निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 02/07/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 05/03/2012
तक्रार निकाल दिनांकः-07/05/2014
कालावधी 1 वर्ष 10 महिने 5 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री प्रदीप निटुरकर, B.Com.LL.B.
सदस्या - सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
1 अWड.सुनिल पि.शरदराव सावरगांवकर अर्जदार
वय 38 वर्षे, धंदा वकिली, अWड.एस.एस.देशपांडे
रा.गव्हाणे चौक, परभणी, (अर्जदार क्र.1 व 2 करिता)
ता.जि.परभणी.
2 अविनाश पि.विजयराव सावरगांवकर
वय 34 वर्षे, धंदा नोकरी,
रा.वकील कॉलनी, गंगाखेड,
ता.गंगाखेड, जि.परभणी.
विरुध्द
1 प्रबंधक, गैरअर्जदार
पुर्व तट रेल्वे विभाग, अWड.ए.जी.सोनी
मुख्य वि भागीय कार्यालय, भुवनेश्वर (गै.अ.क्र.1 ते 3 करिता)
ता.जि.भुवनेश्वर
2 विभागीय प्रादेशिक प्रबंधक,
पुर्व तट रेल्वे विभाग, प्रबंधक कार्यालय,
खुर्दा रोड, खुर्दा (ओरीसा)
3 अधिक्षक,
पुर्व तट रेल्वे विभाग, प्रबंधक कार्यालय,
खुर्दा रोड, खुर्दा (ओरीसा)
4 प्रबंधक, स्वतः
दक्षिण मध्य रेल्वे विभाग, विभागीय कार्यालय,
सिकंद्राबाद (आंध्र प्रदेश)
5 प्रबंधक स्वतः
दक्षिण मध्य रेल्वे विभाग,
विभागीय कार्यालय परभणी,
ता.जि.परभणी (महाराष्ट्र)
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.प्रदीप निटुरकर, अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
(निकालपत्र पारित व्दारा – सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या)
गैरअर्जदार क्र.1 ते 5 यांनी ञुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
अर्जदार यांनी जगन्नाथपुरी या धार्मिक स्थळाला भेट देण्याकरिता दोन महिन्याआधी नियोजन केले होते. त्यासाठी त्यांनी केलेले आरक्षण खालीलप्रमाणे आहे.
01 | नांदेड ते खडकपूर | दि.21/05/2012 | 1545 कि.मी. |
02 | खडकपूर ते जगन्नाथपुरी | दि. 22/05/2012 | 384 कि.मी. |
03 | खुर्दा रोड ते सिकंद्राबाद | दि.25/05/2012 | 1125 कि.मी. |
04 | सिकंद्रबाद ते परभणी | दि.26/05/2012 | 331 कि.मी. |
वरील तिकीटांपैकी खुर्दा रोड ते सिकंद्राबाद हे तिकीट वेटींग लिस्ट क्र. 06व 07 प्रमाणे मिळाले होते. देवदर्शन संपवून अर्जदार नियोजीत दिवशी म्हणजे दिनांक 25.05.2012 रोजी खुर्दा रोड येथुन सिकंद्राबाद येथे जाण्यासाठी रेल्वे क्र.22849 एस.एच.एम.एस.सी. साप्ताहिक जलद गाडी संध्याकाळी 7.45 वा. खुर्दा रोड येथुन निघते. तिथे 5.00 वाजता रेल्वे स्टेशनवर पोहचले. चौकशीअंती त्यांना सदर रेल्वेसाठी त्यांना आरक्षण मिळाल्याचे समजले. सदर रेल्वेची नियोजीत वेळ निघुन गेली तरीही गैरअर्जदाराकडुन कोणतीही अनाउन्समेंट न झाल्यामुळे अर्जदारांनी चौकशी कार्यालयाकडे संपर्क साधला असता त्यांना गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडे संपर्क साधण्यासाठी सुचविण्यात आले. चौकशी केल्यानंतर सदर रेल्वेगाडी रद्द झाल्याची माहिती अर्जदारांना देण्यात आली. पुढील रेल्वेमध्ये आरक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी अर्जदारांनी गैरअर्जदाराकडे विनंती केली असता गैरअर्जदाराने सहकार्य करायचे नाकारले व अर्जदारांना अपमानास्पद वागणुक दिली. वास्तविक पाहता अर्जदारांनी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने एक महिना आधी रेल्वेचे आरक्षण केले होते. परंतु अर्जदारांना हावडा ते हैद्राबाद या रेल्वेमध्ये जनरल तिकिटांवर प्रवास करावा लागला. त्यासाठी त्यांना एकुण रुपये 380 /- ची वेगळी तिकीटे काढावी लागली व प्रवासादरम्यान खूप गैरसोय झाली मनस्तापास सामोरे जावे लागले म्हणुन अर्जदारांनी मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांनी मानसीक व शारीरीक नुकसानीबद्दल रक्कम रुपये 1,50,000/- द्यावेत. तसेच तिकीटाची रक्कम रुपये 1330/- दिनांक 17.04.2012 पासून सदर रक्कम मिळेपर्यंत 35 टक्के व्याजासह द्यावी व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रुपये 10,000/- मिळावेत अश्या मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपञ नि..2 वर व पुराव्यातील कागदपञे नि.4 वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदार क्र.1 ते 5 यांना तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी लेखी निवेदन नि.27 वर मंचासमोर दाखल केले.
त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराने शालीमार ते सिकंद्राबाद एक्सप्रेस या रेल्वे गाडीचे दिनांक 25.05.2012 रोजी आरक्षण केले होते. परंतु काही अपरीहार्य कारणास्तव सदरची रेल्वे गाडी व इतर अनेक रेल्वे गाडया दिनांक 25.05.2012 ते 27.05.2012 च्या कालावधीमध्ये रद्द करण्यात आल्या होत्या व या संदर्भातील माहिती प्रवाश्यांना सतत देण्यात येत होती. पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराकडे E-ticket असल्यामुळे रद्द झालेल्या रेल्वे गाडीच्या तिकीटांची पुर्ण रक्कम प्रवाशांना परत करण्यात येते. तसेच इतर रेल्वे गाडीने प्रवास केल्यास त्यांना आरक्षीत सीट उपलब्ध करुन देण्यासंदर्भात शाश्वती मिळणार नाही. सबब सदर प्रकरणात गैरअर्जदारांनी कोणतीही ञुटीची सेवा अर्जदारांना दिलेली नसल्यामुळे त्यांच्या विरुध्द अर्जदारांनी केलेली तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदार क्र.4 ते 5 यांनी नि.23 वर अर्ज देवुन त्यांना या प्रकरणातुन वगळण्याची विनंती मंचासमोर केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1 गैरअर्जदारांनी अर्जदारांना ञुटीची सेवा होय
दिल्याचे शाबीत झाले आहे काय ?
2 आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2 -
अर्जदारांनी जगन्नाथपुरी या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी रेल्वे गाडीचे आरक्षण केले होते. देवदर्शन संपवुन अर्जदार नियोजीत दिवशी म्हणजे दिनांक 25.05.2012 रोजी खुर्दा रोड येथुन सिकंद्राबाद येथे जाण्यासाठी संध्याकाळी 5.00 वाजता रेल्वे स्टेशनवर पोहचले. नियोजीत वेळ निघुन गेली तरीहीसदरच्या रेल्वेगाडी संदर्भात कोणतही अनाउंसमेंट न झाल्यामुळे त्यांनी गैरअर्जदारांकडे चौकशी केली असता सदरची रेल्वेगाडी रद्द झाल्याचे अर्जदारांना सांगण्यात आले. अर्जदारांना हावडा ते हैद्राबाद या रेल्वेगाडीने जनरल तिकीटांवर प्रवास करावा लागला. गैरअर्जदारांनी त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही अशी थोडक्यात अर्जदारांची तक्रार आहे. यावर गैरअर्जदारांचे म्हणणे असे की, काही अपरीहार्य कारणास्तव दिनांक 25.05.2012 ते दिनांक 27.05.2012 या दरम्यानच्या सर्व रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्या होत्या व या संदर्भातील माहिती प्रवाशांना सतत देण्यात येत होती. तसेच अर्जदारांकडे E-ticket असल्यामुळे जर संबंधीत रेल्वे गाडी रद्द झाली किंवा त्या तिकीटांवर प्रवास करता आला नाही तर तिकीटांची पुर्ण रक्कम मिळण्यास अर्जदार पाञ ठरतात म्हणुन अशा परिस्थितीमध्ये गैरअर्जदारांनी सेवाञुटी केली असे मानता येणार नाही. निर्णयासाठी महत्वाचा व एकमेव मुद्दा असा की, गैरअर्जदारांनी अपरिहार्य कारणास्तव सदरची रेल्वेगाडी रद्द झाली होती व याची सुचना सतत प्रवाशांना देण्यात आल्याचे मंचासमोर ठोसरित्या शाबीत केले आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल कारण गैरअर्जदारांनी दिनांक 25.05.2012 ते दिनांक 27.05.2012 दरम्यानच्या सर्व रेल्वेगाडया रद्द करण्यात आल्याचे व या संदर्भातील सुचना प्रवाशांना देण्यात आल्याचे लेखी निवेदनात कथन केले असले तरीही त्याच्या पृष्टयर्थ ठोस पुरावा व शपथपञ मंचासमोर दाखल केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदारांनी घेतलेला बचाव ग्राहय धरण्याजोगा नसल्याचे मंचाचे मत आहे. तसेच अर्जदारांकडे E-tickets असल्यामुळे व त्या तिकीटांवर जर अर्जदारांना प्रवास करता आला नाही तर त्या तिकीटांची रक्कम अर्जदारांना मिळाली असेलच त्यामुळे तिकीटांची रक्कम अर्जदारांना मंजूर करता येणार नाही. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात येतो.
2 गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी निकाल कळाल्यापासुन 30 दिवसांच्या आत वैयक्तीकरित्या वा संयुक्तीकरित्या सेवाञुटीपोटी प्रत्येकी रक्कम रुपये 300/- व मानसीक ञासापोटी प्रत्येकी रक्कम रुपये 300/- अर्जदारांना द्यावी.
3 दोन्ही पक्षांना निकालाच्या प्रती मोफत पुरावाव्यात
सौ.अनिता ओस्तवाल श्री.प्रदीप निटुरकर
सदस्या अध्यक्ष