Maharashtra

Chandrapur

CC/13/78

Tulsiram Vishwanath Bangre - Complainant(s)

Versus

Registrar Khristanand Charitable Trust Hospital Brahmapuri - Opp.Party(s)

Adv.Potdukhe

09 Apr 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/13/78
 
1. Tulsiram Vishwanath Bangre
R/o- Jani Ward Brahmapuri
Chandrapur
Maharshtra
...........Complainant(s)
Versus
1. Registrar Khristanand Charitable Trust Hospital Brahmapuri
Brahmapuri Dist-Chandrapur
Chandrapur
Maharshtra
2. Dr. Vivek Kokane
Kristanand Charitable Trust Hospital Brahmapuri
Chandrpur
Maharshtra
3. Dr. R.Ravi
First Floar NitiGaurav ,Near Lokmat Bhavan Center Market Road Nagpur
nagpur
Maharshtra
4. Gupte Cancer Clinic Proprioter Dr.Smita Gupte
ShriWardhan Complex Sitaburdi nagpur
Nagpur
Maharshtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. Kalpana Jangade MEMBER
 HON'BLE MRS. Kirti Gadgil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: नि का :::

(मंचाचे निर्णयान्‍वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक :- ०९/०४/२०१५ )

 

अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.

अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणे.

 

१.    अर्जदार यांचे डाव्‍या पायाचे मांडीला गाठ असल्‍यामुळे ते गैरअर्जदार क्रं. १ व २ यांचे रुग्‍णालयात दि. १८.०७.१२ रोजी तपासणी करीता आले व गैरअर्जदार क्रं. २ यांनी अर्जदाराची प्राथमिक तपासणी करुन डाव्‍या पायाचे गाठीचे शस्‍ञक्रिया करावे लागेल अन्‍यथा अर्जदाराला भविष्‍यात गंभीर परिणाम होवू शकते असे सांगितले. गैरअर्जदार क्रं. २ चे सल्‍लानुसार व तपासणी रिपोर्ट नुसार दि. ७.८.१२ रोजी शस्‍ञक्रियेकरीता एकूण फि रक्‍कम रु. ४०,०००/- रुग्‍णालयात खाते विभागात भरणा करण्‍यात आली. उपरांत  दि. ८.८.१२ रोजी अर्जदाराचे डाव्‍या पायाचे गाठीची शस्‍ञक्रिया करण्‍यात आली. सदर शस्‍ञक्रिया एक दोन तास उशिराने करण्‍यात आली. व अतिशय गोंधळलेल्‍या परिस्थितीत गैरअर्जदार क्रं. २ ने शस्‍ञक्रियापूर्वी व नंतर शस्‍ञक्रिया संबंधाने तक्रारदाराचे नातेदारांना यशस्‍वीतेने कोणतीही खाञी लायक माहीती दिली नाही. गैरअर्जदार क्रं. २ ने शस्‍ञक्रियेवेळी निष्‍काळजी पणे शस्‍ञक्रिया करतांना अर्जदाराचे डाव्‍या पायाची मुख्‍य नस ६ से. मी. पर्यंत कापली त्‍यामुळे अर्जदाराचा डाव पाय शस्‍ञक्रियेनंतर काम करीत नव्‍हता. सदर पायाला कृञिम यंञ बसवून सुध्‍दा अर्जदाराला मदतनीस शिवाय बसणे उठने कठिन झाले होते. सदर संदर्भात गैरअर्जदार क्रं. २ ला त्‍यावेळी उपचार करण्‍याची मागणी केल्‍यावर गैरअर्जदार क्रं. २ यांनी अर्जदाराला उडवाउडवीची उत्‍तरे देवून पायातील संवेदना कालांतराने येतील अशी बनावणी केली. गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी अर्जदारास शस्‍ञक्रिये दरम्‍यान काढलेल्‍या डाव्‍या पायातील गाठीचे आवश्‍यक घटक व रक्‍त नमुने गैरअर्जदार क्रं. ३ यांचेकडे तपासणी व उचित चाचणीकरीता  पाठविले असल्‍याची अर्जदाराला माहीती दिली. सदर तपासणी व चाचणी अहवाल दि. १०.०८.१२ नुसार अर्जदाराला कर्करोग असल्‍याबाबत गैरअर्जदार क्रं. १ नी लेखी अहवाल पाठविले. गैरअर्जदार क्रं. २ व ३ यांचे वैदयकिय सल्‍ल्‍यानुसार  व अहवालानुसार अर्जदार यांनी गुप्‍ते कॅन्‍सर क्लिनीक नागपूर येथे गैरअर्जदार क्रं. ४ यांचेकडे दि. ०७.०९.१२ रोजी स्‍वतःला उपचाराकरीता दाखला घेवून पुढील पंधरा दिवस पावेतो अर्जदाराला कर्करोगाचे रोगी म्‍हणून उपचार करण्‍यात आले.  अर्जदाराला पाच केमो थेरपी देण्‍यात आले. संपूर्ण उपचारात अर्जदाराचे एकूण ३,००,०००/- रु. खर्च झाले. तरी सुध्‍दा अर्जदाराचे डाव्‍या पायास कोणत्‍याही प्रकारची सुधारणा झाली नव्‍हती. सुमारे दोन महिण्‍याचे कालावधीत अर्जदाराचे दैनंदिन व्‍यापार ठप्‍प झाले व त्‍यांना शारिरीक व मानसिक, आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्‍यानंतर अर्जदार तामीळनाडू येथिल वेल्‍लोर येथिल तंञ व निष्‍णांत डॉ. चे रुग्‍णालय उपचारासाठी दाखल झाले. अर्जदाराचे शस्‍ञक्रिया संबंधीत व गैरअर्जदाराने दिलेला वैदकिय अहवाल तसेच अर्जदाराची संपूर्ण तपासणी करुन डॉक्‍टरांनी असे प्रमाणित केली कि, अर्जदाराला कोणताही स्‍वरुपातील कर्करोग नव्‍हते. तसेच दि. १.१.१३ चे एम आर रिपोर्ट मध्‍ये स्‍पष्‍ट झाले कि,  अर्जदाराची गैरअर्जदार क्रं. २ यांनी दि. ०८.०८.१२ रोजी गाठीवर शस्‍ञक्रिया करतांना ६ से. मी पायाची मुख्‍य नस कापल्‍यामुळे पूर्ण निकामी झाले त्‍याकरीता मोठे ऑपरेशन करणे आवश्‍यक आहे. अर्जदाराने नागपूर येथिल मेडीटीना इंस्‍टीटयुट ऑफ मेडिकल सायन्‍स या रुग्‍णालयात जावून  येथिल तज्ञ डॉ. समीर पालथेवार व डॉ. निलेश अग्रवाल न्‍युरोसर्जन कडून तपासण्‍या व चाचण्‍या करुन अर्जदाराला कुठल्‍याही स्‍वरुपाचा कर्करोग नसल्‍याची खाञी केली. परंतु दि. ०४.०२.१२ रोजीचे एम. आर. रिपोर्टमध्‍ये पूवीच्‍या केलेल्‍या ऑपरेशनमध्‍ये डाव्‍या पायाच्‍या मुख्‍य नस ६ से. मी. कापल्‍यामुळे पाय सडण्‍याची स्थिती निकामी झाले होते व त्‍याकरीता मोठे ऑपरेशन करणे आवश्‍यक होते. डॉ. समीर पालथेवार यांनीडॉ. गिरीश देशपांडे यांचे मार्फत डाव्‍या पायाचे एम. आर. रिपोर्ट दि. ०३.०२.१३ रोजी केले त्‍यामध्‍येही सुध्‍दा डाव्‍या पायाची मुख्‍य नस दिसून येत नाही व त्‍यामुळे डावा पाय निकामी होण्‍याचे मार्गावर आहे. त्‍यावर जर शस्‍ञक्रिया झाली नाही तर डावा पाय पूर्णतः कापावे लागेल असे सांगितले होते. सबब मेडीसीन इन्‍स्‍टीटयुट मधील डॉक्‍टरांनी दि. ०४.०२.१३ रोजी पर्यंत संपूर्ण चाचण्‍या घेवून दि. ०५.०२.१३ रोजी संपूर्ण तंज्ञ डॉक्‍टरांना बोलावून अर्जदाराच्‍या डाव्‍या पायाची शस्‍ञक्रिया केली त्‍यावर अर्जदाराला ३,७५,०००/- रु. खर्च करावे लागले. गैरअर्जदार क्रं. १ ते ४ यांनी अर्जदाराला दिलेल्‍या वैदयकिय निष्‍काळजीमुळे अर्जदाराला जवळपास १८,३०,०००/- पर्यंतचा खर्च नुकसानीस वैयक्तिकपणे सहन करावे लागले. तसेच अर्जदाराला कायमचे अपंगत्‍व निर्माण झाले. गैरअर्जदार क्रं. १ ते ४ यांनी सुमारे ८ ते १० महिण्‍याच्‍या दिर्घ कालावधीत कर्करोगा सारखे गंभीर आजार झाल्‍याची नाहक माहीती दिल्‍याने अर्जदाराला मानसिक, शारिरीक व मोठया प्रमाणत आर्थिक ञास सहन करावा लागला त्‍यामुळे अर्जदाराने दि. २९.०५.१३ रोजी सदर नुकसानीची भरपाई करीता गैरअर्जदार क्रं. १ ते ४ यांना वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठविला. गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी सदर नोटीसाचे उत्‍तर दिले व गैरअर्जदार क्रं. ३ व ४यांनी सदर नोटीस प्राप्‍त होवून सुध्‍दा त्‍यांची काहीही उत्‍तर पाठविले नाही व मागणी प्रमाणे रक्‍कमही परत केली नाही. सबब सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्‍यात आली.

२.    अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्रं. १ ते ४ यांनी अर्जदाराला झालेल्‍या आर्थिक तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रु. १८,३०,०००/- गैरअर्जदाराकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावे.

 

३.    अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार क्रं. १ ते ४ विरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदार क्रं. १ ते ४ हजर होवून गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी नि. क्रं. १५ वर आपले लेखीउत्‍तर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी आपल्‍या लेखीउत्‍तरात असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार क्रं. २ यांना गैरअर्जदार क्रं. १ ने वैदयकिय शल्‍यचिकित्‍सक म्‍हणून त्‍यांचे दवाखाण्‍यात नियुक्‍त केले आहे. अर्जदाराने गाठीची तपासणी नागपूर येथिल एका दवाखाण्‍यातुन सोनोग्राफी करुन घेतली होती व त्‍या डॉक्‍टरांनी अर्जदारास शस्‍ञक्रिया करुन गाठ काढावी लागेल अशी सल्‍ला दिली होती. सदर गाठ अर्जदाराला १५ ते २० वर्षापासून जुनी व मोठी होती. सदर गाठ काढतांना आसपासचा भाग काढावा लागु शकतो असे अर्जदाराला व त्‍यांचे कुटुंबाला माहीती देण्‍यात आली होती. अर्जदाराचे शस्‍ञक्रियेचा निर्णय घेतल्‍या शस्‍ञक्रियेची तारीख दि. ०७.०८.१२ ला देण्‍यात आली होती परंतु अर्जदार यांनी खर्रा व पान सारखे मादक पदार्थ खावून असल्‍याने डॉक्‍टरांना शस्‍ञक्रिया करणे शक्‍य नसल्‍याने दुस-या दिवशी शस्‍ञक्रिया करता अर्जदाराला बोलविण्‍यात आले. गैरअर्जदार क्रं. २ यांनी अर्जदाराची शस्‍ञक्रिया करतेवेळी असे लक्षात आले कि, सदर गाठ कॅन्‍सर ची असल्‍याने व आसपासच्‍या भागामध्‍ये पसरले असल्‍याचे लक्षात आले. त्‍यात आसपासची धमणी व नस हे देखिल गाठीत अडकून खराब झाल्‍याचे दिसून आाले. त्‍यानुसार शस्‍ञक्रिया दरम्‍यान अर्जदाराचे नातेवाईकाना या गोष्‍टीची कल्‍पना देण्‍यात आली व त्‍यानंतरच गाठ व आसपासचा भाग कॅन्‍सरग्रस्‍त झाल्‍याने अर्जदाराचा जिवाचा धोका टाळण्‍यासाठी शस्‍ञक्रिया करण्‍यात आली जेणे करुन गाठीची कोणताही भाग शिल्‍लक राहु नये म्‍हणून अर्जदाराच्‍या जिवाला धोका होवू नये. सदर बाब खाञी करण्‍याकरीता सदर गाठ गैरअर्जदार क्रं. ३ कडे तपासणी करीता पाठविण्‍यात आली.  गैरअर्जदार क्रं. ३ चा अहवालावरुन सदर गाठ कॅन्‍सरची असल्‍याने निदाणात आले. अर्जदाराने सदर अहवाल गैरअर्जदार क्रं. ३ खोटे सांगून परस्‍पर घेवून गेले होते. त्‍यावर गैरअर्जदार क्रं. २ ची वैदयकिय सल्‍ला घेण्‍यात आली नव्‍हती. अर्जदाराने दस्‍त्‍ क्र अ- ६ वर असे दिसून येते कि, अर्जदाराने डॉ. लडूकर यांचे सल्‍लावरुन गैरअर्जदार क्रं. ४ कडे केमो थेरेपीचा उपचार करुन घेतल्‍याचे दिसून येते.  गैरअर्जदार क्रं. २ ने अर्जदारास शस्‍ञक्रिये काळापर्यंत विश्रांती करण्‍याची सल्‍ला दिली होती परंतु ती अर्जदाराने  ती पाळली नाही. गैरअर्जदार क्रं. ३ यांचा तपासणी अहवाल व अर्जदाराने वेल्‍लोर येथिल दवाखाण्‍यात केलेली तपासणी अहवाल साम्‍य आहे. फक्‍त दोन्‍ही अहवालात शब्‍द मांडणी वेगळी आहे. गैरअर्जदार क्रं.  ३ यांचे अहवालात   “ Atyapical Lipoma favors well differentied iliposorcoma” असे नमुद केलेले आहे व वेल्‍लोर येथिल तपासणी अहवालात “ Atypical Lipomatous tumer cannot be ruled out” असे सांगितले आहे. याचा अर्थ अर्जदाराला दोन्‍ही अहवालानुसार टयुमर (गाठीचे) निदाण “ Atypical Lipomatous tumer” असे आहे. अर्जदाराने दाखल केलेल्‍या वेल्‍लोर येथिल रेडियोथेरेपीचा सल्‍ला दिला होता याचा अर्थ अर्जदारास कॅन्‍सर होता कारण तज्ञ डॉक्‍टर पेशंटला कॅन्‍सर असल्‍याने किमो थेरेपी किंवा रेडियोथेरेपी घेण्‍यास सल्‍ला देत आहे.  

