तक्रारदार : गैर हजर. सामनेवाले : मार्टिस या प्रतिनिधी मार्फत हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाली ही विद्युत पुरवठा करणारी कंपनी असून तक्रारदार हे सा.वाले यांचे ग्राहक आहेत. सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांच्या दुकानामधील विजेच्या वापराकामी विद्युत पुरवठा केला होता. तत्पुर्वी म्हणजे डिसेंबर, 2008 पुर्वी जागेचा वापर निवासी कामाकरीता करण्यात येत होता व त्याप्रमाणे निवासी दराने तक्रारदारांना देयके प्राप्त होत होती व तक्रारदार त्या प्रमाणे रक्कम अदा करत होते. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन की, दिनांक 17.4.2009 रोजी सा.वाले यांचे काही अधिका-यांनी सा.वाले यांच्या जागेस भेट दिली व तक्रारदार हे विद्युत वापर वाणीज्य व्यवसायाकामी करत आहे असा अहवाल तंयार केला व तो वापर दिनांक 30.10.2005 पासून सुरु आहे असा निष्कर्ष नोंदवून त्या आधारे विद्युत आकारणी आदेश सा.वाले यांनी पारीत केला व तक्रारदार यांचेकडून रक्कमेच्या वसुलीची कार्यवाही सुरु केली. तक्रारदारांचे असे कथन आहे की, ही सर्व कार्यवाही चुकीची असून तक्रारदारांनी विद्युत वापर 2008 पूर्वी निवासी कामासाठी केला व तो वाणीज्य व्यवसायाकामी केला नव्हता. 2. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व तक्रारीतील तक्रारदारांचे आरोपास नकार दिला. त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदार हे जागेचा वापर वाणीज्य व्यवसायाकामी करत असल्याने तक्रारदारांना ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे तक्रार करता येत नाही. तक्रारदारांनी विज चोरीचा गुन्हा केला असल्याने देखील ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे तक्रार दाखल होऊ शकत नाही. या प्रमाणे दोन्ही तांत्रिक मुद्यांवर सा.वाले यांनी आक्षेप नोंदविला. 3. तक्रारदार व सा.वाले यांनी पुरावे शपथपत्र दाखल केले. तक्रार प्रलंबीत असतांना सा.वाले यांनी एक अर्ज दिला व त्यामध्ये असे कथन कले की, सा.वाले यांनी पोलीसांकडे तक्रार दाखल करुन तक्रारदारांचे विरुध्द गुन्हा क्रमांक 16/2009 दाखल केलेला आहे. व या प्रमाणे तक्रारदारांचे विरुध्द विज चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे प्रस्तुतची तक्रार चालु शकत नाही. 4. युक्तीवादाकामी तक्रारदार गैर हजर होते. सा.वाले यांचे प्रतिनिधींचा युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | प्रस्तुत मंचाला ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे तक्रार चालविण्याचा अधिकार आहे काय ? | नाही. | 2 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 5. सा.वाले यांनी तक्रारदारांचे विरध्द पोलीसांकडे दाखल केलेल्या प्रथम खबरी अहवालाची प्रत दाखल केलेली आहे. त्या मजकुरावरुन असे दिसून येते की, तक्रारदार व अन्य चार इसमांचे विरुध्द भारतीय विद्युत कायदा कलम 135 प्रमाणे सहार पोलीसांकडे गुन्हा नोंदविला आहे. तो गुन्हा सा.वाले यांचे कर्मचा-यांच्या तक्रारीवरुन नोंदविण्यात आलेला आहे. या प्रमाणे सा.वाले यांच्या तक्रारीवरुन तक्रारदारांचे विरुध्द विज चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे व पोलीसांचा तपास जारी आहे ही बाब सिध्द होते. 6. सा.वाले यांनी आपल्या कथनाचे पृष्टयर्थ मा.राष्ट्रीय आयोगाच्या झारखंड स्टेट इलेक्ट्रीकसिटी बोर्ड विरुध्द अनवर अल्ली III (2008) CPJ 284 असा दिनांक 10.4.2008 प्रसिध्द झाला आहे त्या निकालाची प्रत हजर केली आहे. त्यामध्ये राष्ट्रीय आयोगाने असा अभिप्राय नोंदविला आहे की, ग्राहकाचे विरुध्द चोरीचा गुन्हा नोंदविला असेल तर ग्राहक संरक्षण कायद्या प्रमाणे तक्रार चालु शकत नाही. त्याच स्वरुपाचा निकाल मा.राष्ट्रीय आयोगाने बी.सी.शुक्ला विरुध्द दिल्ली विद्युत बोर्ड दिनांक 9.2.2004 या प्रकरणात दिला. या प्रमाणे तक्रारदारांचे विरुध्द विद्युत चोरीचा गुन्हा दाखल झाला असल्याने प्रस्तुतची तक्रार चालविण्याचा ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे ग्राहक मंचास अधिकार नाही हा सा.वाले यांचा आक्षेप ग्राहय धरण्यात येतो 7. वरील परिस्थितीत पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 552/2009 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |