निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 21/03/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 05/04/2011 तक्रार निकाल दिनांकः- 11 /10/2011 कालावधी 06 महिने 06 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. मीरा भ्र.भास्कर कवडे. अर्जदार वय 30 वर्ष.धंदा.शेती व घरकाम. अड.मुडपे के.पी. रा.हिस्सी ता.सेलू जि.परभणी. विरुध्द 1 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि. गैरअर्जदार. 19 रिलायन्स सेंटर,वालचंद हिराचंद मार्ग. अड.जी.एच.दोडीया. बल्लार्ड इस्टेट.मुंबई. 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीस प्रा.लि. स्वतः शॉप नं.2 दिशा अलंकार कॉम्पलेक्स. टाऊन सेंटर.सिडको.औरंगाबाद. 3 मा.तहसिलदार साहेब. स्वतः तहसिल कार्यालय,सेलू.ता.सेलू.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा श्रीमती अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू दिनांक 14/03/2009 रोजी झाला.तो महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी होता.अर्जदाराने तीच्या मयत पतीच्या उपरोक्त योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी दिनांक 27/03/2009 रोजी तहसिलदार सेलू यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह तलाठ्या मार्फत क्लेम दाखल केला.तदनंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे वेळोवेळी पाठपुरावा केला.शेवटी दिनांक 03/01/2011 रोजी अर्जदाराने कायदेशिर नोटीस पाठवली, परंतु गैरअर्जदारांनी त्यास प्रतिसाद न दिल्यामुळे अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा रक्कम रु.1,00,000/- वर 3 महिन्या पर्यंत 9 टक्के व 3 महिन्यानंतर 15 टक्के व्याज द्यावे. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळावे.अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि.5/16 मंचासमोर दाखल केली. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1, 2 व 3 यांना मिळाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 नेमलेल्या तारखेस मंचासमोर हजर न झाल्यामुळे त्याच्या विरोधात एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. व प्रकरण त्याच्या विरोधात एकतर्फा चालविण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी लेखी निवेदनल अनुक्रमे नि.5 वर व नि.10 वर मंचासमोर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे की, ते IRDA मान्यता प्राप्त असून महाराष्ट्र शासनाने त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे. विमा कंपनीला क्लेम दाखल करण्यापूर्वी योग्य कागदपत्राची पुर्तता करण्यात आलेली आहे.किंवा नाही.याची छाननी करुन विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 2 ची आहे.त्या बद्दल ते महाराष्ट्र शासनाकडून किंवा शेतक-यांकडून कुठलाही मोबदला घेत नाही.तसेच अर्जदाराचा प्रस्ताव क्लेम गैरअर्जदार क्रमांक 2 ला अद्याप ही मिळालेला नाही.म्हणून वरील सर्व कारणास्तव सदर प्रकरणातून त्यांना वगळण्यात यावे.तसेच दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळावेत. अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक 2 ने मंचासमोर केली आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे असे की, त्याला अर्जदाराच्या मयत पतीचा डेथेक्लेम गैरअर्जदार क्रमांक 2 कडून अद्याप ही प्राप्त न झाल्यामुळे विमा दाव्याची रक्कम अर्जदारास देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.म्हणून वरील सर्व कारणास्तव अर्जदाराची तक्रार खर्चासह खरीज करण्यात यावी. अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक 1 ने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने लोखी निवेदना सोबत शपथपत्र नि.16 वर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास त्रुटीची सेवा कोणत्या गैरअर्जदाराकडून दिल्याचे शाबीत झाले आहे ? गैरअर्जदार क्रमांक 3 कडून 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराचा पती महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात योजने अंतर्गत लाभार्थी होता.त्याचा दिनांक 14/03/2009 रोजी अपघाती मृत्यू झाला उपरोक्त योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत पतीचा डेथक्लेम मिळण्यासाठी दिनांक 27/03/2009 रोजी आवश्यक कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 3 कडे प्रस्ताव तलाठ्या मार्फत दाखल केला,परंतु अद्याप पावेतो अर्जदारास तिच्या मयत पतीच्या डेथक्लेमची रक्कम मिळाली नाही.अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 चे म्हणणे असे की, त्यांना अर्जदाराच्या मयत पतीचा डेथक्लेम मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह क्लेमफॉर्म मिळालेला नाही. मंचासमोर अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्राची पाहणी केली असता असे लक्षात येते की, गैरअर्जदार क्रमांक 3 ने कागदपत्रांसह क्लेमफॉर्म गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दाखल न करता सरळ गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पाठवुन दिलेला आहे.वास्तविक पाहता गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराचा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवावयास हवा होता.व गैरअर्जदार क्रमांक 2 ने प्रस्तावाची छाननी करुन योग्य प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पाठविला असता ती नेहमीची Procedure आहे. व याचे ज्ञान गैरअर्जदार क्रमांक 3 ला असू नये या बद्दल आश्चर्य वाटते.या कार्यप्रणालिला छेद देवुन सरळ गैरअर्जदार क्रमांक 1 कडे प्रस्ताव पाठविला हि बाब नक्कीच गैरअर्जदार क्रमांक 3 च्या सेवेत त्रुटी असल्याचे दर्शविते.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचा कोणताही दोष नसल्याचे मंचाचे मत आहे.म्हणून सर्व बाबींचा सारासार विचार करुन आम्ही खाली प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार क्रमांक 3 ने आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव त्वरित गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दाखल करावा.व गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 कडून प्रस्ताव मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथक्लेमची रक्कम मंजूर करावी. 3 गैरर्जदार क्रमांक 3 ने सेवात्रुटीपोटी दंडात्मक रक्कम रु.2,000/- निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास द्यावी. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |