तक्रारदार : स्वतः
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- *-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- *-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्र
तक्रारीचे संक्षिप्त स्वरूप खालीलप्रमाणेः-
सामनेवाले ही विद्युत पुरवठा करणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे त्यांचे दुकानाला विद्युत पुरवठा करणे कामी अर्ज दिला. तक्रारदार व अन्य दुकानदार यांच्या संघटनेने विद्युत पुरवठयाच्या संदर्भात सामनेवाले यांचेकडे तक्रार अर्ज देखील दिला. त्यानंतर, सामनेवाले यांनी इमारतीच्या मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र हजर करण्यास सांगितले. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विद्युत पुरवठा तर केलाच नाही परंतु दि.21.02.2012 रोजी भरमसाठ रक्कमेचे देयक पाठविले. त्यानंतर, तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. तक्रारीच्या सुनावणी कामी तक्रारदारांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
2 तक्रारदारांनी तक्रारीत असेही स्पष्टपणे मान्य केली आहे की, तक्रारदारांचे दुकान असुन ते भाडोत्री असुन जागेचा वापर वाणिज्य व्यवसायाकामी केला जातो. ग्राहक संरक्षण कायदा, कलम-2(1))(डी) प्रमाणे वर्षे-2003 नंतर ग्राहकाने जर सेवा वाणिज्य व्यवसायाकामी स्विकारली असले तर सेवा स्विकारणारी व्यक्ती ग्राहक संरक्षण कायदा, कलम-2(1))(डी) प्रमाणे ग्राहक होत नाही. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत तक्रारीची जी प्रत दाखल केलेली आहे, त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांना औद्योगिक कामी म्हणजे वाणिज्य व्यवसायाकामी विद्युत पुरवठा केला असे नमुद आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून निवासी कामी विद्युत पुरवठा स्विकारला नव्हता. सबब, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक संरक्षण कायदा, कलम-2(1))(डी) प्रमाणे ग्राहक होत नाहीत.
वरील चर्चेवरुन व निष्कर्षावरुन, या प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतात.
आदेश
तक्रार दाखल करुन घेण्यात येत नाही व ग्राहक संरक्षण कायदा, कलम-12(3) प्रमाणे रद्द करण्यात येते.