जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/36. प्रकरण दाखल तारीख - 02/02/2010 प्रकरण निकाल तारीख –19/06/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री. सतीश सामते, - सदस्य. कमलबाई भ्र. बाळगीर गोस्वामी वय 55 वर्षे, धंदा घरकाम रा. लोहगांव ता.बिलोली जि. नांदेड अर्जदार विरुध्द. 1. रिलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनी लि. 19, रिलायन्स सेंटर,वालचंद हिराचंद मार्ग, बोलेर्ड इस्टेट, मुंबई -400 038. गैरअर्जदार 2. तहसीलदार, बिलोली ता.बिलोली जि. नांदेड. 3. कबाल इन्शूरन्स ब्रोकींग प्रा.लि.कंपनी दीशा अलंकार, दुकान नं.2, टाऊन सेंटर सिडको, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.शिवराज पाटील. गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - अड.अविनाश कदम गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.3 तर्फे - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) तक्रारदार यांची गैरअर्जदार रिलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनी यांचे सेवेच्या ञूटीबददल तक्रार असून शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना अंतर्गत त्यांना विम्याची रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळाले नाही म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार ही मयत बाळगीर राजगीर गोस्वामी यांची वीधवा पत्नी असून मयत बाळगीर हे शेताकडे जात असताना मोटार सायकल अपघातात त्यांचा दि.04.01.2008 रोजी मृत्यू झाला. लोहगांव येथे गट नंबर 544 व 546 येथे त्यांची शेती असून ते शेतकरी होते व कूटूंबातील प्रमूख होते. अर्जदाराने तहसील कार्यालय यांचेकडे या बाबत नूकसान भरपाईचा अर्ज दिलेला होता. पण त्यांस प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना लेखी नोटीस पाठविली, यानंतर देखील त्यांना नूकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यामूळे त्यांनी दाद मागितली आहे. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे त्यांनी मयत बाळगीर हे गट नंबर 544 व 546 लोहगांव येथे त्यांचे मालकीची शेती आहे व ते शेतकरी होते व अर्जदार त्यांची वीधवा होती हे सिध्द करण्यास सांगितले आहे. अर्जदार यांनी तक्रार अर्जात तहसीलदार यांचेकडे तक्रार दाखल केली असे म्हटले नाही. परंतु दि.31.2.2008 रोजी तलाठयाकडे तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे. यावीषयी गैरअर्जदार यांनी क्लेम प्रपोजल मिळाले नसून त्यांनी अजूनही अर्जदाराची फाईल बंद केलेली नाही. त्यामूळे प्रस्तूत तक्रार ही प्रिमॅच्यूअर असून ती खारीज करणे योग्य आहे असे म्हटले आहे. अर्जदाराने आवश्यक ते कागदपञ जसे क्लेम फॉर्म, 7/12, फेरफार, खबरी जवाब, घटनास्थळ पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपञ, वयाचे प्रमाणपञ, बँकेचे कागदपञ, बँकेचा खाते उतारा किंवा बँकेचे खाते पासबूक व वारस असल्याचे संमतीपञ, इत्यादी कागदपञ दाखल करणे आवश्यक होते. त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस पाठवीली परंतु ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा आदेश करुन पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.3 यांनी आपले म्हणणे पोस्टाने पाठविले आहे. त्यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांना बाळगीर, रा. लोहगांव ता.बिलोली यांचे प्रपोजल अद्यापपर्यत त्यांना मिळालेले नाही असे म्हटले आहे. म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार यांची तक्रार ही प्रिमॅच्यूअर आहे काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी आपली तक्रार दाखल करताना सोबत एफ.आय.आर., मयताचे नांवे शेती असल्याबददल गांव नमूना 7 व 12 तसेच मृत्यू दाखला प्रमाणपञ, तलाठयाचे प्रमाणपञ, तहसीलदाराचे प्रमाणपञ, दाखल केलेले आहे. या सोबत हे सर्व कागदपञ तहसीलदार यांचेकडे तलाठयामार्फत दाखल केलेले असून तहसीलदार बिलोली यांनी सरळ रिलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनी यांना दि.31.3.2008 रोजी पञ पाठविल्या बददलच्या पञाची प्रत दाखल केलेली आहे. परंतु गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी अद्यापपर्यत त्यांना या प्रपोजलची प्रत मिळाली नसल्याचे म्हटले आहे. यांची शहानीशा फक्त गैरअर्जदार क्र.2 हेच करु शकतात. कारण त्यांचे रेकॉर्डनुसार गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी हे सर्व प्रपोजल शिफारस करुन कोणत्या तारखेला पाठविले व त्यांना कधी मिळाले. परंतु हे करण्यासाठी गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस पाठवून ते यांस प्रतिसाद देत नाही किंवा आपले म्हणणे व रेकॉर्ड त्यांचे कनिष्ठा मार्फत पाठवितही नाहीत. मंचाची नोटीस मिळूनही तहसीलदार हजर झाले नाही व त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही. यात त्यांना मंचाच्या कामावीषयी गंभीरता दिसून येत नाही. म्हणून कर्तव्यात कसून केला म्हणून त्यांना रु.2,000/- दंड लावण्यात यावा या नीर्णयास हे मंच आलेले आहे. तक्रारदाराचा अर्ज हा गैरअर्जदार क्र.1 ला मिळाला हे सिध्द होत नसल्यामूळे तक्रार ही प्रिमॅच्यूअर आहे व गैरअर्जदार यांना हे प्रपोजल मिळणे आवश्यक आहे तरच त्यांना यावर कार्यवाही करता येईल. मयत बाळगीर यांचा मृत्यू दि.4.1.2008 रोजी ला झाला व यानंतर साधारणतः फेब्रूवारी मार्च महिन्यात तलाठी व तहसीलदार यांना हे प्रपोजल मिळाले असल्याकारणाने ही तक्रार मूदत बाहय आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून लिमिटेशनचा प्रश्न येथून पूढे येणार नाही. शासकीय परिपञकानुसार विम्याच्या नियम अंतर्गत सात दिवसात गैरअर्जदार यांना सूचना मिळून प्रपोजल देणे आवश्यक जरी असले तरी तो नियम बंधनकारक नाही व एखादया शेतक-याच्या घरी दूःखद घटना घडल्यामूळे लवकर क्लेम दाखल करणे शक्य नाही म्हणून मूदतीचा मूददा येणार नाही. अर्जदार यांची तक्रार प्रिमॅच्यूअर (अपरिपक्व) असल्याकारणाने क्लेम प्रपोजल व आम्ही चर्चा केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपञासह नवीन प्रपोजल सरळ गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दाखल करावे व गैरअर्जदार क्र.1 यांनी हे प्रपोजल मिळाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आंत यावर नीर्णय घ्यावा. घेतलेला नीर्णय तक्रारदार यांना मान्य नसल्यास ज्या मूददयावर त्यांचा आक्षेप आहे त्या मूददयावर त्यांना परत तक्रार दाखल करता येईल. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज प्रिमॅच्यूअर असल्यामूळे तो खारीज करण्यात येतो, परंतु तक्रारदाराने त्यांचा तक्रार अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे विम्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल करावा व तक्रार प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.1 यांनी यावर नीर्णय घ्यावा. 2. गैरअर्जदार क्र.2 तहसीलदार बिलोली यांनी रु.2000/- दंड म्हणून एक महिन्यात जमा करावे. 3. दावा खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 4. निकालाच्या प्रति पक्षकारांना देण्यात याव्या. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री. सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर लघूलेखक. |