Maharashtra

Parbhani

CC/11/138

Usha Janardhan Dugane - Complainant(s)

Versus

Relance General Insurance Company Limited,Mumbai -31 - Opp.Party(s)

Adv.Arun M.Raut

14 Feb 2012

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/11/138
1. Usha Janardhan DuganeR/o Waghala Tq.PathriParbhaniMaharashtra2. Archana Janardhan DuganeR/o Waghala Tq.PathriParbhaniMaharashtra3. Sharda Janardhan DuganeR/o Waghala Tq.PathriParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Relance General Insurance Company Limited,Mumbai -31570,Requtifire House,Endowrigen Electrica Limited Naygum Crous Road,Next two rowal Industries Estate,Wadala West,Mumbai.MumbaiMaharashtra2. Manager,Kabal Insurance Broking Services Pvt.Ltd.Raj Aparment,AurangbadPlot No.29,G-Sequter,Reliance Prex Back Side,Warsha In Hotel Newar,Town Centre,Cidco,AurangbadAurangbadMaharashtra3. Taluka Krashi Officer,PathariTaluka Krashi Office,PathariParbhaniMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv.Arun M.Raut, Advocate for Complainant

Dated : 14 Feb 2012
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र

                        तक्रार दाखल दिनांकः-  14/07/2011

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 19/07/2011

                        तक्रार निकाल दिनांकः- 14/02/2012

                                                                                    कालावधी 06 महिने 26 दिवस

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.

सदस्‍या                                                                                                    सदस्‍या

सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.              

    

1     श्रीमती उषा भ्र.जनार्धन दुगाणे.                                        अर्जदार

वय 26 वर्ष.धंदा. घरकाम.                                  अड. ए.एम.राऊत.

रा.वाघाळा, ता.पाथरी जि.परभणी.

2     श्रीमती अर्चना भ्र.जनार्धन दुगाणे.

      वय 28 वर्षे धंदा घरकाम.

      रा.वाघाळा,ता.पाथरी जि.परभणी.

3     कु.शारदा पि.जनार्धन दुगाणे.अ.पा.क.अर्जदार नं.1

      वय 03 वर्ष.धंदा निरंक.

      रा.वरील प्रमाणे.    

               विरुध्‍द

1     व्‍यवस्‍थापक,रिलायंस जनरल इन्‍शुरन्‍स कं.लि.                गैरअर्जदार.                     

      570, रेक्‍टीफायर हाऊस इंडो रिजन इलेक्‍ट्रीक लि.          अड.जी.एच.दोडीया.                     

      नायगाव क्रॉस रोड, नेक्‍सट टू रॉयल.इन्‍डस्‍ट्रीयल इस्‍टेट.

      वडाळा (वेस्‍ट) मुंबई 400 031.

2     व्‍यवस्‍थापक, कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.          स्‍वतः

      राज अपार्टमेंट,प्‍लॉट नं.29, जी सेक्‍टर, रिलायंस प्रेसच्‍या मागे,

          वर्षा इन हॉटेल जवळ, टाऊन सेंटर सिडको.औरंगाबाद.431 003.

3     तालुका कृषी अधिकारी.पाथरी.                              स्‍वतः                                           ता.पाथरी.जि.परभणी.                                                    

------------------------------------------------------------------------------------        

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)        सौ.सुजाता जोशी.                   सदस्‍या.                                              3)        सौ.अनिता ओस्‍तवाल.                 सदस्‍या.

-------------------------------------------------------------------------------------------------------

         

          (  निकालपत्र पारित व्‍दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्‍यक्ष.)

      शासनातर्फे उतरविलेल्‍या  शेतकरी अपघात विमा योजनेची  नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळावी म्‍हणून प्रस्‍तुतची  तक्रार आहे.

            अर्जदारांची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे वाघाळा ता.पाथरी येथील रहिवासी आहेत.अर्जदार क्रमांक 1 व 2 या मयत अपघात ग्रस्‍त शेतक-याच्‍या पत्‍नी असून अर्जदार नं 3 ही मुलगी आहे. महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 1 यानी पुरस्‍कृत  केलेल्‍या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता त्‍या पॉलीसीचा अर्जदार क्रमांक 1 व 2 चे मयत  पती जनार्धन ज्ञानदेव दुगाणे हा देखील लाभार्थी होता तारीख 06/04/2009  रोजी विहिरीतून पाणी काढत असतांना पाय घसरुन विहिरीत पडला त्‍याला पोहता येत नसल्‍यामुळे पाण्‍यात बुडून त्‍याचा मृत्‍यू झाला.त्‍याच्‍या मृत्‍यू नंतर शेतकरी अपघात विम्‍याची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळण्‍यासाठी मयत  जनार्धन दुगाणे याची आई आश्रुबाई ज्ञानोबा दुगाणे हीने तारीख 13/05/2009 रोजी आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 3 कडे क्‍लेम दाखल केला होता.त्‍याने जिल्‍हा कार्यालया मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 कडे कागदपत्रे पाठवली. त्‍यानंतर क्‍लेम मंजूर झाला का याबाबतची चौकशी करण्‍यासाठी गेली असता तीला असे सांगितले की, नियमा प्रमाणे विमाक्‍लेम पत्‍नीला करण्‍याचा अधिकार आहे तुम्‍हाला लाभ मिळणार नाही म्‍हणून तो क्‍लेम नामंजूर झाला आहे.म्‍हणून पुन्‍हा प्रस्‍तुत प्रकरणातील अर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तारीख 21/01/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे दुसरा नवीन प्रस्‍ताव दाखल केला.परंतु त्‍यानंतर क्‍लेम मंजुरी बाबत अनेक वेळा चौकशी करुन देखील समाधान कारक उत्‍तर दिले नाही म्‍हणून गैरअर्जदारांना वकिला मार्फत नोटीस पाठवली नोटीस मिळून देखील त्‍याने क्‍लेम मंजुरी बाबत काहीही कळविले नाही अथवा नोटीसीचे उत्‍तरही दिले नाही अशा रितीने प्रकरण रखडत ठेवून नुकसान भरपाई मिळणे पासून वंचित ठेवले आहे. म्‍हणून ग्राहक मंचात प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 20 टक्‍के व्‍याजासह मिळावी याखेरिज मानसिकत्रासापोटी रु.25,000/- आणि अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केलेली आहे.

तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदार क्रमांक 1 व 2 यांची शपथपत्रे ( नि. 2 व 3 )  पुराव्यातील कागदपत्रात नि. 5 लगत एकूण  35  कागदपत्रांच्‍या छायाप्रती दाखल केलेली आहेत.

      तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्‍यावर गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने तारीख 05/01/2012 रोजी आपला लेखी जबाब (नि.22) सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी पोष्‍टाव्‍दारे पाठविलेला लेखी जबाब तारीख 09/09/2011 रोजी प्रकरणात नि. 12 ला समाविष्‍ठ केला.गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी तारीख 25/08/2011 रोजी लेखी जबाब ( नि.8) प्रकरणात सादर केला.

गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आपल्‍या लेखी जबाबात नि.(22)  तक्रार अर्जातून त्‍यांच्‍या विरुध्‍द केलेल्‍या विधानांचा इन्‍कार करुन प्रस्‍तुतची तक्रार विमा कंपनी विरुध्‍द मुळीच चालणेस पात्र नाही त्‍यांचेकडून कोणत्‍याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही असे म्‍हंटलेले आहे.गैरअर्जदार क्रमांक 2 कडे मयत जनार्धन दुगाणे यांच्‍या डेथक्‍लेम बाबत चौकशी करता असे कळाले की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांना 27/05/2009 रोजी क्‍लेमची कागदपत्रे मिळाली होती,परंतु त्‍यामध्‍ये बरीच अपुरी कागदपत्रे असल्‍याने त्‍याची पुर्तता करण्‍याबाबत गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदारास कळवून देखील पुर्तता न झाल्‍यामुळे मुळक्‍लेमची  कागदपत्रे त्‍याने विमा कंपनीकडे पाठवली होती.परंतु अपुरी कागदपत्रे असल्‍यामुळे कंपनीने 24/11/2010रोजी वरील कारणास्‍तव क्‍लेम नामंजुर केलेला आहे.शेतकरी विम्‍या संबंधी तक्रार अर्जातील मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने वैयक्तिक माहिती अभावी साफ नाकारली आहेत.गैरअर्जदाराकडून क्‍लेम मंजुरीच्‍या बाबतीत कोणतीही सेवात्रुटी झालेली नाही.सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा. अशी शेवटी विनंती केली आहे.

लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ गैरअर्जदार नं 1 चे शपथपत्र (नि.13) दाखल केले आहे.

गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्‍या लेखी जबाबात (नि.12) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्‍या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्‍लेम संदर्भातील कागदपत्रांची विमा कंपनीकडे आवश्‍यक ती पूर्तता व छाननी करण्‍यासाठी शासनाने त्‍याना मध्‍यस्‍थ सल्‍लागार म्‍हणून नेमलेले आहे त्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्‍यांचेकडून विम्‍याचा हप्‍ताही स्विकारला जात नाही. मयत जनार्धन दुगाणे याच्‍या विमा क्‍लेमची कागदपत्रे तारीख 27/05/2009 रोजी प्राप्‍त झाली होती.परंतु पाठवलेल्‍या कागदपत्रात बरीच कागदपत्रे अपुरी असल्‍यामुळे त्‍याची पुर्तता करण्‍यासाठी डी.एस.ए.ओ.परभणी यांना कळवले होते.परंतु त्‍याची पुर्तता न केल्‍यामुळे आहेत ती कागदपत्रे अपुरी असा शेरा मारुन विमा कंपनीकडे पाठवली व त्‍यांनी त्‍यानंतर तारीख 24/11/2010 च्‍या पत्राने क्‍लेम वरील कारणास्‍तव नाकारल्‍याचे कळवले. सबब गैरअर्जदार क्रमांक 1 यांना या प्रकरणातून वगळण्‍यात यावे.अशी शेवटी विनंती केली आहे.  

लेखी जबाबासोबत विमा कंपनीने अर्जदारास पाठवलेल्‍या तारीख 24/11/2010 च्‍या पत्राची छायाप्रत दाखल केलेली आहे.

गैरअर्जदार क्रमांक 3 याने आपल्‍या लेखी जबाबात (नि.8) असा खुलासा केला आहे की, मयत जनार्धन दुगाणे याच्‍या आईने सुरवातीला माहे मे 2009 मध्‍ये शेतकरी अपघात नुसाकन भरपाई क्‍लेम सादर केले होते.ती जिल्‍हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे त्‍यांनी पाठवली.परंतु शासन निर्णय परिपत्रक 268 दिनांक 30/09/2009 नुसार मयत व्‍यक्‍तीच्‍या वारसांना नुकसान भरपाईचा क्‍लेम दाखल करावयाचा झाल्‍यास अर्जदार व्‍यक्‍तींचा प्राधान्‍यक्रम दिला आहे त्‍यामध्‍ये 1) पत्‍नी  2) अविवाहीत मुलगी   3) आई 4) मुलगे  5) नातवंडे  6) विवाहीत मुलगी या क्रमाने अर्ज करावा लागतो.असे मुळ अर्जदारास सांगितल्‍यानंतर पुन्‍हा तारीख 25/01/2011 रोजी प्रस्‍तुत अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नवीन नुकसान भरपाई प्रस्‍ताव दाखल केला आहे तो जिल्‍हा कार्यालयाकडे तारीख 01/02/2011 रोजी पुढिल कार्यवाहीसाठी सादर केला.

तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड. ए.एम.राऊत आणि   गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड दोडिया  यानी युक्तिवाद केला.

      निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

    मुद्दे.                               उत्‍तर

1              गैरअर्जदार 1 ते 3 यानी अर्जदाराच्‍या मयत पतीच्‍या

मृत्‍यू पश्‍चात शेतकरी अपघात विम्‍याची नुकसान भरपाई

क्‍लेम आजपर्यंत विनाकारण रखडत ठेवुन सेवात्रुटी केली

आहे काय ?                                        होय

  2           अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे काय? अंतिम आदेशा प्रमाणे.          

                   

 

 

 

 

 

                        कारणे

मुद्या क्रमांक 1 व 2 - 

      अर्जदार क्रमांक 1 व 2 यांचा मयत पती जनार्धन दुगाणे  हा  शेतकरी  अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्‍यात सादर केलेल्‍या नि.5 लगत दाखल केलेली रेव्‍हीन्‍यु रेकॉड मधील मयताच्‍या नावाच्‍या नोंदीवरुन शाबीत झाले आहे.तसेच  दिनांक 06.04.2009 रोजी मयत जनार्धन दुगाणे याचा विहिरीत पाय घसरुन बुडून अपघाती  मृत्‍यू झाला होता हे देखील नि.5 लगत दाखल केलेल्‍या पोलिस पेपर्स वरुन  शाबीत झाले आहे.जनार्धन दुगाणे याच्‍या मृत्‍यू नंतर तो शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याचा लाभार्थी असल्‍यामुळे सुरवातीला माहे मे 2009 मध्‍ये मयताची आई आश्रुबाई हिने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्‍याकडे विमा क्‍लेम व कागदपत्रे विम्‍याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी सादर केलेली होती त्‍या कागदपत्रांच्‍या छायाप्रती पुराव्‍यात नि.5 लगत दाखल केलेल्‍या आहेत. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी ती कागदपत्रे जिल्‍हा कार्यालया मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवल्‍यानंतर  त्‍यांनी काही अपु-या कागदपत्रांची पुर्तता करण्‍या बाबत डि.एस.ए.ओ.यानाही कळवलेले होते असे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपल्‍या लेखी जबाबात सविस्‍तरपणे नमुद केले आहे.अपु-या कागदपत्रांची पुर्तता केली नाही म्‍हणून त्‍यानंतर विमा कंपनीने तारीख 24/11/2010 च्‍या पत्राव्‍दारे क्‍लेम नामंजूर केला असल्‍याचाही गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी लेखी जबाबात खुलासा केलेला आहे.प्रस्‍तुत तक्रार अर्जातील अर्जदारांनी असे म्‍हंटलेले आहे की, त्‍यांच्‍या सासूबाई (अर्जदाराची आई) दाखल केलेला क्‍लेम शासनाच्‍या परिपत्रका प्रमाणे चालत नाही मयताच्‍या पत्‍नीनेच विमाक्‍लेम दाखल करायला पाहिजे असे सांगितल्‍यावरुन अर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी मयत जनार्धन दुगाणे याचा डेथक्‍लेम पुन्‍हा गैरअर्जदार क्रमांक 3 कडे सादर केला होता.त्‍या क्‍लेमफॉर्मची नक्‍कलही पुराव्‍यात नि.5/6 वर दाखल केलेली आहे.क्‍लेमफॉर्म सोबत आवश्‍यक त्‍या कागदपत्रांच्‍या पाठवलेल्‍या छायाप्रतीही पुराव्‍यात दाखल केलेल्‍या आहेत.तसेच पूर्वी मयताच्‍या आई तर्फे दाखल केलेल्‍या क्‍लेमफॉर्म (नि.5/25) व त्‍यासोबतची कागदपत्रेही पुराव्‍यात नि.5/26 ते 5/35 दाखल केलेली आहेत. शासनाच्‍या परिपत्रका प्रमाणे व कायद्यातील तरतुदी प्रमाणे शेतक-याचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास नुकसान भरपाईचा क्‍लेम करण्‍याचा अधिकार वारस पत्‍नीस असतो त्‍यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्‍या सांगण्‍यावरुन दाखल केलेला होता हे गैरअर्जदार क्रमांक 3 ने ही लेखी जबाबात नाकारलेले नाही.प्रस्‍तुत अर्जदाराने माहे जानेवारी 2011 मध्‍ये पुन्‍हा नवीन क्‍लेम दाखल केल्‍यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 याने  तारीख 01/02/2011 रोजी क्‍लेम व कागदपत्रे जिल्‍हा अधिक्षक कार्यालयाकडे पाठवलेली होती असे लेखी जबाब (नि.16) मध्‍ये म्‍हंटलेले आहे.मात्र जिल्‍हा कार्यालयाकडून संबंधीत क्‍लेम कबाल इन्‍शुरन्‍स अथवा रिलायंस विमा कंपनी यांच्‍याकडे पाठवण्‍यात आला होता या संबंधीचा कसलाही उल्‍लेख गैरअर्जदार क्रमांक 3 याने लेखी जबाबात केलेला नाही.एवढेच नव्‍हेतर अर्जदारांनी ग्राहक मंचात प्रस्‍तुतची तक्रार दाखल केल्‍यानंतर गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठवल्‍यावर कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज अथवा रिलायंस इन्‍शुरन्‍स कंपनी यांनी देखील अर्जदारांच्‍या क्‍लेमची कागदपत्रे त्‍यांना मिळाली आहेत किंवा नाही याबाबत खुलासा दिलेला नाही.पुराव्‍यातील या वस्‍तुस्थिती वरुन एक गोष्‍ट निश्चित आहे की,अर्जदारांचा मयत पती जनार्धन दुगाणेचा पॉलिसी मुदतीत अपघाती मृत्‍यू झाल्‍यामुळे पॉलिसी हमी आणि तो शेतकरी विमा पॉलिसीचा लाभार्थी असल्‍यामुळे त्‍याच्‍या कायदेशिर वारसांना नुकसान भरपाई रु.1,00,000/- मिळायला हवी.याबाबत सुरवातीला मयताच्‍या आईने दाखल केलेला क्‍लेम अपु-या कागदपत्रांच्‍या पुर्तते अभावी विमा कंपनीने तारीख 24/11/2010 च्‍या पत्रातून नामंजूर केलेला होता.परंतु त्‍या अपु-या कागदपत्रांची पुर्तता करण्‍या विषयीची कल्‍पना अर्जदारांना दिली होती या संबंधीचा कोणताही पुरावा गैरअर्जदारांनी मंचापुढे सादर केलेला नाही.त्‍यामुळे क्‍लेम नामंजुरीचा घेतलेला तो निर्णय निश्चितपणे चुकीचा आहे असे मंचाचे मत आहे.गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्‍या सांगणे वरुनच प्रस्‍तुत अर्जदाराने पुन्‍हा तारीख 25/01/2011 रोजी क्‍लेम दाखल केलेला होता त्‍या क्‍लेमची कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्‍या जिल्‍हा कार्यालया मार्फत जा.क्र.621/10 ने तारीख 10/02/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवण्‍यात आलेली होती हे अर्जदाराने पुराव्‍यात नि.5/3 लगत दाखल केलेल्‍या पत्राच्‍या कॉपीवरुन लक्षात येते म्‍हणजेच प्रस्‍तुतच्‍या अर्जदारांचा विमा क्‍लेम गैरअर्जदार क्रमांक 2 कडे प्रलंबित आहे हे स्‍पष्‍ट होते मात्र अशी वस्‍तुस्थिती असतांनाही गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी मात्र अर्जदारांच्‍या क्‍लेम बाबत लेखी जबाबा मध्‍ये काहीही उल्‍लेख अथवा खुलासा केलेला नाही.राज्‍यातील खातेदार शेतक-यासांठी शासनाने शेतकरी अपघात नुकसान भरपाई विमा ही कल्‍याणकारी योजना शेतक-यांच्‍या कुटूंबासाठी राबवलेली आहे.त्‍यासाठी शासनाने राज्‍यातील सर्व शेतक-यांचे विम्‍याचे हप्‍तेही स्‍वतः भरलेले आहेत.अर्जदारांच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यू झालेला असल्‍यामुळे अर्जदार वारसांना नुकसान भरपाई रु.1,00,000/- विमा कंपनीकडून मिळणेस ते पात्र आहेत.त्‍यापासून त्‍यांना मुळीच वंचित ठेवता येणार नाही.असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.त्‍यामुळे अर्जदारांनी दाखल केलेल्‍या विमा क्‍लेम बाबत मुदतीच्‍या अटीची कोणतीही बाधा येवु न देता अथवा ती विचारात न घेता विमा कंपनीने नुकसान भरपाई देणे उचित ठरेल या संदर्भात मा. महाराष्‍ट्र राज्‍य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्‍द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे मत व्‍यक्‍त केले आहे की, क्‍लेम दाखल करण्‍यास उशीर झाला ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही हे मत प्रस्‍तूत प्रकरणालाही  लागू पडते याखेरीज मा. राष्‍ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी विरुध्‍द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्‍या निकालपत्रात देखील वरील प्रमाणेच मत व्‍यक्‍त केलेले आहे.ते प्रस्‍तुत प्रकरणाला लागु पडते. सबब मुद्दा क्रमांक 1  चे उत्‍तर होकारार्थी देवून आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.

           दे                         

1          अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्‍यात येते.

2          गैरअर्जदार क्र. 2 यांनी आदेश प्रत मिळाल्‍यानंतर 30 दिवसाच्‍या आंत अर्जदार क्र 1 व 2 यांच्‍या मयत पतीच्‍या डेथक्‍लेमची नुकसान भरपाई मंजूर करण्‍याच्‍या कामी कागदपत्रांची छाननी करुन व अर्जदाराकडून अपू-या कागदपत्रांची  पूर्तता करुन घेवुन मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे क्‍लेम व कागदपत्रे पाठवावीत.कागदपत्रे प्राप्‍त झाल्‍यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारांचा विमाक्‍लेम पूढील एक महिन्‍यात सेटल करावा.

3.    पक्षकांरानी आपला खर्च आपण सोसावा.   

4.    पक्षकाराना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरवाव्‍यात  

 

 

 

 

 

सौ. अनिता ओस्‍तवाल              सौ.सुजाता जोशी        श्री. सी.बी. पांढरपटटे

     सदस्‍या                        सदस्‍या                  अध्‍यक्ष

 

 

 

 

 

 

 


[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member