जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 14/2011 तक्रार दाखल तारीख- 31/01/2011
निकाल तारीख - 07/07/2011
------------------------------------------------------------------------------------
श्रीमती अनुसया भ्र गणपत रायते,
वय -52 वर्षे, व्यवसाय – शेती
रा.रायतेवाडी, पो.डोंगरकिन्ही, ता.पाटोदा.जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
1. महाराष्ट्र शासन, मार्फत जिल्हाधिकारी साहेब,
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड ता.व जि.बीड
2. तालुका कृषी अधिकारी,
कृषी अधिकारी कार्यालय, पाटोदा ता.पाटोदा, जि.बीड
3. कबाल इंश्युरन्स ब्रोकींग सर्व्हिस प्रा.लि.,
मार्फत विनीत आठल्ये, व्यवस्थापक (विभाग प्रमुख),
भास्करायण,एचडीएफसी होम लोन बिल्डींग,
प्लॉट नं.7, सेक्टर – इ-1 टाऊन सेंटर,
सिडको, औरंगाबाद, ता.जि.औरंगाबाद
4. रिलायन्स जनरल इंश्युरन्स कंपनी लि.
मार्फत शाखा व्यवस्थापक,
श्री साई एन्टरप्राईजेस, 210, साई कन्फोटेक,
आर.बी. मेहता मार्ग, पटेल चौक,
घाटकोपर (पूर्व) मुंबई – 400 077 ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – ए.जी.काकडे ,
सामनेवाले 1 तर्फे – तहसिलदार,
सामनेवाले 2 तर्फे - स्वत:,
सामनेवाले 3 तर्फे – स्वत:,
सामनेवाले 4 तर्फे – वकील – ए.पी.कुलकर्णी.
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर – सदस्य )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार ही रायतेवाडी पो.डोंगरकिन्ही ता.पाटोदा जि.बीड येथील रहिवाशी असुन त्यास गट नं.72/ए, 69/डी, 68/डी, 94 मध्ये शेत जमिन आहे. तक्रारदारांचे पती गणपत गोविंद रायते हे ता.10.08.2009 रोजी विहीरत पडून पाण्यात बुडून अपघाती मृत्यू पावल्यामुळे व तक्रारदार हे शेतकरी असल्यामुळे त्यांनी शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजनेअंतर्गत शासनाने उतरविलेली विमा लाभ रक्कम मिळण्यासाठी तक्रारदाराने ता.22.9.2009 रोजी सामनेवाले नं.2 यांचेकडे सर्व कागदपत्राची पूर्तता करुन विमा क्लेम मिळण्यासाठी मागणी केली. सामनेवाले नं.4 यांनी ता.15.7.2010 रोजी अपूर्ण कागदपत्राची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार वारंवार सामनेवाले नं.2 ते 4 यांचेकडे नुकसान भरपाईची मागणी करीत राहिले. पंरतु त्यांनी उडवाउडवीचे उतर दिल्यामुळे तक्रारदारांनी ता.22.12.2010 रोजी कायदेशीर नोटीस सामनेवाले नं. 1 ते 4 यांना दिली. त्यात त्यांनी शेतकरी वैयक्तीक अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/-, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.30,000/-, तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- असे एकुन रु.1,35,000/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासुन 18 टक्के व्याजाची मागणी केली आहे.
तक्रारदारांनी आपले म्हणण्याच्या पुष्ठयार्थ एकुन 15 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले नं.2 यांनी त्याचे लेखी म्हणने ता.9.3.2011 रोजी दाखल केले आहे. त्यात त्यांनी तक्रारदारांची कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास हक्कदार होवू शकत नाहीत, असे म्हणंटले आहे. तसेच सामनेवाले नं.2 यांनी ता.4.3.2010 रोजी तक्रारदारास दिलेल्या पत्रात तक्रारदारांनी सर्व कागदपत्राची पूर्तता केली असुन सदर कागदपत्र जा.क्र.835/2010 दि.21.7.2010 नुसार ती कागदपत्रे सामनेवाले नं.4 यांचेकडे पाठविल्याचे म्हणटले आहे. तसेच आपला विमाप्रस्ताव सामनेवाले नं.4 यांचेकडे प्रलंबीत असल्याचे पत्र तक्रारदारास दिले आहे. सामनेवाले यांचे वरील दोन्ही पत्रात विसंगती दिसून येते. यावरुन सामनेवाले यांनी आपल्या कामास कसूर करुन सेवेत त्रुटी केली आहे, हे सिध्द होते.
सामनेवाले नं.3 यांनी आपले लेखी म्हणने पोष्टाद्वारे ता.9.3.2011 रोजी दाखल केले असुन त्यात त्यानी सामनेवाले नं.4 यांना वारंवार स्मरणपत्रे दिल्याचे म्हणटले आहे. तसेच ता.21.6.2010 पासुन सामनेवाले नं.4 यांचेकडे तक्रारदाराचा शेतकरी वैयक्तीक अपघात विमा प्रकरण प्रलंबीत असल्याचे म्हणटले आहे.
तक्रारदारांने त्यांचे लेखी म्हणण्याचे पूष्ठयार्थ ता.6.6.2011 रोजी एकुन 9 कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदार व सामनेवाले नं. 2 ते 4 यांचे लेखी म्हणन्याचे व वरील सर्व कागदपत्राचे बारकाईने अवलोकन केले असता, सामनेवाले नं.4 यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा नुकसान भरपाई न देवून तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे हे सिध्द होते.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले नं.4 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास शेतकरी व्यक्तीगत अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- ( अक्षरी रुपये एक लाख फक्त ) त्यावर ता.18.01.2011 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह आदेश मिळाल्या तारखेपासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
3. सामनेवाले नं.2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त ) आदेश मिळाल्या पासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
4. सामनेवाले नं.4 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-( अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- ( अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत अदा करावी.
5. सामनेवाले नं.4 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र.2 मधील रक्कम विहित मुदतीत अदा न केल्या ता.18.01.2011 पासुन होणा-या व्याजासह रक्कम तक्रारदाराचे पदरीपडे पर्यन्त व्याज देण्यास जबाबदार राहतील.
6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड