Maharashtra

Nanded

CC/11/25

Parbatbai Pralhad Pawade - Complainant(s)

Versus

Reliance General Insurance company - Opp.Party(s)

B.V.Bhure

10 May 2011

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/11/25
1. Parbatbai Pralhad PawadeKotha Tq.KandharNandedMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Reliance General Insurance company19,.Reliance Center, Walchand Hirachand Marg, Belard Estate, Mumbai-38MumbaiMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE MR. President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :

Dated : 10 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2011/25
                          प्रकरण दाखल तारीख - 19/01/2011
                          प्रकरण निकाल तारीख 09/05/2011
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
        मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
    
पार्बतबाई भ्र.प्रल्‍हाद पावडे
वय 55 वर्षे, धंदा घरकाम                                  अर्जदार
रा.कौठा   ता.कंधार जि. नांदेड
     विरुध्‍द.
1.   व्‍यवस्‍थापक/मॅनेजर,               
     रिलायंस जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
     19, रिलायंन्‍स सेंटर वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्‍टेट, मुंबई 400 038
2.    व्‍यवस्‍थापक                                      गैरअर्जदार
     रिलायंस जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
शाखा उज्‍वल इंटरप्रायजेसच्‍यावर
हनुमानगड कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड.
3.   विभागीय प्रमूख                               
    कबाल इन्‍शूरंन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस प्रा.लि.
भास्‍करायन एचडीएफसी, लाईफ इंशोरंन्‍सच्‍या खाली
प्‍लॉट नं.7, सेक्‍टर ई 1 टाऊन सेंटर, सिडको,औरंगाबाद.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.बी.व्‍ही.भुरे
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे        -   अड. ए.जी.कदम
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील     -   स्‍वतः
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील, अध्‍यक्ष )
1.                                      अर्जदार पार्बतीबाई मयत शिवराज प्रल्‍हाद पावडे यांची आई आहे. मयत शिवराज हे शेतकरी व्‍यवसाय करुन त्‍यांचे कूटूंबीयाचे व त्‍यांचे पालनपोषन करीत होते. त्‍यांचे नांवे शेत गट नंबर 183 मध्‍ये क्षेञफळ 28 आर आणि स्थित कौठा ता.कंधार जि. नांदेड येथे आहे. महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यास व त्‍यांचे कूटूंबियास सामाजिक न्‍याय देण्‍याच्‍या हेतूने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना सूरु केली होती. त्‍यामध्‍ये मयत शिवराज यांचा विमा गैरअर्जदार क्र.1 ते 3 मार्फत उतरविण्‍यात आला आहे. सदर विम्‍याचा कालावधी दि.15.8.2008 ते 14.8.2009 असा होता. अर्जदाराचा मूलगा दि.28.06.2009 रोजी मौजे कौठा येथे सार्वजनिक बोअर वर पाणी भरण्‍यासाठी गेला असता बोअर चालू करण्‍यासाठी बोअरचे बटन दाबताना विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाला व त्‍यानंतर सरकारी दवाखाना मुखेड येथे शरीक केले व उपचार चालू असताना त्‍यांचा मृत्‍यू झाला. अर्जदाराने आवश्‍यक त्‍या सर्व नियमानुसार
 
शेतकरी अपघात विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्ज केला. पण आजपर्यत अर्जदारास कोणतीही नूकसान भरपाई मिळाली नाही म्‍हणून अर्जदारास हा अर्ज घेऊन मंचात यावे लागले. अर्जदाराने अपघातानंतर घटनेची फिर्याद पोलिस स्‍टेशन कंधार येथे दिली ज्‍यांचा गून्‍हा नंबर 26/2009 असा आहे व कलम 174 सीआरपीसी नुसार गून्‍हा नोंदविण्‍यात आला. पोलिस पेपर्स व पी.एम.रिपोर्ट इत्‍यादी दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराने तालूका कृषी अधिकारी यांचेकडे दि.11.01.2010 रोजी अर्जासोबत घटनास्‍थळ पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, 7/12 चा उतारा, नमुना नं.8चा उतारा व 6-क चा उतारा इत्‍यादी कागदपञ दाखल करुन विम्‍याची रक्‍कम मागितली परंतु अर्जदार हे अडाणी असल्‍यामुळे क्‍लेम दाखल करण्‍यास उशिर झाला. तालुका कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा क्‍लेम हा गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे पाठविला परंतु क्‍लेमची रक्‍कम दिली नाही म्‍हणून अर्जदाराने दि.30.12.2010 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली व ती त्‍यांना मिळूनही त्‍यांन विम्‍याची रक्‍कम दिली नाही म्‍हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, नूकसान भरपाई म्‍हणून रु.1,00,000/- व त्‍यावर सन 2009 पासून 12 टक्‍के व्‍याजाने मागणी केली आहे. तसेच अर्जदारास झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
2.                गैरअर्जदार क्र,1 व 2 हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. ज्‍यामध्‍ये गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे अर्जदार ही मयत शिवराज यांची आई होती याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही. तसेच कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. मयत शिवराज हा शेतकरी आहेत याबददल ही पूरावा दाखल केलेला नाही. तसेच मयत शिवराज यांनी प्रत्‍यक्षरित्‍या गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे पॉलिसी उतरविलेली नाही. म्‍हणून ते गैरअर्जदार क्र.2 यांचे ग्राहक नाहीत.मयत शिवराज हे मृत्‍यू पावले हे दि.28.06.2009 रोजी मौजे कौठा येथे सार्वजनिक बोअर वर पाणी भरण्‍यासाठी गेला असता बोअर चालू करण्‍यासाठी बोअरचे बटन दाबताना विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाला व त्‍यानंतर सरकारी दवाखाना मुखेड येथे शरीक केले व उपचार चालू असताना मृत्‍यू झाला हे अर्जदाराने सिध्‍द केलेले नाही. अर्जदाराच्‍या क्‍लेम बाबत गैरअर्जदार यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही म्‍हणून अर्जदारास तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदाराचा अर्ज ते मान्‍य करु शकत नाही. तसेच त्‍यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही म्‍हणून अर्जदाराचा अर्ज रु.10,000/- खर्चासह अमान्‍य करण्‍यात यावा असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी शपथपञ दाखल केलेले आहे.
3.                    गैरअर्जदार क्र.3 हे हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.28.06.2009 रोजी झाला व दावा दि.22.01.2010 रोजी त्‍यांना मिळाला पण तो क्‍लेम हा दि.14.11.2009पर्यत पाठवीणे आवश्‍यक होते तो 90 दिवसांनंतर मिळाल्‍यामूळे तो दि.30.01.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे पाठविण्‍यात आला व तो उशिराने प्राप्‍त झाल्‍यामूळे दावा बंद करण्‍यात आल्‍याचे कळविण्‍यात आले. म्‍हणून त्‍यांचे सेवेमध्‍ये कोणतीही ञूटी नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार ही फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
 
 
 
 
 
4.              अर्जदार व गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांनी दाखल केलेले कागदपञ पाहून जे मूददे उपस्थित होतात, ते मुददे व त्‍यावरील उत्‍तरे खालील प्रमाणे,                        
           मूददे                                             उत्‍तर
1.     अर्जदार ग्राहक आहेत काय ?                                होय.
2.    गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्‍कम देण्‍यास
      बांधील आहेत काय ?                                     होय.
3.    काय आदेश  ?                                 अंतिम आदेशाप्रमाणे
 
