मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई दरखास्त क्रमांक – 46/11, 47/11, 48/11, 49/11, 50/11, 51/11, 52/11, 53/11 व 54/2011 दरखास्त दाखल दिनांक – 04/10/2011 आदेश दिनांक - 04/10/2011 1) वैशाली महेंद्र खंडागळे, रा. खंडाळा, ता. खंडाळा, जि. - सातारा. (दरखास्त क्रमांक 46/2011) 2) श्रीमती बानुबाई किसन संकपाळ 2)रा. सुरुळ, ता. पाटण, जि. – सातारा. (दरखास्त क्रमांक 47/2011)
3) श्रीमती विजया भरत पवार, 3)रा. काशीळ, ता. सातारा, जि. – सातारा. (दरखास्त क्रमांक 48/2011) 4) श्रीमती मालन सुरेश धुमाळ, 4)रा. करंजे (मोलाचा ओढा), ता. सातारा, जि. - सातारा. (दरखास्त क्रमांक 49/2011)
5) श्रीमती निता अंकुश पवार, 5)रा. उंबर्डे, ता. खटाव, जि. - सातारा. (दरखास्त क्रमांक 50/2011) 6) श्रीमती भारती उध्दव जगताप, 6)रा. निगडी, ता. कोरेगांव, जि. - सातारा. (दरखास्त क्रमांक 51/2011) 7) श्रीमती लता आनंदा सुर्यवंशी, 7)रा. जुना मालखेड, ता. कराड, जि. - सातारा. (दरखास्त क्रमांक 52/2011) 8) श्रीमती प्रभावती आनंदराव जाधव, 8)रा. अतीत, ता. सातारा, जि. - सातारा. (दरखास्त क्रमांक 53/2011) 9) सुनंदा यशवंत मडके, 9)रा. रांजनी, ता. मान, जि. – सातारा. (दरखास्त क्रमांक 54/2011) ........ अर्जदार/मूळ तक्रारदार विरुध्द
1) रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मर्या., 3 रा मजला, पलई प्लाझा, प्रीतम हॉटेलच्यासमोर, दादर टी.टी., मुंबई 400 014. 2) रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मर्या., रिलायन्स सेंटर, 19 वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई 400 001.
द्वारा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मर्या. 570, नायगम क्रॉस रोड, रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट जवळ, वडाळा (पश्चिम), मुंबई 400031. ....... गैरअर्जदार/मूळ सामनेवाले क्रं 1 व 2 (दरखास्त क्रं. 46/2011 ते 54/2011 करीता) समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती – उभयपक्ष व त्यांचे वकील गैरहजर - आदेश - - द्वारा - मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ 1) प्रस्तुत दरखास्ती सर्व अर्जदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 प्रमाणे दिनांक 04/08/2011 रोजी दाखल केलेल्या आहेत. मंचाने सर्व अर्जदारांच्या तक्रारी मंजूर केल्या होत्या. परंतु मंचाच्या आदेशाची पूर्तता गैरअर्जदार यांनी केली नाही म्हणून प्रस्तुत दरखास्ती दाखल केल्या आहेत. अर्जदारांतर्फे वकील श्री. अभय जाधव हे दिनांक 09/08/2011 रोजी हजर होते परंतु अर्जदार हे हजर नव्हते, त्यामुळे अर्जदार यांना हजर करण्याबाबत अर्ज दाखल केले. सदर अर्ज मंजूर करण्यात आले. तदनंतर दिनांक 17/08/2011 रोजी सदर दरखास्त प्रकरणे अर्जदारांच्या पतडताळणीकरीता ठेवण्यात आले होते, परंतु सदर दिवशीसुध्दा अर्जदार हे गैरहजर होते. अर्जदार व त्यांचे वकील दिनांक 23/08/2011, 26/08/2011 रोजी गैरहजर होते, त्यानंतर अनेक तारखांना गैरहजर होते. गैरअर्जदार यांना संधी देऊनही हजर न झाल्यामुळे अर्जदारांच्या दरखास्ती खारिज होण्यास पात्र आहेत. त्यामुळे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहेत - आदेश - 1) ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 अन्वये दाखल केलेल्या प्रस्तुत दरखास्ती क्रमांक 46/11, 47/11, 48/2011, 49/2011, 50/2011, 51/2011, 52/11, 53/2011 व 54/2011 हयातील सर्व अर्जदार हे सतत गैरहजर असल्यामुळे खारिज करण्यात येतात. 2) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 04/10/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./-
| [ SMT.BHAVNA PISAL] MEMBER[HONABLE MR. MR. NALIN MAJITHIA] PRESIDENT | |