Maharashtra

Additional DCF, Mumbai(Suburban)

CC/04/327

Suresh Bohra - Complainant(s)

Versus

Reliance Energy Ltd - Opp.Party(s)

S Gokhale

28 Sep 2010

ORDER


ADDITIONAL DISTRICT CONSUMER REDRESSAL DISPUTES FORUM,BANDRA3rd floor,New ADM BLDG. Near Chetna College,Bandra(E)-51.
Complaint Case No. CC/04/327
1. Suresh Bohra 701, Parasrampuria, T6, Yamuna Nagar, Mumbai 400053 ...........Appellant(s)

Versus.
1. Reliance Energy Ltd Electricity House, Santacruz (E), Mumbai 400055 ...........Respondent(s)



BEFORE:
HONORABLE S P Mahajan ,PRESIDENTHONORABLE G L Chavan ,Member
PRESENT :

Dated : 28 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

तक्रारदारासाठी ऍड. श्री. गोखले हजर.
सामनेवालेसाठी ऍड.श्री. सुखाडीया हजर.
 
श्री.ग.ल.चव्हाण, सदस्यानुसार दिलेले 3131निकालपत्र्/span>
 
ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे.
 
1.   तक्रारदार यांनी त्यांच्या निवासी गाळयासाठी सामनेवाले यांच्याकडून घेतलेल्या वीज मिटरचा क्रमांक 81577006/025166 व ग्राहक क्रमांक 826576436 असा आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांची सेवा निवासी वीज पुरवठयासाठी घेतलेली आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांना त्यांच्या वीजेच्या खपाची येणारी देयके नियमितपणे भरत होते. तथापी त्यांना सामनेवाला यांच्याकडून सातत्याने त्रास देण्यात येत होता. म्हणून ते सामनेवाला यांच्या सांताकृझ येथील कार्यालयात जावून त्यांनी संबंधित अधिका-यांची भेट घेतली. त्यावेळी सामनेवाला यांनी निर्धारीत केलेली दंडाची रक्कम रुपये 1,21,000/- दोन दिवसात भरावी असे सांगीतले. तक्रार अर्जात नमुद केल्याप्रमाणे तक्रारदार फ्रिज, ए.सी, टी.व्ही. वाशिंग मशिन इ.विद्यूत उपकरणांचा वापर करत असतात असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु या बाबींचा वापर नियमितपणे केला जात नाही. ए.सी. मशिनचा वापर फक्त उन्हाळयात केला जातो. तक्रारदाराने सामनेवाला यांच्या कडून दंडाची निर्धारीत केलेली रक्कम रुपये 1,21,000/- पैकी मानसीक ताण कमी करण्याच्या हेतुन रुपये 22,420/- सामनेवाला यांना अदा केली. ही रक्कम काही कारण नसताना सामनेवाला यांना द्यावी लागली असल्यामुळे ती परत मिळावी अशी तक्रारदारांची विनंती आहे. कारण सामनेवाला यांच्याकडून वीज मिटर खंडीत करण्याची धमकी दिली होती. म्हणून ही रक्कम तक्रारदाच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी वीज मिटर खंडीत करु नये म्हणून भरण्यात आली. सामनेवाला यांनी ही वसुलीची रक्कम कोणत्या कारणासाठी तक्रारदारावर बसविली या विषयीचा कोणताही तपशिल किंवा सविस्तर माहिती तक्रारदाराने मागीतली असता, दिलेली नाही यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
 
2.     तक्रारदाराने त्यांच्या लेखी युक्तीवादामध्ये सप्टेंबर, 2003 ते जानेवारी, 2010 या कालावधीत त्यांच्याकडून वापरण्यात आलेल्या विजेच्या सरासरीची माहिती दिलेली आहे. तक्रारदाराचे म्हणणे की, सामनेवाले यांनी आरोप केल्याप्रमाणे अधिकची विज वापर करीत नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कधीही अनधिकृत विजेचा वापर केलेला नाही. त्यामुळे सामनेवाला यांच्याकडून जी दंडाची रक्कम आकारण्यात आलेली आहे ती त्यांची चुकीची कृती आहे. म्हणून तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांच्याकडून दंडापोटी रक्कम रुपये 1,12,795/- बाबतची मागणी रद्द करुन या प्रकरणी रक्कम रुपये 22,420/-ही आपला हक्क आबाधित ठेवून भरलेली आहे ती रक्कम त्यांना परत मिळावी.
 
3. सामनेवाला यांनी कैफियत दाखल करुन तक्रार अर्जातील आरोप पूर्णत: नाकारले आहेत. सदरहू तक्रार खोटी, बिन बुडाची, बेकायदेश्ीर व गैरसमजुतीवर आधारलेली असल्याने ती खर्चासह रद्द करण्यात यावी असे सामनेवाले यांचे म्हणण्े आहे. तक्रारदाराने या प्रकरणी महत्वाचे मुद्दे लपवून ठेवलेले असून तक्रारदार पारदर्शकपणे मंचासमोर आलेला नाही. तक्रारदाराने वीज मिटरमध्ये हस्तक्षेप
 ( Meter Tampered ) केलेला असून गैर मार्गाने, अनधिकृतपणे वीजेचा वापर केला असल्याचे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. तक्रारदाराने वीजेची चोरी करुन फौजदारी गुन्हा केला आहे आणि त्यामुळे विद्युत अधिनियम 2003 मध्ींल तरतुदीनुसार ते शिक्षेसाठी पात्र आहेत. तक्रारदाराने वीजेची चोरी केली असल्यामुळे ही तक्रार या मंचासमोर चालणारी नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या विरुध्द त्यांनी चोरी केलेल्या प्रकरणी दंडाची रक्कम मागणी करण्यात आली या बाबतचा तपासणी अहवाल प्रत सोबत दाखल केली आहे. त्यामुळे सामनेवाल्यांनी संबंधित प्रकरणी केलेली कार्यवाही ही बेकायदेशिर नसल्याने त्यांच्या सेवेत कमतरता नाही, वर नमुद केलेल्या परिस्थितीत ही तक्रार या मंचासमोर चालणारी नाही. म्हणून तक्रार रद्द करण्यात यावी असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे.
 
4. तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडून पुरवठा करण्यात येणा-या वीजेच्या प्रकरणी विज मिटरमध्ये हस्तक्षेप करुन विजेची चोरी केलेली असल्यामुळे त्यामध्ये सामनेवाल्यांचे बरेच नुकसान झालेले आहे. या नुकसान भरपाईची पहाणी व तपासणी करुन त्यानुसार नुकसान उभरपाईच्या रक्कमेची त्यानुसार रक्कम रुपये 1,12,795/-निर्धारण करण्यात आले. या रक्कमेची भरपाई तक्रारदाराने सामनेवाल्यांना करावी अशी मागणी करण्यात आली. यामध्ये सामनेवाला यांची काही चुक नाही असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे.
 
5. तक्रारदाराच्या वीज मिटरची सामनेवाले यांच्या तपासण्ी पथकाकडून 2 जुलै, 2004 रोजी पहाणी व तपासणी करण्यात आली. व त्यावर तक्रारदाराच्या पत्नीची सही घेऊन तसा अहवाल तक्रारदाराला देण्यात आला. त्यामध्ये खालील दोष आढळून आले.          
        1) " Glass Gasket found Tempered "
        2) " Scrachess found on Reading Digit on 100 &
                        10 Digit.    
 
6. तक्रारदाराला वर नमुद केलेली नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले यांच्या संबंधित अधिका-याला दिनांक 22/7/2004 रोजी प्रत्यक्ष भेटून तक्रारदाराने तडजोडी संबंधी चर्चा केली. त्यांनी अनधिकृतपणे विजेचा वापर केल्याचे मान्य केले. व त्यानंतर सामनेवाले यांनी निर्धारीत केलेल्या रक्कमेपैकी रु.21,920/- चा पहिला हप्ता सामनेवाले यांना अदा केला. त्यामध्ये रु.1,920/- वीज मिटर बदलून नविन बसविण्याच्या खर्चाच्या रक्कमेचा समावेश होता. सामनेवाले यांच्या कार्यपध्दतीनुसार वीज मिटरची पहाण्ी व तपासणी केल्यानंतर मे, 2002 ते जुलै, 2004 या कालावधीमध्ये तक्रारदाराकडून अनधिकृतपणे वापरण्यात आलेल्या नोंदणीकृत विजेच्या अभिलेखाप्रमाणे त्या काळात सरासरी 911 एकांक वापरल्याचे सामनेवाले यांच्या निदर्शनास आले व त्यानुसार दंडाची रक्कम रु.1,12,795/- निर्धारीत करण्यात आली. पैकी रु.21,920/- रक्कम तक्रारदार यांच्याकडून मिळाली.उर्वरित रक्कम रु.90,875/- अद्याप तक्रारदार यांच्याकडून सामनेवाले यांना प्राप्त झालेली नाही. म्हणून सदरहू रक्कम तक्रारदाराने सामनेवाला यांना प्रदान करणे ही त्यांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी त्यांनी अद्याप पार पाडलेली नाही. त्यामुळे सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता नाही असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून सदरहू तक्रार अज खर्चासह रद्द करण्यात यावा अशी सामनेवाले यांची विनंती आहे.
 
7. तक्रार अर्ज, त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्रे, प्रतिनिवेदन, लेखी युक्तीवाद, सामनेवाले यांची कैफियत व लेखी युक्तीवाद इ.कागदत्राची पहाणी व अवलोकन केले. उभय पक्षकारांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. त्यानुसार निकालासाठी खालील प्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
 
 

अ.क्र.
 
मुद्दे
 
उत्तरे
 
1.
 
तक्रार अर्ज या मंचाला चालविता येईल काय ?
 
नाही.
 
2.
 
तक्रारदार हे सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय ?
 
प्रश्न उद्भवन नाही.
 
3.
 
तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून रक्कम रु.22,420/- परत मागण्यास पात्र आहेत
काय ?
प्रश्न उद्भवन नाही.
 
4.
 
आदेश
 
आदेशा प्रमाणे.
 

 
कारण मिमांसा
8. तक्रारदाराने त्यांच्या निवासी सदनिकेसाठी सामनेवाले यांच्याकडून घेतलेल्या वीज मिटरचा क्रमांक 81577006/025166 व ग्राहक क्रमांक 826576436 असा आहे. दिनांक 02/07/2004 रोजी सामनेवाले यांच्या दक्षता पथकाच्या अधिका-यांनी तक्रारदाराच्या वीज मिटरची पहाणी व तपासणी केली. त्यावेळी तक्रारदाराच्या सदरहू वीज मिटरमध्ये हस्तक्षेप ( Meter Tampered ) केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली त्या बाबतचे सविस्तर शेरे सामनेवाले यांच्या अधिका-याने पहाणी अहवालामध्ये नमुद केलेले आहे. त्यांनी अहवालात नमुद केल्याप्रमाणे वीज मिटरमध्ये हस्तक्षेप केलेला होता. त्यानुसार या सपूर्ण अहवालाची प्रत त्यांनी तक्रारदाराला दिली. यावर सामनेवाले यांच्याकडून तक्रारदाराच्या पत्नीची सही घेतली हे तक्रारदाराने त्यांच्या लेखी युक्तीवादामध्ये मान्य केले आहे. त्याअर्थी सामनेवाले यांच्या दिनांक 2/7/2004 च्या पहाणी अहवालाची प्रत तक्रारदाराला प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये खालील दोष निदर्शनास आल्याचे नमूद केले आहे.
 
        1) " Glass Gasket found Tempered "
        2) " Scrachess found on Reading Digit on 100 &
                        10 Digit. " 
 
वीज मिटरमध्ये हस्तक्षेप केल्याची बाब सामनेवाले यांच्या अधिका-यांच्या निदर्शनास आल्यानंतर सामनेवाले यांच्या म्हणण्याप्रमाणे विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन पहाणी व तपासणी करुन प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने वीजेची चोरी केली असल्याने मे, 2002 ते जुलै,2004 या कालावधीमध्ये तक्रारदाराने अनधिकृतरित्या विजेची चोरी करुन विजेचा वापर किती केलेला आहे हे निर्धारीत करुन दंडापोटी रक्कम रुपये 1,12,795/- ची मागणी तक्रारदार यांचेकडे केली. वीज मिटर खडीत होऊ नये म्हणून तक्रारदाराने सामनेवाले यांच्या अधिका-याची दिनांक 22/07/2004 रोजी भेट घेवून तडजोडीची मागणी केली व त्यानुसार मिटर खंडीत करण्यात येवू नये या हेतुने नविन मिटर बसविण्याच्या रक्कमेसह एकूण रक्कम रुपये 21,920/- सामनेवाले यांना अदा केली.
 
9. मा. राष्ट्रीय आयोगाने Revision Petition No. 1283 of 2003 दिनांक 9February 2004 नुसार जो निवाडा दिलेला आहे. ŸµŸ»†#164;¿»»¯#207;´ †#198;
 
 
 
                Shri. B.C.Julka
                   V/s
                Delhi Vidyut Board
        
          [ 1686-2006 Consumer 10785 (NS) ]
त्यात मा.राष्ट्रीय आयोगाचे मत खालील प्रमाणे आहे.
 
          " Consumer Protectiion Act. 1986 Section 2(1)(e)
               Consumer dispute electricity- surprise inspection
               Of complainants premises carried out meter half
         Seal found unnumbered and meter found tampered-
               Inspection report signed by complainant- case of
               Electricity and FAE not a consumer dispute-
             Revision petition dismissed "
 
या निवाडयामध्ये मा. राष्ट्रीय आयोगाने खालील प्रमाणे View घेतला आहे.
 
FAE is not a consumer dispute. We are of the
Same view that FAE cannot be a matter of
Consumer dispute. This will unnecessary      
encourage malpractices by the consumers."
 
10. राष्ट्रीय आयोगाचा वरील निवाडा व या तक्रारीची वस्तुस्थिती लक्षात घेता तक्रारदार हा ग्राहक होत नाही आणि प्रस्तुत प्रकरण या मंचाला चालविता येणार नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रार अर्जातील मागण्या मान्य करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अशा परिस्थितीत तक्रार अर्ज रद्दबातल होण्यासारखा असल्याने या प्रकरणी खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो ;
 
                 आदेश
 
1.   तक्रार क्रमांक 327/2004 रद्दबातल करण्यात येतो.
2. उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती दो­न्ही पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.

[HONORABLE G L Chavan] Member[HONORABLE S P Mahajan] PRESIDENT