मूददा क्र.1 ः-
5.                अर्जदार यांनी मयत शिवराज यांचे भारतीय निवडणूक आयूक्‍त यांनी दिलेले ओळखपञ दाखल केलेले आहे. त्‍यावर मयताचे नांव शिवराज प्रल्‍हाद पावडे आहे. तसेच अर्जदार हिचे मराठवाडा ग्रामीण बँकेचे पासबूक दाखल केलेले आहे. तसेच तलाठी सज्‍जा कौठा ता.कंधार यांचा 7/12 दाखल केला आहे त्‍यात मयत शिवराज यांचे नांवावर 0.28आर जमिन असल्‍याचे सिध्‍द होते. तसेच 7/12 मध्‍ये शिवराज यांची आई पार्वतीबाई प्रल्‍हाद पावडे यांचे नांवावर सूध्‍दा 0.27 आर जमिन असल्‍याचे दिसते. तसेच तलाठी कौठा यांनी प्रमाणपञ दिले आहे त्‍यात मयत शिवराज यांची आई पार्बतीबाई असल्‍याचे दिलेले आहे. तसेच फेरफार रजिस्‍ट्रर दाखल केले आहे त्‍यात सूध्‍दा मयत शिवराज यांची आई पार्वतीबाई आहे सिध्‍द होते. त्‍यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे मयत शिवराज यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार ही मयत शिवराज यांचे वारस आहेत हे सिध्‍द झालेले आहे. अर्जदार ही मयत शिवराज यांची आई आहे हे सिध्‍द होत असल्‍यामूळे मूददा क्र.1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात येते.
मूददा क्र.2 ः-
6.                अर्जदार हिने मयत शिवराज  यांचे नांवावर शेती असल्‍याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्‍यामध्‍ये मयत शिवराज यांचे नांवावर शेत जमीन असल्‍याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत शिवराज हे दि.28.06.2009 रोजी मौजे कौठा येथे सार्वजनिक बोअर वर पाणी भरण्‍यासाठी गेला असता बोअर चालू करण्‍यासाठी बोअरचे बटन दाबताना विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाला व त्‍यानंतर सरकारी दवाखाना मुखेड येथे शरीक केले व उपचार चालू असताना मृत्‍यू झाला, हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्‍ये मृत्‍यूबदल पूरावा दाखल केला नाही म्‍हणून अमान्‍य केला आहे. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद भोकर पोलिस स्‍टेशन येथे  दिली व त्‍यामध्‍ये अर्जदाराचा मृत्‍यू हा इलेक्‍ट्रीक शॉक लागून झाला अशी माहीती पोलिस स्‍टेशन भोकर ता. भोकर येथे दिलेली आहे. त्‍याबददल जवाब घेण्‍यात आला व घटनास्‍थळ पंचनामा दाखल केला. त्‍याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्‍यामूळे मयत शिवराज हे विजेचा शॉक बसल्‍यामूळे जागीच मरण पावले हे सिध्‍द झालेले आहे. सन 2008-09 मध्‍ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्‍यक्‍तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्‍यांचा विमा हप्‍ता महाराष्‍ट्र शासनाने भरला आहे. यामध्‍ये शिवराज यांचा सहभाग असल्‍यामूळे व अर्जदार ही त्‍यांची आई असल्‍यामूळे ती प्रत्‍यक्षरित्‍या जरी नाही तरी अप्रत्‍यक्षरित्‍या अर्जदार ही ग्राहक आहे. त्‍यामूळे अर्जदार ही विमा रक्‍कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मरणोत्‍तर
 
 
प्रमाणपञ,पी.एम.रिपोर्ट, बँकेचे पासबूक, वारसा प्रमाणपञ, 7/12, , इत्‍यादी कागदपञासह तालुका कृषी अधिकारी कंधार यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्‍याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. सदरील सर्व कागदपञ तहसील कार्यालय कंधार यांनी कबाल इन्‍शूरन्‍स यांचेकडे पाठविले आहेत. दि.28.06.2009 रोजी घटना घडली आहे व त्‍याबददलची कागदपञे कबाल इन्‍शूरन्‍स यांना दि.22.01.2010 रोजी मिळाली आहेत. कंपनीने ते कागदपञे रिलायन्‍स इन्‍शूरन्‍स कंपनी यांना दि.24.11.2010 रोजी अर्जदाराचा क्‍लेम हा 90 दिवसांने आल्‍यामुळे बंद केलेला आहे, पण यात अर्जदार ही अडाणी आहे ती अशिक्षीत असल्‍यामुळे व घरी दुःखद घटना घडल्‍यामूळे अर्जदार हिस क्‍लेम दाखल करण्‍यास विलंब झालेला आहे. पण महाराष्‍ट्र शासनाच्‍या जी.आर नुसार असा विलंब हा गृहीत धरण्‍यात येऊ नये असे म्‍हटले आहे. वरील सर्व कागदपञ सिध्‍द झाल्‍याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्‍कम रु.1,00,000/- दि.22.07.2010 पासून 9 टक्‍के व्‍याजाने एक महिन्‍याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु,2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे.
7.                वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                                                                         आदेश
1.                                          अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                          गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- व त्‍यावर दि.28.06.2009 पासून पूर्ण रक्‍कम मिळपर्यत 9 टक्‍के व्‍याजासह पूर्ण रक्‍कम दयावी.
 
3.                                          मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मंजूर करण्‍यात येतात.
 
4.                                          पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                  श्रीमती सुवर्णा देशमूख      
                 अध्‍यक्ष                                                            सदस्‍या               
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक
 

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT