Maharashtra

Beed

CC/11/94

Sunita Rangnath Bhalekar - Complainant(s)

Versus

Reliance General Insurance company ltd. - Opp.Party(s)

04 May 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/94
 
1. Sunita Rangnath Bhalekar
Sonwala Tq.Ambejogai
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Reliance General Insurance company ltd.
Belard Estate, Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  P. B. Bhat PRESIDENT
  A P Bhosrekar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, बीड यांचे समोर ...
ग्राहक तक्रार क्रमांक – 94/2011             तक्रार दाखल तारीख- 02/07/2011
                                        निकाल तारीख   - 04/05/2012
 
 
सुनिता रंगनाथ भालेकर,
वय – 35 वर्ष, धंदा – घरकाम व शेती
रा.सोनवळा,ता.अंबाजोगाई, जि.बीड.               ....... तक्रारदार
 
            विरुध्‍द
 
1.     शाखाधिकारी,
रिलायन्‍स जनरल इंश्‍युअरन्‍स कंपनी,
19, रिलायन्‍स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्‍टेट, मुंबई- 400 038
2.    विभाग प्रमुख,
कबाल इंश्‍युअरन्‍स ब्रोकींग सर्व्हिस प्रा.लि.,
प्‍लॉट नं.29, राज अपार्टमेंट, टाऊन सेंटर
सिडको, औरंगाबाद                      ­­­........ सामनेवाले.
 
           को र म - पी.बी.भट, अध्‍यक्ष
                     अजय भोसरेकर, सदस्‍य 
 
                             तक्रारदारातर्फे – वकील – ए.एस.पावसे,
                             सामनेवाले1तर्फे – वकील – ए.पी.कुलकर्णी,
                             सामनेवाले2तर्फे – वकील – स्‍वत:,
                                                                                                           
                             ।। निकालपत्र ।।
                       ( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्‍य)
      तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.  
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार हा रा.सोनवळा ता.अंबाजोगाई, जि.बीड येथील रहिवाशी असुन तक्रारदाराचे मयत पती रंगनाथ हनुमंत भालेकर यांचा दि.19.3.2009 रोजी मोटार सायकल अपघातामध्‍ये मयत झाले आहेत. तक्रारदाराने आपल्‍या मयत पतीचा शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दाव्‍यासह सर्व कागदपत्राची पूर्तता करुन तालुका कृषि अधिकारी, अंबाजोगाई यांचेकडे दाखल केला. तक्रारदार हा सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडे सतत पाठपुरावाकरत राहिला. परंतु तक्रारदारास शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम आजपर्यन्‍त मिळूशकली नाही. म्‍हणून तक्रारदाराने सामनेवाले यांचे‍ विरुध्‍द शेतकरी वैयक्‍तीक अपघात रक्‍कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍ठयार्थ एकुण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले नं.2 यांनी आपले लेखी म्‍हणणे दि.29.08.2011 रोजी दाखल केले असुन तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव दि.06.07.2009 रोजी प्राप्‍त झाला असुन सदरचा‍ विमा प्रस्‍ताव दि.03.08.2009 अन्‍वये सामनेवाले नं.1 यांचेकडे पाठविला असल्‍या बाबतचा लेखी खुलाशात म्‍हंटले आहे. सदरचा विमा प्रस्‍ताव सामनेवाले नं.1 यांचेकडे प्रलंबीत आहे.
सामनेवाले नं.1 यांनी आपले लेखी म्‍हणणे दि.30.11.2011 रोजी दाखल केले असुन तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव हा पॉलीसी पिरेडच्‍या 90 दिवस संपल्‍यानंतर दाखल केला आहे, त्‍यामुळे सदरचा विमा दावा हा मुदत बाहय आहे. तसेच तक्रारदार हा मोटार वाहन कायदानुसार मोटार सायकलवर 2 व्‍यक्‍तीच बसण्‍याची परवानगी असते, परंतु तक्रारदार हा घटना घडताना 2 पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तीसह प्रवास करत होते. त्‍यामुळे तक्रारदाराचा विमा दावा दये नाही, असे म्‍हंटले आहे. त्‍यामुळे तक्रारदाराचा विमा दावा न देवून आम्‍ही कोणतीही सेवेत त्रूटी केली नसल्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाले नं.1 ते 2 यांनी आपले लेखी म्‍हणण्‍याचे पूष्‍ठयार्थ अन्‍य कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
तक्रारदाराची तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाले नं.1 व 2 यांनी दाखल  केलेले लेखी म्‍हणणे तक्रारदार व सामनेवाले यांचा युक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर त्‍याचे बारकाईने आवलोकन केले असता,
सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदाराचाविमा प्रस्‍ताव हा दि.6.7.2009 रोजी मिळाला असुन सदरचा विमा प्रस्‍ताव हा सामनेवाले नं.1 यांचेकडे दि.3.8.2009 रोजी पाठविला असल्‍याचे म्‍हंटले आहे. सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदाराचा‍ विमा प्रस्‍ताव मुदतीत मिळाला नाही असे म्‍हंटले आहे. परंतु तक्रारदार हा विमा करारानुसार विमा प्रस्‍ताव तालुका कृषि अधिकारी यांचेकडे मुदतीत दाखल केला आहे असे म्‍हंटले आहे.
       शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजनेच्‍या त्रिस्‍तरीय कराराचे परिपत्रकाचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने विमा प्रस्‍ताव हा तालुका कृषि अधिकारी यांचेकडे मुदतीत दाखल करणे पर्यन्‍तची जबाबदारी तक्रारदाराची असते व पुढील सर्व कार्यवाही ही सामनेवाले यांनीच करावयाची आहे. म्‍हणून सामनेवाले यांनी सदर तक्रार ही मुदतबाहय आहे व मोटार सायकलवर दोन पेक्षा जास्‍त प्रवाशी होते असे म्‍हंटले आहे. पोलीस पंचनाम्‍याचे अवलोकन केले असता, अज्ञात ट्रकने भरदाव व निष्‍काळजीपणे चालवून सदर अपघात झाल्‍याचे म्‍हंटले आहे.
      सामनेवाले यांनी तक्रारदाराचा‍ विमा प्रस्‍ताव नाकरला नाही अथवा दिला नाही हीचसामनेवाले नं.1 यांची सेवेत त्रूटी आहे हे दिसुन येते. त्‍यामुळे तक्रारदारास शेतकरी वैयक्‍तीक अपघात विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- व मानसिक शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- आणि तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- मंजूर करणे न्‍यायाचे होईल, असे न्‍यायमंचाचे मत आहे.
सबब, न्‍यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
                    ।। आ दे श ।।
1.     तक्रारदाराची तक्रार अंशत: करण्‍यात येते.
2.    सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारास शेतकरी वैयक्‍तीक अपघात विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/-(अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) आदेश प्राप्‍तीपासून 30 दिवसाचे आत अदा करावी.
3.    सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, आदेश क्रं.2 चे पालन मुदतीत न केल्‍यास सदर रक्‍कमेवर द.सा.द.शे.9 टक्‍के दि.03.08.2009 पासून तक्रारदाराचे पदरी पडेपर्यन्‍त देण्‍यास जबाबदार राहतील.
4.    सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) तक्रारीचे खर्चापोटी रु.2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त) आदेश प्राप्‍ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावीत..
5.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
 
 
                                           ( अजय भोसरेकर )     ( पी. बी. भट )
                                    सदस्‍य,            अध्‍यक्ष,
                          जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,बीड जि.बीड
 
 
 
 
[ P. B. Bhat]
PRESIDENT
 
[ A P Bhosrekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.