जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 35/2008. प्रकरण दाखल तारीख - 16/01/2008 प्रकरण निकाल तारीख - 29/07/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. सौ. अनिता राजेश तिवाडी अर्जदार. वय वर्षे 33, धंदा घरकाम व व्यापार, रा. आयुवेदीक कॉलेज समोर, वजिराबाद नांदेड. विरुध्द. रिलायन्स कम्युनिकेशन कंपनी तर्फे शाखाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.के.दागडीया गैरअर्जदारा तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते,सदस्य ) गैरअर्जदार रिलायन्स कम्युनिकेशन कंपनी यांच्या सेवेच्या ञूटीबददल अर्जदाराची तक्रार आहे. ते आपल्या तक्रारीत म्हणतात की, वजिराबाद येथे त्यांनी गैरअर्जदाराकडून लॅडलाईनची दूरध्वनीची सूवीधा घेतली.त्यांला दूरध्वनी नंबर 323499 हा देण्यात आला. कनेक्शनसाठी अर्जदाराने रु.1,000/- व डिपॉझीट म्हणून रु.1,000/- गैरअर्जदार यांच्याकडे जमा केले.दूरध्वनी जोडल्यानंतर त्यामध्ये नेहमी तांञिक अडचण निर्माण होऊन तो बंद होत असे त्यामुळे अर्जदाराने वारंवार गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली पण त्याने ती दूर केली नाही. त्यामुळे अर्जदाराने नाईलाजाने दि.16.1.2007 रोजी दूरध्वनी बंद करण्याचा नीर्णय घेतला व त्याप्रमाणे गैरअर्जदार यांचे कार्यालयात जाऊन दूरध्वनी जमा केला व त्यांच्याकडे डिपॉझीटची रक्कम परत करण्याची मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी आजपर्यत ती रक्कम वापस केली नाही. पून्हा एकदा दि.17.10.2007 रोजी गैरअर्जदार यांचे कार्यालयात गेले असता त्यांनी अर्जदार यांना डिपॉझीटची रक्कम गैरअर्जदार यांनी वापस दिली नाही. दि.14.12.2007 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना एक कायदेशीर नोटीस पाठविली त्यांलाही त्याने उत्तर दिले नाही. अर्जदाराची मागणी आहे की, रु.2,000/- त्यांला दि.16.1.2007 पासून 18 व्याजाने देण्यात यावे तसेच रु.50,000/- मानसिक ञासाबददल व रु.2,000/- दावा खर्चही मिळावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार यांना नोटीस पाठविण्यात आली परंतु त्यांनी नोटीस घेण्यास इन्कार केला म्हणून प्रकरण एकतर्फा चालवीण्याचे आदेश करण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे, तसेच गैरअर्जदार यांचा कंपनीशी केलेला पञव्यवहार तो ही दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी पाठविलेली कायदेशीर नोटीस, शपथपञाद्वारे रु.2,000/-मिळाले नसल्याचे उल्लेख केलेला आहे. तसेच दि.16.1.2007 रोजी दूरध्वनी बंद केल्या बददलची पावती व दि. 7.11.2005 रोजी रु,1,000/- पावती क्र.7013912 तसेच रु.1000/- मिळाल्याबददलची पावती 2026205575 दि.29.10.2005 हे पूरावा म्हणून दाखल केलेले आहे. यामध्ये डिपॉझीट म्हणून रु.1,000/- दिलेले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद एकूण खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी दूरध्वनी वापस केल्या बददलची पावती व भरलेल्या डिपॉझीटच्या पावत्या तसेच दि.14.12.2007 रोजी रु.2,000/- वापस करण्या बाबत गैरअर्जदार यांना लिहीलेले पञ. तसेच दोन्ही पावत्यावरुन एस.टी.डी. डिपॉझीट व दूरध्वनी डिपॉझीट प्रत्येकी रु.1,000/- असे मिळून रु.2,000/- गैरअर्जदार यांच्याकडे जमा असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांना या प्रकरणात आपले म्हणणे माडंण्याची संधी दिली पण त्यांनी ती नाकारली यांचाच अर्थ अर्जदार यांची तक्रार त्यांना मान्य आहे असे समजून गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे दूरध्वनीपोटी घेतलेले डिपॉझीट रु.2,000/- वापस करणे बंधनकारक आहे. ही रक्कम वापस न करुन त्यांनी सेवेत ञूटी केलेली आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांचे दूरध्वनी डिपॉझीटची रक्कम रु.2,000/- व त्यावर दि.17.1.2007 पासून 12 % व्याजाने रक्कम वापस करावी, असे न केल्यास दंडणीय व्याज म्हणून 15% व्याजासह पूर्ण रक्कम मिळेपर्यत अर्जदार यांना दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.2000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.विजयसिंह राणे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |