निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराने त्यास गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने 2 जुलै 2005 रोजी गैरअर्जदार रिलायन्स कम्युनिकेशन लि., यांच्याकडून लोकल पीसीओ चालवण्यासाठी घेतला. त्यासाठी तयाने गैरअर्जदाराकडे रु 1,000/- अनामत ठेवली. दिनांक 8/5/2009 रोजी त्याने त्याचे लोकल पीसीओचा व्यवसाय बंद केला आणि गैरअर्जदाराकडे त्याने रु 1,000/- परत मागितले. परंतु अनेकवेळा मागणी करुन त्याची अनामत रक्कम रु 1,000/- परत दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराने त्यास गैरअर्जदाराकडून अनामत रक्कम रु 1,000/-सह एकूण रक्कम रु 1,00,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. प्रस्तूत तक्रारदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय? असा मुद्दा आमच्यासमोर उपस्थित झाला. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून एसटीडी पीसीओ चालवण्यासाठी घेतला होता. याचाच अर्थ तक्रारदार गैरअर्जदाराचा ग्राहक नसून त्याने गैरअर्जदाराचा एसटीडी पीसीओ प्रतिनिधी म्हणून चालविण्यासाठी घेतला होता. तक्रारदाराचे गैरअर्जदारासोबत एजंट मालक असे नाते आहे. तक्रारदार गैरअर्जदाराचा ग्राहक नाही म्हणून तक्रारदाराची ही तक्रार या मंचात चालू शकत नाही असे आमचे मत आहे. म्हणून ही तक्रार सुनावणीसाठी दाखल करुन न घेता फेटाळण्यात येते. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री डी.एस. देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| | [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |