व्यक्तीगत कामासाठी बाहेर जावयाचे होते. बाहेर त्याची दुचाकी लावलेल्या जागेवर नव्हती. इकडे तिकडे शोधाशोध केली, शेजा-यांना विचारले. तदनंतर दोन दिवस शोधाशोध करुन सदर वाहन न मिळालेने भिर्डी अॅटो यांना सदर घटनेबाबत कळवले. भिर्डी यांनी त्यावेळी सामनेवाला यांना त्याची कल्पना देतो असे सांगितले. तक्रारदाराने वाहन चोरी झालेबाबतची तोडी माहिती पोलीस स्टेशनला दिली असता त्यांनी अजूनही वाहनाचा शोध घ्या व मिळाले नाही तर तक्रार नोंदवावी असा सल्ला दिला. तक्रारदारांनी शोधाशोध करुनही वाहन न मिळालेने सरतेशेवटी दि.16/09/2008 रोजी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. जागेचा पंचनामा, जबाब घेतलेले आहेत. चोरीचा तपास केलेला आहे. मात्र आरोपी मिळून आलेले नाहीत. तक्रारदाराने लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे, पोलीस पेपर्स तसेच वाहनाच्या दोन्ही मूळ किल्ल्या सामनेवालांकडे जमा केलेल्या आहेत. दि.01/10/2009 रोजी सामनेवाला यांनी पॉलीसीच्या अट क्र.1 नुसार सदर घटना घडलेपासून 1 महिनेचे आत सामनेवाला कंपनीस लेखी सुचना दिली नसलेचे कळवलेले आहे. मात्र सामनेवालांचे एजंट आशिष नरके हे चोरी घडलेनंतर 4 ते 5 दिवसांनी जयसिंगपूर येथे आले होते. त्यांना याबाबत कल्पना दिली होती. तसेच सामनेवाला यांनी दि.23/06/2008 रोजी चोरीची घटना घडलेली आहे. मात्र त्याची माहिती दि.24/09/2008 रोजी दिलेचे तक्रारदारास सुचना दिलेली आहे. यावरुन सामनेवाला हे तक्रारदाराने वेळेत सुचना दिली नसलेचे दाखवू इच्छितात. सदर कारणास्तव सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेने दि.13/10/2009 रोजी तक्रारदार स्वत: पुणे येथे जाऊन लेखी सुचना ताबडतोब का देता आली नाही याबाबत अर्ज दिलेला आहे. तक्रारदारास दि.14/10/2009 रोजी पत्र आलेले आहे. दि.08/11/2008 पर्यंत पोलीसांनी तपास करुनही चोर सापडू शकलेले नाहीत. त्यामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयसिंगपूर यांचेकडे समरी मंजूर करणेबाबत विचारणा केलेली आहे व दि.14/09/2009 रोजी समरी मंजूर झालेली आहे. सदर कागदपत्रे मिळवणे. तपास, संपर्क इत्यादी बाबींसाठी वेळ गेलेला आहे. तक्रारदार यांचा यामध्ये कोणताही आर्थिक फायदा घेणेचा हेतू नाही. केवळ लेखी सुचना वेळेत मिळाली नाही म्हणून तक्रारदाराचा क्लेम नाकारुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन नमुद वाहनाची आयडीव्ही व्हॅल्यू रु.38,668/-, मानसिक त्रासापोटी रु.10,000/-, संपर्क, प्रवास इत्यादी खर्चापोटी रु.3,000/-,नोटीस,वकील फी खर्चापोटी रक्कम रु.5,000/- असे एकूण रु.56,668/- तसेच तक्रारीचा खर्च इत्यादी रक्कम द.सा.द.शे.12 टक्के व्याजाने मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ फर्स्ट इन्फॉर्मेशन पत्र, चार्जशिट अंतिम अहवाल, गुन्हयाचे अ फायनल मंजूरीसाठी मा.दंडाधिकारी प्रथम वर्ग जयसिंगपूर यांचेकडे सादर केलेले पत्र, श्री पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सादर केलेले पत्र, जयसिंगपूर पोलीस स्टेशन यांचेकडील गु.र.नं.94/08 मध्ये दाखल कागदपत्रांची फेरिस्त, अनिल कांतीलाल बरडिया यांचा जबाब, पंचनामा, सामनेवाला यांची नियमावली, पॉलीसी, तक्रारदाराचे वाहनाचे टॅक्स पावती, टॅक्स इन्व्हाईस व आर.सी.बुक, सामनेवाला यांना वकील राहूल मगदूम यांचेमार्फत पाठविलेली वकील नोटीस, सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे पत्र, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना पाठविलेले पत्र, पोलीस स्टेशन जयसिंगपूर यांनी तक्रारदारांची फिर्यादीचा तपास केलेबाबत तक्रारदारास दिलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवालाने दाखल केलेल्या म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्य केले कथनाखेरीज परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तसेच सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात की, तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदाराची तक्रार मुदतीत नाही. त्यामुळे ती खर्चासह नामंजूर करणेत यावी. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, पॉलीसीच्या टर्म क्र.1 प्रमाणे घटना घडलेपासून एक महिनेचे आत लेखी सुचना कंपनीस दिलेली नाही. अशी सुचना देणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे तक्रारदाराने गाडी चोरीस गेलेची लेखी सुचना सामनेवाला कंपनीस दिलेली नाही. त्वरीत पोलीसांकडेही तक्रार नोंदवलेली नाही. कंपनीस सहकार्य केलेले नाही. दि.23/07/2008 रोजी चोरीची घटना घडलेली आहे व दि.24/09/2008 रोजी विलंबाने सामनेवाला यांना माहिती दिलेली आहे. प्रस्तुत पॉलीसीच्या अटीचा भंग केलेमुळे सामनेवालांची कोणतीही जबाबदारी येत नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विंनती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे व सामनेवालांचे वकीलांनी केलेला युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे का? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 व 2 :- सामनेवाला यांनी पॉलीसी मान्य केलेली आहे. तक्रारदाराने त्याचे मालकीचे हिरो होंडा स्प्लेंडर MH-09-BD-7167 युनिक अॅटोमोबाईलचे भीर्डी अॅटोमोबार्इ्रल जयसिंगपूर यांचेकडे रु.41,250/- रक्कमेच खरेदी केली होती. सदर दुचाकीचा इंजिन नं.07एल15ई01255 असून सदर दुचाकीचा विमा पॉलीसी क्र.17061172312544375 अन्वये दि.16/01/2008 ते 15/01/2009 चे कालावधीकरिता उतरविलेला होता. तयासाठी रु.883/- इतका विमा हप्ता तक्रारदाराने अदा केलेला होता. वाहनाची आयडी व्हॅल्यू रु.38,668/- होती. नमुद वाहन दि.23/07/2008 रोजी तक्रारदाराचे राहते ठिकाणावरुन सायंकाळी 5 वाजणेचे दरम्यान चोरीस गेले आहे. त्यासंबंधीचे पोलीस पेपर्स प्रस्तुत प्रकरणी दाखल आहेत. तसेच प्रस्तुत वाहनाच्या चोरीबाबत चोरांचा शोध न लागलेने गुन्हयाचे ‘अ’ फायनल मंजूरीबाबत दि.07/03/09 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर विभाग जयसिंगपूर प्रथम न्यायदंडाधिकारी, जयसिंगपूर यांना पाठवलेले अर्जावर दि.14/09/2009 रोजी समरी मंजूर झालेबाबतचा आदेश दिसून येतो. यावरुन नमुद वाहन चोरीस गेलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सामनेवाला यांनी 63 दिवस विलंबाने नमुद वाहनाचे चोरीची सुचना दिलेने दि.01/10/2009 चे पत्राने क्लेम नाकारला आहे. सदर वस्तुस्थितीचा विचार करता सदर वाहन चोरीसी घटना ही दि.23/07/08 रोजी घडलेली आहे. तक्रारदाराने दोन दिवस वाहनाची शोधाशोध केलेली आहे. सदर वाहनाचे चोरीची माहिती श्री भिर्डे यांना लगेच दिलेली आहे. भिर्डे यांनी सदर माहिती सामनेवाला यांना देतो असे तक्रारदारास आश्वासित केले होते. पोलीसांचे सल्लयाप्रमाणे वाहनाची शोधाशोध करुन मिळून न आलेने सरतेशेवटी फिर्याद दिलेली आहे. तक्रारदाराने चोरीची सुचना भिर्डे यांना दिलेचे शपथेवर नमुद केलेले आहे. तसेच तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रे पोलीस पेपर्स व वाहनाच्या मूळ दोन किल्ल्या सामनेवालांकडे जमा केलेचे सामनेवाला यांनी मान्य केलेले आहे. केवळ विलंबाने चोरीची सुचना दिली म्हणून सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारलेला आहे. वस्तुत: जनरल ट्रान्झॅक्शनचा विचार करता वाहनाच्या चोरीबाबत पोलीस त्वरीत तक्रार नोंदवून घेत नाहीत. वाहनाचा शक्यतो शोध घेऊन तदनंतरच वाहन खरोखरच चोरीस गेले आहे याची खात्री झालेनंतरच वाहन चोरीची फिर्याद नोंदवली जाते व तदनंतर तपास करुन चोर न सापडलेस गुन्हयाचे ‘अ’ फायनल मंजूरी घेतली जाते. सदर बाबीसाठी बराचसा कालावधी जातो. याबाबत सामनेवालांना सदर चोरीबाबतची योग्य कागदपत्रे व वाहनाच्या मूळ किल्ल्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे सदर वाहन चोरीस गेले आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. वादाचा मुद्दा आहे तो सामनेवाला यांना लेखी सुचना दिली नाही. तक्रारदार यांनी 63 दिवस विलंबाने कळवले आहे. सदर विलंबाने सुचना दिली यामध्ये तक्रारदाराचा कोणताही बेकायदेशिररित्या लाभ घेणेचा हेतू दिसून येत नाही. केवळ विलंबाने सुचना दिली म्हणून वाहन चोरीस गेले नाही असे म्हणणे चुकीचे आहे. तसेच कंडिशन क्र.1 मध्येही स्पष्टपणे कालावधीचा उल्लेख नाही. सदर मजकूर पुढीलप्रमाणे Notice shall be given in writing to the company immediately upon the occurrence of any accidental loss or damage in the event of any claim and thereafter the insured shall give all such information ad assistance as the Company shall require. Every letter claim writ summons and/or process or copy thereof shall be forwarded to the Company immediately on receipt by the insured. Notice shall also be given in writing to the Company immediately the insured shall have knowledge of any impending prosecution,inquest or fatal inquiry in respect of any occurrence which may give rise to a claim under this Policy. In case of theft of criminal act which may be subject of claim under this policy the insured shall give immediate notice to police and cooperate the company in securing the conviction of the offender.प्रस्तुत अटीचा विचार करता किती कालावधीत सुचना दयावी याची स्पष्ट नोंद नाही. तसेच प्रस्तुतची अट ही निर्णायक नसून दिशादर्शक आहे. यासाठी हे मंच खालील पूर्वाधार विचार घेत आहे. 2010 (1) CPR 219 MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, MUMBAI- Kamalabai Prakash Chavan Vs. The Authorised Signatory ICICI Lombard Insurance Co. Ltd. and Anr. F.A.NO.1052 of 2007 Decided on 5.10.2009- Consumer Protection Act, 1986-Sections 12 and 17-Group Personal Accident Insurance Policy Claim-Policy was obtained by State Government for farmers-Insured husband of complainant was a farmer and died in road accident-Claim was repudiated on ground of delayed intimation-District Forum accepted defence contention and dismissed complaint-Appeal-Claim was preferred after 106 days from death of deceased-Respondent ought not to have repudiated claim only because it was delayed by 106 days-Appellant held entitled to policy amount of Rs. 1,00,000/- with interest at 9% p.a. and cost Rs.2,000. 2007 NCJ 546 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – National Insurance Company Vs. Lajwanti Revision Petition No.3192 of 2005 Decided on 18.1.2005 Consumer Protection Act, 1986- Section 2(1)(g) 14(d) and 21(b) –Car stolen-Claim for insurance – Allowed-Appreciation of evidence-Case closed as car is untraceable –Theft not doubtful-Comprehensive in surence-Consideration of-Held-Warranting no interference in revisional jurisdiction-Revision dismissed. 2008 NCJ 788 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI- Oriental Insurance Company Vs. Prakash Devi- Revision Petition No2745 of 2003 Decided on 26.3.2008 – Insurance-Condition of policy-Justification of-Held-Policy conditions then not clear capable of more than one interpretation the interpretation beneficial to consumer should be adopted. सदरचा विलंब हा तक्रारदार नमुद पोलीस स्टेशनला गेलेला होता त्याने संबंधीत पोलीस स्टेशनला तोंडी तक्रार दिली होती. मात्र पोलीसांनी वाहनाचा पुरेसा शोध घेतलेनंतरच तक्रार दाखल करणेस सांगितले. तक्रारदार वारंवार विविध पोलीस स्टेशनला भेट देत होता. तसेच दैनिकामधूनही माहिती घेत होता व सरतेशेवटी दि.16/09/2008 रोजी त्याने तक्रार नोंदवलेली आहे. तसेच भिर्डी अॅटो जयसिंगपूर यांचेकडून त्याने वाहन घेतले असलेने त्याने भिर्डी यांनाही सदर चोरीची दोन दिवसात कल्पना दिली होती व भिर्डी यांनी सदर बाब सामनेवाला यांना कळवतो असे सांगितलेने तक्रारदार निश्चित राहिलेला आहे. सदर वस्तुस्थितीचा विचार करता व पॉलीसीचा मूळ हेतू विचारात घेता सामनेवाला कंपनीने सदर 63 दिवसांचा विलंब माफ करावयास हवा होता. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे वाहन चोरीस गेलेमुळे पॉलीसीच्या तक्रारदाराचे वाहनाचे नमुद आयडीव्ही व्हॅल्यू रु.38,668/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर क्लेम नाकारले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास सर्व्हे रिपोर्टप्रमाणे रक्कम रु.38,668/- (रु.अडतीस हजार सहाशे अडूसष्ट फक्त) दि.03/05/2011 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजदराने अदा करावेत. 3) सामनेवाला यांनी केलेल्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) तक्रारदारास दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |