निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* आदेश 1. सा.वाली ही विद्युत पुरवठा करणारी कंपनी असून तक्रारदारांच्या जागेमध्ये मिटर क्रमांक 287692 या मिटरला घरगुती दराने सा.वाले हे विद्युत पुरवठा करीत होते. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदाराने सा.वाले यांना विद्युत देयकाप्रमाणे नियमितपणे रक्कम अदा केलेली आहे. दिनांक 11.4.2008 रोजी तक्रारदार हजर नसताना सा.वाले यांनी तक्रारदारांचे जागेला भेट दिली व मिटरमध्ये फेर जुळवणी केली आहे असा खोटा अहवाल तंयार केला. त्या अहवालाचे आधारे अंतरीम वसुली आदेश दिनांक 29.4.2008 रोजी सा.वाले यांनी पारीत केला व तक्रारदारांना 45049.14 येवढया देयकाची रक्कम दि.6.7.2006 ते 11.4.2008 या कालावधीकरीता भरण्यास सांगीतले. सा.वाले यांनी त्यानंतर दुसरा हंगामी आदेश दि.2.5.2008 रोजी पारीत केला व तक्रारदारांना त्यांच्या मिटरमधुन गैरनिवासी विद्युत वापर केला असा आरोप लावून तक्रारदारांना रु.49442.02 या रक्कमेचे देयक पाठविले. तक्रारदारांनी दि.21.5.2008 व दि.26.5.2008 रोजी सा.वाले यांच्या अधिका-यांकडे पत्र देवून मिटरची फेर तपासणी करावी, तसेच जागेवर तपासणी करावी अशी विनंती केली. परंतु सा.वाले यांनी दाद दिली नाही. याप्रमाणे सा.वाले हे तक्रारदारांकडून जबरदस्तीने रु.94,491/- वसुली करु पहात आहेत. मुळातच तक्रारदारांचा विजेचा वापर गैर निवासी किंवा व्यापारी स्वरुपाचा नसून तक्रारदार हे केवळ निवासी वापराकरीता विद्युत पुरवठा वापरत आहेत. तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन दि.29.4.08 व 2.5.08 हे दोन्ही आदेश बेकायदेशीर आहेत असे जाहीर करुन सा.वाले यांचेकडून 50,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी दाद मिळणेकामी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. 2. सा.वाले यांनी आपली कैफियत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, दि.11.4.2008 रोजी सा.वाले यांच्या अधिका-यांनी तक्रारदारांचे जावई श्री.फैजल शेख यांचे समक्ष तक्रारदारांचे जागेची पहाणी केली असताना तक्रारदार हे खालच्या मजल्यावर निवासी वापर तर वरच्या मजल्यावर 4 मशिन ठेवून त्या जागेचा वाणिज्यकामी वापर करीत आहेत असे दिसून आले. तसेच तक्रारदारांचे जागेवर बसविलेल्या मिटरमध्ये फेरफार केल्याचे आढळले व ते मिटर अतिशय मंदगतीने चालत होते. त्यानंतर दुसरा मिटर तपासण्यात आला व सा.वाले यांनी अंतरीम आदेश पारीत करुन तक्रारदारांना सुनावणीकामी हजर रहाण्यास कळविले. सा.वाले यांच्या कथनाप्रमाणे दि.15.5.2008 रोजी हजर होऊन त्यांचा वरचे मजल्यावरचा वापर वाणिज्य कामासाठी होत होता हे तक्रारदारांनी मान्य केले व तसे लिहून दिले. त्यानंतर अंतरीम आदेश पारीत करण्यात आला. याप्रमाणे सा.वाले यांनी आपल्या कार्यवाहीचे समर्थन केले व अंतरीम आदेश कलम 126 यास तक्रारदाराने अपील आव्हान दिले असल्याने तक्रार चालू शकत नाही असे निवेदन दिले. 3. तक्रारदाराने आपले प्रतिनिवेदनाचे शपथपत्र दाखल केले. तसेच पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रं दाखल केली. सा.वाले यांनीदेखील त्यांचे कथनाचे पृष्ठयर्थ आपला अधिकारी यांचे शपथपत्र व कागदपत्रं दाखल केली. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफियत, पुराव्याचे शपथपत्र कागदपत्रं, शपथपत्र, तसेच लेखी युक्तीवादाचे वाचन केले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. त्यानुसार तक्रार निकालाकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांचे विद्युत मिटरमध्ये फेरफार केला व तक्रारदार हे आपल्या जागेचा काही भाग वाणिज्य कामी वापरून निवासी दराने घेतलेल्या विजेचा वापर व्यापारी उद्देशाकामी करत आहेत यावर आधारीत सा.वाले यांनी पारीत केलेला आदेश हा चूक,निरर्थक आहे ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय व सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 2 | तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. रु.10,000/- | 2 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 4. सा.वाले यांनी आपली कैफियत शपथपत्रासोबत दि.11.4.2008 रोजी सा.वाले यांचे अधिका-यांनी तक्रारदाराच्या मिटरची तपासणी केली व आपला अहवाल दाखल केलेला आहे तो निशाणी "अ" पृष्ठ क्र.34 वर आहे. त्यामधील मजकुरावरुन असे दिसून यते की, सा.वाले यांचे अधिकारी श्री. ई.टी.राणे व श्री.क्षीरसागर यांचे समक्ष व तक्रारदारांचे नातेवाईक जावई फैजल शेख यांचे समक्ष मिटरची पहाणी केली व मिटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. तो अहवाल पृष्ठ क्र. 35 वर मिटर संबंधित तांत्रिक अहवाल आहे. तो अहवाल श्री.राणे व श्री.क्षिरसागर यसांनी तंयार केल्याचे दिसून येते. तर श्री. निकम यांनी त्यास अंतीम स्वरुप दिलेले आहे. 5. सा.वाले यांनी हंगामी आदेश दि.29.4.2008 व 2.5.2008 हे वरील तांत्रिक अहवालावर आधारीत पारीत केले होते व त्यानंतर त्या हंगामी आदेशान्वये दि.7.6.2008 रोजी म्हणजे तक्रार दाखल केल्यानंतर अंतीम करण्यात आला. सा.वाले यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदार वापरत असलेला मिटरमध्ये दोष आढळल्याने व त्या मिटरमध्ये फेरफार केला होता व त्यामुळे तो मिटर एकूण व खराखुला वापर दाखवित नव्हता या संबंधात सा.वाले यांनी तक्रारदाराच्या मिटरची तपासणी कुठल्याही प्रयोगशाळेकडून करुन घेतलेली नाही. तसेच त्या बाबतचा अहवाल दाखल केलेला नाही. या संबंधात तक्रारदारांचे वकीलांनी आपल्या युक्तीवादामध्ये असे कथन केले की, सा.वाले यांनी तक्रारदाराचे जागेमध्ये बसविलेला मिटर तपासून घेतलेला नाही किंवा तसा अहवाल दाखल केलेला नाही. त्या युक्तीवादाचे पृष्ठयर्थ तक्रारदाराने राष्ट्रीय आयोगाच्या निकाल उत्तरी हरीयाणा बिजली वितरण निगम लि.(एचव्हीपीएन) विरुध्द गौतम प्लॉस्टीक I (2008 ) CPJ 62 ( NC) दिनांक 2.11.2007 याचा आधार घेतला व त्यामध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने विद्युत कायद्याच्या कलम 39 त्याचप्रमाणे कलम 44 उधृत करुन असा अभिप्राय नोंदविला की, मिटर तपासणी न करता त्याचप्रमाणे मिटर तपासणी संबंधी नोटीस न देता ग्राहकाचे विरुध्द आदेश पारीत केल्यास विजेची चोरी झाली ही बाब सिध्द होत नाही. प्रस्तुतच्या प्रकरणामध्येदेखील सा.वाले यांनी त्या सबंधात कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. 6. या व्यतिरिक्त सा.वाले यांनी मिटरचा तपासणी अहवाल तंयार केलेला आहे. त्यांचे दोन अधिकारी श्री.क्षीरसागर व श्री.राणे याच्या सहया आहेत. सा.वाले यांनी आपल्या कथनाचे पृष्ठयर्थ श्री.क्षीरसागर व श्री.राणे यांचे शपथपत्र दाखल केलेले नाही. वस्तुतः सा.वाले यांचे अधिका-यांनी तक्रारदाराचे जागेवर भेट दिली व त्यांचे जागेत बसविलेल्या विद्युत मिटरमध्ये फेरफार करण्यात आला होता ही बाब सिध्द करण्याची जबाबदारी सा.वाले यांचेवर असल्याने सा.वाले यांनी वरील अधिका-यांचे शपथपत्र दाखल करणे आवश्यक होते. तो महत्वाचा पुरावा ठरला असता. याबद्दल सा.वाले यांचेकडून वरील बाबींचा खुलासा लेखी युक्तीवादाचेवेळी करण्यात आला नाही. 7. त्याचप्रमाणे सा.वाले यांनी आपल्या कैफियतीमध्ये असे कथन केले की, तक्रारदाराने चौकशीचे दरम्यान हजर हजर होऊन दिनांक 15.5.08 रोजी त्यांचे जाणेतील वरच्या मजल्याचा वापर वाणीज्य कामासाठी होत होत होता ही बाब मान्य केली. तथापी सा.वाले यांनी आपल्या कैफियतीसोबत जी कागदपत्रे दाखल केलेली त्यामध्ये तक्रारदाराच्या वरील दिनांक 15.5.2008 च्या जाबाबाची प्रत दाखल केलेली नाही किंवा युक्तीवादासोबत सुध्दा ही प्रत दाखल केलेली नाही. 8. सा.वाले यांनी तक्रारदाराला तथाकथीत श्री.फैजल सय्यद शेख यांची सही तपासणी अहवालावर आहे यावर भर दिला. तथापी श्री.फैजल शेख हे ग्राहक नव्हेच तर त्यांचे नाते संबंध हे सिध्द झालेले नाही किंवा त्यांना दिलेली जबाबदारी तक्रारदारांचे वतीने होती असे दिसून येत नाही. 9. वरील परिस्थिती सा.वाले यांनी तक्रारदाराविरुध्द हंगामी आदेश पारीत करणेकामी त्यांचे मिटरमध्ये फेरफार झालेला आहे असे आरोप करुन मागील दोन वर्षापासुनची वसुली करण्याची कार्यवाही ही कायदेशीर होती व योग्य होती ही बाब सा.वाले सिध्द करु शकत नाही. मुळातच मागील वर्षाची कार्यवाही ही कलम 126 प्रमाणे विद्युत कायदा 2003 प्रमाणे फक्त मागील 12 महिन्याची होऊ शकते. त्यापेक्षा अधिक काळाची होऊ शकत नाही, तथापी सा.वाले यांनी ही कार्यवाही दोन वर्षाच्या कालावधीची केली. वरील परिस्थितीत सा.वाले यांनी तक्रारदरांना त्यांचे विद्युत मिटरचे वापराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब सिध्द होते. 10. सा.वाले यांनी वरील प्रकारची कार्यवाही केली व दोन अंतरीम आदेश पारीत केल्यानंतर तक्रारदारांना रक्कम भरणेकामी वसुली आदेश दिला व अंतीमतः तक्रारदाराने प्रस्तुत मंचाकडे तक्रार दाखल करुन अंतरीम आदेश मिळविला व त्याकामी रु.10,000/- जमा केले. त्या आदेशाचे वाचन केले असता असे दिसते की, तक्रारदारांनी 10,000/- रुपये व्यतिरिक्त 21,000/- रुपये सा.वाले यांचेकडे जमा केले होते. यावरुन तक्रारदारांना मानसिक ताण, व कुचुंबणा झाल्याचे सिध्द होते. तथापी तक्रारीचे एकंदरीत स्वरुप व तक्रारदार व सा.वाले यांचे संबंध लक्षात घेता नुकसान भरपाईची रक्कम रु.10,000/- तक्रारदारांना देणे योग्य राहील असे प्रस्तुत मंचास वाटते. 11. वरील परिस्थिती पुढील आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 297/2008 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदारांचा तक्रारीतील मिटर क्र.287692 या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब सिध्द होते व सामनेवाले यांनी हंगामी वसुली आदेश दि.29.4.2008 व दिनांक 2.5.2008 यांची अंमलबजावणी करु नये असे आदेश देण्यात येतात. 3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई बद्दल रक्कम रु.10,000/- अदा करावी असा आदेश देण्यात येतो. 4. तथापी तक्रारदाराने नियमित विज देयकाप्रमाणे सामनेवाले यांना रक्कम अदा करावी. तसेच भविष्यामध्ये तक्रारदारांना योग्य वाटल्यास तक्रारदाराचे मिटर तपासणी बद्दल वैध कार्यवाही करु शकतात. 5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात. निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* आदेश 1. सा.वाली ही विद्युत पुरवठा करणारी कंपनी असून तक्रारदारांच्या जागेमध्ये मिटर क्रमांक 287692 या मिटरला घरगुती दराने सा.वाले हे विद्युत पुरवठा करीत होते. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदाराने सा.वाले यांना विद्युत देयकाप्रमाणे नियमितपणे रक्कम अदा केलेली आहे. दिनांक 11.4.2008 रोजी तक्रारदार हजर नसताना सा.वाले यांनी तक्रारदारांचे जागेला भेट दिली व मिटरमध्ये फेर जुळवणी केली आहे असा खोटा अहवाल तंयार केला. त्या अहवालाचे आधारे अंतरीम वसुली आदेश दिनांक 29.4.2008 रोजी सा.वाले यांनी पारीत केला व तक्रारदारांना 45049.14 येवढया देयकाची रक्कम दि.6.7.2006 ते 11.4.2008 या कालावधीकरीता भरण्यास सांगीतले. सा.वाले यांनी त्यानंतर दुसरा हंगामी आदेश दि.2.5.2008 रोजी पारीत केला व तक्रारदारांना त्यांच्या मिटरमधुन गैरनिवासी विद्युत वापर केला असा आरोप लावून तक्रारदारांना रु.49442.02 या रक्कमेचे देयक पाठविले. तक्रारदारांनी दि.21.5.2008 व दि.26.5.2008 रोजी सा.वाले यांच्या अधिका-यांकडे पत्र देवून मिटरची फेर तपासणी करावी, तसेच जागेवर तपासणी करावी अशी विनंती केली. परंतु सा.वाले यांनी दाद दिली नाही. याप्रमाणे सा.वाले हे तक्रारदारांकडून जबरदस्तीने रु.94,491/- वसुली करु पहात आहेत. मुळातच तक्रारदारांचा विजेचा वापर गैर निवासी किंवा व्यापारी स्वरुपाचा नसून तक्रारदार हे केवळ निवासी वापराकरीता विद्युत पुरवठा वापरत आहेत. तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन दि.29.4.08 व 2.5.08 हे दोन्ही आदेश बेकायदेशीर आहेत असे जाहीर करुन सा.वाले यांचेकडून 50,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी दाद मिळणेकामी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. 2. सा.वाले यांनी आपली कैफियत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, दि.11.4.2008 रोजी सा.वाले यांच्या अधिका-यांनी तक्रारदारांचे जावई श्री.फैजल शेख यांचे समक्ष तक्रारदारांचे जागेची पहाणी केली असताना तक्रारदार हे खालच्या मजल्यावर निवासी वापर तर वरच्या मजल्यावर 4 मशिन ठेवून त्या जागेचा वाणिज्यकामी वापर करीत आहेत असे दिसून आले. तसेच तक्रारदारांचे जागेवर बसविलेल्या मिटरमध्ये फेरफार केल्याचे आढळले व ते मिटर अतिशय मंदगतीने चालत होते. त्यानंतर दुसरा मिटर तपासण्यात आला व सा.वाले यांनी अंतरीम आदेश पारीत करुन तक्रारदारांना सुनावणीकामी हजर रहाण्यास कळविले. सा.वाले यांच्या कथनाप्रमाणे दि.15.5.2008 रोजी हजर होऊन त्यांचा वरचे मजल्यावरचा वापर वाणिज्य कामासाठी होत होता हे तक्रारदारांनी मान्य केले व तसे लिहून दिले. त्यानंतर अंतरीम आदेश पारीत करण्यात आला. याप्रमाणे सा.वाले यांनी आपल्या कार्यवाहीचे समर्थन केले व अंतरीम आदेश कलम 126 यास तक्रारदाराने अपील आव्हान दिले असल्याने तक्रार चालू शकत नाही असे निवेदन दिले. 3. तक्रारदाराने आपले प्रतिनिवेदनाचे शपथपत्र दाखल केले. तसेच पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रं दाखल केली. सा.वाले यांनीदेखील त्यांचे कथनाचे पृष्ठयर्थ आपला अधिकारी यांचे शपथपत्र व कागदपत्रं दाखल केली. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफियत, पुराव्याचे शपथपत्र कागदपत्रं, शपथपत्र, तसेच लेखी युक्तीवादाचे वाचन केले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. त्यानुसार तक्रार निकालाकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांचे विद्युत मिटरमध्ये फेरफार केला व तक्रारदार हे आपल्या जागेचा काही भाग वाणिज्य कामी वापरून निवासी दराने घेतलेल्या विजेचा वापर व्यापारी उद्देशाकामी करत आहेत यावर आधारीत सा.वाले यांनी पारीत केलेला आदेश हा चूक,निरर्थक आहे ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय व सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 2 | तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. रु.10,000/- | 2 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 4. सा.वाले यांनी आपली कैफियत शपथपत्रासोबत दि.11.4.2008 रोजी सा.वाले यांचे अधिका-यांनी तक्रारदाराच्या मिटरची तपासणी केली व आपला अहवाल दाखल केलेला आहे तो निशाणी "अ" पृष्ठ क्र.34 वर आहे. त्यामधील मजकुरावरुन असे दिसून यते की, सा.वाले यांचे अधिकारी श्री. ई.टी.राणे व श्री.क्षीरसागर यांचे समक्ष व तक्रारदारांचे नातेवाईक जावई फैजल शेख यांचे समक्ष मिटरची पहाणी केली व मिटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. तो अहवाल पृष्ठ क्र. 35 वर मिटर संबंधित तांत्रिक अहवाल आहे. तो अहवाल श्री.राणे व श्री.क्षिरसागर यसांनी तंयार केल्याचे दिसून येते. तर श्री. निकम यांनी त्यास अंतीम स्वरुप दिलेले आहे. 5. सा.वाले यांनी हंगामी आदेश दि.29.4.2008 व 2.5.2008 हे वरील तांत्रिक अहवालावर आधारीत पारीत केले होते व त्यानंतर त्या हंगामी आदेशान्वये दि.7.6.2008 रोजी म्हणजे तक्रार दाखल केल्यानंतर अंतीम करण्यात आला. सा.वाले यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदार वापरत असलेला मिटरमध्ये दोष आढळल्याने व त्या मिटरमध्ये फेरफार केला होता व त्यामुळे तो मिटर एकूण व खराखुला वापर दाखवित नव्हता या संबंधात सा.वाले यांनी तक्रारदाराच्या मिटरची तपासणी कुठल्याही प्रयोगशाळेकडून करुन घेतलेली नाही. तसेच त्या बाबतचा अहवाल दाखल केलेला नाही. या संबंधात तक्रारदारांचे वकीलांनी आपल्या युक्तीवादामध्ये असे कथन केले की, सा.वाले यांनी तक्रारदाराचे जागेमध्ये बसविलेला मिटर तपासून घेतलेला नाही किंवा तसा अहवाल दाखल केलेला नाही. त्या युक्तीवादाचे पृष्ठयर्थ तक्रारदाराने राष्ट्रीय आयोगाच्या निकाल उत्तरी हरीयाणा बिजली वितरण निगम लि.(एचव्हीपीएन) विरुध्द गौतम प्लॉस्टीक I (2008 ) CPJ 62 ( NC) दिनांक 2.11.2007 याचा आधार घेतला व त्यामध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने विद्युत कायद्याच्या कलम 39 त्याचप्रमाणे कलम 44 उधृत करुन असा अभिप्राय नोंदविला की, मिटर तपासणी न करता त्याचप्रमाणे मिटर तपासणी संबंधी नोटीस न देता ग्राहकाचे विरुध्द आदेश पारीत केल्यास विजेची चोरी झाली ही बाब सिध्द होत नाही. प्रस्तुतच्या प्रकरणामध्येदेखील सा.वाले यांनी त्या सबंधात कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. 6. या व्यतिरिक्त सा.वाले यांनी मिटरचा तपासणी अहवाल तंयार केलेला आहे. त्यांचे दोन अधिकारी श्री.क्षीरसागर व श्री.राणे याच्या सहया आहेत. सा.वाले यांनी आपल्या कथनाचे पृष्ठयर्थ श्री.क्षीरसागर व श्री.राणे यांचे शपथपत्र दाखल केलेले नाही. वस्तुतः सा.वाले यांचे अधिका-यांनी तक्रारदाराचे जागेवर भेट दिली व त्यांचे जागेत बसविलेल्या विद्युत मिटरमध्ये फेरफार करण्यात आला होता ही बाब सिध्द करण्याची जबाबदारी सा.वाले यांचेवर असल्याने सा.वाले यांनी वरील अधिका-यांचे शपथपत्र दाखल करणे आवश्यक होते. तो महत्वाचा पुरावा ठरला असता. याबद्दल सा.वाले यांचेकडून वरील बाबींचा खुलासा लेखी युक्तीवादाचेवेळी करण्यात आला नाही. 7. त्याचप्रमाणे सा.वाले यांनी आपल्या कैफियतीमध्ये असे कथन केले की, तक्रारदाराने चौकशीचे दरम्यान हजर हजर होऊन दिनांक 15.5.08 रोजी त्यांचे जाणेतील वरच्या मजल्याचा वापर वाणीज्य कामासाठी होत होत होता ही बाब मान्य केली. तथापी सा.वाले यांनी आपल्या कैफियतीसोबत जी कागदपत्रे दाखल केलेली त्यामध्ये तक्रारदाराच्या वरील दिनांक 15.5.2008 च्या जाबाबाची प्रत दाखल केलेली नाही किंवा युक्तीवादासोबत सुध्दा ही प्रत दाखल केलेली नाही. 8. सा.वाले यांनी तक्रारदाराला तथाकथीत श्री.फैजल सय्यद शेख यांची सही तपासणी अहवालावर आहे यावर भर दिला. तथापी श्री.फैजल शेख हे ग्राहक नव्हेच तर त्यांचे नाते संबंध हे सिध्द झालेले नाही किंवा त्यांना दिलेली जबाबदारी तक्रारदारांचे वतीने होती असे दिसून येत नाही. 9. वरील परिस्थिती सा.वाले यांनी तक्रारदाराविरुध्द हंगामी आदेश पारीत करणेकामी त्यांचे मिटरमध्ये फेरफार झालेला आहे असे आरोप करुन मागील दोन वर्षापासुनची वसुली करण्याची कार्यवाही ही कायदेशीर होती व योग्य होती ही बाब सा.वाले सिध्द करु शकत नाही. मुळातच मागील वर्षाची कार्यवाही ही कलम 126 प्रमाणे विद्युत कायदा 2003 प्रमाणे फक्त मागील 12 महिन्याची होऊ शकते. त्यापेक्षा अधिक काळाची होऊ शकत नाही, तथापी सा.वाले यांनी ही कार्यवाही दोन वर्षाच्या कालावधीची केली. वरील परिस्थितीत सा.वाले यांनी तक्रारदरांना त्यांचे विद्युत मिटरचे वापराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब सिध्द होते. 10. सा.वाले यांनी वरील प्रकारची कार्यवाही केली व दोन अंतरीम आदेश पारीत केल्यानंतर तक्रारदारांना रक्कम भरणेकामी वसुली आदेश दिला व अंतीमतः तक्रारदाराने प्रस्तुत मंचाकडे तक्रार दाखल करुन अंतरीम आदेश मिळविला व त्याकामी रु.10,000/- जमा केले. त्या आदेशाचे वाचन केले असता असे दिसते की, तक्रारदारांनी 10,000/- रुपये व्यतिरिक्त 21,000/- रुपये सा.वाले यांचेकडे जमा केले होते. यावरुन तक्रारदारांना मानसिक ताण, व कुचुंबणा झाल्याचे सिध्द होते. तथापी तक्रारीचे एकंदरीत स्वरुप व तक्रारदार व सा.वाले यांचे संबंध लक्षात घेता नुकसान भरपाईची रक्कम रु.10,000/- तक्रारदारांना देणे योग्य राहील असे प्रस्तुत मंचास वाटते. 11. वरील परिस्थिती पुढील आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 297/2008 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदारांचा तक्रारीतील मिटर क्र.287692 या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब सिध्द होते व सामनेवाले यांनी हंगामी वसुली आदेश दि.29.4.2008 व दिनांक 2.5.2008 यांची अंमलबजावणी करु नये असे आदेश देण्यात येतात. 3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई बद्दल रक्कम रु.10,000/- अदा करावी असा आदेश देण्यात येतो. 4. तथापी तक्रारदाराने नियमित विज देयकाप्रमाणे सामनेवाले यांना रक्कम अदा करावी. तसेच भविष्यामध्ये तक्रारदारांना योग्य वाटल्यास तक्रारदाराचे मिटर तपासणी बद्दल वैध कार्यवाही करु शकतात. 5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |