तक्रार क्र. 84/2012 दाखल दि. 23.10.2012
आदेश दि. 09.09.2014
तक्रारकर्ती :- सौ. माया रमेश भगत,
वय 53 वर्षे, व्यवसाय—घरकाम
रा. द्वारा घनश्यामजी धोटे,
विनोबा नगर, तुमसर
ता.तुमसर, जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त,
भविष्य निधी भवन, तुकडोजी चौकाजवळ,
रघुजी नगर, नागपुर, ता.जि.नागपुर
2. क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त,
भविष्य निधी भवन,241 बांद्रा पुर्व,मुंबई
3. प्रबंधक,युनिव्हर्सल फेरो अलाइड एन्ड केमिकल लिमी.
मानिक नगर,तुमसर ता.तुमसर जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्ता व त्याचे वकील गैरहजर.
विरुध्द पक्ष प्रॉव्हिफंड फंड तर्फे प्रतिनीधी ए.बी.शरण
विरुध्द पक्ष 3 तर्फे अॅड.खत्री
( आदेश पारित द्वारा मा. सदस्या श्रीमती गीता रा.बडवाईक )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 09 सप्टेंबर 2014)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाच कलम 12 अन्वये विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे
तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष 3 यांच्या सेवेमध्ये Office Assistant and Operator या पदावर काम करीत होती. तिने दिनांक 19/8/2006 ला आपली नोकरी सोडली. विरुध्द पक्ष क्र. 3 हे तिच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंडच्या रकमेची मासिक कपात करुन फॅमीली प्रॉव्हिडंट फंड 1971 च्या योजनेत विरुध्द पक्ष नं.2 च्या खात्यात जमा करीत होते. तसेच विरुध्द पक्ष नं.1 हे प्रॉव्हिडंड फंड विषयक प्रशासकिय सेवा देवून त्याबद्दलचे कपातीच्या विवरणाचे निरीक्षण करीत होते. त्यानंतर फॅमीली प्रॉव्हिडंड फंड 1971 च्या Employees Pension Scheme 1995 ही योजना विरुध्द पक्ष नं.1 व 2 यांनी अंमलात आणली. त्या योजनेप्रमाणे विरुध्द पक्ष तक्रारकर्तीच्या मासिक पगारातून रक्कमेची कपात करीत होते व ती रक्कम प्रॉव्हिडंड फंड खात्यात जमा करीत होते. तक्रारकर्तीचा प्रॉव्हिडंड फंड सदस्यता क्रमांक MH/8663/985/ZM हा आहे. तक्रारकर्तीची जन्मतारीख 7/7/1959 ही असून तिने नोकरी सोडतांना 10 C Form भरुन विरुध्द पक्षाकडून Scheme Certificate मिळावे अशी विनंती केली होती. त्याअनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी Scheme Certificate दिले. या Scheme Certificate चा उपयोग तक्रारकर्तीस वयाचे 50 वर्षापर्यंत करता येवू शकतो. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडून प्राप्त झालेल्या Scheme Certificate च्या मुळ प्रती दिनांक 30/3/2010 ला नियोक्त्या मार्फत दिनांक 17/3/2010 रोजी भविष्य निधी कार्यालय, बांद्रा, विरुध्द पक्ष क्र. 2 कडे जमा केल्या. सदर सर्टिफिकेट जमा झाल्यानंतर 1 महिन्यात स्कीमचा लाभ तक्रारकर्तीला मिळणे आवश्यक होते. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस लाभ दिला नाही. या विरुध्द पक्षाच्या सेवेत त्रृटी असल्यामुळे तसेच विरुध्द पक्षाने निष्काळजीपणा केल्यामुळे तक्रारकर्तीने वारंवार पत्रव्यवहार केला. तसेच प्रत्यक्ष भेट घेवून विचारणा केली. तक्रारकर्तीला आजारपणासाठी रक्कमेची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी बाबत सदरची तक्रार मंचासमोर दाखल केली आहे.
तक्रारकर्तीने तक्रारीमध्ये Scheme Certificate चा लाभ दिनांक 17/3/2011 पासून मिळावा तसेच इतर फायदे व व्याज मिळावे व तक्रार दाखल करण्याचा खर्च तसेच विरुध्द पक्षाचा निष्काळजीपणा व दिरंगाई बाबत रुपये 25,000/- चा दंड करण्याची मागणी केली आहे.
3. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीसोबत दस्तऐवज तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक 9 ते 14 वर एकुण 9 दस्त दाखल केले आहेत.
4. तक्रारकर्तीची तक्रार दाखल करुन मंचाद्वारे विरुध्द पक्षास नोटीस पाठविण्यात आल्या. विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचे लेखी उत्तर व दस्त दाखल केले. विरुध्द पक्ष 3 यांनी लेखी उत्तर दाखल केले. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे म्हणणे आहे की त्यांना तक्रारकर्तीचा पेन्शन दावा दिनांक 3/5/2011 ला विरुध्द पक्ष 2 मार्फत प्राप्त झाला. परंतु सदर फॉर्म 10 D मध्ये तक्रारकर्तीने कॉलम 8 अ मध्ये पेन्शन सुरु होण्याची तारीख नमुद केली नाही. त्यामुळे तक्रारकर्तीचा Pension Claim दिनांक 3/5/2011 पासून मंजुर करण्यात आल्याबद्दल पत्र पाठविले. त्याचा नं. MH/BAN/110500002690 हा आहे.
विरुध्द पक्ष नं.1 व 2 यांचे कार्यालयात संपुर्ण कार्यालयाचे संगणकीकरणाची प्रक्रिया सुरु असल्यामुळे त्याबाबतची सुचना दिनांक 4/12/2010 च्या दै.लोकसत्ता मध्ये व प्रत्यक्ष कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावली. कार्याल्यामध्ये संगणकीकरणाचे काम Online सुरु असल्यामुळे कामाचा बोझा वाढल्यामुळे तक्रारकर्तीच्या पेन्शन दाव्याबाबत त्वरीत निर्णय घेतला नाही. ज्यामध्ये विरुध्द पक्ष क्र.1 यांनी जाणूनबुझून कोणतीही कृती केलेली नाही.
5. दिनांक 4/10/2012 ला तक्रारकर्तीचा Pension Claim म्हणजेच 10 D मुळ स्कीम प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे विरुध्द पक्ष 2 यांचे मार्फत प्राप्त झाल्यानंतर PPO Bearing No 93753 हा तयार करुन दिनांक 25/10/2012 ला Pension Section कडे तक्रारकर्त्याच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी पाठविला आणि तक्रारकर्तीची पेंन्शन दिनांक 3/5/2011 पासून सुरु करण्यात आली व आवश्यक सर्व कागदपत्रे स्टेट बॅंक ऑफ इंडिया, मुख्य शाखा येथे दिनांक 7/11/2012 ला पाठविण्यात आली. तक्रारकर्ती Monthly Member Pension of para 12(7) of Employees Pension Scheam 1995 नुसार लाभार्थी आहे. Which reads as Early pension a member if he so desire, may be allowed to draw an early pension from a date earlier than 58 years of age but not earlier than 50 years of age. In such cases, the amount of pension shall be reduced at the rate of four percent, for every year the age falls short of 58 years.
विरुध्द पक्षाने लेखी उत्तरासोबत तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक 39 ते 63 प्रमाणे दस्त दाखल केले आहेत. विरुध्द पक्ष 3 यांनी प्राथमिक आक्षेपासह लेखी उत्तर दाखल केले आहे. विरुध्द पक्ष 3 यांचे म्हणणे आहे की तक्रारकर्तीने तक्रार मुदतीत दाखल केली नाही. तक्रारकर्तीने खोटया तथ्यावर तक्रार दाखल केली आहे. विरुध्द पक्ष 3 यांना अनावश्यक रित्या सदर तक्रारीत गोवलेले आहे, त्यामुळे विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी. विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की तक्रारकर्तीने स्वतःहून दिनांक 19/8/2006 ला नोकरी सोडली व नोकरी सोडतांना संपुर्ण हिशोब विरुध्द पक्ष 3 यांनी पुर्ण केल्याने त्यांची कोणतीही जबाबदारी राहत नाही. प्रॉव्हिडंड फंड योजनेचा लाभ देणे हे विरुध्द पक्ष 3 च्या कार्यक्षेत्रात येत नाही. त्यामुळे त्यांचे सेवेत त्रृटी किंवा निष्काळजीपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष 3 यांच्यामध्ये फक्त मालक व नोकर हा संबंध होता जो दिनांक 19/8/2006 रोजी संपुष्टात आला. त्यांच्या मध्ये ग्राहक किंवा सेवा प्रदान करणे असा कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे तक्रार मंचासमोर चालविण्यास पात्र नाही. तक्रारकर्तीने तक्रारीमध्ये दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता हे स्पष्ट होते की तक्रारकर्तीला निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळत आहे व खोटया तत्वावर आधारित खोटी तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द दाखल करुन मा.न्यायमंचाची दिशाभुल करुन गैरकायदेशीर पध्दतीने नुकसान भरपाई घेण्याच्या उद्देशाने कलम 26 अन्वये सदरहू तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती केली आहे.
6. तक्रारकर्तीची तक्रार, दस्त, विरुध्द पक्षाचे लेखी उत्तर व दस्त यांचे अवलोकन करता मंचासमोर खालील प्रश्न उपस्थित होतो.
- तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का?– नाही
कारण मिमांसा
7. तक्रारकर्तीने सदर तक्रार दिनांक 24/9/2012 ला दाखल केली. विरुध्द पक्षाने लेखी उत्तर दाखल केल्यानंतर दिनांक 8/3/2013 पासून तक्रारकर्ती व तिचे वकील प्रत्येक तारखेला गैरहजर होते. तसेच तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष 3 यांनी दाखल केलेल्या लेखी उत्तराची प्रत देखील घेतली नाही. तक्रारकर्ती व तिच्या वकीलांच्या सततच्या गैरहजेरीवरुन मंचाने तक्रारकर्तीला उपस्थितीबाबत दिनांक 13/5/2014 ला नोटीस पाठविली. ती नोटीस तक्रारकर्तीला प्राप्त होऊन देखील तक्रारकर्ती गैरहजर राहिली. त्यामुळे मंचाने तक्रारकर्तीची तक्रार खारीज न करता तक्रारीमध्ये गुणवत्तेनुसार निकाल लावून तक्रार निकाली काढण्याचा निर्णय घेतला. विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी दाखल केलेल्या दस्तावरुन ही बाब स्पष्ट होते की तक्रारकर्तीला दिनांक 3/5/2011 पासून रुपये 908/- मासिक पेन्शन प्राप्त होत आहे.
तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष 3 कडे कार्यरत असतांना त्यांना पार्टी बनविले आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष 3 हे आवश्यक पार्टी आहेत, असे मंचाचे मत आहे. तसेच विरुध्द पक्ष नं.1 व 2 यांनी त्यांच्या सेवेमध्ये निष्काळजीपणा केलेला नाही, असे मंचाचे मत असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार निकाली काढण्यात येते.
तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीमध्ये स्कीम सर्टिफिकेट प्रमाणे पेंन्शन मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे व तक्रारकर्तीला स्कीम सर्टिफिकेट नुसार पेन्शन मिळत असल्यामुळे तक्रारीचा वाद संपुष्टात आला असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
करीता आदेश
अंतीम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.