Maharashtra

Beed

CC/10/11

Visnu Bhanudas Sonawane - Complainant(s)

Versus

Reliance General Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

.D.S.Borade

13 Sep 2010

ORDER

 
Complaint Case No. CC/10/11
 
1. Visnu Bhanudas Sonawane
R/o.Mohakhed Road,Dindrud,Tq.Majalgaon,Dist.Beed
Beed
Maharashtra.
...........Complainant(s)
Versus
1. Reliance General Insurance Co.Ltd.
C/o.Manager Clame Department 1st Floor,Space Cosmos Building,Ashok Stambha,Nashik,Dist.Nashik.
Nashik.
Maharashtra.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  P. B. Bhat PRESIDENT
  Sou. M. S. Vishwarupe MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदारातर्फे :- अँड. डी. एस. बोराडे.
                         सामनेवालेतर्फे :- अँड. ए. पी. कुलकर्णी.
 
                             निकालपत्र   
           
            तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.
 
      तक्रारदार हा दिंद्रुड येथील रहिवाशी असून त्‍याने त्‍याच्‍या व कुटूंबाचे उदरनिर्वाहासाठी अँपेरिक्षा क्रमांक एम. एच. 44/4899 हे वाहन दि. 28/8/2008 रोजी खरेदी केलेले आहे. त्‍या तारखेपासून सदर वाहनावर ड्रायव्‍हर म्‍हणून नामे प्रकाश पि. विष्‍णु सोनवणे हा काम करत आहे. तक्रारदारास त्‍याचे वाहनापासून खर्च वजा जाता दररोज रु.300/- मिळत होते. म्‍हणजे त्‍यास दरमहा 10,000/- रुपये उत्‍पन्‍न सदर वाहनापासून मिळत होते. तक्रारदारास या वाहनाशिवाय इतर कोणतेही उत्‍पन्‍नाचे साधन नाही.
 
      सामनेवालेंनी सदर रिक्षाचा विमा घेतलेला आहे. त्‍याचे विमा पत्र क्रमांक 108000204344 असे आहे. वाहनाची संपूर्ण जोखीम विमापत्रात संरक्षित आहे.
 
      तारीख 07/11/2008 रोजी प्रवाशी घेवून तक्रारदाराचा चालक नामे प्रकाश पि. विष्‍णु सोनवणे हा तेलगांव ते दिंद्रुड या रस्‍त्‍याने जात असतांना त्‍यावेळी विरुध्‍द दिशेने ट्रॅक्‍टर क्रमांक एम.एच. 44/डी.312 व ट्रॉली क्रमांक एम.एच. 44/ सी.120 व ट्रॉली क्रमांक एम.एच. 44/ सी. 121 हे भरधाव वेगाने आले आणि चुकीच्‍या दिशेने येवून त्‍यांनी तक्रारदाराचे रिक्षाला जोराची धडक दिली. त्‍यावेळी रिक्षातील एक मयत झाला आणि ड्रायव्‍हरसह इतर दोन प्रवाशांना मार लागला. सदर अपघातामध्‍ये अँपेरिक्षाचे रु. 43,000/- चे नुकसान झाले.
 
      त्‍यानंतर तक्रारदाराने सदर रिक्षाच्‍या अपघाताची व झालेल्‍या नुकसानीची माहिती लेखी व फोनद्वारे तोंडी स्‍वरुपात सामनेवालेचे नाशिक येथील कार्यालयास कळविली. त्‍यानंतर सामनेवाले यांनी मागवलेली कागदपत्रे तक्रारदाराने सामनेवाले यांचे नाशिक येथील कार्यालयात नेवून दिली.
 
      सामनेवालेचे सांगणेनुसार तक्रारदाराने त्‍याचे वाहन दुरुस्‍तीसाठी श्री वैद्यनाथ अटो एजन्‍सी परळी वैजनाथ या ठिकाणी लावले व त्‍यासाठी लागणारे सुटे भाग व लागणारा खर्च या खर्चाचे अंदाजपत्रक श्री वैद्यनाथ अटो एजन्‍सी यांचेकडून घेतले व कार्यालयात दिले. त्‍यानंतर सामनेवाले यांनी सर्व्‍हेअर मार्फत वाहनाची पाहणी केली.
 
            सामनेवालेने वरिष्‍ठ कार्यालयाकडून मंजूरी आल्‍यानंतर नुकसान भरपाई देऊत असे सुचविले. त्‍यानुसार तक्रारदारास वाट पाहण्‍याशिवाय पर्याय राहिलेला नव्‍हता. परंतू दिनांक 21/09/2008 रोजी चुकीची दिनांक टाकून सामनेवालेने तक्रारदारास क्‍लेम नाकारल्‍याबदृल लेखी कळविले की, पत्रामध्‍ये दर्शविलेली कारणे ही पूर्णत: चुकीची असून तक्रारदारास नुकसान भरपाई देण्‍याचे टाळण्‍यासाठी केलेले कृत्‍य आहे.
 
      तारीख 07/11/2008 ते दि. 02/03/2009 या तारखेपर्यंत वाहन दुरुस्‍ती करण्‍यात आले. त्‍यानंतर तक्रारदाराने विमा कंपनीस नाशीक येथे जावून प्रत्‍यक्ष कळविले आणि नुकसान भरपाईची मागणी केली.
 
      तक्रारदाराने सामनेवालेस अपघाताबदृल लगेच कळविले होते. विमा कंपनीस अपघाताबदृल कळविण्‍यास 85 दिवसांचा उशीर झाला, हे म्‍हणणे चुकीचे आहे. तसेच रिक्षा चालक प्रकाश विष्‍णु सोनवणे यांच्‍याकडे सदर वाहन चालविण्‍याचा वैद्य परवाना होता. त्‍यामुळे विमा कंपनीने चालकाकडे परवाना नव्‍हता हा मुददा चुकीचा असून विमापत्राचा भंग झालेला नाही.
 
      वाहनात अपघाताच्‍या वेळी ड्रायव्‍हरसह 4 प्रवासी होते, त्‍यामुळे विमापत्राच्‍या नियम व अटींचा कोणताही भंग झालेला नाही. सामनेवालेंनी कोणतेही सबळ कारण नसतांना दावा नाकारलेला आहे, सेवेत कसूर केलेला आहे. त्‍यामुळे सामनेवाले हे दंडास पात्र आहेत.
 
            तक्रारदारांना वाहना दुरुस्‍तीचे पैसे न मिळाल्‍याने पैशाची व्‍यवस्‍था करावी लागली. वाहन गॅरेजमध्‍ये पडून होते त्‍यामुळे तक्रारदारास वाहनापासून उत्‍पन्‍न मिळवता आले नाही. तक्रारदाराने वाहन दुरुस्‍तीसाठी केलेला खर्च खालील प्रमाणे आहे.
 
  1. वैद्यनाथ अँटो एजन्‍सी परळी वैजनाथ रु. 28,000/-
  2. गॅरेजमधील वाहन दुरुस्‍तीचा खर्च रु. 15,000/-
  3. दि. 07/11/2008 पासून 02/03/2009 पर्यंत पैशा अभावी गॅरेजमध्‍ये पडून असल्‍यामुळे तक्रारदाराचे रु. 30,000/- चे नुकसान झालेले आहे.
  4. मानसिक त्रासापोटी रु. 25,000/-
  5. दाव्‍याचा खर्च रु. 5,000/- 
  6.  
विनंती की, तक्रारदारास नुकसान भरपाईची रक्‍कम रु. 1,00,000/- सामनेवालेकडून देण्‍याचा आदेश व्‍हावा. सदर रक्‍कमेवर 12 टक्‍के दराने व्‍याज देण्‍याचे आदेशीत करावे.
 
सामनेवालेंनी त्‍यांचा खुलासा तारीख 29/06/2010 रोजी दाखल केला. त्‍यांचा खुलासा थोडक्‍यात की, तक्रारीतील कलम- 1 सामनेवाले माहिती अभावी नाकारीत आहेत. अपेरिक्षा नोंदणी क्रं. एमएच-44/4899 चा तक्रारदार मालक आहे आणि त्‍याने रिक्षा चालविण्‍यासाठी चालकाची नेमणूक केलेली आहे. हा मजकूर तक्रारदाराने शाबीत करावा.
 
कलम- 2 तक्रारदाराने काटेकोरपणे शाबीत करावा. विमापत्र घेण्‍याच्‍या तारखेला अंमलात असल्‍याचे आणि त्‍यात संपूर्ण जोखीम संरक्षित असल्‍याची बाब तक्रारदाराने शाबीत करावी.
 
कलम- 3 माहितीतील नसल्‍याने सामनेवाले नाकारीत आहेत. रक्‍कम रु. 43,000/- चे नुकसान झाल्‍याची बाब तक्रारदाराने शाबीत करावी.
 
कलम5 4 सामनेवाले पूर्णपणे नाकारीत आहेत. तक्रारदाराने घटनेची सुचना लेखी किंवा तोंडी या सामनेवालेंना दिलेली नाही, त्‍याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारीत दाखल नाही. तक्रारदाराने संपूर्ण कागदपत्रे कार्यालयात स्‍वत: दाखल केली, ही बाब सामनेवाले नाकारीत आहेत.
 
तक्रारीतील कलम- 5 सामनेवाले नाकारीत आहेत. तक्रारदाराने सामनेवालेच्‍या आदेशानुसार वाहनाची दुरुस्‍ती केली आणि त्‍यानुसार वाहनाची तपासणी सर्व्‍हेअर मार्फत करण्‍यात आली, ही विधाने चुकीची आहेत. सदरचे आक्षेप विधाने ही केवळ तक्रारीस कारण घडण्‍यासाठी केलेली आहेत.
 
कलम- 6 मान्‍य नाही, सामनेवालेने नुकसान भरपाई देण्‍याची हमी दिली, हे विधान सामनेवाले नाकारीत आहेत. चुकीच्‍या तारखेचे दावा नाकारल्‍याचे पत्र दिल्‍याची बाब सामनेवाले नाकारीत आहेत.
 
कलम- 7 सामनेवाले नाकारीत आहेत. सामनेवालेंना वाहन दुरुस्‍तीबाबतची कोणतीही सुचना तक्रारदाराने दिलेली नाही.
कलम- 8 तारीख 21/03/2008 या पत्राद्वारे तक्रारदारांना सकारण दावा नाकारल्‍याचे कळविले, या हददीपर्यंत बरोबर आहे.
 
कलम- 9 बरोबर नाही. सामनेवालेंनी योग्‍य त-हेने दावा नाकारलेला आहे, त्‍यामुळे सेवेत कसूर नाही.
 
कलम- 10 ते 12 बरोबर नाहीत. तक्रारदारास कोणतीही नुकसान भरपाई देण्‍यास सामनेवाले जबाबदार नाहीत. न्‍याय मंचास सदरची तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही.
 
तारीख 31/01/2009 रोजी तक्रारदारांनी सामनेवालेंच्‍या कार्यालयास वाहनाचे नुकसान झाल्‍याबददल कळविलेले आहे. तारीख 07/11/2008 रोजी वाहनाचा अपघात होवून नुकसान झाल्‍याचे तक्रारदाराने ता. 31/1/2009 रोजी कळविले, म्‍हणून 85 दिवसांचा विलंब तक्रारदारास सुचना देण्‍यास झालेला आहे. त्‍यामुळे विमापत्रातील अटी व शर्तीचा भंग झालेला आहे आणि म्‍हणून सामनेवालेने तक्रारदाराचा दावा नाकारलेला आहे. विमा असलेले वाहन हे चालक प्रकाश सोनवणे हे घटनेचे तारखेला घटनेच्‍या वेळी चालवत होते. परंतू त्‍यांचा वाहन चालक परवाना अपघाताचे तारखेला वैद्य व अंमलातील नव्‍हता. याही कारणाने विमापत्राचा भंग झालेला आहे. म्‍हणून सामनेवालेंनी योग्‍य व कायदेशीर कारणाने तक्रारदाराचा दावा नाकारलेला आहे. याबाबत सामनेवालेंनी खालील न्‍याय निवाडयांचा आधार घेतलेला आहे.
 
A.C.J. 2008 Supreme court Pg. 627 New India Insurance co. 
V/s. Prabhulal.
 
नोंदणी प्रमाणपत्रानुसार वाहनाची आसन क्षमता 3 अधिक 1 असून अपघाताच्‍या वेळी 4 अधिक 1 असे एकूण 5 प्रवासी प्रवास करीत होते. असे पोलीस प्रथम खबरी मध्‍ये नमूद आहे. त्‍यामुळे वाहना कायदयाच्‍या नियमाचा भंग झालेला आहे. तसेच विमा कराराचाही भंग झालेला आहे, म्‍हणून सामनेवालेंनी योग्‍य त-हेने तक्रारदाराचा दावा नाकारलेला आहे.
 
प्रथम खबरी अहवालात गाडी मालक वाहन चालकाचे शेजारी पुढील आसणावर बसलेले होते, ही बाबही अधिकृत नाही, त्‍यामुळे वाहन चालकाला वाहन चालविण्‍यास अडचण निर्माण होवू शकते व त्‍यामुळे अपघात होवू शकतो.
 
उपलब्‍ध कागदपत्रे व तपासणी अहवालावरुन सामनेवालेंनी दावा नाकारलेला आहे. अशा परिस्थितीत सामनेवालेंवर कोणतीही जबाबदारी येत नाही.
 
तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येत नाहीत, सामनेवालेंच्‍या सेवेत कसूर नाही. सदरची तक्रार ही खोटी आहे. सामनेवाले विरुध्‍द तक्रार करण्‍यास कोणतेही कारण तक्रारदारास घडलेले नाही. तक्रार खर्चासह रदृ करुन सामनेवालेंना खर्चाची रक्‍कम रु. 5,000/- देण्‍यात यावेत.
 
न्‍याय निर्णयासाठी मुददे                           उत्‍तरे
1.    तक्रारदाराच्‍या अपघातग्रस्‍त वाहनाची नुकसान
      न देवून सामनेवालेंनी तक्रारदारांना दयावयाच्‍या
      सेवेत कसूर केल्‍याची बाब तक्रारदाराने सिध्‍द
      केली काय ?                                      नाही.
2.    तक्रारदार दाद मिळण्‍यास पात्र आहे काय ?              नाही.
3.    अंतिम आदेश ?                             निकालाप्रमाणे.
 
      तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तिवाद निशाणी’ 17, सामनेवालेचा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. सामनेवालेचे विद्वान अँड. ए. पी. कुलकर्णी यांचा युक्तिवाद ऐकला.
 
      तारीख 07/11/2008 रोजी तक्रारदाराचा आपेरिक्षा चालक प्रकाश विष्‍णु सोनवणे वाहन चालवत असतांना तेलगांव ते दिंद्रुड या रस्‍त्‍यावर विरुध्‍द दिशेने आलेल्‍या ट्रॅक्‍टर क्रं. एम. एच. 44/डी. 312, ट्रॉली क्रं. एम. एच. 44/ सी- 120 आणि ट्रॉली क्रं. एम. एच. 44/ सी. 121 यांनी भरधाव वेगाने येवून व चुकीच्‍या दिशेने येवून तक्रारदाराचे आपेरिक्षाला जोराची धडक देवून अपघात केलेला आहे. सदर अपघाताची सूचना तक्रारदाराने लेखी व तोंडी स्‍वरुपात सामनेवालेचे कार्यालय नाशिक येथे कळविल्‍याचे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे. तसेच नाशीक येथील कार्यालयाच्‍या आश्‍वासनानुसार व सुचनेनुसारच तक्रारदाराने सदरचे वाहन हे वैद्यनाथ आटो एजन्‍सी परळी वैजनाथ येथे दुरुस्‍तीसाठी लावलेले आहे व सदरची दुरुस्‍ती तारीख 07/11/2008 ते 02/03/2009 पर्यंत दुरुस्‍ती करण्‍यात आलेली आहे.
 
      सदर तक्रारदाराने तारीख 07/11/2008 च्‍या अपघाताची सुचना सामनेवालेंना तारीख 31/01/2009 रोजी म्‍हणजे 85 दिवस उशीराने दिलेली आहे, अशी जोरदार हरकत सामनेवालेंनी घेतलेली आहे व याच कारणाने सामनेवालेंनी दावा नाकारलेला आहे. तसेच वाहन चालकाकडे अपघाताच्‍या वेळी वैद्य वाहन चालक परवाना नव्‍हता याही कारणाने सामनेवालेने दावा नाकारलेला आहे.
 
      तारीख 31/01/2009 रोजी सामनेवालेंना अपघाताची सुचना मिळाल्‍याचे सामनेवालेंनी विधान केलेले आहे. सदरचे विधान तक्रारदाराने नाकारलेले नाही. तक्रारदाराने तक्रारीत जरी लगेचच सामनेवालेंना लेखी व तोंडी फोनद्वारे सदर घटनेची माहिती दिली व प्रत्‍यक्ष नाशिक येथे सामनेवालेंच्‍या कार्यालयात जावून आलो, असे म्‍हटलेले असले तरी तक्रारदाराच्‍या सदर विधानास विसंगत विधान तारीख 07/11/2008 पासून तक्रारदाराचे सदरचे वाहन हे दुरुस्‍तीसाठी देण्‍यात आलेले आहे. तसेच लगेच व फोनद्वारे सुचना दिल्‍याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. या सर्व परिस्थितीवरुन तक्रारदाराने अपघाताची सुचना सामनेवालेंना लगेच दिली ही बाब कोठेही स्‍पष्‍ट होत नाही. तसेच सामनेवालेंना सदर अपघाताची सुचना तक्रारदाराने 85 दिवस उशीरांनी दिल्‍याची बाब स्‍पष्‍ट होते, असे न्‍याय मंचाचे मत आहे.
 
      तसेच घटनेच्‍या वेळी वाहन चालक प्रकाश विष्‍णु सोनवणे यांच्‍याकडे वाहन चालविण्‍याचा वैद्य परवाना नव्‍हता.  याबाबत वाहन चालकाचा परवाना तक्रारदाराने दाखल केलेला आहे. सदरचा परवाना हा ए.आर.टी./आर. हा स्‍वयंचलीत वाहन चालविण्‍याचा परवाना असून तो स्‍वयंचलीत पॅसेंजर वाहन चालविण्‍याचा परवाना नाही. या कारणाने सामनेवालेंनी तक्रारदाराचा दावा नाकारलेला आहे.
 
      तक्रारदाराने त्‍याच्‍या म्‍हणण्‍याच्‍या समर्थनार्थ खालील न्‍याय निवाडयाचा आधार घेतलेला आहे.
            1. 2008 (2) T.A.C. 273 (Bom.)
                Bombay High Court, Nagpur Bench.
                United India Insurance Co. Ltd.
                                Versus\
                Vimal Narayanrao Nandanwar and Others.
               
                Motor Vehicles Act, 1988 , Section 147 and 149 – Motor insurance-
                Tractor – trolley – Breach of conditions of policy – Liability of
                Insurance Company – Offending tractor- trolley carrying 20 to 22
                Labourers – Tractor- trolley overturned and son of claimant died on spot -         
                Contention that there was breach of conditions of policy inasmuch
as tractor was carrying  more than 20 coolies instead of permitted 6 and
persons traveling were gratuitous passengers – No doubt more persons
were traveling than mentiened in policy – Held, breach of condition of
policy is no so fundamental in nature as to put an end to contract of
insurance – When breach committed Insurance Company cannot avoid
its liability as for as thired party is concerned – Such a defence not
available to Insurance Company.
 
2) 2010 (2) T.A.C.374 (S.C.) SUPREME COURT OF INDIA, NEW DELHI.
Amalendu Sahoo V/s. Oriental Insurance Co. Ltd.
 
Motor insurance – Comprehensive insurance policy- Accident took
place during subsistence of policy – Policy valid on date of accident –
Repudiation of claim on ground that vehicle was not used for personal use
but was used by way of being hired- Though no payment for personal
charges proved – Insurance Company cannot repudiate the claim in toto –
Orders of for a below not affirmed – Insurance Company directed to pay
A consolidated sum of Rs. 2,50,000/- even though compensation claimed
being Rs. 5,00,000/- -- No interest awarded – If amount not paid within
6 weeks from date of order, amount will carry interest at 9 % p.a.
 
 
सामनेवाले यांनी खुलाशात जरी त्‍यांचा बचाव म्‍हणून तीन प्रवासी बसल्‍याचा बचाव घेतलेला असला तरी युक्तिवादाच्‍या वेळी त्‍यावर सामनेवाले वकिलांनी भर दिला नाही, त्‍यामुळे तक्रारदाराने आधार घेतलेला वरील नं. 1 चा निवाडा या ठिकाणी लागू होत नाही, असे न्‍याय मंच नम्रपणे नमूद करीत आहे.
 
नं. 2 चा निवाडा पाहता सदरचा निवाडा हा वाहनाचा विमा ज्‍या कारणाने घेतलेला आहे त्‍या कारणाने वाहन वापरलेले नाही, या बाबतचा आहे. प्रस्‍तुत तक्रारीत त्‍या बाबतचे कोणतेही कारण नाही. त्‍यामुळे सदरचा न्‍याय निवाडा हा तक्रारदाराच्‍या तक्रारीस लागू होत नाही, असे न्‍याय मंच नम्रपणे नमूद करीत आहे. मुळात तक्रारदाराचा दावा हा वाहना चालकाच्‍या चालक परवाण्‍याच्‍या कारणाने व विलंबाच्‍या कारणाने नाकारलेला आहे.
 
तक्रारदाराने विलंबाने अपघाताची सुचना सामनेवालेकडे दिलेली आहे व त्‍यामुळे तक्रारदाराचा दावा नाकारलेला आहे. सदरचा दावा हा योग्‍य व कायदेशीर कारणासह नाकारल्‍याचे पत्र सामनेवालेंनी तक्रारदारांना दिलेले आहे व सदरचे पत्र मिळाल्‍याचे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे. यात सेवेत कसूरीचा भाग दिसून येत नाही. त्‍यामुळे सामनेवालेंनी तक्रारदाराचा दावा नाकारुन तक्रारदारांना दयावयाच्‍या सेवेत कसूर केल्‍याची बाब वरील सर्व पुराव्‍यावरुन स्‍पष्‍ट होत नाही, असे न्‍याय मंचाचे मत आहे. म्‍हणून तक्रारीत मागणी केल्‍याप्रमाणे तक्रारदारांना कोणतीही रक्‍कम देणे उचित होणार नाही, असे न्‍याय मंचाचे मत आहे.
 
सबब, न्‍याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
                   आ दे श   
1.     तक्रारदाराची तक्रार रदृ करण्‍यात येत आहे.
2.    सामनेवालेंच्‍या खर्चाबाबत आदेश नाही.
3.    ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
                        (सौ. एम. एस. विश्‍वरुपे )       ( पी. बी. भट )
                              सदस्‍या,                अध्‍यक्ष,
                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, बीड.
 
 
 
 
 
 
           
 
   
 
 
 
 
 
[ P. B. Bhat]
PRESIDENT
 
[ Sou. M. S. Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.