तक्रार व त्यांचे वकील श्री.चौबे हजर. सामनेवाले क्र.1 व 2 तर्फे – वकील श्री.लाठीवाले हजर. सामनेवाले क्र.3 साठी वकील श्री.गांवकर हजर. मा.सदस्यानुसार दिलेले निकालपत्र. 1. तक्रारदारांची तक्रार अशी की, ते सागनेवाले यांचे ग्राहक असून सामनेवाले क्र.2 यांच्याकडून भ्रमण दूरध्वनी यंत्र रु.13,348/- येवढया किंमतीस दि.18/07/2005 रोजी खरेदी केला. त्याची खरेदी पावती सोबत जोडली आहे. दिनांक 31/05/2006 रोजी सामनेवाले क्र.2 यांच्याकडून घेतलेला भ्रमण दूरध्वनी यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीकरीता दि.02/06/2006 रोजी तक्रारदार यांनी फोमसन या सामनेवाले यांच्या अधिकृत सेवा केंद्राला भेट दिली. त्यावेळी भ्रमण दूरध्वनी यंत्रातील सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आले असे तक्रादार यांचे म्हणणे आहे. परंतु त्यावेळी सामनेवाले यांच्याकडे सॉफ्टवेअर उपलब्ध नव्हते. त्यामुळे तक्रारीचे निराकरण झाले नाही. त्यानंतर दि.03/06/2006 रोजी तक्रारदाराने सामनेवाले क्र.1 यांना दूरध्वनीवरुन तांत्रिक बिघाडाची बाब त्यांच्या निदर्शनास आणली. त्यावर तक्रारदाराला अन्य सेवेसाठी संबंधित केंद्राकडे संपर्क साधण्याचे सांगण्यात आले. म्हणून तक्रारदाराने मरोळ अंधेरी, कुर्ला रोड, या मार्गावरील सेवा केंद्राला भ्रमण दूरध्वनी दूरुस्त करण्यासाठी भेट दिली. त्या ठिकाणी ते भ्रमण दूरध्वनीयंत्र दुरुस्त होणार नाही असे त्यांना सांगून त्यांना नोकीयाच्या सेवाकेंद्राकडे जावे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्याप्रमाणे दि.04/06/2006 रोजी तक्रारदाराने सामनेवाले क्र.4 यांची भेट घेतली. त्यांनी तक्रारदाराच्या भ्रमण दूरध्वनीची तपासणी केली आणि सदरहू यंत्र " Liquid Damage " मुळे तांत्रिक बिघाड झाला असल्याचे सांगण्यात आले आणि ही बाब वॉरंटीमध्ये येत नाही असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. तक्रारदाराने सदरहू यंत्र दुरुस्त करण्याची विनंती सामनेवाले क्र.4 यांना केल्यानंतर सदरहू भ्रमण दूरध्वनी यंत्र " Non-reparable Handset " असल्याचे व " Beyond Economical Repair " असे मुद्दे उपस्थित करुन सदर भ्रमण दूरध्वनी यंत्राची त्यांच्याकडून दुरुस्ती होऊ शकणार नाही असे सामनेवाले क्र.4 यांच्याकडून तक्रारदाराला सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराने त्यांच्या भ्रमण दूरध्वनी यंत्रात बिघाड झाल्याची बाब दि. 05/06/2006 रोजी सामनेवाले यांच्या कार्यालयातील संबंधित अधिका-यांच्या निदर्शनास आणली. परंतु सामनेवाले यांच्याकडून भ्रमण दूरध्वनी दुरुस्त करुन मिळण्याबाबत तक्रारदाराला काही प्रतिसाद मिळालेला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर काही दिवसांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडे संपर्क साधला असता त्यांच्याकडून तक्रारदाराला असे सांगण्यात आले की, 6 महिन्याचे आत जर हा भ्रमण दूरध्वनी तक्रारदाराने चालु करुन घेतला नाहीतर तो बंद होईल. त्यामुळे सामनेवाले क्र.2 यांचे सूचनेनुसार तक्रारदाराने रुपये 12,500/-ला दुसरा नविन दूरध्वनीसंच खरेदी केला. हे भ्रमण दूरध्वनीयंत्र फोन शॉप यांच्याकडून खरेदी केले. त्याची पावती सोबत जोडलेली आहे. हया दुस-या भ्रमण दूरध्वनी यंत्रामध्ये दि.15/06/2006 रोजी तक्रारदाराचा भ्रमण दूरध्वनी सामनेवाले क्र.2 यांच्याकडून कार्यान्वयीत करुन देण्यात आला असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. परंतु दि.15/06/2006 नंतर तक्रारदाराला सदर भ्रमण दूरध्वनी यंत्राकडून काही प्रतिसाद मिळालेला नाही. थोडक्यात तक्रारदाराने नविन घेतलेला भ्रमण दूरध्वनी यंत्राचा देखील तक्रारदाराला काही उपयोग झाला नाही, त्यांचा भ्रमण दूरध्वनी बंद पडला. म्हणून त्यांनी या प्रकरणी दिनांक 28/06/2006 रोजी दिल्ली येथील सामनेवाले यांचे प्रधान कार्यालयाला कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु सामनेवाले यांच्याकडून तक्रारदाराला काही प्रतिसाद मिळालेला नाही. सामनेवाले यांच्याकडून तक्राराला बराच मानसीक त्रास देण्यात आला असे त्यांचे महणणे आहे. सदर दूरध्वनी यंत्र हे " Liquid Damage " मुळे त्यात बिघाड झाला असल्याचे सामनेवाले यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर अचानक सामनेवाले क्र.4 यांच्या तांत्रिक अधिका-यांनी दूरध्वनी यंत्राची मागणी केली व हे दूरध्वनी यंत्र दूरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडून रु.168/- घेतल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्या बाबतची दि.31/10/2006 च्या टॅक्स इनव्हाईसची प्रत सोबत जोडली आहे. तक्रारदाराचे म्हणणे की, वॉरंटी कालावधी असतानादेखील तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीसाठी खर्चाची रक्कम द्यावी लागली यासाठी ही सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. प्रामुख्याने सामनेवाले क्र. 3 व 4 हे जबाबदार असून त्यांच्या सेवेत कमतरता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 2. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदाराला सदर दूरध्वनी 6 महिन्याचे आत चालु करण्याच्या सूचना करुन त्याकरीता दुसरा नविन भ्रमण दूरध्वनीयंत्र खरेदी करण्यास सांगीतले. त्यामुळे तक्रारदाराला रु.12,500/- खर्च करुन नविन भ्रमण दूरध्वनीयंत्र फोनशॉप यांच्याकडून खरेदी करावे लागले त्यासाठी तक्रारदाराला अनावश्यक भुंर्दड सहन करावा लागला यासाठी सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. कारण सामनेवाले क्र.2 यांच्या सूचनेमुळे तक्रारदाराला अनावश्यक आर्थिक र्भुदंड सहन करावा लागला त्यांची या प्रकरणात सामनेवाले यांच्याकडून घोर फसवणूक झाली या प्रकरणी तक्रारदाराला न्याय मिळावा म्हणून या मंचासमोर तक्रार दाखल करुन खालील प्रमाणे विनंती तक्रारदाराने केली आहे. 1. सामनेवाले यांच्या सूचनेनुसार तक्रारदाराला रु.12,500/- खर्च करुन दुसरे नविन भ्रमण दूरध्वनीयंत्र खरेदी करावे लागले त्याची रक्कम सामनेवाले यांच्याकडून मिळावी. 2. तक्रारदाराच्या व्यवसायामध्ये प्रतिदिन 1000/-- याप्रमाणे 15 दिवस जे नुकसान झाले त्याची भरपाई रक्कम रुपये 15,000/-सामनेवाले क्र.3 यांनी द्यावी. 3. भ्रमण दूरध्वनीयंत्र दुरुस्त करुन देण्यासाठी तक्रारदाराला सामनेवाले क्र.4 यांच्याकडे जावे लागले त्यासाठी प्रतिभेट रु.500/- प्रमाणे त्यांच्याकडून रु.1500/-मिळावेत व दुपारचे जेवळ, चहापाणी,व प्रवासखर्चाची रक्कम रु.2000/-त्यांचेकडून मिळावेत. 4. शारीरिक व मानसीक त्रासापोटी सामनेवाले यांच्याकडून रु.15,000/- मिळावेत. 5. तक्रारदाराला या प्रकरणी पत्रव्यवहार करावा लागला त्याची रक्कम रुपये 1500/- व वकीलाचा खर्च रु.1200/-अशी एकूण रक्कम रु.2700/- मिळावेत. 6. तक्रारदाराची सामनेवाले यांच्याकडून फसवणूक झाली व त्यांच्याकडून जे गैरवर्तन करण्यात आले त्यापोटी रक्कम रु.50,000/- मिळावेत. 7. या तक्रारीचा खर्च रु.25000/- द्यावे व अन्य दाद मिळावी. 3. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी कैफीयत दाखल करुन तक्रार अर्जातील आरोप नाकारले. सदरहू तक्रार बिनबुडाची, गैरसमजुतीवर आधारलेली असल्यामुळे सदर तक्रार अर्ज कर्जासह रद्द करण्यात यावा अशी त्यांची विनंती आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सदर तक्रार अर्ज स्विकारण्यासारखा नाही. ही तक्रार या मंचासमोर चालणारी नाही. केवळ सामनेवाले यांना त्रास देण्याच्या हेतुने व पैसे उकळण्याचे हेतुने तक्रारदाराने तक्रार केली आहे. तक्रारदाराने संबंधीतांना पक्षकार केलेले नाही. तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 व 2 यांच्या विरुध्द कोणताही आरोप केलेले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्यासेवेत कमतरता नाही. तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 व 2 यांचे ग्राहक नाहीत. त्यामुळे सदरहू तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा असे त्यांचे म्हणणे आहे. 4. सामनेवाले क्र.3 यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदाराचे आरोप नाकारले आहे. तक्रार अर्जात तक्रारदाराने केलेले आरोप हे नोकीया कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्राबाबत आहेत असे सामनेवाले क्र.3 यांचे म्हणणे आहे. हा तक्रार अर्ज या मंचाच्या कार्यक्षेत्राखाली येत नाही असेही त्यांचे म्हणणे आहे. तक्रारदाराने सामनेवाले यांच्या निश्चित कोणत्या सेवा केंद्राबाबत आरोप केलेला आहे याचा उल्लेख तक्रार अर्जात केलेले नाही. थोडक्यात सामनेवाले क्र.3 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने मोघम स्वरुपाचा आरोप केलेला असून त्याबाबत कोणताही पूरावा दाखल केलेला नाही. सामनेवाले यांच्या वॉरंटी बाबतच्या अटी व शर्ती नुसार भ्रमणदूरध्वनी यंत्राबाबत तो खरेदी करणा-याकडून सेवा उपलब्ध करुन देता येते. तक्रारदाराने केलेला आरोप हा अनिश्चित स्वरुपाचा केलेला असल्यामुळे त्याबाबत उत्तर देण्याचा प्रश्न उदभवत नाही. तक्रारदाराने खरेदी केलेला भ्रमण दूरध्वनीमध्ये निश्चित कोणत्या स्वरुपाचा दोष आहे या बाबतची छाननी तपासणी योग्य त्या लॅबोरटीकडून करुन घेतलेली नाही. तसे केलेले नाही ही तक्रारदारांची चुक आहे. त्या बाबतच्या वरील परिस्थितीत सामनेवाले क्र.3 यांची जबाबदारी येत नाही तसेच त्यांच्या सेवेत कमतरता नाही असे सामनेवाले क्र. 3 यांचे म्हणणे आहे. केवळ सामनेवाले यांना त्रास देण्यासाठी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीशी त्यांचा काही संबंध नसल्यामुळे ती रद्द करण्यात यावी अशीही त्यांनी विनंती केली आहे. 5. सामनेवाले क्र.4 यांनी कैफीयत दाखल करुन तक्रार अर्जातील आरोप नाकारले. सदर तक्रार खोटी,बिनबुडाची व गैरसमजुतीवर आधारलेली आहे व सामनेवाले यांना त्रास देऊन पैसे उकळण्यासाठी केलेली असल्यामुळे ती तक्रार रद्द करण्यात यावी अशी त्यांची विनंती आहे. त्यांचे म्हणणे की, कायदेशीर तरतुदीनुसार तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. त्यांच्या सेवेत कमतरता नाही. त्यांचे असेही म्हणणे आहे की, तक्रारदाराने त्यांच्याकडून त्यांनी दुसरे भ्रमण दूरध्वनीयंत्र खरेदी केले. त्यामुळे संबंधित तक्रारीमध्ये करण्यात आलेला आरोप हे या सामनेवाले यांच्या संबंधित नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर तक्रार ही खोटी व बिनबुडाची असल्यामुळे त्यातील आरोप हे सामनेवाले क्र.4 यांच्या बाबतीत नसल्यामुळे सदर तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा अशी विनंती आहे. 6. तक्रार अर्ज, त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्रे , लेखी युक्तीवाद सामनेवाले क्र. 1 ते 4 यांच्या कैफीयती सामनेवाले क्र.3 यांच्या पुरावा शपथपत्र इ. कागदपत्रांची पहाणी व अवलोकन करुन वाचन केले. उभय पक्षकारांचा युक्तीवाद ऐकला त्यानुसार खालील मुद्दे उपस्थित होतात. अ.क्र | मुद्दे | उत्तरे | 1. | तक्रारदार हे सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असल्याचे सिध्द करतात काय ? | नाही. | 2. | तक्रारदार सामनेवाले यांच्याकडून भ्रमण दूरध्वनीयंत्राची खरेदी रु.12,500/-मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. | 3. | तक्रारदार हा तक्रार अर्जात नमुद केलेल्या अन्य सर्व आर्थिक मागण्या सामनेवाले यांच्याकडून मिळण्यास पात्र आहे काय ? | नाही. | 4. | आदेश | आदेशाप्रमाणे. |
कारण मिमांसा 7. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत सामनेवाले क्र.2 यांच्याकडून प्रथमतः भ्रमण दूरध्वनी यंत्र दिनांक 18/06/2005 रोजी रक्कम रुपये 13,348/-- येवढया किंमतीस खरेदी केल्याची पावती सोबत दाखल केली आहे. दिनांक 31/05/2006 रोजी या भ्रमण दूरध्वनी यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बाब तक्रारदाराच्या लक्षात आली. त्या बाबतची दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी सामनेवाले यांच्या अधिकृत सेवा केंद्राकडे ते भ्रमण दूरध्वनी यंत्र नेले असता त्यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे सदरहू यंत्र हे दुरुस्त करण्याच्या पलीकडे आहे असे सामनेवाले यांच्या सेवा केंद्राचे म्हणणे होते. त्यानुसार सामनेवाले क्र.4 च्या जॉबसिटमध्ये " Beyond Economical Repair " असे नमुद केलेले आहे. तसेच सदरहू यंत्र हे " Liquid Damage " मुळे खराब झालले असल्यामुळे त्याची दुरुस्ती होणार नाही असेही सेवा केंद्राकडून तक्रारदाराला सांगण्यात आले. सामनेवाले क्र.4 यांचे म्हणणे की, सदरहू दूरध्वनी यंत्रामध्ये सुरवातीला दोन वेळा त्या यंत्रामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे ते दुरुस्त करता आलेले नाही आणि ही बाब वॉरंटीतील अटी व शर्ती कक्षेबाहेरील बाब होती व त्यामुळे त्या यंत्राची वारंटी संपली होती. त्यानंतर तक्रारदाराने तिस-यावेळी सदरहू भ्रमण दूरध्वनी यंत्र दुरुस्तीला आणले त्यावेळी त्यामध्ये पाण्याचा अंश संपलेला असल्यामुळे तक्रारदार यांच्याकडून रुपये 168/-येवढी रक्कम घेऊन सदरहू यंत्र दूरुस्त करुन देण्यात आले. यापूर्वी दोन वेळा सदरहू यंत्रात पाण्याचा अंश असल्यामुळे यंत्र दुरुस्त होण्यासारखे नव्हते. परंतू तिस-यावेळी वर नमूद केल्याप्रमाणे त्यामध्ये पाण्याचा अंश नसल्यामुळे, तपासणीनंतर सदरहू दोष दुरुस्ती करण्यासारखा असल्यामुळे सामनेवाले क्र.4 यांनी तक्रारदार यांचेकडून रु.168/- घेऊन सदरहू भ्रमण दूरध्वनी यंत्र दूरुस्त करुन दिले. पहिल्यांदा दोन वेळा हे यंत्र सामनेवाले क्र.4 कडे दुरुस्तीला आणले त्यावेळी त्यात पाणी गेलेले आढळून आले. नंतर त्यातील पाणी सुकेल व ते दुरुस्त करता येईल याची कल्पना सामनेवाले क्र.4 यांना नव्हती. कारण असे फार क्वचीत घडते. त्यामुळे ते यंत्र दुरुस्तीच्या पलीकडे आहे असे त्यांनी सांगीतले यात त्याची सेवेत न्यूनता दिसत नाही. सदर दुरुस्ती ही वॉरंटी कालावधीनंतर करण्यात आलेली असल्यामुळे सामनेवाले क्र.4 यांनी या दुरुस्तीपोटी रक्कम रु.168/- घेतले. यामध्ये देखील त्यांचे सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. 8. सहा महिन्याचे आत तक्रारदाराने त्यांनी घेतलेला भ्रमण दूरध्वनी क्रमांक चालु न केल्यास तो बंद होईल असे सामनेवाले क्र.2 यांच्याकडून सांगण्यात आले होते, व त्यासाठी सामनेवाले क्र.2 यांच्या कथनानुसार तक्रारदाराने नविन भ्रमण दूरध्वनी यंत्र रु.12,500/- दिनांक 14/06/2004 रोजी खरेदी केले असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. परंतु हा आरोप सामनेवाले क्र.2 यांनी नाकारला असून अशा प्रकारचे कथन त्यांनी कधीही केलेले नाही व नविन भ्रमण दूरध्वनी यंत्र घेण्यास त्यांनी तक्रारदारास सांगीतले नाही असे सामनेवाले क्र.2 चे म्हणणे आहे. सदरच्या आरोपाला तक्रारदाराच्या तक्रारीत काही पुरावा नाही. सामनेवाले क्र.2 च्या सांगणेवरुन त्याने नवीन यंत्र विकत घेतले हया म्हणण्यामध्ये तथ्य असल्याचे दिसून येत नाही. 9. थोडक्यात तक्रारदाराच्या या तक्रार अर्जात काही तथ्य असल्याचे दिसून येत नाही. सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असल्याचे तक्रारदाराने सिध्द केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराने दुस-या खरेदी केलेल्या यंत्राची किंमत रु.12,500/- त्यास सामनेवाले यांच्याकडून मागता येणार नाही. तसेच अन्य दादही मागता येणार नाही. तक्रार अर्ज हा रद्द करण्यास पात्र असल्यामुळे या प्रकरणी खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार अर्ज क्रमांक 516/2006 खर्चासह रद्द करण्यात येतो. 2. या प्रकरणी उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य देण्यात/पाठविण्यात याव्यात.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONORABLE S P Mahajan] PRESIDENT | |