निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 21/02/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 09/03/2011 तक्रार निकाल दिनांकः- 02 /11/2011 कालावधी 07 महिने 23 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. अण्णासाहेब पिता नारायण शिंदे. अर्जदार वय 45 वर्ष.धंदा.शेती. अड.डि.यु.दराडे. रा.सेलू ता.पालम जि.परभणी. विरुध्द 1 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि. गैरअर्जदार. तर्फे अधिकृत सहिकर्ता. अड.जी.एच.दोडीया. श्री.साई इन्टरप्राईजेस,210 साई इन्फोटेक आर.बी.मेहता मार्ग पटेल चौक घाटकोपर (पु) मुंबई.400077. 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीस प्रा.लि. स्वतः भास्करायन प्लॉट नं.17 इ.सेक्टर -1. कॅनाट गाडन टाउन सेंटर,सिडको औरंगाबाद. 3 तालुका कृषी अधिकारी. स्वतः पालम जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचा मुलगा संदीप यास दिनांक 07/01/2009 रोजी अपघात झाला व उपचारा दरम्यान दिनांक 24/03/2010 रोजी सेलू येथे त्याचा मृत्यू झाला.सदर अपघाताच्या संदर्भात पोलिसांनी गुन्हा क्रमांक 21/2009 नोंदविला. अर्जदाराचा मुलगा हा शेतकरी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी होता.तदनंतर अर्जदाराने त्याच्या मयत मुलाच्या डेथक्लेमची रक्कम मिळावी यासाठी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे विमा प्रस्ताव पाठविला.परंतु वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील गैरअर्जदारांनी त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे त्याने शेवटी दिनांक 18/12/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 ला पत्र पाठविले, परंतु त्याचे उत्तर ही अर्जदारास न मिळाल्यामुळे त्याने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- दिनांक 13/03/2009 पासून पूर्ण रक्कम मिळे पर्यंत द.सा.द.शे.12 % व्याजासह द्यावी. तसेच मानसिकत्रास व तक्रारीचा खर्च द्यावा अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/21 वर मंचासमोर दाखल करण्यात आली. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1,2, व 3 यांना तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी नेवदन अनुक्रमे नि.15, नि.13, व नि.18 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुत अंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे असे की,गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांच्याकडून अर्जदाराचा प्रस्ताव अद्याप पावेतो त्यास मिळालेला नाही.त्यामुळे अर्जदाराचा प्रस्ताव मंजूर अथवा नामंजूर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.तसेच सदरचा वाद हा मुदत बाह्य आहे.म्हणून वरील सर्व कारणास्तव अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जदार क्रमांक 1 ने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.16 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.21/1 वर मंचासमोर दाखल केली. गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे की, ते IRDA मान्यता प्राप्त असून महाराष्ट्र शासनाने त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे. विमा प्रस्ताव संबंधित कंपनीकडे पाठविण्यापूर्वी त्याची छाननी करण्याची व परिपूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 2 ची आहे त्या बद्दल महाराष्ट्र शासनाकडून अथवा विमा धारकाकडून कोणतेही शुल्क ते आकारत नाही.पुढे त्याचे म्हणणे असे की, संदीप शिंदे याला झालेल्या अपघाताची सुचना दिनांक 07/01/2009 रोजी व प्रस्ताव दिनांक 02/04/2009 रोजी त्यांना मिळाला होता आवश्यक कागदपत्राची पुर्तता झाल्यानंतर सदरचा प्रस्ताव विमा कंपनीकडे दिनांक 11/12/2009 रोजी पाठविण्यात आला व अनेक स्मरणपत्रे पाठविल्यानंतर देखील कोणताही निर्णय विमा कंपनीने अद्याप पावेतो कळविला नसल्याचे गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे आहे. त्यांना विनाकारण सदरचा प्रकणात गोवण्यात आलेले असल्यामुळे त्यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे तसेच दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु.2000/- मिळावे अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.गैरअर्जदार क्रमाक 3 चे म्हणणे असे की, शेतकरी अपघात विम्याचा प्रस्ताव 254/04 दिनांक 13/03/2009 रोजी सादर केला प्रस्तावातील त्रुटी बाबत कंपनीकडून पत्र आले त्यानुसार कागदपत्राची पुर्तता करुन दिनांक 29/08/2009 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला प्रस्तावात त्रुटी असल्याचे आढळून आल्याने पुन्हा त्यातील कागदपत्राची पुर्तता करुन दिनांक 11/11/2009 नुसार प्रस्ताव जि.अ.कृ अ.परभणी यांना सादर केला त्यामुळे त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पाडलेली आहे.तसेच म्हणून वरील सर्व कारणास्तव त्यांच्या विरोधातील अर्जदाराची तक्रार खारीज करावी अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक 3 ने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदार कमांक 3 ने पुराव्यातील कागदपत्र नि.19 वर मंचासमोर दाखल केली आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदारानी त्रुटीची सेवा दिल्याचे अर्जदाराकडून शाबीत झाले आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराच्या मुलाचा दिनांक 07/01/2009 रोजी अपघात झाला व दिनांक 24/03/2010 रोजी त्याचा मृत्यू झाला तो शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा लाभार्थी असल्यामुळे त्याच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने प्रस्ताव दाखल केला,परंतु अद्याप पावेतो गैरअर्जदारांनी त्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.निर्णयासाठी अर्जदाराच्या तक्रारी मधील तथ्य पाहणे गरजेचे आहे.मंचासमोर गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 लेखी निवेदन दाखल केले आहे ते वाचले असता व मंचासमोर दोन्ही पक्षांच्या वतीने दाखल केलेल्या कागदपत्राची पडताळणी केली असता असे लक्षात येते की,शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अंपगत्वाचा लाभ मिळण्यासाठी स्वतः संदीप शिंदे म्हणजे अर्जदाराच्या मुलाने प्रस्ताव दाखल केलेला आहे. प्रस्ताव प्रलंबीत असतांनाचा दिनांक 24/03/2010 रोजी त्याचा मृत्यू झाल्याचे दिसते त्यामुळे अर्जदारास जर त्याच्या मयत मुलाच्या शेतकरी व्यक्तीगत अपघात योजने अंतर्गत डेथक्लेमची रक्कम मागावयाची असेल तर त्याने ही बाब संबंधीत अधिका-यांना कळवुन त्या अनुषंगाने औपचारीकता पूर्ण करावयास हवी होती, परंतु त्याने तशी काही कार्यवाही केल्याचे कागदोपत्री तरी दिसत नाही.अपंगत्वाच्या प्रस्तावावर डेथेक्लेमची रक्कम मिळावी.अशी अपेक्षा करणे मुळातच चुकीची आहे त्यामुळे अर्जदाराची मागणी मान्य करता येणार नाही. असे मंचाचे मत आहे.परंतु तरीही उपरोक्त योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्जदार वंच्छीत राहू नये असे ही मंचास वाटते म्हणून अर्जदाराने त्याच्या मयत मुलाच्या डेथक्लेमची रक्कम मिळण्यासाठी लागणा-या आवश्यक कागदपत्राची पुर्तता करावी व सदरच्या प्रकगरणाचा गैरअर्जदाराने सुध्दा सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यास डेथक्लेमची रक्कम मंजूर करावी. असा आदेश देणे न्यायोचित होईल. म्हणून वरील सर्व बाबीचा सारासार विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1 अर्जदाराने आदेश कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत त्याच्या मयत मुलाच्या शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक असणारी औपचारीकता पूर्ण करावी व तदनंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ने प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अर्जदाराचा प्रस्ताव मंजूर करावा. 2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |