निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 15/03/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 17/03/2011 तक्रार निकाल दिनांकः- 08/11/2011 कालावधी 07 महिने 22 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. संजय पिता नागोराव देशपांडे. अर्जदार वय 52 वर्ष.धंदा.नोकरी. अड.सतीश.ए.देशपांडे रा.रामकृष्णनगर परभणी.ता.जि.परभणी विरुध्द 1 रिलायंस कॅपिटल असेट मॅनेजमेंट कं.लि. गैरअर्जदार. एक्सप्रेस बिल्डींग. 4 था मजला.14 – इ.रोड. प्रतिनिधी. चर्चगेट मुंबई -400020 2 कृष्णकुमार पिता चंद्रशेखरराव पेडगांवकर. वय 40 वर्षे.धंदा व्यवसाय.रा.रामकृष्ण नगर. ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) गैरअर्जदारने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 च्या एजंटकडे (गैरअर्जदार क्रमांक 2) 2008 मध्ये रु.10,000/- गुंतवणुक करण्यासाठी दिले.गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्याची रितसर पावती अर्जदारास दिली.गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास गुंतवणुकीचे स्टेटमेंट देण्यास टाळाटाळ केली व शेवटी 26/02/2008 रोजी अर्जदारास स्टेटमेंट देण्यात आले.त्यानुसार अर्जदाराच्या खात्यावर केवळ रु.5000/- च गुंतवलेले होते.अर्जदाराने उर्वरित रु.5000/- ची मागणी गैरअर्जदाराकडे केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवुन रक्कम देण्याचे टाळले. त्यामुळे अर्जदाराने रु.5000/- हे द.सा.द.शे.12 टक्के व्याजाने दिनांक 30/01/2008 पासून मिळावेत व मानसिकत्रास व सेवात्रुटी बद्दल रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळण्यासाठी ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत त्याचे शपथपत्र, म्युच्युअल फंडची पावती, म्युच्युअल फंडचा खातेउतारा,इ.कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्याच्या लेखी जबाबात गैरअर्जदाराने अर्जदाराकडून डिमांड ड्राफ्ट क्रमांक 213327 सुंदरलाल सावजी अर्बन को आप बँकेचा रिलायंस नॅचरल रिसोर्सेस फंडच्या अर्जासह मिळाल्याचे मान्य केले आहे,परंतु तो रु.4985/- रक्कमेचा असल्याचे मान्य केले आहे. व तेवढया रक्कमेची युनिट्स अर्जदारास दिलेली आहेत.अर्जदाराने केवळ रु.4985/- दिलेले असतांना तो खोटेपणाने रु.10,000/- च्या युनिटस् साठी अर्ज केल्याचे सांगतो आहे.अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 ला रु.10,000/- दिल्याचा कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही. अर्जदाराने रु.4985/- चाच ड्राफ्ट दिला पण सुरुवातीच्या अर्जात त्याने चुकीने रु.10,000/-गुंतवणुकीची रक्कम लिहिलेले आहे.पण ड्राफ्ट 4985/- चाच असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 ने रु.5000/- चीच गुंतवणुक केली.गैरअर्जदाराने 19 जानेवारी 2011 रोजी अर्जदारास ही रक्कम परत केलेली आहे. अर्जदाराने रु.10,000/- गुंतवणूक केल्याबद्दल कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही.अर्जदाराने ही खोटी तक्रार केलेली आहे व सदरील तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, गुंतवणुकीच्या अर्जाची व डिमांड ड्राफ्टची छायाप्रत,इ कागदपत्र दाखल केलेले आहेत. अर्जदार क्रमांक 2 ला पोस्टखात्याने नोटीस आल्याची सुचना देवुनही त्याने नोटीस स्वीकारली नसल्यामुळे त्याच्या विरुध्द तक्रार एकतर्फा चालवण्याचा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारीत दाखल कागदपत्र व अर्जदाराच्या वकिलांचा लेखी युक्तीवाद यावरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे गैरअर्जदार क्रमांक 2 मार्फत गुंतवणूक करण्यासाठी अर्ज केलेला होता ही बाब सर्वमान्य आहे.अर्जदाराने ( नि.5/1) वर दाखल केलेल्या व गैरअर्जदाराने नि.14 वर दाखल केलेल्या म्युच्युअल फंडाच्या अर्जावरुन दोन्ही एकाच अर्जाच्या छायाप्रती आहेत व के.सी.पेडगावकर हे (गैरअर्जदार क्र.2) गैरअर्जदार क्रमांक 1 चे एजंट आहेत हे सिध्द होते.तसेच त्या अर्जावरुन अर्जदाराने रु.10,000/- डी.डी. चार्जेस रु.15/- वजा होता रु.9985/- चा डी.डी.क्रमांक 213327 दिनांक 30/01/2008 सुंदरलाल सावजी अर्बन को.ऑप बँक औरंगाबादचा ड्राफ्ट त्या अर्जासोबत दिलेला आहे.असे दिसते.नि.5/2 वरील पुराव्या वरुन अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे दिलेल्या ड्राफ्टची पावती आहे त्या पावतीवर गैरअर्जदार क्रमांक 1 चा शिक्का आहे,परंतु छायाप्रतीमुळे त्यातील मजकूर समजून येत नाही.गैरअर्जदार क्रमांक 1 ने दाखल केलेल्या नि.15 वरील ड्राफ्टच्या छायाप्रतीवरुन नि. 5/1 व नि.14 वरील अर्जामधील उल्लेख केलेल्या ड्राफ्टचीच ती छायाप्रत आहे.कारण बँकेचे नाव,तारीख ड्राफ्ट क्रमांक सारखाच आहे मात्र त्यातील रक्कम रु.9985/- नसून रु. 4985/- आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबात याबाबत असे म्हणणे दिलेले आहे की, अर्जदाराने जरी अर्जावर रु.9985/- ही रक्कम लिहिलेली असली तरी प्रत्यक्षात ड्राफ्ट रु.4985/- चाच असल्याचे लक्षात आल्यावर गुंतवणुक ही रु.4985/- चीच केलेली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने न्यायमंचातर्फे दिलेली नोटीस घेतलेली नसल्यामुळे त्याने अर्जदाराकडून रु.10,000/- घेतल्याचे मान्य केलेले आहे.असे मानावे लागेल. गैरअर्जदार क्रमांक 1 ने गुंतवणुकीसाठीचा अर्ज स्वीकारल्यानंतर त्यावरील लिखीत रक्कम व ड्राफ्ट वरील रक्कम यात तफावत असल्याचे लक्षात आल्यावर अर्जदाराला त्याबाबत न कळवुन त्रुटीची सेवा दिलेली आहे.असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन खालील खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार क्रमांक 1 व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी संयुक्तिकरित्या वा वैयक्तिकरित्या अर्जदारास रु.5000/- दिनांक 30/01/2008 पासून संपूर्ण रक्कम देय होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने निकाल समजल्यापासून 30 दिवसांच्या आत द्यावेत. 3 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या वा वैयक्तिकरित्या मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- आदेश मुदतीत अर्जदारास द्यावा. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |