Maharashtra

Akola

CC/15/230

Ku.Rajani Kisanrao Mahalle - Complainant(s)

Versus

Reliance General Insurance through Divisional Manager - Opp.Party(s)

Narendra Dhut

07 Jul 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/230
 
1. Ku.Rajani Kisanrao Mahalle
R/o.8/9,MIG 64, V H B Colony, Gorakshan Rd.Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Reliance General Insurance through Divisional Manager
Divisional Office,Ayodhya Bldg.Bajaj Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.R. LONDHE PRESIDENT
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 HON'BLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 07 Jul 2016
Final Order / Judgement

::: आ दे श :::

( पारीत दिनांक :  07/07/2016 )

 

आदरणीय सदस्‍य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार

 

1.        ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर  करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .

       तक्रारकर्ती क्र. 1 हीने इंडीगो इसीएस जीएलएक्स कार क्र. एमएच 30 एफ 878 ही कार घरगुती वापराकरिता विकत घेतली व सदर कारचा विमा विरुध्दपक्ष यांचेकडून काढला त्याचा पॉलिसी क्र. 1708542311002072 असून, सदर पॉलिसी दि. 16/10/2014 ते 15/10/2015 पर्यंत अस्तीत्वात होती.  तक्रारकर्ती क्र. 1 व तिचे पती तक्रारकर्ता क्र. 2 हे दि. 14/5/2015 रोजी महाबळेश्वर येथे जात असतांना अहमदनगर ते पुणे रोडवर दुपारी 2.45 वाजता राज्य परिवहन महामंडळाची बस क. एमएच 07 सी 9120 ने तक्रारकर्त्याच्या वाहनाला पाठीमागुन धडक दिली व त्यामुळे सदर कार आडवी होऊन कारचे नुकसान झाले. सदर अपघाताची माहीती लगेच तक्रारकर्ता क्र. 2 यांनी सुपा पोलीस स्टेशन अहमदनगर यांना दिली व त्यांनी घटनास्थळ पंचनामा केला. तक्रारकर्ता क्र. 2 यांनी सदर अपघाताबद्दल विरुध्दपक्ष  यांना टोल फ्री नंबरवर माहीती दिली व त्यांनी तक्रारकर्त्यास भ्रमणध्वनीवर क्लेम नंबर दिला व श्री विक्रम मांडपे यांनी सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केली.  तक्रारकत्यांनी दि. 17/5/2015 रोजी सदर कार रेनबो स्प्रेज अकोला यांना दाखविली व त्यांनी रु. 91,690/- चे कोटेशन दिले.  त्याच दिवशी सर्व्हेअर यांनी कारची तपासणी केली व कार दुरुस्त करण्याकरिता सांगीतले.  सदर कारच्या दुरुस्ती व स्पेअरपार्ट खर्चाकरिता तक्रारकर्त्याने एकूण रु. 71,279/- दि. 22/6/2015 रोजी अदा केले.  सदर खर्चाबाबतचा क्लेम मिळण्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाशी संपर्क साधला, त्यानंतर श्री चांडक यांनी कारची रेनबो स्प्रेज अकोला येथे येवून पाहणी केली.  दि. 22/6/2015 रोजी ईमेलद्वारे विरुध्दपक्ष यांनी रु. 41486/- चे असेसमेंट पाठविले व त्यानंतर दि. 26/6/2015 ला ईमेलद्वारे रु. 43,019/- चे असेसमेंट पाठविले.  तक्रारकर्त्याला सदर क्लेम मान्य नाही, असे फोनवर सांगितले तरी सुध्दा विरुध्दपक्षाने दि. 29/6/2015 ला सदर रक्कम तक्रारकर्ती क्र. 1 चे बँक खात्यात ऑनलाईन वळते केले.  तक्रारकर्त्यांनी सदर कार दुरुस्तीकरिता रु. 71,279/- खर्च केले.  परंतु विरुध्दपक्ष यांनी रु. 43,019/- चा दावा मंजुर करुन ती रक्कम तक्रारकर्ती क्र. 1 च्या खात्यात वळती केली.  अशा प्रकारे विरुध्दपक्ष यांनी सेवा देण्यास न्युनता दर्शविली  व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे.  तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन  विनंती केली आहे की, तक्रार मंजुर व्हावी व विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यांना फरकाची रक्कम रु. 28,260/- अदा करावी.  मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 25,000/- व प्रकरणाचा खर्च रु. 10000/- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यांना द्यावा.

            सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 07 दस्‍तऐवज पुरावे म्हणून  जोडण्‍यात आले आहेत.

विरुध्‍दपक्ष यांचा लेखीजवाब :-

2.    विरुध्दपक्ष यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे.  त्यानुसार त्यांनी तक्रारीतील आरोप नाकबुल करुन असे नमुद केले की,  तक्रारकर्त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्याची सुचना मिळाल्यावर विरुध्दपक्ष यांनी कंपनीच्या अधिकृत व्यक्तीमार्फत  वाहनाची पाहणी केली.  तक्रारकर्त्याने दुरुस्तीकरिता किती खर्च लावला यापेक्षाही प्रत्यक्ष गाडीचे अपघातामध्ये किती नुकसान झाले, ही बाब अत्यंत महत्वाची आहे.  विमा कायदा व पॉलिसी अटीनुसार विमा नुकसान अदा करण्याबाबत वजावटी करिता कायदेशिर जे नियम आहेत तेच विम्याच्या करारामध्ये अंतर्भुत आहेत त्याप्रमाणे नुकसानग्रस्त गाडीचा सर्व्हे करुन, सुटे भागांची किंमत व खराब झालेल्या सुटे भागाची किंमत, तसेच सुट्या भागावर  आकारण्यात येणारा घसारा इत्यादी बाबी लक्षात घेवून  नुकसान ठरविण्यात येते. प्रस्तुत प्रकरणात सुट्या भागांची किंमत रु. 36,895, खराब सुटे भागांची किंमत रु. 2,863.90 सुटे भागावर आकारलेला घसारा वजा 8098.85 व सुटे भागांची विमा देय रक्कम रु. 25,932.25 आकारण्यात आली.  तसेच डेंटींग पेंटींग भरपाईची वजावट अशी की, पेंटींगची एकूण रक्कम रु. 15,150/- पेंटींगची मजुरी 11,362.50 पेंटींगचे सामान 2,787.50 पेंटींगच्या सामानावरील घसारा वजा 1893.75, व पेटींगची निव्वळ देय भरपाई रु. 13,256.25/-  तसेच सुट्या भागांची देय मजुरी 4830/-  व अनिवार्य अतिरिक्त वजावट रु. 1000/- या प्रमाणे तक्रारकर्तीस रु. 43,019/- अदा केले.  विमा करारानुसार वेगवेगळया सुट्या भागांवर विमा अटी व तरतुदीनुसार ज्या प्रमाणात घसारा लागतो तो घसारा वजा करुनच नुकसान भरपाई देय ठरते.  त्यामुळे वरील प्रमाणे वजावट केल्यावर विरुध्दपक्षाने दिलेली रक्कम योग्य आहे व म्हणून विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. 

3.   त्यानंतर  तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल केले व लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद  केला.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

4.        सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार, सोबत दाखल केलले सर्व दस्तएवेज,  विरुध्दपक्ष यांचा लेखी जबाब, तक्रारकर्त्याचे प्रतिउत्तर, तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलेाकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला तो येणे प्रमाणे. 

     तक्रारकर्तीने ऑक्टोबर 2012 मध्ये टाटा मोटर्स लि. उत्पादित इंडीगो इसीएस जीएलएक्स कार क्र. एमएच 30 एफ 878 ही कार घरगुती वापराकरिता विकत घेतली.  सदर कारचा विमा विरुध्दपक्ष यांचे कार्यालयाकडून काढला त्याचा पॉलिसी क्र. 1708542311002072 असून पॉलिसी दि. 16/10/2014 ते 15/10/2015 पर्यंत अस्तीत्वात आहे.  सदर पॉलिसीचे दस्त क्र. अ-2  दाखल केले आहे.  त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाची ग्राहक आहे, हे सिध्द होते.

        सदर कारचा अपघात अहमदनगर ते पुणे रोडवर दि. 14/5/2015 रोजी झाला व अपघाताची माहीती तक्रारकर्ते क्र. 2 यांनी पोलिस स्टेशन अहमदनगर यांना दिली व पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. सदर घटनेची माहीती भ्रमणध्वनीद्वारे विरुध्दपक्ष यांना दिली व विरुध्दपक्षाने क्लेम नंबर तक्रारकर्त्यास दिला.  सदर दस्त तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केले आहे.  सदर कार दि. 17/5/2015 रोजी दुरुस्तीसाठी रेनबो स्प्रेज, अकोला येथे दाखविली व त्यानी रु. 91,660/- चे कोटेशन दिले.  त्याच दिवशी श्री विक्रम मांडपे सर्व्हेअर यांनी कारची तपासणी करुन व फोटो काढून कोटेशनची मुळ प्रत घेवून गेले आणि रेनबो स्प्रेज येथे दरुस्ती करण्याकरिता सांगितले. सदर कारचे अस्सल स्पेअरपार्ट रु. 44,729/- चे खरेदी करुन व रेनबो स्प्रेज यांना रु. 26,550/- अदा केले.  असे एकूण रु. 71,279/-  तक्रारकर्ती क्र. 1 चे पती, तक्रारकर्ता क्र. 2 यांनी अदा केले.  सदर दस्त प्रकरणात दाखल केले आहे.  श्री चांडक यांनी कारची रेनबो स्प्रेज अकोला येथे येवून पाहणी केली व तपासणी रिपोर्ट विरुध्दपक्षाला पाठवून देतो असे सांगितले व त्यानंतर तक्रारकर्ता क्र. 2 यांनी खर्चाची मुळ बिले कुरीयरद्वारे विरुध्दपक्ष यांना पाठविली. 

     विरुध्दपक्ष यांनी दि. 22/6/2015 ला रु. 41,486/- चे असेसमेंट पाठविले व इतका कमी क्लेम कसा काढला, असे विचारले असता, परत रु. 43,019/- तक्रारकर्तीच्या खात्यात जमा केले.  तक्रारकर्त्यानी सदर कार दुरुस्तीकरीता एकूण रु. 71,279/- खर्च केलेले आहेत व विरुध्दपक्ष यांनी केवळ तक्रारकर्तीला रु. 43,019/- अदा केले.  या बाबत विरुध्दपक्षाला विचारणा केली असता कोणतेही समर्पक उत्तर विरुध्दपक्ष यांनी दिले नाही.  त्यामुळे उर्वरित रक्कम रु. 28,260/- ची मागणी तक्रारकर्ते करीत आहेत.

     विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने कारचे अपघातात नुकसान झाल्याची माहीती दिल्यानंतर कंपनीने अधिकृत सवर्हेअरकडून नुकसानग्रस्त गाडीची पाहणी करुन खर्चाचा अंदाज घेतला.  तक्रारकर्त्याने दुरुस्तीकरिता किती खर्च लावला यापेक्षाही प्रत्यक्ष गाडीचे अपघातामध्ये किती नुकसान झाले, ही बाब अत्यंत महत्वाची आहे. पॉलिसी अटीनुसार विमा नुकसानीचा सर्व्हे करुन, सुटे भागांची किंमत व खराब झालेल्या सुटे भागाची किंमत तसेच सुट्या भागावर  आकारण्यात येणारा घसारा इत्यादी बाबी लक्षात घेवून  नुकसान ठरविण्यात येते. त्यानुसार सुट्या भागाच्या नुकसान भरपाईचे रु. 25,932.25, डेंटींग पेंटींगच्या भरपाईचे रु. 13,256.25, सुट्या भागांची देय मजुरी रु. 4830 व अनिवार्य अतिरिक्त वजावट रु. 1000/- असे मिळून रु. 43,019/- तक्रारकर्तीला अदा केले आहेत. त्यामुळे रु. 71,279/- चे इन्व्हाईस व फरकाची रक्कम रु. 28,260/-  विमा करारानुसार देय लागत नाही.  विरुध्दपक्षाने अदा केलेली रक्कम रु. 43,019/- योग्य आहे व म्हणून विरुध्दपक्ष यांनी सेवेत त्रुटी दर्शविलेली नाही व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला नाही.

          उभय पक्षांचा युक्तीवाद व दाखल दस्तऐवज यांचे काळजीपुर्वक अवलेाकन करुन मंच या निष्कर्षाप्रत पोहचले आहे की, तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडून कारची विमा पॉलिसी काढली होती.  सदर कारचा, पॉलिसीच्या वैध कालावधीमध्ये अपघात झाला व दुरुस्तीकरीता तक्रारकर्तीला एकूण रु. 71,279/- खर्च आला.  त्यापैकी विरुध्दपक्षाने रु. 43,019/- तक्रारकर्तीला अदा केले.  परंतु उर्वरित रक्कम रु. 28,260/- कमी दिल्यामुळे  तक्रारकर्तीने सदर केस मंचात दाखल केली आहे.  यावर विरुध्दपक्षाचे म्हणणे असे आहे की, सदर गाडीच्या अपघाताची माहीती मिळण्यानंतर लगेच कंपनीचा सवर्हेअर पाठवून गाडीचा सर्व्हे करुन घेतला.  तक्रारकर्तीने किती खर्च लावला, यापेक्षाही प्रत्यक्ष गाडीचे अपघातामध्ये किती नुकसान झाले ही बाब अत्यंत महत्वाची आहे.  विमा पॉलिसीच्या अटीनुसार वजावटी करिता कायदेशिर जे नियम आहेत तेच विम्याच्या करारामध्ये अंतर्भुत आहेत.  सुटे भागांची किंमत व खराब झालेल्या सुटे भागाची किंमत तसेच सुट्या भागावर आकारण्यात येणारा घसारा, यावर नुकसान ठरविण्यात येते.  तसेच पॉलिसीमध्ये जे इलेक्ट्रीक पार्ट आहेत, फायबरचे पार्ट, काचेचे पार्ट, मेटलचे पार्ट यांची किंमत अदा करण्याची तरतुद नसल्यामुळे मंचाने असा निष्कर्ष काढला आहे की, तक्रारकर्तीचे एकुण रु. 71,279/- खर्च झालेले आहे व रु. 43,019/- तक्रारकर्तीस विरुध्दपक्षाने अदा केलेले आहेत.  उर्वरित रु. 28,260/- ची मागणी तक्रारकर्तीने केलेली आहे.  त्यातील विमा पॉलिसीच्या नियमानुसार रु. 7,748/- (पृ क्र. 23,24 व 25 यावरील हिशोबानुसार ) कमी करुन रु. 20,312/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.

     सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे

::: अं ति म  आ दे श  :::

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
  2. विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला तिच्या दावा रकमेची उर्वरित रक्कम रु. 20,512/-( रुपये विस हजार पाचशे बारा फक्त ) प्रकरण दाखल तारखेपासून प्रत्यक्ष अदाई तारखेपर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के व्याजासह द्यावी.
  3. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्तीस शारीरिक आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 3000/-( रुपये तिन हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- ( रुपये दोन हजार ) द्यावे.
  4.  सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.

5.     सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या. 

 
 
[HON'BLE MR. V.R. LONDHE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.