Maharashtra

Nagpur

CC/174/2015

Mrs. Reema Kuldeep Singh Rana - Complainant(s)

Versus

Regional Office Star Union Dai Ichi Life Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Pritesh Bansod

25 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/174/2015
( Date of Filing : 31 Mar 2015 )
 
1. Mrs. Reema Kuldeep Singh Rana
r/o T- 134,Basant Vihar Khadgaon Road Wadi Nagpur 440023
Nagpur
Maharastra
2. Ms. Radha Kuldeep Singh Rana
r/o T- 134,Basant Vihar Khadgaon Road Wadi Nagpur 440023
Nagpur
Maharastra
3. Mr. Sanjay Kuldeep Sing Rana
r/o T- 134,Basant Vihar Khadgaon Road Wadi Nagpur 440023
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Regional Office Star Union Dai Ichi Life Insurance Co. Ltd.
121/1 2nd floor, salasar Park 1, Giri Peth, Law College Sqr.,Nagpur 440010
Nagpur
Maharastra
2. Registered Office Star Union Dai Ichi Life Insurance Co. Ltd.
Star House, C-5, G Block, Bandra Kurla complex, Bandra East Mumbai 400051
Mumbai
Maharastra
3. Star Union Dai Ichi Life Insurance Co. Ltd.
11th floor, Vishwaroop I.T. Park, Vashi, Navi Mumbai 400703
Mumbai
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:Pritesh Bansod , Advocate
For the Opp. Party:
Dated : 25 Jun 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की,   तक्रारकर्ती क्रं. 1 ही विमाधारक स्‍व. कुलदिपसिंह राणा यांची पत्‍नी असून त.क. क्रं. 2 व 3 हे स्‍व. कुलदिपसिंह राणा यांची अल्‍पवयीन मुलगी व मुलगा आहे. तक्रारकर्ती क्रं. 1 चे पती स्‍व. कुलदिपसिंह राणा यांनी विमा कंपनी एजंट मार्फत खाली नमूद केल्‍याप्रमाणे विमा पॉलिसी काढलेली होती.  

Sr.No.

Name of Policy

Commu.date

Pre.Rs.

Policy No.

Maturity

Amount

  1.  

Sud.Life Suraksha Express

05.01.2012

15,000

 00431017

1,50,000/-

  1.  

Sud.Life Jeevan Sufar Plan

17.07.2012

49,856

 00510780

1,74,000/-

  1.  

Sud.Life Jeevan Sufar Plan

18.02.2013

9,994/-

 00606360

1,32,000/-

 

 

Total

 4,56,000/-

 

  1.      तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की,  तिचे पती स्‍व.कुलदिपसिंह राणा यांचे दि. 03.03.2013 ला हॉस्‍पीटलमध्‍ये उपचारा दरम्‍यान हृदयविकाराने निधन झाले. याबाबत तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष कंपनीला तात्‍काळ कळविले व विमा दावा मिळण्‍याकरिता दि. 05.04.2013 ला सादर केला. विरुध्‍द पक्ष कंपनीच्‍या  अधिका-यांनी तक्रारकर्तीच्‍या घरी चौकशी केली व त्‍याचा अहवाला सादर केल्‍यानंतर विमा मागणीबाबत कळविण्‍यात येईल असे सांगितले.  त्‍यानंतर दि. 08.07.2013 ला विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला पत्र पाठवून कळविले की, तिचा विमा दावा विमाधारकाने त्‍याच्‍या प्रकृतीबाबत माहिती लपवून ठेवल्‍याच्‍या कारणाने नाकारलेला आहे. यावर ही तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे अनेक वेळा विनंती करुन ही तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर न केल्‍यामुळे तक्रारकर्तीने दि. 02.02.2015 रोजी विरुध्‍द पक्षाला वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 4,56,000/- द.सा.द.शे. 12  टक्‍के दराने दि. 05.04.2013 पासून प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत व्‍याजसह अदा करावे. तसेच तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष यांनी आपला लेखी जबाब दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्तीचे पती स्‍व. कुलदिपसिंह राणा यांनी Sud.Life Suraksha Express पॉलिसी क्रं. 00431017 ही दि. 05.01.2012 ला विमा मुल्‍य रुपये 1,50,000/- करिता काढली होती व  Sud.Life Jeevan Sufar Plan पॉलिसी क्रं. 00510780 ही दि. 17.07.2012 ला, विमा मुल्‍य रुपये 1,74,000/- करिता  व Sud.Life Jeevan Sufar Plan पॉलिसी क्रं. 00606360 ही दि. 18.02.2013 ला विमा मुल्‍य रुपये 1,32,000/- करिता काढली होती. तक्रारकर्तीच्‍या पतीचे दि. 03.03.2013 ला हॉस्‍पीटलमध्‍ये उपचारा दरम्‍यान निधन झाले. तक्रारकर्तीने पतीच्‍या निधनानंतर विमा दावा मिळण्‍याकरिता आवश्‍यक दस्‍तावेजासह विमा दावा प्रस्‍ताव सादर केला होता. तक्रारकर्तीने विमा दावा प्रस्‍तावा सोबत दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे (दस्‍तऐवज क्रं. 4 पेज.नं. 22-43) चे काळजीपूर्वक वाचन केल्‍यावर असे लक्षात येते की, जीवन विमा उतरविणारे श्री. कुलदिपसिंह राणा हे  Diabetic Mellitus and Hyper Tension या आजाराने विमा पॉलिसी काढण्‍यापूर्वी पासून बाधित होते व ते याकरिता उपचार घेत होते. तक्रारकर्तीने तक्रारी सोबत तसेच विमा प्रस्‍तावासोबत दाखल केलेले दस्‍तऐवजा क्रं. अॅनेक्‍चर 2 Medical Attendant  Statement चे अवलोकन केल्‍यावर असे निदर्शनास येते की, विमा धारकाला दि. 02.03.2013 रोजी शिवगंगा हॉस्‍पीटल नागपूर येथे भरती करण्‍यात आले व त्‍यांचे दि. 03.03.2013 ला निधन झाले. त्‍यांच्‍यावर दवाखान्‍यात उपचार करणारे डॉक्‍टर प्रदिप मिश्रा यांच्‍या निदानानुसार विमाधारक कुलदिपसिंह राणा यांचे निधन होण्‍याचे पहिले कारण Cardiogenic Shock हृदयविकार हे आहे व दुसरे कारण Diabetic Mellitus आहे.
  2.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, त्‍यांना तक्रारकर्तीकडून विमा दावा प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍यांनी विमा कंपनीच्‍या अधिका-यांची चौकशीकरिता नेमणूक केली व विमा कंपनीच्‍या अधिका-यानी विमाधारकाच्‍या घरी जाऊन व इतरत्र चौकशी करुन अहवाल सादर केला. विरुध्‍द पक्षाने संपूर्ण दस्‍तावेजाची तपासणी केल्‍यावर असे लक्षात आले की, विमाधारक हा मागील 3 वर्षापासून Diabetic Mellitus and Hyper Tension या आजाराने बाधित होता व तो डॉ. नितीन गुप्‍ता यांच्‍याकडून Diabetic Mellitus and Hyper Tension या आजाराकरिता मागील 3 वर्षापासून उपचार घेत होता याबाबतचे प्रमाणपत्र  दिलेले आहे.
  3.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, विमाधारकाने पॉलिसी घेतांना तो Diabetic Mellitus and Hyper Tension या आजाराने पिडित असल्‍याची बाब लपवून ठेवली. विमाधारकाचे प्रथम कर्तव्‍य आहे की, त्‍याने विमा पॉलिसी घेतांना वैयक्तिक माहिती, प्रकृती व सवय इत्‍यादी प्रपोझल फॉर्मच्‍या प्रश्‍नावली प्रमाणे खरी माहिती नमूद करावयास पाहिजे. विमा करार हा uberrima fides या तत्‍त्‍वावर आधारित आहे. विमाधारकावर त्‍याचे वय, प्रकृती इत्‍यादी सर्व खरी माहिती उघड करण्‍याचे ओझे आहे. परंतु विमाधारकाने प्रश्‍न क्रं. 6 (a) (1) ला होय आणि प्रश्‍न क्रं. 6 (a) (2, 3, 4, 5, 6 व 7 ) , 6 (b) 1 to 17 ला उत्‍तर नाही देऊन विमाधारकाने तो धडधाकट आणि तो निरोगी आहे असे नमूद केले. विमाधारक कुलदिपसिंह राणा याने जाणूनबुजून प्रपोझल फॉर्ममध्‍ये खरी माहिती नमूद केली नाही. विमाधारकाने त्‍याच्‍या प्रकृती विषयी खरी माहिती लपवून विमा पॉलिसीचा फायदा कपटी हेतूने घेण्‍याकरिता विमा पॉलिसी घेतली होती. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला तिचा विमा दावा दि. 08.07.2013 च्‍या पत्रान्‍वये नाकारल्‍याचे कळविले होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला कोण्‍त्‍याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिली नसल्‍यामुळे सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.

  

  1.        उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

 

 

मुद्दे                    उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ॽ            होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली कायॽ      होय

 

  1. काय आदेश ॽ                             अंतिम आदेशाप्रमाणे

            निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्तीचे पती स्‍व. कुलदिपसिंह राणा यांनी विरुध्‍द पक्षाकडून पॉलिसी क्रं. 00431017,  00510780 व  00606360 अन्‍वये एकूण रुपये 4,56,000/- इतक्‍या रक्‍कमेचा विमा काढला होता हे उभय पक्षांना मान्‍य आहे. तक्रारकर्तीने नि.क्रं. 2 वर दाखल केलेल्‍या दस्‍तावेजावरुन स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक ठरते. विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा विमाधारकाने विमा पॉलिसी घेतांना प्रकृतीबाबतची खरी माहिती लपवून ठेवल्‍याच्‍या कारणाने नाकारला. विमा करार हा uberrima fides या तत्‍त्‍वावर आधारित आहे. तक्रारकर्तीने नि.क्रं. 2(4) वर दाखल केलेल्‍या Attendant  Statement चे अवलोकन केल्‍यावर असे निदर्शनास येते की, तक्रारर्तीच्‍या पतीचे मृत्‍यु होण्‍याचे प्रथम कारण Cardiogenic Shock हृदयविकार हे आहे व दुसरे कारण Diabetic Mellitus आहे.
  2.      मा. राष्‍ट्रीय आयोगाने Revsion Petition No. 1129 of 2010 LIC of India VS. Kolla Santhi & anr या प्रकरणात पारित केलेल्‍या न्‍यायनिवाडयाचे अवलोकन केले असता असे स्‍पष्‍ट होते की, Cardiogenic Shock हृदयविकाराचा अटॅक केव्‍हाही येऊ शकतो आणि सदरहू विकार हा Pre-existing Disease नाही. त्‍यामुळे या कारणावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारणे हे चुकिचे आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट होते.

                 सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 4,56,000/- व 

त्‍यावर दि.05.04.2013 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्तीला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.

 

  1. उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.

 

  1. तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.