निकालपत्र :- (दि.14/09/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर सामनेवालांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्या मुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार हे वर नमुद पत्त्यावर आपल्या कुटूंबासह कायमचे वास्तवास आहेत. तक्रारदार हे मालवाहू ट्रकचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी सदर व्यवसायाकरिता चेतन मोटर्स या टाटा कंपनीच्या कमर्शियल गाडयांची विक्री करणारे डिलरकडून टाटा कंपनीचा मॉडेल नं.2515 कमिन्स नोंदणी क्र.MH-09-BC-7177 चा ट्रक खरेदी केला. सदर ट्रक घेणेकरिता तक्रारदार यांनी टाटा मोटर फायनान्स यांचेकडून कर्ज घेतलेले आहे. सदर ट्रकमधून जे.के.सिमेंटचे कोल्हापूर येथून रत्नागिरी जिल्हयामध्ये वाहतूक केली जात होती. दि.01/02/2011 रोजी सदर ट्रक सिमेंटची वाहतूक करत असताना बांबवडे ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर येथे अपघातग्रस्त झाला, सदर अपघाताची नोंद शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली व पोलीसांनी सदर अपघाताचा रितसर पंचनामा केला. सदर अपघातामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले सदर अपघाताची माहिती सामनेवाला यांना दिली. सामनेवाला कंपनीने त्यांचे संबंधीत सवर्हेअर यांना गाडीचा सर्व्हे करणेकरिता पाठवलेले होते. सदर सर्व्हेअर यांनी गाडीचा सर्व्हे करुन इन्शुरन्सकरिता आवश्यक कागदपत्रांवर तक्रारदाराच्या सहया घेतल्या व काहीच दिवसात नुकसान भरपाई मिळेल असे सांगण्यात आले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन दुरुस्तीकरिता चेतन मोटर्स कोल्हापूर यांचेकडे जमा केले. तदनंतर चेतन मोटर्स यांनी गाडीचे दुरुस्तीबाबत येणारे खर्चाचे इस्टीमेट तक्रारदार व सामनेवाला यांना दि.28/02/2011 रोजी दिले. परंतु तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वेळोवेळी तोंडी तसेच लेखी विनंती करुनही सामनेवाला यांनी अपघातग्रस्त गाडीची विमा रक्कम दिली नाही अथवा तक्रारदारास कोणतीही दाद दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि.26/04/2011रोजी वकीलांमार्फत नोटीस देऊनही सामनेवाला यांनी तक्रारदार यांना त्रास देणेच्या व हेकेखोरपणाच्या वृत्तीने व विमा बुडविण्याच्या हेतूने विमा मंजूर न केलेने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर होऊन अपघातग्रस्त गाडीच्या नुकसानीची विम्याची भरपाईची रक्कम रु.12,79,008/-,आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.5,00,000/-,मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-, तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ आर.सी.बुक, फिटनेस सर्टीफिकेट, टॅक्स पावती, इन्शुरन्स कव्हर नोट, इनशुरन्स पॉलीसी, घटनास्थळ पंचनामा, एफ.आर.आय. चेतन मोटर्स जॉब कार्ड, चेतन मोटर्स इस्टीमेट, सामनेवाला यांचेकडून आलेली पत्रे, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस,नोटीस सामनेवाला यांना पोहोचलेची पोहोच पावती व घटनास्थळाचे फोटो इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.13/09/2011 रोजी टाटा मोटर फायनान्स यांचेकडील तक्रारदारचा कर्ज खातेउतारा दाखल केला आहे. (4) सामनेवालाने दाखल केलेल्या म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. तसेच सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराची तक्रार खोटी,लबाडीची व चुकीची असून ती कायदेशिररित्या चालणेस पात्र नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. तक्रारदाराचा ट्रक हा व्यापारी कारणासाठी वापरला जात असलेने ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीप्रमाणे मे. मंचात तक्रार चालणेस पात्र नाही. तक्रारदाराचे ट्रकचा अपघातापूर्वीचा विमा ही फ्यूचर जनरली इन्शुरन्स कंपनी यांचेकडे होता. सदरील विमा दि.28/01/2011 रोजी संपलेने तक्रारदारांनी अपघात झालेनंतर सामनेवालांकडे सदर ट्रकचा विमा उतरविणेसाठी अर्ज केला. सदर अर्ज करतेवेळी तक्रारदारांनी सदर ट्रकला दि.01/02/2011 रोजी अपघात झालेची बाब सामनेवाला यांचेपासून लपवून ठेवून सदर ट्रकची विमा पॉलीसी सामनेवाला यांचेकडून घेतली आहे. त्यामुळे सदर विमा पॉलीसी ही कायदयाप्रमाणे रद्द होणेस पात्र आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ तक्रारदारचा ट्रक क्र.MH-09-BC-7177 चा सर्व्हे रिपोर्ट दाखल केला आहे. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे व सामनेवालांचे वकीलांनी केलेला युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रस्तुतची तक्रार सदर मंचास चालणेस पात्र आहे का? --- होय. 2. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे का? --- होय. 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमधील कलम 2 मध्ये व्यापारी कारणासाठी सदर ट्रकचा वापर केला असलेने प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र नसलेचा आक्षेप घेतलेला आहे. सदर आक्षेपाचा विचार करता विमा सेवा या विविध कारणासाठी विमा संरक्षण देत असतात. यामध्ये व्यक्तीच्या जीवन संरक्षण, मेडिक्लेम, पशुविमा, वाहनाचा विमा तसेच विविध कारणास्तव वेगवेगळया प्रकारच्या विमा सेवा देतस असतात; प्रस्तुत तक्रारीमधील तक्रारदाराच्या मालकीच्या ट्रकचा विमा उतरविलेला होता. सदरचा विमा हा अपघातामध्ये ट्रकचे नुकसान झालेस सरंक्षणासाठी उतरविलेला होता. सदर बाबींचा विचार करता वाहनाच्या अपघाती नुकसानीपासून संरक्षण व्हावे हा हेतू आहे यामध्ये कोणताही व्यापारी हेतू नाही; सबब प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 व 3 :- तक्रारदाराचे मालकीचा ट्रक हा टाटा कंपनीचा असून मॉडेल नंबर 2515 कमिन्स नेांदणी क्र.एम.एच.-09-बीसी-7177 असून टाटा मोटर फायनान्सकडून कर्ज काढून घेतलेला आहे. सदर तक्रारदाराचे ट्रकचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता हे सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये मान्य केलेले आहे. दाखल विमा पॉलीसीप्रमाणे नमुद वाहनाची आयडी व्हॅल्यू रक्कम रु.12,79,008/- असून पॉलीसीचा कालावधी हा दि.29/01/2011 ते दि.28/01/2012 अखेर आहे. पॉलीसी क्र.1706702334000795 असा आहे. सदर पॉलीसी कालावधीत तक्रारदाराचे नमुद वाहनाचा दि.01/02/2011 रोजी कोल्हापूर येथून रत्नागिरी येथे जे;के.सिमेंट वाहतूक करताना अपघात झालेला आहे. सदर अपघाताची एफ.आय.आर.,घटनास्थळाचा पंचनामा प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. तक्रारदाराने दाखल केलेले फोटोग्राफ व चेतन मोटर यांचे जॉबकार्डवरुन नमुद वाहनाचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेचे दिसून येते. चेतन मोटर यांनी रु.16,25,587/- इतकी दुरुस्तीसाठीचे अंदाजपत्रक दिलेले आहे. तक्रारदाराने वेळोवेळी मागणी करुनही तसेच दि.26/04/2011 रोजी वकील नोटीस देऊनही तकारदाराचे क्लेमबाबत सामनेवाला यांनी कोणताही निर्णय दिलेला नाही ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला यांचे वकीलांनी नमुद वाहनाचे केले नुकसानीचे सर्व्हे अहवालामध्ये रक्कम देणेस कंपनी तयार असलेचे प्रतिपादन केले आहे. सदरचा सर्व्हे अहवाल प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. तक्रारदाराचे वकीलांनी प्रस्तुत तक्रार दाखल झालेनंतर सर्व्हे अहवालाप्रमाणे सामनेवाला कंपनी क्लेम देणेबाबतची तयारी दर्शविलेली आहे या मुददयाकडे या मंचाचे लक्ष वेधलेले आहे. तसेच सदर क्लेमबाबत वेळेत निर्णय न घेतलेने तक्रारदाराचा ट्रक हा कर्जाऊ रक्कमेने घेतला असलेने त्यास आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. त्याबाबत त्यांनी टाटा मोटर फायनान्स यांचेकडील त्यांचा नमुद वाहनाच्या कर्जाचा खातेउतारा दाखल केला आहे. नमुद वाहन दुरुस्त न झालेने उत्पन्नाचा मार्ग बंद पडला व त्यामुळे तक्रारदार कर्जाचा हपता भरु शकलेला नाही. त्यामुळे तक्रारदारास आर्थिक नुकसान व मानसिक त्रास सोसावा लगाला आहे. सबब सदर बाबींचा विचार करता क्लेम रक्कमेवयतिरिक्त आर्थिक नुकसान भरपाईपोटी भरीव रक्कम मिळावी अशी विंनती केलेली आहे. सामनेवाला यांनी क्लेम दाखल झालेपासून तीन महिन्यात क्लेमबाबत निर्णय दयावयास हवा होता तो न देऊन सेवेत गभीर त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंचयेत आहे. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेला सर्व्हेअहवालातील नमुद नुकसानीप्रमाणेची रक्कम व्याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तक्रारदाराने सदर क्लेम तातडीने दाखल केलेला दिसून येतो. त्यासंदर्भात सामनेवाला कंपनीने दि.27/03/2011, 12/04/2011, दि.03/05/2011 रोजी पत्रव्यवहार केलेला आहे. तक्रारदाराने दि.26/04/2011 रोजी वकील नोटीस दिलेला आहे. क्लेम निर्णित करणेसाठी योग्य कालावधी 3 महिन्याचा असलेने तक्रारदार सामनेवाला कंपनीने शेवटचा पत्र व्यवहार केलेपासून म्हणजे दि.03/05/2011 पासून सदर रक्कमेवर व्याज मिळणेस पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारस झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास सर्व्हे रिपोर्टप्रमाणे रक्कम रु.7,83,900/-(रु.सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे फक्त)दि.03/05/2011 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजदराने अदा करावेत. 3) सामनेवाला यांनी केलेल्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) तक्रारदारास दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |