Maharashtra

Nanded

CC/11/26

Sarswatibai Shrihari Thakare - Complainant(s)

Versus

Reliance general insurance company ltd. - Opp.Party(s)

B.V.Bhure

27 Apr 2011

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/11/26
1. Sarswatibai Shrihari ThakareShivani Tq.KinwatNandedMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Reliance general insurance company ltd.19, reliance center, Walchand Hirachand Marg, Belard Estate, Mumbai 38MumbaiMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE MR. President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :

Dated : 27 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :- 2011/26
 
                                   प्रकरण दाखल तारीख -          19/01/2011     
                                   प्रकरण निकाल तारीख           27/04/2011
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
              मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख.           -   सदस्‍या
 
1.    सरस्‍वतीबाई भ्र.श्रीहरी ठाकरे,
वय वर्षे 47, धंदा- घरकाम,.                                   अर्जदार.
      रा.शिवनी ता.किनवट जि.नांदेड.
 
      विरुध्‍द
 
1.     व्‍यस्‍थापक/मॅनेजर,                                                    गैरअर्जदार.
      रिलांयन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
 19 रिलायंन्‍स सेंटर, वॉलचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्‍टेट,मुंबई -400 038.
3.    व्‍यवस्‍थापक,
रिलांयन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
      शाखा-उज्‍वल इंटरप्राईजेसच्‍यावर हिंगोली नाका,नांदेड.
2.    विभागीय प्रमुख
कबाल इंशूरंस सर्व्हिसेस प्रा.लि.
      शॉप नं. 2, दिशा अलंकार कॉम्‍पलेक्‍स,
टाऊन सेंटर, कॅनॉट प्‍लेस, औरंगाबाद.
अर्जदारा तर्फे वकील               -   अड.बी.व्‍ही.भुरे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील    -   अड अविनाश कदम.
गैरअर्जदार क्र. 3                  -   स्‍वतः
                                                        निकालपत्र
                               (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्‍या)
 
     अर्जदार श्रीमती सरस्‍वतीबाई भ्र.श्रीहरी ठाकरे रा.शिवनी ता.किनवट जि.नांदेड येथील रहीवाशी असून ती मयत शेतकरी श्रीहरी पि.यादोजी ठाकरे यांची पत्‍नी आहे.
      अर्जदाराचे पती नामे श्रीहरी पि. यादोजी ठाकरे हे दि.06/06/2009 रोजी रात्री ट्रॅक्‍टर क्र. एमएच-26/के-5548 मध्‍ये शिवनी नाल्‍यावरुन,शिवनी गावाकडे रेजी भरुन येत होते, समोरुन वाहन आल्‍याने ट्रॅक्‍टर चालकाने हयगयी व निष्‍काळजीपणे सदर ट्रॅक्‍टरचे ब्रेक अचानक दाबले त्‍यामुळे ट्रॅक्‍टर वरील श्रीहरी यादोजी ठाकरे हे ट्रॅक्‍टर वरुन खाली पडले आणी ट्रॅक्‍टरच्‍या टायरखाली आल्‍यामुळे त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. अर्जदाराने एफ.आय.आर.,पी.एम.रिपोर्ट, घटनास्‍थळ पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा इ.दस्‍तऐजवज मंचासमोर दाखल केले आहे. सदर घटनेची क्र.46/09 कलम 279,304, ए भा.द.वि.प्रमाणे पोलिस स्‍टेशन इस्‍लापूर ता.किनवट जि.नांदेड यांनी गुन्‍हा नोंदविला आणी साक्षीदाराचे बयान नोंदविले व पंचनामा केला. अर्जदाराचे पती श्रीहरी पि.यादोजी ठाकरे हे व्‍यवसायाने शेतकरी होते, त्‍यांच्‍या नांवे मौजे शिवनी ता.किनवट जि.नांदेड येथे गट नं 08 मध्‍ये क्षेत्रफळ 0 हेक्‍टर 90 आर एवढी जमीन आहे व त्‍या जमीनीचे ते मालक व ताबेदार होते, ते 7/12 धारक शेतकरी होते. अर्जदाराने 7/12 चा उतारा, नमुना नं. 8 चा उतारा व 6 क चा उतारा दाखल केला आहे. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्रातील शेतक-याचे, शेतक-यांना विमा संरक्षण देण्‍यासाठी शेतक-याचे शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे काढले व त्‍याचे प्रिमीअम गैरअर्जदार क्र. 1 यांनी विमा घेते वेळेस सर्व प्रकारची जोखीम स्विकारली व विमा शेतक-याच्‍या हक्‍कात दिला. अर्जदाराचे पती हे शेतकरी होते व त्‍याचे प्रिमीअम महाराष्‍ट्र शासनाने भरलेले आहे व तो लाभार्थी आहे म्‍हणून अर्जदाराचे पती हे गैरअर्जदार क्र. 2 यांचे ग्राहक आहेत. सदरील पॉलिसीचा कालावधी हा 15/08/2008 ते 14/08/2009 असा आहे व घटना ही दि.06/06/2009 ची आहे व मृत्‍यु 06/06/2009 रोजी झाला आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास नुकसान भरपाई देण्‍यास पात्र आहेत. अर्जदाराने आपल्‍या पतीच्‍या मृत्‍युनंतर तहसिल कार्यालय किनवट यांच्‍याकडे सर्व़ आवश्‍यक कागदपत्रासह क्‍लेम दाखल केले. क्‍लेम दाखलनंतर गैरअर्जदार क्र. 1,2 व 3 यांचेकडे क्‍लेम दाखल केल्‍यापासुन विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी अनेक वेळा तोंडी विनंती केली पण गैरअर्जदार यांनी आज या, उद्या या म्‍हणुन नेहमी टाळाटाळ करीत राहीले व अर्जदाराने गैरअर्जदाराकडे चकरा मारुन सुध्‍दा आजपर्यंत विम्‍याची नुकसान भरपाई दिलेली नाही जे की, नियमानुसार एक महिन्‍याच्‍या आत देणे बंधनकारक आहे तरीपण त्‍यांनी दिली नाही. म्‍हणुन अर्जदाराने शेवटी वकीला मार्फत दि.06/01/2011 रोजी कायदेशिर नोटीस पाठविली तरीपण गैरअर्जदारांनी अर्जदारास नुकसान भरपाई दिली नाही म्‍हणुन अर्जदाराने तक्रारअर्ज दाखल केला आहे. त्‍यांची मागणी आहे की, अर्जदारास शेतकरी अपघात विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/-, 12 टक्‍के व्‍याजाने सन 2009 पासून अर्जदारास द्यावेत. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- अर्जदारास द्यावेत, असे म्‍हटले आहे.
      गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले त्‍यांचे म्‍हणणे असे की,अर्जदाराची तक्रार ही खोटी असुन फेटाळण्‍यात यावी. अर्जदार यांनी पत्‍नी असल्‍याबद्यल कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. मयत श्रीहरी यांचा मृत्‍यू अपघाताने झाला हे अर्जदाराने सिध्‍द करायचे आहे. गैरअर्जदार यांना हे मान्‍य नाही की, पंचनामा व साक्ष झालेली आहे. अर्जदार यांनी हे सिध्‍द करायचे आहे की, गट नं.08 मध्‍ये 90 आर जमीन मयत श्रीहरी यांचे नांवाने आहे. गैरअर्जदारांना हे मान्‍य नाही की, अर्जदाराचे पती हे शेतकरी असून गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे ग्राहक आहेत. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदार यांना कोणतीही सेवेत त्रुटी दिली नाही, त्‍यामुळे ते कोणतीही नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाहीत. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा दावा फेटाळलेला नाही त्‍यामुळे अर्जदार यांची तक्रार ही अपरिपक्‍व आहे. गैअर्जदार क्र. 1 यांनी मागतल्‍याप्रमाणे अर्जदार यांनी कागदपत्र दाखल केलेले नाही.   अर्जदार यांना तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही.   अर्जदार यांनी मागीतलेली नुकसान भरपाई देण्‍यास गैरअर्जदार जबाबदार नाही. अर्जदार यांनी मुदतीनंतर तहसीलदार यांचेकडे क्‍लेम दाखल केलेला आहे त्‍यामुळे तो फेटाळण्‍यात यावा. अर्जदार यांनी सदर तक्रार दिवाणी न्‍यायालयात दाखल करावी. गैरअर्जदार यांच्‍या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्‍यामुळे अर्जदाराची तक्रार रु.10,000/- खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
            गैरअर्जदार क्र.3 हे हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.06.06.2009 रोजी झाला व त्‍यांना क्‍लेम हा दि.15.03.2010 रोजी प्राप्‍त झाला पण तो क्‍लेम सोबत काही कागदपञ कमी असल्‍याचे दि.14/11/2009 रोजी कळविण्‍यात आले. पॉलिसीच्‍या कराराप्रमाणे क्‍लेम हा 90 दिवसांत प्राप्‍त न झाल्‍यामुळे क्‍लेम रिलायंन्‍स जनरल इंशुरन्‍स कंपनी मुंबई यांचेकडे पाठविण्‍यात आले त्‍यांनी क्‍लेम बाबत लिमीटेशनचा मुद्या उपस्थित करुन दि.24/11/2010 क्‍लेम बंद केला.असे
म्‍हटले आहे. 
              अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1, 2, व 3 व   यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून जे मूददे उपस्थित होतात, ते मुद्ये व त्‍यावरील सकारण उत्‍तरे खालील प्रमाणे.
 
      मूददे                                                उत्‍तर
1.     अर्जदार ग्राहक आहेत काय ?                              होय.
2.    गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्‍कम देण्‍यास
      बांधील आहेत काय ?                                     होय.
3.    काय आदेश  ?                            अंतिम आदेशाप्रमाणे
 
मूददा क्र.1
                  अर्जदार यांनी जे मृत्‍यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गांव नमूना 6 क व 7/12, वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्‍ये मृत भोगवटदाराचे नांव श्रीहरी यादोजी ठाकरे दाखवलेले आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत श्रीहरी यादोजी ठाकरे यांचे वारस आहेत हे सिध्‍द झालेले आहे. अर्जदार ही मयत श्रीहरी यादोजी ठाकरे यांची पत्‍नी आहे हे सिध्‍द होत असल्‍यामूळे मूददा क्र.1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात येते.
 
मूददा क्र. 2 
                  अर्जदार हीने मयत श्रीहरी यादोजी ठाकरे यांचे नांवावर शेती असल्‍याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्‍यामध्‍ये मयत श्रीहरी यादोजी ठाकरे यांचे नांवावर शेत जमीन असल्‍याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत श्रीहरी यादोजी ठाकरे यांचा ट्रॅक्‍टरखाली पडल्‍यामुळे दि.06.06.2009 अपघाती मृत्‍यू झाला, हा मूददा अर्जदार यांनी जवाबामध्‍ये मृत्‍यूबदल पूरावा दाखल केला नाही म्‍हणून अमान्‍य केला आहे. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्‍यामध्‍ये मयताचा मृत्‍यू हा ट्रॅक्‍टरखाली आल्‍यामुळे झाला अशी माहीती पोलिस स्‍टेशन इस्‍लापुर यांनी अपघाती नोंद घेतली आहे. त्‍याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्‍यामूळे मयत श्रीहरी यादोजी ठाकरे हे ट्रॅक्‍टरखाली आल्‍यामुळे अपघाती मरण पावले हे सिध्‍द झालेले आहे. सन 2009-10 मध्‍ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्‍यक्‍तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.2 यांचेंकडून काढलेली आहे व त्‍यांचा विमा हप्‍ता महाराष्‍ट्र शासनाने भरला आहे. यामध्‍ये श्रीहरी यादोजी ठाकरे यांचा सहभाग असल्‍यामूळे व अर्जदार ही त्‍यांची पत्‍नी असल्‍यामूळे ती प्रत्‍यक्षरित्‍या जरी नाही तरी अप्रत्‍यक्षरित्‍या अर्जदार ही ग्राहक आहे. त्‍यामूळे अर्जदार ही विमा रक्‍कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचेकडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्‍यू दाखला प्रमाणपञ, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्‍यादी कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्‍याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. दि.06.06.2009 रोजी घटना घडली आहे व त्‍याबददलची कागदपञे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना पाठविले आहेत. कंपनीने ते कागदपञे रिलांयन्‍स जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी यांना दिलेले आहेत पण अद्यापपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी विम्‍याची रक्‍कम दिली नाही हे सिध्‍द होते. वरील सर्व कागदपञ सिध्‍द झाल्‍याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्‍कम रु.1,00,000/- एक महिन्‍याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.2,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे.
 
                  वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                               आदेश
 
1.                  अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.    गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना शेतकरी अपघात विमा दावा रक्‍कम रु.1,00,000/- द्यावेत. मानसिक ञासाबददल रु.2,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1,000/- मंजूर करण्‍यात येतात.
4     वरील सर्व रक्‍कम एक महिन्‍याचे आंत न दिल्‍यास, एक महिन्‍यानंतर   
संपूर्ण रक्‍कमेवर 9 टक्‍के व्‍याज पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास दयावे लागेल.
5.                  पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                        श्रीमती सुवर्णा देशमूख          
     अध्‍यक्ष                                     सदस्‍या
 
 
गो.प.निलमवार.
लघुलेखक
 
 
 
 
 
 

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT