Maharashtra

Nanded

CC/10/186

kamalbai Rangrao Aade - Complainant(s)

Versus

Reliance General Insurance Company - Opp.Party(s)

S.H.Suryavanshi

12 Oct 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/186
1. kamalbai Rangrao AadeAamadari Tanda BhokarNandedMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Reliance General Insurance Company19, Reliance Centre, Walchand Hirachand Marg, Bellard Estate, MumbaiMumbaiMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBERHON'BLE MR. Member Mr. S. J. Samte ,MEMBER
PRESENT :

Dated : 12 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/186
                          प्रकरण दाखल तारीख - 22/07/2010
                          प्रकरण निकाल तारीख 12/10/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
 
कमलबाई भ्र.रंगराव आडे
वय 42 वर्षे, धंदा घरकाम                                  अर्जदार
रा.आमदरी तांडा ता.भोकर जि. नांदेड
     विरुध्‍द.
1.   रिलायंस जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
     मार्फत व्‍यवस्‍थापक,              
     19, रिलायंन्‍स सेंटर वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्‍टेट, मुंबई 400 038
2.   रिलायंस जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,शाखा उज्‍वल इंटरप्रायजेसच्‍यावर
हनुमानगड कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड.
3.   विभागीय प्रमूख                                   गैरअर्जदार कबाल इन्‍शूरंन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस प्रा.लि.
भास्‍करायन एचडीएफसी, लाईफ इंशोरंन्‍सच्‍या खाली
प्‍लॉट नं.7, सेक्‍टर ई 1 टाऊन सेंटर, सिडको,औरंगाबाद.
4.   मा. तहसीलदार,
तहसील कार्यालय, भोकर ता.भोकर जि.नांदेड
5.   मा.कृषी अधिकारी,
कृषी कार्यालय, भोकर ता.भोकर जि.नांदेड.                                        
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.एस.एस.सूर्यवंशी
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे        -   अड. ए.जी.कदम
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील     -   स्‍वतः
गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील       -   कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र.5 तर्फे वकील       -   स्‍वतः
 
 
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, सदस्‍या )
                                      अर्जदार कमलबाई मयत रंगराव सोमला आडे यांची पत्‍नी आहे. मयत रंगराव हे शेतकरी व्‍यवसाय करुन त्‍यांचे कूटूंबीयाचे व त्‍यांचे पालनपोषन करीत होते. त्‍यांचे नांवे शेत गट नंबर 69 मध्‍ये क्षेञफळ 60 आर आणि स्थित बोरवाडी ता. भोकर जि. नांदेड येथे आहे. महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यास व त्‍यांचे कूटूंबियास सामाजिक न्‍याय देण्‍याच्‍या हेतूने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना सूरु केली होती. त्‍यामध्‍ये मयत गमाजी यांचा विमा गैरअर्जदार क्र.1 ते 5 मार्फत उतरविण्‍यात आला आहे. सदर विम्‍याचा कालावधी दि.15.8.2007 ते 14.8.2008 असा होता. अर्जदाराचे पती दि.08.07.2008 रोजी आमदरी तांडा बसत स्‍थानक येथे जिप क्र.एम.एच.-26-व्‍ही-528 ची धडक लागून गंभीर जखमी होऊन जागीच मृत्‍यू पावले. अर्जदाराने आवश्‍यक त्‍या सर्व नियमानुसार शेतकरी अपघात विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्ज केला. पण आजपर्यत अर्जदारास कोणतीही नूकसान भरपाई मिळाली नाही म्‍हणून अर्जदारास हा अर्ज घेऊन मंचात यावे लागले. अर्जदाराने अपघातानंतर घटनेची फिर्याद रामराव सोमला आडे यांचे मार्फत पोलिस स्‍टेशन भोकर ता. भोकर येथे दि.08.07.2008 रोजी दिली. ज्‍यांचा गून्‍हा नंबर 77/2008 असा आहे व घटनास्‍थळ पंचनामा व तपास केला. अर्जदाराने अर्जासोबत घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, 7/12 उतारावरील होल्‍डींग, टोच नकाशा, फेरफार, वारसा प्रमाणपञ, तलाठाचे प्रमाणपञ इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. नूकसान भरपाई म्‍हणून रु.1,00,000/- व त्‍यावर दि.07.02.2009 पासून 15 टक्‍के व्‍याजाने मागणी केली आहे. तसेच अर्जदारास झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
              गैरअर्जदार क्र.4 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही, गैरअर्जदार क्र,1,2,3 व 5 हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. ज्‍यामध्‍ये गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे अर्जदार ही मयत रंगराव यांची पत्‍नी होती याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही. तसेच कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. मयत रंगराव हे शेतकरी आहेत याबददल ही पूरावा दाखल केलेला नाही. तसेच मयत रंगराव यांनी प्रत्‍यक्षरित्‍या गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे पॉलिसी उतरविलेली नाही. मयत
 
 
रंगराव हे दि.08.07.2008 रोजी आमदरी तांडा बस स्‍थानक येथे जिप क्र.एम.एच.-26-व्‍ही-528 ची धडक लागून गंभीर जखमी होऊन जागीच मृत्‍यू पावले हे अर्जदाराने सिध्‍द केलेले नाही. अर्जदाराचा अर्ज ते मान्‍य करु शकत नाही. तसेच त्‍यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही म्‍हणून अर्जदाराचा अर्ज रु.10,000/- खर्चासह अमान्‍य करण्‍यात यावा असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी शपथपञ दाखल केलेले आहे.
 
              अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात.
              मूददे                                      उत्‍तर
1.   अर्जदार ग्राहक आहेत काय ?                             होय.
2.   गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्‍कम देण्‍यास
     बांधील आहेत काय ?                                होय.
3.   काय आदेश      ?                           अंतिम आदेशाप्रमाणे
 
मूददा क्र.1 ः-
              अर्जदार यांनी आपले भारतीय निवडणूक आयूक्‍त यांनी दिलेले ओळखपञ दाखल केलेले आहे. त्‍यावर तिचे नांव कमलबाई रंगराव आडे आहे. तसेच तलाठी सज्‍जा आमदरी तांडा ता.भोकर येथील पोलिस पाटील यांनी दिलेले वारसा प्रमाणपञ दाखल केलेले आहे. ज्‍यामध्‍ये कमलबाई ही रंगराव यांची पत्‍नी आहे असे लिहीलेले आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत रंगराव यांचे वारस आहेत हे सिध्‍द झालेले आहे. अर्जदार ही मयत रंगराव यांची पत्‍नी आहे हे सिध्‍द होत असल्‍यामूळे मूददा क्र.1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात येते.
मूददा क्र.2 ः-
              अर्जदार ही मयत रंगराव यांचे नांवावर शेती असल्‍याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्‍यामध्‍ये मयत रंगराव यांचे नांवावर शेत जमीन असल्‍याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत रंगराव हे दि.08.07.2008 रोजी आमदरी तांडा बस स्‍थानक
 
 
येथे जिप क्र.एम.एच.-26-व्‍ही-528 ची धडक लागून गंभीर जखमी होऊन जागीच मृत्‍यू पावले हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्‍ये मृत्‍यूबदल पूरावा दाखल केला नाही म्‍हणून अमान्‍य केला आहे. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्‍यामध्‍ये अर्जदाराचा मृत्‍यू हा जिपची धडक बसून झालेला होता अशी माहीती पोलिस स्‍टेशन भोकर ता. भोकर येथे दिलेली आहे. त्‍याबददल
जवाब घेण्‍यात आला व घटनास्‍थळ पंचनामा दाखल केला. त्‍याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्‍यामूळे मयत रंगराव हे जिपची धडक बसल्‍यामूळे जागीच मरण पावले हे सिध्‍द झालेले आहे. सन 2007-08 मध्‍ये औरंगाबाद महसूल वीभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्‍यक्‍तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्‍यांचा विमा हप्‍ता महाराष्‍ट्र शासनाने भरला आहे. यामध्‍ये रंगराव यांचा सहभाग असल्‍यामूळे व अर्जदार ही त्‍यांची पत्‍नी असल्‍यामूळे ती प्रत्‍यक्षरित्‍या जरी नाही तरी  अप्रत्‍यक्षरित्‍या अर्जदार ही ग्राहक आहे. त्‍यामूळे अर्जदार ही विमा रक्‍कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्‍यू दाखला प्रमाणपञ, बँकेचे पासबूक, वारसा प्रमाणपञ, 7/12, शीधापञिका, इत्‍यादी कागदपञासह तहसील भोकर यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्‍याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. सदरील सर्व कागदपञ तहसील कार्यालय यांनी कबाल इन्‍शूरन्‍स यांचेकडे पाठविले आहेत. दि.08.07.2008 रोजी घटना घडली आहे व त्‍याबददलची कागदपञे कबाल इन्‍शूरन्‍स यांना दि.07.01.2009 रोजी मिळाली आहेत. कंपनीने ते कागदपञे रिलायन्‍स इन्‍शूरन्‍स कंपनी यांना दि.31.01.2009 रोजी सेंटलमेंट साठी दिलेले आहेत व त्‍याबददल रिलायन्‍स जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी यांनी तो क्‍लेम हा 90 दिवसांनी आलेला असल्‍यामूळे त्‍यांनी दाखल करुन घेतलेला नाही. यावरुन अर्जदाराने क्‍लेम तहसील यांचेकडे वेळेत पाठविला होता व त्‍यांनी तो कबाल इन्‍शूरन्‍स यांचेकडे पाठविला आहे. कबाल इन्‍शूरन्‍स यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे सेंटलमेंट साठी पाठविला आहे हे सिध्‍द होते. वरील सर्व कागदपञ सिध्‍द झाल्‍याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्‍कम रु.1,00,000/- दि.22.07.2010 पासून 9 टक्‍के व्‍याजाने एक महिन्‍याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु,2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे.
 
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
 
 
                         आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                         गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- व त्‍यावर दि.22.07.2010 पासून पूर्ण रक्‍कम मिळपर्यत 9 टक्‍के व्‍याजासह पूर्ण रक्‍कम दयावी.
 
3.                                         मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मंजूर करण्‍यात येतात.
 
4.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                               श्रीमती सुवर्णा देशमूख                                      श्री.सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                                                 सदस्‍या                                                             सदस्‍य
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER