द्वारा घोषित – श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष – तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे वडील हे शेतकरी व शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते. दिनांक रोजी तक्रारदाराच्या वडीलाचा खुन झाला. एफआयआर नोंदविण्यात आला व त्यानंतर दिनांक 6/10/2007 रोजी पीएम करण्यात आले. तक्रारदारानी दिनांक 29/2/2008 रोजी तहसिलदार यांच्याकडे सर्व कागदपत्रासहीत क्लेमफॉर्म पाठवून दिला. गेरअर्जदारानी क्लेमची रक्कम दिली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून क्लेमची रक्कम रु 1,00,000/-, 20,000/- नुकसान भरपाई आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराचा क्लेम त्यांना प्राप्त झाला नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार अमान्य करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यांचा लेखी जवाब पोष्टाद्वारे पाठवून दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराचा क्लेम दिनांक 16/4/2008 रोजी त्यांना प्राप्त झाला. हा क्लेम त्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दिनांक 23/12/2008 रोजी पाठवून दिला. गैरअर्जदार क्रमांक 3 यांची पोच पावती मंचात दाखल तरीही ते गैरहजर म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या गावातील कांही लोकांनी शेतीच्या वादातून तक्रारदाराच्या वडिलाचा खुन केला हे कागदपत्रारुन दिसून येते. पीएम अहवालामध्ये, गळफास लावल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला असे कारण दिलेले आहे म्हणून व्हिसेरा केमिकल अॅनालेसीस साठी पाठविण्यात आलेला आहे. तक्रारदाराचे वडिल हे शेतकरी होते याबाबत तक्रारदाराने पुरावा दाखल केलेला आहे. शेतकरी अपघात विमा योजनेनुसार पॉलिसीच्या दरम्यान शेतक-याचा मृत्यु झाला आहे त्यामुळे तक्रारदार हे क्लेमची रक्कम मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदारानी तहसिलदाराकडे आणि तहसिलदारानी कबाल इन्शुरन्स कंपनीकडे सर्व कागदपत्रे पाठविली. कबाल इन्शुरन्स कंपनीने दिनांक 23/12/2008 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे सर्व कागदपत्रासहीत क्लेम पाठवून दिल्याचे म्हणतात. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मात्र त्यांच्या लेखी जवाबात क्लेम प्राप्त झाला नसल्याचे सांगतात. वरील सर्व विवेचनावरुन मंच तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करुन गैरअर्जदार क्रमांक 1 यांना असा आदेश देत आहे की, त्यांनी रु 1,00,000/- कबाल इन्शुरन्स कंपनीने क्लेम पाठविलेल्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 23/12/2008 पासून दसादशे 15 टक्के (शासन परिपत्रकानुसार)व्याजदराने 6 आठवडयाच्या आंत द्यावेत तसेच तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावा. वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश - तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास रक्कम रु 1,00,000/- दिनांक 23/12/2008 पासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याजदराने तसेच तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावेत.
(श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Rekha Kapadiya] Member[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |