निकाल
पारित दिनांक 18.04.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्व2रुपे, सदस्यी)
तक्रारदाराची तक्रार थोडक्याित खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदारांचे पती श्री लक्ष्मपण सदाशिव जरे हे शेतकरी असून दुर्दैवाने दि.06.06.09रोजी झालेल्या मोटार अपघातात मरण पावले. पोलीसांनी सदर अपघाताची
(2) त.क्र.112/11
चौकशी करुन मयत व्य क्ती चा पंचनामा केला व प्रेत पोस्टरमार्टमसाठी पाठवले.
तकारदारांनी पतीच्या मृत्यूीनंतर शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्तााव तालुका कृषी अधिकारी आष्टीत यांचे मार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे दाखल केला.
गैरअर्जदार क्र.1 यांच्याा म्हरणण्यामनुसार तक्रारदारांचा प्रस्ता्व पॉलीसी कालावधीनंतर नियमानुसार 90 दिवसात दाखल केलेला नाही. त्या मुळे तक्रारदारांना नुकसान भरपाई देण्याुची जबाबदारी विमा कंपनीवर येत नाही.
गैरअर्जदार क्र.2 यांच्याि म्ह णण्यालनुसार तक्रारदारांचा प्रस्ता्व विमा पॉलीसीच्या दि.15.08.08 ते 14.08.09 या कालावधीतील असून पॉलीसीच्याि कालावधीनंतर 90 दिवसात म्ह णजेच दि.14.11.09 रोजी दाखल करणे शासन व इन्शु रन्सा कंपनीमध्येर झालेल्याी करारातील अटीनुसार आवश्यणक होते. तक्रारदारांचा प्रस्ताशव दि.14.12.09 रोजी पॉलीसीचा कालावधी संपुष्टा्त आल्याानंतर दाखल झालेला असल्या मुळे दि.19.12.09 रोजी गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे 90 दिवसाच्यार विलंबानंतर क्ले म दाखल झालेला असल्या0चे शे-यासह पाठविण्याॉत आला. गैरअर्जदार विमा कंपनीने दि.24.11.10 रोजी तक्रारदारांच्याव प्रस्ताावाची फाईल बंद केली.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे लेखी म्हरणणे व दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.भगत तसेच गैरअर्जदार क्र.1 यांचे विद्वान वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्ती वाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांच्या विमा पॉलीसीचा कालावधी दि.15.08.08 ते 14.08.09 असा असून त्यालनंतर 90 दिवसाच्याा कालावधीत म्ह्णजेच दि.14.11.09 पर्यंत सदर प्रस्तााव गैरअर्जदार यांचेकडे शासन व गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीमध्ये झालेल्यात विमा पॉलीसीतील अटी नुसार दाखल करणे आवश्य क होते. परंतू तक्रारदारांचा प्रस्तातव दि.14.12.09 रोजी म्हशणजेच एक महिन्या.च्यात विलंबाने दाखल झाल्याधचे गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुखरन्स कंपनीच्या् लेखी म्हकणण्याेवरुन दिसून येते.
विमा पॉलीसीतील सदरची अट ही मार्गदर्शक सूचना असून बंधनकारक अट नाही. तसेच शासनाने शेतकरी अपघात व्य क्तीुगत योजना ही शेतक-यांसाठी कल्यााणकारी
(3) त.क्र.112/11
योजना राबवलेली असल्या मुळे तांत्रिक कारणास्त व फेटाळणे उचित नाही. त्या-मुळे तक्रारदारांचा प्रस्ता व गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने विलंबाचा मुददा वगळून गुणवत्तेंवर निकाली करणे न्यारयोचित होईल असे न्यारयमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीला आदेश देण्याात येतो की, तक्रारदारांचा विमा प्रस्ताकव विलंबाचा मुददा वगळून आदेश मिळाल्यािनंतर 60 दिवसात गुणवत्तेपवर निकाली करावा.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांदचे संच तक्रारदारास परत करावे.
श्रीमती माधुरी विश्वारुपे, श्रीमती नीलिमा संत, सदस्या अध्य क्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.