तक्रारदार : गैर हजर. सामनेवाले : त्यांचे प्रतिनिधी धनश्री पेडणेकर यांचे मार्फत हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाली ही विद्युत पुरवठा करणारी कंपनी असून तक्रारदारांना सा.वाले यांनी त्यांचे विद्युत मिटरमधुन विद्युत पुरवठा करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे तक्रारदारांनी त्यांचे विद्युत मिटरमधुन विद्यूत पुरवठा घेतला. या प्रकारे तक्रारदार हे सा.वाले यांचे ग्राहक आहेत. 2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे दिनांक 17.4.2009 रोजी सा.वाले यांनी तक्रारदारांच्या दुकानास भेट दिली व मिटरमध्ये फेरफार केला आहे असा खोटा अहवाल तंयार करुन त्या आधारे हंगामी वसुली आदेश रुपये 1,54,403/- असा पारीत केला. वस्तुतः तक्रारदारांनी अशा प्रकारचा कुठलाही फेरफार केलेला नव्हता किंवा विजेचा गैरवापर केलेला नाही व चुकीच्या खोटया तपासणी अहवालाचे आधारे सा.वाले हे तक्रारदारांकडून भरमसाठ रक्कम वसुल करु पहात आहेत. तक्रारदारांनी या प्रकारची कार्यवाही सा.वाले यांनी करु नये याकामी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सा.वाले यांनी तक्रारदारांना होणा-या विद्युत पुरवठयाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली अशा दादी मागीतल्या. 3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व आपल्या कार्यवाहीचे समर्थन केले. तसेच सा.वाले यांच्या फीर्यादीवरुन तक्रारदारांविरुध्द गुन्हा क्रमांक 16/2009 सहार पोलीस स्टेशन येथे नोदविण्यात आला असे कथन केले व तक्रारदारांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असल्याने प्रस्तुत ग्राहक मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही असा मुद्दा मांडला. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये इतरही काही मुद्दे मांडले. 4. दोन्ही बाजुंनी पुरावा शपथपत्र, कागदपत्र दाखल केले. तक्रार अंतीम सुनावणीकामी नेमली असतांना सा.वाले यांनी असा अर्ज दिला की, तक्रारदारांचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला असल्याने प्रस्तुतचे ग्राहक मंचास तक्रार चालवून निर्णय देण्याचा अधिकार नाही. त्या अर्जाची सुनावणी तक्रारीच्या अंतीम सुनावणीसोबत घेण्याचे ठरले. 5. तक्रारदारांनी सा.वाले यांनी दिलेल्या अर्जास आपले म्हणणे दाखल केलेले नाही. 6. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्रं, तसेच सा.वाले यांचा तक्रार खारीज करण्याचा अर्ज यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | तक्रारदारांचे विरुध्द विज चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे काय व तसे असल्यास प्रस्तुत मंचास सदर तक्रार चालविण्याचा अधिकार आहे काय ? | नाही. | 2. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 7. सा.वाले यांनी तक्रारदारांची तक्रार रद्द करण्या बाबतचा अर्ज दिनांक 2.7.2011 रोजी दिला व त्यामध्ये असे स्पष्ट कथन केले की, तक्रारदारांचे विरुध्द चोरीच्या गुन्हयाबद्दल गुन्हा क्र. 16/2009 दिनांक 20.6.2009 रोजी सहार पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आलेला आहे. तक्रारदारांनी आपले म्हणणे देवून सा.वाले यांचे कथनास कोठेही नकार दिलेला नाही. यावरुन तक्रारदारांना सा.वाले यांचे कथन मान्य आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. 8. या व्यतिरिक्त सा.वाले यांनी आपल्या अर्जासोबत सत्र न्यायालय, मुंबई येथे दिनांक 21.7.2009 रोजी तक्रारदारांच्या अटकपूर्व जामीनाचे अर्जावर पारीत केलेल्या आदेशाची प्रत हजर केलेली आहे. त्याचे वाचन केले असतांना असे दिसून येते की, सहार पोलीस स्टेशन मुंबई यांनी तक्रारदारांचे विरुध्द भारतीय विज कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा क्र.16/2009 नोंदविला असून तक्रारदारांना अटकेची शंका आल्याने तक्रारदारांनी सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनकामी अर्ज दिला. व सत्र न्यायालयाने दिनांक 21.7.2009 च्या आदेशान्वये तक्रारदारांना काही अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. 9. वर संदर्भित झालेल्या मजकुरावरुन असे दिसते की, तक्रारदारांचे विरुध्द सहार पोलीस स्टेशन येथे भारतीय विज कायदा 135 प्रमाणे गुन्हा क्रमांक 16/2009 नोंदविण्यात आलेला असून तक्रारदार यांनी त्याबद्दल अटकपूर्व जामीन घेतलेला आहे. 10. मा.राष्ट्रीय आयोगाने झारखंड इलेक्ट्रीकसिटी बोर्ड विरुध्द अनवर अल्ली न्याय निर्णय दिनांक 10.04.2008 या प्रकरणामध्ये असा निर्णय दिलेला आहे की, विज चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असेल तर ग्राहक तक्रार निवारण मंचास त्या बद्दलची तक्रार चालविता येणार नाही. ग्राहक मंचाने त्या प्रकरणात हस्तक्षेप करु नये. त्या निर्णयातील निष्कर्ष सा.वाले यांच्या कथनास पुष्टी देतात व तो निर्णय प्रस्तुत मंचास बंधनकारक आहे. 11. वरील परिस्थितीत सदर तक्रार प्रस्तुत मंचास चालविण्याचा अधिकार नसल्याचे मंच पुढील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्रमांक 487/2009 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |