(द्वारा- श्री.डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदाराकडून गाडी बदलून मिळावी यासाठी तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे. (2) त.क्र.34/10 थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने दि.27.03.2009 रोजी गैरअर्जदार क्र.3 कडून ओमनी गाडी खरेदी केली होती. गाडी घेतल्यानंतर 5 ते 6 दिवसांतच गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला व त्यामधून वाफा निघू लागल्या तसेच गाडी गरम होऊन बंद पडू लागली तसेच गाडीचे टायर नेहमी पंक्चर होऊ लागले म्हणून त्याने गैरअर्जदार क्र.3 कडे त्याबाबत तक्रार केली असता, सर्व्हीसींग नंतर गाडी ठीक होईल असे सांगण्यात आले. म्हणून त्याने गाडीची सर्व्हीसींग करुन घेतली परंतु त्यानंतरही गाडी पुर्वीप्रमाणेच त्रास देऊ लागली म्हणून त्याने दि.29.04.2009 रोजी गाडी वर्कशॉपला लावली. परंतु गैरअर्जदार क्र.1 च्या व्यवस्थापकाने त्याचा व त्याच्या वडिलांचा अपमान केला. त्यानंतर दि.02.05.2009 रोजी त्याने गैरअर्जदार क्र.1 यांना गाडी दुरुस्त करुन देण्याबाबत अर्ज दिला. त्यानंतर दि.05.05.2009 रोजी त्याने गाडीचा ताबा घेतला त्यावेळी गैरअर्जदारांना त्याच्या गाडीचे स्वीच बदलल्याचे दिसले. परंतु गाडीचे टयुब व टायर बदलले नव्हते आणि इंजिनमध्ये काहीही दुरुस्ती केली नाही. गैरअर्जदारांनी त्यास ना-दुरुस्त गाडी विक्री करुन फसवणूक केली व गाडी बदलून दिली नाही. अशा प्रकारे गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदारांनी ओमनी गाडी बदलून देण्याबाबत आदेश व्हावा व नुकसान भरपाई म्हणून रु.2,00,000/- देण्यात यावेत. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी तक्रारदाराला विक्री केलेल्या गाडीमध्ये कोणताही दोष नव्हता. तक्रारदाराची गाडी गरम होऊन बंद पडू लागली, गाडी विकत घेतल्यानंतर 5 – 6 दिवसांनी गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला व त्यामधून वाफा निघू लागल्या व गाडीचे टायर नेहमी पंक्चर होऊ लागले, हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. दि.05.05.2009 रोजी तक्रारदाराच्या सांगण्यावरुनच गाडीचे स्वीच बदलण्यात आले होते. त्यावेळी गाडीचे टायर व टयुबमध्ये दोष दिसून आला नाही किंवा इंजिनमध्ये देखील कोणताही दोष नव्हता म्हणून टायर टयुब बदलण्याची किंवा इंजिन दुरुस्त करण्याची आवश्यकता नव्हती. तक्रारदाराच्या गाडीत कोणताही दोष नसल्यामुळे गाडी बदलून देण्याची आवश्यकता नाही व तक्रारदाराची फसवणूक केलेली नसल्यामुळे ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुददे उपस्थित होतात. मुददे उत्तर 1) तक्रारदार हे सिध्द करु शकतो का की, (3) त.क्र.34/10 त्याने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेल्या “ओमनी” व्हॅनचे इंजिन सदोष होते ? नाही. 2) गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही. 3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुददा क्रमांकः- 1 व 2 – तक्रारदाराच्या वतीने त्याचे मुखत्यार श्री.जवाहरलाल जैन व गैरअर्जदारांच्या वतीने अड. अविनाश पाठक यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराने गैरअर्जदारांकडून खरेदी केलेल्या ओमनी कारच्या इंजिनमध्ये दोष होता हे सिध्द करण्यासाठी तक्रारदाराने कोणताही सबळ पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराने त्याच्या वाहनाची तज्ञामार्फत तपासणी करुन तज्ञाचे मत मंचासमोर सादर केलेले नाही, किंवा त्याने त्याच्या वाहनाची मंचामार्फत तपासणी करुन घेण्यासाठी त्याचे वाहन मंचासमोर सादर केले नाही. त्याचप्रमाणे त्याच्या गाडीच्या टायर व टयुबमध्ये दोष असल्याचे सिध्द करण्यास देखील तक्रारदार असमर्थ ठरला आहे. त्याने गाडीचे टायर व टयुब मंचासमोर सादर केले नाही. त्यामुळे टायर-टयुबची प्रयोगशाळेत तपासणी करणे शक्य झालेले नाही. तक्रारदाराने गाडी खरेदी केल्यानंतर 5 – 6 दिवसांतच गाडीचे इंजिन नादुरुस्त झाले व ते गरम होऊ लागले हे सिध्द करण्यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदारांनी नादुरुस्त गाडी विक्री करुन फसवणूक केली या आरोपात काहीही तथ्य उरत नाही. म्हणून मुददा क्र. 1 व 2 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा. 3) संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |