::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 20/11/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराचे पतीने गैरअर्जदार क्रं. 2 यांचेकडून इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. सदर पॉलिसीचा क्रं. 970739113, 970790621, 970951040, 971194236, 971199567, 971307566, 974373314 व 976384510 अशा होत्या. अर्जदाराचे पतीचा मृत्यु दि. 07/10/09 ला झाला. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 नी पॉलिसी क्रं. 976384510 सोडून उर्वरित सर्व पॉलिसीचे क्लेम अर्जदाराला दिले. गैरअर्जदार क्रं. 1 ने सदर पॉलिसी विषयी दि. 09/05/11 रोजी पञ लिहून पॉलिसी क्लेम देण्यास नकार दिला. त्या पञामध्ये क्लेम नकारण्याचे कारण अर्जदाराचे पतीला पॉलिसी काढण्याच्या एक वर्षा अगोदर जॉईंडस होता व त्याबाबतची माहीती अर्जदाराचे पतीने लपविली म्हणून अर्जदाराचे विमा क्लेम नाकारण्यात आले. अर्जदाराने गैरअर्जदार यांना दि. 14/7/11, 11/8/11 तसेच 26/9/11 ला पञ पाठवून विमा क्लेम देण्याची विनंती केली. परंतु गैरअर्जदाराने त्यावर कोणतेही दखल घेतली नाही. अर्जदाराने दि. 26/5/12 रोजी परत गैरअर्जदारांकडे पॉलिसीच्या मृत्यु क्लेमची रक्कम मिळण्याबाबत अर्ज केला व गैरअर्जदार यांनी दि. 9/5/11 ला अर्जदाराला सदर विमा क्लेम नाकारण्याचे कारण दिले व त्या निर्णयावर जर अर्जदाराची असहमती असली तर अर्जदार गैरअर्जदाराचे झोनल ऑफिस मुंबई येथे दाद मागु शकतात व त्या अनुषंगाने दि. 14/7/11 ला गैरअर्जदाराचे झोनल ऑफिस मुंबई येथे सदर पॉलिसीच्या रकमेच्या मागणी करीता पञ पाठविले. व परत दि. 11/8/11 ला गैरअर्जदार क्रं. 1 कडे सुध्दा पञ पाठवून विमा क्लेमच्या रकमेची मागणी केली. तरी सुध्दा गैरअर्जदाराने अर्जदारास सदर पॉलिसीची मृत्यु क्लेमची रक्कम न देवून सेवेत न्युनता दर्शविली व अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली असून अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदारास सदर पॉलिसीची मृत्यु क्लेम लाभासह देण्याचा आदेश व्हावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. 10 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराचे पती यांनी काढलेली वरील नमुद असलेली इन्शुरन्स पॉलिसीची, पॉलिसी क्रं. 976384510 ला सोडून इतर पॉलिसीचे मृत्यु विमा क्लेम अर्जदाराला देण्यात आले होते. अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप गैरअर्जदाराने नाकबुल केले आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, वादातील पॉलिसी घेण्याच्या वेळी अर्जदाराचे पती हे पिलीयाचे आजाराने ग्रस्त होते ही बाब अर्जदाराचे पतीने घेतलेल्या लता मंगेशकर हॉस्पीटल मध्ये उपचाराच्या यादीमधून गैरअर्जदाराला कळले. अर्जदाराचे पतीने पॉलिसी घेते वेळी त्याच्या प्रस्तावामध्ये स्वास्थ संबंधी महत्वपूर्ण बाब लपविली म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास सदर पॉलिसीचे विमा क्लेम नाकारुन कोणतीही सेवेत ञुटी व अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली नाही सबब सदर तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
(4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराचे पतीने गैरअर्जदार क्रं. 2 यांचेकडून इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. सदर पॉलिसीचा क्रं. 970739113, 970790621, 970951040, 971194236, 971199567, 971307566, 974373314 व 976384510 अशा होत्या. अर्जदाराचे पतीचा मृत्यु दि. 07/10/09 ला झाला. अर्जदार ही तीच्या पतीची वारसदार आहे व गैरअर्जदाराकडून काढलेली पॉलिसीची विमा क्लेम रक्कम मिळण्यास पाञ आहे ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्याने अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे असे सिध्द होत असल्यामुळे मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. गैरअर्जदाराने अर्जदाराला पॉलिसी क्रं. 976384510 विमा क्लेम नकारले याचे कारण दि. 9/5/11 चे पञामध्ये असे दश्रविले कि, अर्जदाराचे पतीने पॉलिसी घेतांना पिलीयाच्या आजाराने ग्रस्त होते ही बाब गैरअर्जदारापासुन लपविण्यात आली होती. दोन्ही पक्षांना ही बाब मान्य आहे कि, अर्जदाराचे पतीचे मृत्यु दि. 7/10/09 ला झाली होती व त्याचे कारण JCH B/L BRONCHOPNUMONIA PSP ARDS SUBACCUTE INTESTINAL OBSTRUCTION हे होते ही बाब पण दोन्ही पक्षांना मान्य आहे कि, अर्जदाराचे पतीचे मृत्यु पिलीया मुळे झाली नव्हती. गैरअर्जदाराने हे सिध्द करण्याकरीता कि, अर्जदाराचे पतीला पॉलिसी घेतेवेळी पिलियाचा आजार होता म्हणून नि. क्रं. 23 वर डॉ. मिलींद पांडुरंग भुसंडी यांचे साक्षि पुरावा घेतला परंतु त्या साक्षि पुराव्यामध्ये साक्षिदाराने असे सांगितले कि, गैरअर्जदाराने अर्जदाराचे पतीचे आजाराची दाखल केली हिस्ट्री शिट मधील नोंद कॅझुअल मेडीकल ऑफिसर यांनी केली होती व अर्जदाराचे पतीचे उपचार करते वेळी कॅझुअल मेडीकल ऑफिसर यांनी ती शिट साक्षिदाराला दिली होती. तसेच उलटतपासणी मध्ये साक्षिदाराने असे सांगितले कि, अर्जदाराचे पतीचे उपचाराअगोदर अर्जदाराच्या पतीला पिलीया होता या संदर्भात किंवा उपचाराची हिस्ट्री बघीतली नाही. तसे गैरअर्जदाराने सदर प्रकरणात अर्जदाराचे पतीने दिलेला प्रपोझल फॉर्म सिध्द करण्याकरीता व कॅझुअल मेडिकल ऑफिसर यांनी अर्जदाराचे पतीचे उपचाराचे हिस्ट्री शिट मध्ये पिलीया असण्याचे बाब करीता कॅझुअल मेडिकल ऑफिसर यांना तपासले नाही. सबब गैरअर्जदाराने सदर प्रकरणात हे सिध्द करु शकले नाही कि, अर्जदाराचे पतीला पॉलिसी घेतेवेळी पिलीयाचा उपचार घेत होते व ते ग्रस्त होते तसेच गैरअर्जदार हे पण सिध्द करु शकलेनाही कि त्यावेळी अर्जदाराचे पतीने सदर आजाराबद्दल बाब जाणूनबुझुन गैरअर्जदाराकडून लपविली होती.
मा. राष्ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार
REVISION PETITION No. 1304 of 2014
(Against the order dated 03.02.2014 in First Appeal No.634 of 2013 of the State Commission, Haryana)
M/s. ICICI Prudential Life Insurance Company Ltd. –V/s.- Mrs. Veena Sharma and others
PRONOUNCED ON: 05.11.2014
“The onus to prove that the deceased had obtained policy by suppressing facts relating to his illness was on the Corporation, but no tangible evidence was produced on its behalf to prove that the deceased was suffering from serious liver ailment at the time of taking policy and he deliberately suppressed this fact. Undisputedly, the policy was issued on 29.3.1998. The deceased must have filled the proformasome time prior to that date. Therefore, the Corporation ought to have produced evidence to prove that as on the date of filing the proforma, the deceased was suffering from any identified ailment and he had intentionally written ‘no’ against item Nos. (a) to (d) of clause 11. This the Corporation had failed to do.”
7. गैरअर्जदाराने अर्जदाराचे पतीचे पॉलिसी क्रं. 976384510 सोडून उर्वरित सर्व पॉलिसीचे क्लेम अर्जदाराला दिले याबाबतचाही खुलासा गैरअर्जदाराने सदर प्रकरणात केलेला नाही. म्हणून मा. मंचाच्या मताप्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदाराला वादातील पॉलिसीची विमा क्लेम रक्कम न देवून किंवा नामंजूर करुन सेवेत ञुटी दिली आहे व अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराला अर्जदाराचे पतीने काढलेली विमा पॉलिसी क्रं.
976384510 मध्ये विमा क्लेमची रक्कम आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावे.
(3) अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी गैरअर्जदाराने रु.
5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2,500/-आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावे.
(4) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 20/11/2014