 

४.    गैरअर्जदार क्रं.  १ व २ यांनी पुढे असे कथन केले आहे कि, जर शस्‍ञक्रियेवेळी गैरअर्जदार क्रं.  २ ने गाठीमधील अंतर्भुत झालेली नस कापली नसती तर त्‍या गाठीत व नसेत अंतर्भुत पसरलेला कॅन्‍सर हा अर्जदाराच्‍या शरीरातील इतर भागात पसरुन अर्जदाराचे जिवास धोका झाला असता. मेडीकल सायन्‍स मधील सिध्‍दांताप्रमाणे “ Life over limb” म्‍हणणे पेशंटचा एखादा अव्‍यवय पेक्षा पेशंटचा जिव वाचविणे याला जास्‍त महत्‍व दिले आहे. त्‍या सिध्‍दांताची गैरअर्जदार क्रं. २ यांनी पालना केली असून गैरअर्जदार क्रं.  २ ने कोणत्‍याची प्रकारची वैदयकिय निष्‍काळजी पणा अर्जदाराप्रति केला नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं.  २ ने शस्‍ञक्रिया केल्‍यानंतर औषधोपचार घेतला नाही व परस्‍पर Histo pathology examination report घेवून गेला व दुस-या डॉक्‍टरच्‍या सल्‍लयावर कॅन्‍सर आजारावर किमो थेरेपी सुध्‍दा करुन घेतली. गैरअर्जदार क्रं.  १ व २ यांनी अर्जदाराचे नोटीसाचे उत्‍तर दिले आहे. अर्जदाराने अर्जात जास्‍तीची  नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून अवाजवी व बनावटी खर्च व उत्‍पन्‍न दाखविले आहे. गैरअर्जदाराने शस्‍ञक्रियेकरीता अर्जदाराकडुन एकूण १२,६००/- रु. घेतली आहे. त्‍यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रं.  १ व २ वर अविश्‍वास दाखवून इंतराचे चुकीचे सल्‍लावर स्‍वतःवर उपचार करवून घेतला. अर्जदाराने सदर तक्रारीत डॉ. लाडूकर यांना विरोधी पक्ष म्‍हणून न जोडल्‍याने, सदर तक्रार आवश्‍यक पक्ष न जोडल्‍याने खारीज होण्‍यास पाञ आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं.  १ व २ चे विरोधात तक्रारीत केलेले कथन खोटे असून गैरअर्जदार क्रं.  १ व २ यांना नाकबुल आहे. त्‍यामुळे अर्जदाराचा सदर अर्ज खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे.

 

५.    गैरअर्जदार क्रं.  ३ व ४ यांनी नि. क्रं. १४ वर त्‍यांचे लेखीबयाण दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रं.  ३ व ४ यांनी आपल्‍या लेखीबयाणात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदार क्रं.  ३ व ४ विरुध्‍द लावलेले आरोप खोटे असून ते नाकबुल केले आहे. अर्जदाराचे गाठीचे निदान शल्‍यचिकित्‍सेची प्रक्रिया गैरअर्जदार क्रं.  १ व २ यांनी पार पाडली होती. त्‍यामुळे गैरअर्जदार क्रं.  ३ व ४ यांनी तक्रारीत परि. क्रं. ४ व ५ मधील मजकुराबाबत भाष्‍य करणे संयुक्तिक नाही. परंतु गाठ काढणे ही बाब आवश्‍यक होती व गाठ मोठी पण होती. त्‍यामुळे त्‍या गाठीचे मधूनच ‘’ लेफट सायाटिक नर्व्‍ह’’ अंतभर्फत असल्‍यास सदर नर्व्‍ह कापली जाणे नैसर्गिक होते. त्‍यामुळे डावा पाय निकामी आणि अकार्यक्षम होण्‍याचा मार्गावर होण्‍याचा हा आरोप अर्जदाराचा चुकीचा आहे. गैरअर्जदार क्रं.  २ यांनी सदर गाठ तपासणी साठी व अहवाल सादर करण्‍यासाठी गैरअर्जदार क्रं.  ३ कडे पाठविली होती सदर गाठीचे अनेक नमुने तयार करुन त्‍यांचा योग्‍य त्‍या स्‍लाईडस तयार करुन गाठीमधील पेशीच्‍या अभ्‍यास करुन गैरअर्जदार क्रं.  ३ यांनी दि. १०.०८.१२ चा अहवाल प्रदान केला होता. कर्करोगाच्‍या निदानाबद्दल विस्‍तृत करणे आवश्‍यक होते.  कर्करोगाबद्दल आवश्‍यक ते बदल पेशीमध्‍ये दिसून असल्‍यास तज्ञांची ही जबाबदारी आहे कि, त्‍यानुसार पुढील आवश्‍यक चाचण्‍या करण्‍याबाबत सल्‍ला देणे ( Pinking the Patient on risk), सदर अहवालात “ Atypical Lipoma Favours well differentiated Lyposareoma” असे निदान दर्शविलेले होते. कारण त्‍या प्रकारचे सर्व बदल पेशीमध्‍ये आलेले होते. त्‍याप्रमाणे गैरअर्जदार क्रं.  ३ यांनी पुढील चाचणी “ immunohisto Chemistry “  करण्‍याचा सल्‍ला पण अहवालात दिला होता जेणे करुन निदानाची खाञी करता आली असती. अर्जदार यांनी सदर चाचणी केली नाही. गैरअर्जदार क्रं.  ३ यांनी दिलेला अहवाल हा योग्‍य व वस्‍तुनिष्‍ठ अहवाल होता. गैरअर्जदार क्रं.  ३ यांनी सदर चाचणीसाठी फक्‍त ८००/- रु. फि घेतली होती. वेल्‍लोर येथिल तज्ञ व्‍यक्‍तीचा अहवाल गैरअर्जदार क्रं.  ३ चा तंतोतंत अहवाल समान आहे फक्‍त शब्‍दांची मांडणी वेगळी आहे. गैरअर्जदार क्रं.  ३ यांचे अहवाल “ Atypical Lipoma Favours well differentiated Lyposareoma” आणि वेल्‍लोरचा अहवाल  “ Atypical Lipomatous tumer cannot be ruled out” त्‍यामुळे दोन्‍ही अहवालात टयुमर (गाठीचे) निदान “ Atypical Lipomatous tumer” असे आहे. तसेच वेल्‍लोर येथिल तंज्ञानी रेडियोथेरेपीचा पण सल्‍ला दिला होता. अनेक तंज्ञ कर्करोग अहवाला मध्‍ये “ Well differentiated Liposarcoma “  असा उल्‍लेख असतो व काही ठिकाणी त्‍याबद्दल “ Atypical Lipomatous tumer’ असा  केला असतो. सदर नर्व्‍ह जर गाठीमध्‍ये अंतर्भुत असेल तर गाठ काढतांना तेवढयापुरती ( गाठीच्‍या लांबी पुरती)  कापली जाणे नैसर्गिक आहे व ती नस पुर्नस्‍थापीत करण्‍याची शस्‍ञक्रिया साधी व सोपी आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं.  ३ व ४ यांना पाठविलेले नोटीसचे उत्‍तर गैरअर्जदार क्रं.  ३ व ४ यांनी दि. ०७.०७.१३ रोजी वकीलांचे मार्फत पाठविले होते. गैरअर्जदार क्रं.  ३ व ४ यांनी कोणताही निष्‍काळजीपणा व सेवेमध्‍ये कुठलीही ञुटी केली नसल्‍यामुळे सदर तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी मागणी करण्‍यात आली आहे.

 

६.    अर्जदाराचा अर्ज, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्‍तीवाद तसेच गैरअर्जदार क्रं. १ ते ४ चे लेखीउत्‍तर, दस्‍ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्‍तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.

 

           

मुद्दे                                               निष्‍कर्ष

 

१)   अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?                       होय      

२)   गैरअर्जदार क्रं. २ ने अर्जदाराचे शस्‍ञक्रिया

    निष्‍काळजीपणे केली होती का ?                                      नाही.                                                              

 

३) गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणतीही निष्‍काळजीपणा

    किंवा  सेवेते ञुटी दिली आहे का ?                           नाही.

४) आदेश काय ?                                    अंतीम आदेशा प्रमाणे. 

 कारण मिमांसा

मुद्दा क्रं. १ बाबत ः- 

७.    अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. १ चे हॉस्‍पीटल मध्‍ये डाव्‍या पायाचे मांडीला गाठ असल्‍यामुळे गैरअर्जदार क्रं. २ चे कडे चाचणी तपासणी केली व त्‍या उपरांत दि. ०८.०८.१२ रोजी गैरअर्जदार क्रं.२ ने अर्जदाराचे डाव्‍या पायाचे गाठीवर शस्‍ञक्रिया केली. सदर गाठ गैरअर्जदार क्रं. २ ने काढून गैरअर्जदार क्रं. ३ कडे तपासणी अहवालाकरीता पाठविले. गैरअर्जदार क्रं. ३ ने त्‍यावर दि. १०.०८.१२ ला अहवाल पाठविला. त्‍या अहवालाच्‍या अनुषंगाने गैरअर्जदार क्रं. ४ ने अर्जदाराचे उपचार केले ही बाब अर्जदार व गैरअर्जदार क्रं. १ ते ४ यांना मान्‍य असून अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. १ ते ४ चा ग्राहक आहे असे सिध्‍द होत आहे. सबब मुद्दा क्रं. १ चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 मुद्दा क्रं. २ बाबत ः- 

८.    अर्जदाराने गैरअर्जदार क्रं.  २ कडे अर्जदाराचे डाव्‍या पायाचे मांडीत गाठ असल्‍यामुळे चाचणी व तपासणी करीता गेले सदर तपासणी केल्‍या उपरांत दि. ०८.०८.१२ गैरअर्जदार क्रं. २ ने अर्जदाराचे डाव्‍या पायाचे गाठीवर शस्‍ञक्रिया केली. सदर शस्‍ञक्रिया करतेवेळी डाव्‍या पायामध्‍ये असलेली मुख्‍य नस ६ से. मी. पर्यंत कापण्‍यात आली होती ही बाब अर्जदार गैरअर्जदार क्रं.२ यांना मान्‍य आहे. परंतु गैरअर्जदार क्रं. २ नी सदर शस्‍ञक्रिया करतेवेळी निष्‍काळजीपणे मुख्‍य नस ६ से.मी. पर्यंत कापली यासंदर्भात अर्जदाराने कोणतेही तंञविशेतज्ञ चे साक्षिपुरावा मंचासमक्ष सादर केलेले नाही.

मा. राष्‍ट्रीय आयोग यांनी दिलेले न्‍यायनिर्णयाचा

  1. 2012 NCJ 809 (NC)

Minor Harsh Amit Kumar Sheth & Ors. Vs. Sheth Hospital and maternity Home & Ors. Deceided on 19/9/2012.

Mere oral allegation, a medical negligence cannot be proved- It is duty of complainant to prove his case with pregnant evidence.

२) 2013 NCJ 361 (NC)

      Orthonova Instituteof Advanced Surgery & Research T.C.M.L House   

      Vs. Nreipendra Kumar Thakur. Decided on 1/03/2013

      Medical negligence could be considered on the basis of sufficient

      ground. 

अर्जदार सदर प्रकरणत हे सिध्‍द करु शकले नाही कि, अर्जदाराची डाव्‍या पायामधील गाठीची शस्‍ञक्रिया करतेवेळी पायाची मुख्‍य नस काढणे आवश्‍यक नव्‍हते. याउलट गैरअर्जदार क्रं. २ ने त्‍यांच्‍या लेखीबयाणात असे स्‍पष्‍टीकरण दिले कि, ‘’ जर शस्‍ञक्रियेवेळी गैरअर्जदार क्रं.  २ ने गाठीमधील अंतर्भुत झालेली नस कापली नसती तर त्‍या गाठीत व नसेत अंतर्भुत पसरलेला कॅन्‍सर हा अर्जदाराच्‍या शरीरातील इतर भागात पसरुन अर्जदाराचे जिवास धोका झाला असता. मेडीकल सायन्‍स मधील सिध्‍दांताप्रमाणे “ Life over limb” म्हणणे पेशंटचा एखादा अवयवा पेक्षा पेशंटचा जिव वाचविणे याला जास्‍त महत्‍व दिले आहे. त्‍या सिध्‍दांताची गैरअर्जदार क्रं. २ यांनी पालना केली असून गैरअर्जदार क्रं.  २ ने कोणत्‍याची प्रकारची वैदयकिय निष्‍काळजी पणा अर्जदाराप्रति केला नाही.’’ मंचाच्‍या मताप्रमाणे गैरअर्जदार क्रं. २ शस्‍ञक्रिया करतेवेळी अर्जदाराचे जिवाचा बचावाच्‍या दृष्टिने सदर नस कापली आहे व अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 चा निष्‍काळजी पणा ठोस साक्षिपुरावा व तंज्ञ विशेतंज्ञ साक्षिपुरावा मंचासमक्ष सादर न केल्‍यास तसेच वरील नमुद असलेल्‍या न्‍यायनिर्णयाच्‍या आधारे असे सिध्‍द होते कि, गैरअर्जदार क्रं. २ ने अर्जदाराची शस्‍ञक्रिया करतेवेळी कोणतेही निष्‍काळजी पणा केली नाही सबब मुद्दा क्रं. २ चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 मुद्दा क्रं. ३ बाबत ः- 

९.    गैरअर्जदार क्रं. ३ चे अहवालात असे आले कि, अर्जदाराला “ Atypical Lipoma Favours well differentiated Lyposareoma” असे निदान दर्शविलेले होते. आणि वेल्‍लोरचा अहवाल          “ Atypical Lipomatous tumer cannot be ruled out” त्‍यामुळे दोन्‍ही अहवालात टयुमर (गाठीचे) निदान “ Atypical Lipomatous tumer” असे आहे. तसेच वेल्‍लोर येथे डॉ. अब्राहम सुमेल यांनी दिलेले अहवाल रिपोर्ट मधील ‘’ DISCUSSION:- In view of the clinical and radiological findings, the patient was advised to have resection of residual tumour and if the pathology report revealed high grade tumour, then he was advised for Radiation therapy and nerve repair. We have explained about the procedures, costs, risks and benefits to the patient and his relatives. ‘’ यावरुन असे सिध्‍द होत आहे कि, अर्जदाराला टयुमर होता व त्‍याकरीता त्‍या रेडिशन थेरेपी व नर्व्‍ह सुधारीत करण्‍याबाबत सल्‍ला देण्‍यात आले होते. सबब  गैरअर्जदार क्रं. ३ ने दिलेला अहवाल व वेल्‍लोर येथिल डॉक्‍टरांनी दिलेला अहवाल, मध्‍ये साम्‍यपणा दिसून येते. तसेच मुद्दा क्रं. २ चे विवेचनावरुन गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी कोणतेही शस्‍ञक्रियामध्‍ये निष्‍काळजीपणा केला नाही, गैरअर्जदार क्रं. ३ चे अहवाल वेल्‍लोर येथिल डॉक्‍टरांचे अहवाल साम्‍य असून व त्‍या आधाराने गैरअर्जदार क्रं. ४ ने अर्जदाराचे उपचार केले म्‍हणून मंचाचे असे मत व असे सिध्‍द झाले आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति कोणतीही निष्‍काळजीपणा व सेवेत ञुटी दिली नाही. सबब मुद्दा क्रं. 3 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 मुद्दा क्रं. ४ बाबत ः- 

१०.   मुद्दा क्रं. १ ते ३ च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

अंतीम आदेश

           १) अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

           २) उभयपक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.

           ३) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी.

      

चंद्रपूर

दिनांक -   ०९/०४/२०१५

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kirti Gadgil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.