Maharashtra

Kolhapur

CC/21/205

Rupesh Ravasaheb Mane & Other - Complainant(s)

Versus

Reliance General Insurance Ltd. - Opp.Party(s)

N.M.Potdar

16 Sep 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/21/205
( Date of Filing : 09 Apr 2021 )
 
1. Rupesh Ravasaheb Mane & Other
Lonar Vasahat, E Ward, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Reliance General Insurance Ltd.
New Shahupuri, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Sep 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार क्र.1 व 2 यांचे वडील कै.रावसाहेब शामराव माने हे रिक्षा व्‍यावसायिक होते.  त्‍यांच्‍या वाहनाचा क्र. एम.एच.09-इएल-1944 असा असून त्‍यांनी वि.प. यांचेकडून Commercial Vehicles (Passengers carrying 3W 6) Package policy ही पॉलिसी घेतली आहे.  त्‍याचा पॉलिसी क्र. 170621923390000095 असा असून कालावधी दि. 4/2/2019 ते 3/2/2020 असा आहे.  सदर पॉ‍लिसी प्रमाणे PA cover to owner driver कव्‍हर केला असून त्‍याबाबत पॉलिसीमध्‍ये रक्‍कम रु.375/- प्रिमियम घेतला आहे.  कै.रावसाहेब शामराव माने यांचे दि. 2/11/2019 रोजी अपघातामध्‍ये निधन झाले आहे.  तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे विमा क्‍लेम सादर केला व विमा पॉलिसीमध्‍ये कव्‍हर असलेली पर्सनल अॅक्‍सीडेंट कव्‍हरची रक्‍कम रु.15,00,000/- ची मागणी केली.  परंतु वि.प. यांनी कै.रावसाहेब शामराव माने यांचा मृत्‍यू हा medical illness मुळे झालेला आहे असे चुकीचे कारण देवून नाकारला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्‍याने प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, तक्रारदारास विमा कंपनीकडून रक्‍कम रु.15,00,000/-  व त्‍यावर 18 टक्‍के दराने व्‍याज, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.20,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत विमा पॉलिसी, क्‍लेम नामंजूरीचे पत्र, वर्दी व सोबतचे पत्र, वाहनाचे आर.सी.बुक, मयताचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स, तक्रारदार क्र.2 चे आधारकार्ड इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने कागदयादीसोबत लक्ष्‍मीपुरी पोलिस ठाणे यांनी गांधीनगर पोलिस ठाणे यांना दिलेले पत्र, सी.पी.आर. हॉस्‍पीटल येथील वर्दी, शवपरिक्षेसाठी पाठवावयाचा पोलिस अहवाल, मरणोत्‍तर पंचनामा तसेच पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प. यांनी याकामी दि.16/09/21 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल केले असून तक्रारअर्जातील बहुतांशी कथने नाकारली आहेत.  वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदारांनी दाखल केले कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे वडीलांचा मृत्‍यू हा अपघातामुळे झाला नसून वैद्यकीय आजारामुळे नैसर्गिक झालेचे आढळून आलेने वि.प. यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नामंजूर केला आहे.  वि.प. यांची ही कृती योग्‍य व कायदेशीर आहे.  सबब, वि.प. हे तक्रारदारांना क्‍लेम देणे लागत नाहीत.  सबब, वि.प. विमा कंपनीने कोणतीही त्रुटी न दिल्‍याने तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

 

4.    वि.प. यांनी याकामी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

5.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

5

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1 व 2

 

6.    तक्रारदार क्र.1 व तक्रारदार क्र. 2 यांचे वडील कै.रावसाहेब शामराव माने हे रिक्षा व्‍यावसायिक होते.  त्‍यांचा वाहन नं. एमएच-09-इएल 1944 असा असून त्‍यांनी वि.प. यांचेकडून Commercial Vehicles (Passengers carrying 3W 6) Package policy ही पॉलिसी घेतली आहे.  त्‍याचा पॉलिसी क्र. 170621923390000095 असा असून कालावधी दि. 4/2/2019 ते 3/2/2020 असा आहे.  सदर पॉ‍लिसी प्रमाणे PA cover to owner driver कव्‍हर केला असून त्‍याबाबत पॉलिसीमध्‍ये रक्‍कम रु.375/- प्रिमियम घेतला आहे.    पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही.  सबब तक्रारदार यांचे वडीलांनी वि.प. यांचेकडे पॉलिसी उतरविली असल्‍यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतात या निष्‍कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.

 

7.    कै. रावसाहेब शामराव माने यांचा ता. 2/11/2019 रोजी अज्ञात वाहन टाटा एसीई टेम्‍पोने धडक दिलेने अपघात होवून सदर अपघातात त्‍यांच्‍या डोक्‍याला मार लागल्‍याने ते बेशुध्‍द झाले व त्‍यांना सी.पी.आर.हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच ते दि.2/11/19 रोजी मयत झाले.  तक्रारदार यांनी क्‍लेमसाठी लागणारी सर्व कागदपत्रे वि.प. यांचेकडे देवून ता. 5/11/19 रोजी क्‍लेमची मागणी केली असता वि.प. यांनी कै. रावसाहेब शामराव माने यांचा मृत्‍यू मेडीकल इलनेसमुळे झालेला आहे अशी कारणे देवून तक्रारदाराचा क्‍लेम नाकारला आहे.  सबब, सदर कारणास्‍तव तक्रारदारांचा विमा क्‍लेम नाकारुन वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  प्रस्‍तुत मुद्याच्‍या अनुषंगाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी अ.क्र.1 ला ता. 4/2/19 रोजीची वि.प. यांची विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे.   सदर पॉलिसीमध्‍ये Compulsory P.A. Cover to owner/driver 375/- नमूद आहे. सदरची पॉलिसी ही रिलायन्‍स कमर्शियल व्‍हेईकल पॅकेज पॉलिसी असलेचे दिसून येते.  अ.क्र.2 ला वि.प. यांचे तक्रारदारांचा क्‍लेम नाकारलेचे ता. 31/12/2019 चे पत्र दाखल केले आहे. सदर पत्रामध्‍ये It is observed that insured had died due to medical illness and not due to any accidental injury असे नमूद आहे. 

 

8.    प्रस्‍तुतकामी वि.प. यांनी ता. 16/9/21 रोजी म्‍हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे.  सदर म्‍हणण्‍याचे अवलोकन करता वि.प. यांनी तक्रारदारांच्‍या वडीलांनी वि.प. यांचेकडून घेतलेली पॉलिसी मान्‍य केली आहे.  तथापि तक्रारदाराने दाखल केले कागदपत्रांवरुन कै. रावसाहेब शामराव माने यांचा मृत्‍यू हा मेडीकल आजारामुळे म्‍हणजेच नैसर्गिक मृत्‍यू असलेने सदरील मृत्‍यू हा विमा पॉलिसीचे अटी व नियमाप्रमाणे देय होत नाही आणि त्‍याकारणाने तक्रारदाराचा विमादावा नामंजूर केलेचे कथन केले आहे.  सबब, प्रस्‍तुतकामी तक्रारदारांचे दि.13/1/22 रोजीच्‍या पुरावा शपथपत्राचे व कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी लक्ष्‍मीपुरी पोलिस ठाणे येथून गांधीनगर पोलिस ठाणे यांना पाठविलेले पत्राची प्रत दाखल केली आहे.  सदर पत्राचे अवलोकन करता मयत ता. 2/11/2019 रोजी 19.30 चे सुमारास उचगांव कमानीजवळ अपघातात जखमी झालेने त्‍यास 20.30 वा. सी.पी.आर. हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर येथे बेशुध्‍द अवस्‍थेत दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला आहे असे सदर पत्रात नमूद असून त्‍यावर ठाणे अंमलदार, लक्ष्‍मीपुरी पोलिस ठाणे यांची सही आहे.  तसेच तक्रारदार यांनी सी.पी.आर. हॉस्‍पीटल येथे वर्दी व शवपरिक्षेसाठी पाठविलेला प्रेताबरोबरचा जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक यांचकडे पाठविणेचा पोलिस अहवाल व मरणोत्‍तर पंचनामा अशी कागदपत्रे दाखल केली आहेत.  सदर कागदपत्रांचे अवलोकन करता मयत रावसाहेब माने यांचा उचगांव कमानीजवळ अपघातात जखमी झालेने सी.पी.आर. हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर येथे बेशुध्‍द अवस्‍थेत दाखल केले असता उपचारापूर्वी मयत झालेचा पोलिस व पंच यांचा अहवाल आहे.  सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत.  तसेच वि.प. यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये कथन केलेप्रमाणे मयत रावसाहेब शामराव माने यांचा मृत्‍यू मेडीकल आजारप्रमाणे म्‍हणजेच नैसर्गिक झाला आहे याअनुषंगाने कोणताही वैद्यकीय पुरावा अथवा परिस्थितीजन्‍य पुरावा प्रस्‍तुतकामी दाखल केलेला नाही.  वि.प. यांनी त्‍यांची कथने पुराव्‍यानिशी शाबीत केलेली नाहीत.  त्‍याकारणाने पुराव्‍याअभावी मयत रावसाहेब शामराव माने यांचा नैसर्गिक मृत्‍यू झाला आहे हे वि.प. यांचे कथन हे आयोग विचारात घेत नाही.  सबब, वरील सर्व कागदपत्रांचा विचार करता तक्रारदार यांचे वडील मयत रावसाहेब माने हे अपघातात जखमी होवून बेशुध्‍द अवस्‍थेत दाखल झाल्‍यानंतर उपचारापूर्वी मयत झालेले असलेने वि.प. यांनी चुकीच्‍या कारणास्‍तव तक्रारदार यांचा विमाक्‍लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्‍कर्षास हे आयेाग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.1 व 2 यांचे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे. 

 

मुद्दा क्र.3

 

9.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 व 2 मधील विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत विमा पॉलिसी दाखल केली आहे. सदर पॉ‍लिसी प्रमाणे PA cover to owner driver कव्‍हर केला असून त्‍याबाबत पॉलिसीमध्‍ये रक्‍कम रु.375/- प्रिमियम घेतला आहे. तसेच Limit Liability : PA cover for owner driver under Section III CSI Rs. 15,00,000/- नमूद असून सदरचे रकमेबाबत वाद नाही.  सबब, या बाबीचा विचार करता तक्रारदार हे सदरचे विमा क्‍लेमची रक्‍कम रु. 15,00,000/- मिळणेस पात्र आहेत.  तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल ता. 16/4/2021 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4

 

10.   वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.4 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.5  -  सबब आदेश.

 

 

 

 

 

- आ दे श -

 

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना पॉलिसी क्र. 170621923390000095 अंतर्गत विमाक्‍लेमची रक्‍कम रु.15,00,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 16/04/21 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.

 

  1. वि.प.विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- अदा करावी. 

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 

 
 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.