ग्राहक तक्रार अर्ज क्र.239/2011 ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.08/11/2011 अंतीम आदेश दि.12/03/2012 नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक 1) श्रीमती साधना शरद निकम, तक्रारदार 2) कु.श्रुती शरद निकम, (अँड.एस.ए.चोरडीया) रा.ए-5 फ्लॅट क्र.5, रथचक्र हौसिंग सोसायटी, इंदिरा नगर, नाशिक. विरुध्द वरीष्ठ प्रबंधक, सामनेवाले भारतीय जीवन विमा निगम, (अँड.यु.पी.कुलकर्णी) जीवन प्रकाश, गडकरी चौक, गोल्फ क्लब, नाशिक. (मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवालेकडून रक्कम रु.4,96,800/-मिळावी, व त्यावर दि.01/03/2011 पासून रक्कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे.18%व्याज मिळावे, मानसिक त्रासाबाबत रु.50,000/- व या अर्जाचा खर्च रक्कम रु.20,000/- मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाले यांनी पान क्र.15 लगत लेखी म्हणणे व पान क्र.16 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः मुद्देः 1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय?- होय 2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?- नाही 3. अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवालेविरुध्द नामंजूर करणेत येत आहे. तक्रार क्र.239/2011 विवेचनः याकामी अर्जदार यांचेतर्फे अँड.एस.ए.चोरडीया यांनी युक्तीवाद केलेला आहे. तसेच सामनेवाला यांचे वतीने अँड.यु.पी.कुलकर्णी यांनी युक्तीवाद केलेला आहे. अर्जदार यांना सामनेवाले यांनी विमा पॉलिसी दिलेली आहे ही बाब सामनेवाले यांनी त्यांचें लेखी म्हणणे कलम 3 मध्ये मान्य केलेले आहे. अर्जदार यांनी पान क्र.5 व पान क्र.6 लगत सर्टिफिकेट कम विमा पॉलिसी दाखल केलेली आहे. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व पान क्र.5 व पान क्र.6 लगतचे विमा पॉलिसी याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “मयत श्री.शामराव रामराव निकम यांनी त्रैमासिक पध्दतीने विम्याचा हप्ता ते भरतील असे मान्य व कबूल केल्याने त्याप्रमाणे पॉलिसी देण्यात आली. मयत श्री शामराव निकम यांनी फक्त एक वर्षे नऊ महिने एवढया कालावधीकरीताच विमा पॉलिसीचे हप्ते भरलेले आहेत. मयताच्या पॉलिसीचा हप्ता दि.26/11/2011 व दि.27/11/2011 रोजी देय झालेला होता. परंतु मयताने सदर हप्ता त्या तारखेस भरला नाही. पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तारखेच्या दिवशी अथवा त्यापुर्वी हप्ता न भरल्यास सदर हप्ता भरण्यास एक महिना जादा कालावधी (ग्रेस पिरीयड) देण्यात येतो. प्रस्तुत केसमध्ये मयतास प्रथम पॉलिसी करीता दिनांक 25/12/2010 एवढा जादा कालावधी उपलब्ध होता. परंतु मयत श्री. शामराव निकम यांनी विम्याची रक्कम न भरल्याने पॉलिसीच्या अटी शर्ती नुसार त्यांनी घेतलेल्या पॉलिसी हया लॅप्स झालेल्या आहेत. मयताचा मृत्यु हा दिनांक 29/12/2010 रोजी झालेला आहे. मयताच्या पॉलिसीमधील अटी व शर्तीमधील अट क्र.2 मध्ये “2. Grace period-A grace period of one month, but not less than 30 days will be allowed for payment or yearly half yearly or quarterly premium-if a premium that has become due is not paid before the expiry of days of grace, the policy lapses. ” असे नमूद आहे. सामनेवाला यांनी पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसारच अर्जदाराचा क्लेम नामंजूर केलेला आहे. सामनेवाला यांचे सेवेत कोणतीही न्युनता नव्हती व नाही. अर्जदाराचा अर्ज रद्द करावा.” असे म्हटलेले आहे. पॉलिसीचा हप्ता भरण्याचे राहून गेलेले होते ही बाब युक्तीवादाचे वेळी अर्जदार यांनी मान्य केलेली आहे. तसेच तक्रार अर्ज कलम 2 व 3 मध्येही “रस्त्यातच अपघात झाल्यामुळे रक्कम मुदतीत भरता आली नाही तसेच मयत शरद निकम यांचेतर्फे दिनांक 27/12/2010 व दिनांक 26/12/2010 पुर्वी हप्ता भरणे आवश्यक तक्रार क्र.239/2011 होते परंतु दिनांक 29/12/2010 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे हप्ता भरता आला नाही. ”ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांचे तक्रार अर्ज कलम 2 व 3 मधील कथन तसेच सामेनवाला यांचे लेखी म्हणण्यामधील कथन याचा विचार होता मयत शरद शामराव निकम यांचे विमा पॉलिसीबाबत एक महिन्यानंतरही म्हणजे ग्रेस पिरीयडनंतरही विमापॉलिसीचा हप्ता भरलेला नाही व त्यामुळेच पॉलिसीस लॅप्स झालेली आहे. व सामनेवाला यांनी पॉलिसी लॅप्स झाल्यामुळे विमापॉलिसीच्या अटी व शर्तीनुसारच योग्य तीच कार्यवाही केलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोटाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे. 1(2012) सिपीजे महाराष्ट्र राज्य आयोग पान 197 भारतीय जिवन विमा निगम विरुध्द रामचंद्र आबा गावडे अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेले व वर उल्लेख् केलेले वरीष्ट कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. (आर.एस. पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी) अध्यक्ष सदस्या ठिकाणः- नाशिक. दिनांकः-12/03/2012 |