Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/10/393

DR. BABULAL K. SHAH - Complainant(s)

Versus

REGIONAL MANAGER WEST, CUSTOMER SERVICES, HDFC BANK CREDIT CARD DIVISION - Opp.Party(s)

V.C. SINGH

24 May 2016

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG, NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN , BANDRA (E), MUMBAI-400051
 
Complaint Case No. CC/10/393
 
1. DR. BABULAL K. SHAH
10/B-4, SINDHI COLONY SION-WEST, MUMBAI-22.
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. REGIONAL MANAGER WEST, CUSTOMER SERVICES, HDFC BANK CREDIT CARD DIVISION
OLD BLDG., 4TH FLOOR, 26-A, NARAYN PROPERTIES OFF SAKI VIHAR ROAD, CHANDIVALI, ANDHERI-EAST, MUMBAI-72.
Maharastra
2. THE BANKING OMBUDSMAN MAHARASHTRA & GOA
C/O RBI, GARMENT HOUSE GROUND FLOOR, DR. ANNIE BESANT ROAD, WORLI, MUMBAI-18.
Mumbai(Suburban)
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.Y.MANKAR PRESIDENT
 HON'ABLE MR. S.R.SANAP MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

      तक्रारदार              -     गैरहजर.

      सामनेवाले             -  1. एच अँड एम. लिगल असोसिएटस

                                      2. गैरहजर.

 

आदेश - मा. श्री. एम.वाय.मानकर, अध्‍यक्ष,         ठिकाणः बांद्रा (पू.)

 

निकालपत्र

(दिनांक 24/05/2016 रोजी घोषित)

 

1.    सामनेवाले क्र.1 क्रेडीटकार्ड पुरविणा-या संस्‍थेने तक्रारदार यांना दिलेले क्रेडीटकार्ड  त्‍यांना पुर्व सूचना न देता ब्‍लॉक केल्‍यामुळे तक्रारदारांनी ही तक्रार  सामनेवाले क्र.1 व सामनेवाले क्र.2 ओम्‍बडसमन यांच्‍या विरुध्‍द दाखल केली आहे.  तक्रारी सोबत तक्रारदारांनी कागदपत्र दाखल केली. सामनेवाले यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर, मंचात उपस्थित झाले व त्‍यांनी वेगवेगळया लेखी कैफीयती  कागदपत्रांसह दाखल केल्‍या.

 

2.    तक्रारदारानुसार सामनेवाले क्र.1 यांनी आंतरराष्‍ट्रीय क्रेडीटकार्ड क्र.4346781004535274 त्‍यांना दिले व हे कार्ड जुन, 2008 ते सप्‍टेंबर,2009 पर्यंत वैध होते. तक्रारदार यांना सामनेवाले यांच्‍याकडून दि.03.09.2009 ला पत्र प्राप्‍त झाले व त्‍यांचे नविन क्रेडीटकार्ड नुतनीकरण केल्‍यानंतर, पाठविण्‍यात  येत आहे व तक्रारदार यांनी त्‍यांचा पोस्‍टाचा पत्‍ता कळवावा. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 यांच्‍याशी हेल्‍पलाईनद्वारे दि.19.09.2009 ला सायंकाळी 5.15  वाजता संपर्क साधला असता, त्‍यांना  मिस.गितांजली यांनी त्‍यांचे क्रेडीटकार्ड चौदा महिने न वापरल्‍यामुळे सुरेक्षेच्‍या दृष्‍टीकोनातून ब्‍लॉक करण्‍यात आले आहे असे संभाषणात सांगितले. तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि.22.09.2009 ला याबाबत पत्र पाठवून विचारणा केली. सामनेवाले क्र.1 यांनी दि.16.09.2009 च्‍या पत्रानुसार त्‍यांचे कार्ड ब्‍लॉक केल्‍याबाबत व त्‍यांचे नविन क्रेडीटकार्ड विचाराधीन असल्‍याबाबत कळविले. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.2 यांना पत्र पाठवून त्‍यांच्‍या निदर्शनात हया बाबी आणल्‍या व सामनेवाले क्र.1 यांनी बिनशर्त माफी मागावी व क्रेडीटकार्ड पुन्‍हा बहाल करावे असे कळविले.  सामनेवाले क्र.1 यांनी दि.03.09.2009 च्‍या पत्रा प्रमाणे ते तक्रारदार यांना नविन क्रेडीटकार्ड त्‍यांच्‍या पत्‍त्‍यावर पाठवत असल्‍याचे त्‍यांना कळविले. तक्रारदार यांना सामनेवाले क्र.1 कडून दि.12.08.2009 चे पत्र प्राप्‍त झाले होते. परंतु त्‍यामध्‍ये त्‍यांचे क्रेडीटकार्ड अवैध केल्‍याबाबत कळविले नव्‍हते. तक्रारदारांनी जेव्‍हा हेल्‍पलाईनवर फोन केला, तेव्‍हा त्‍यांना त्‍यांचे क्रेडीटकार्ड जुलै,2009 पासून ब्‍लॉक केल्‍याबाबत समजले. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचे क्रेडीटकार्ड कोणतीही पुर्व सूचना न देता ब्‍लॉक केल्‍यामुळे सामनेवाले क्र.1 यांनी सेवा देण्‍यात कसूर केल्‍याचे दिसून येते. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना योग्‍य प्रतिसाद दिला नाही, त्‍यामुळे तक्रारदारांनी ही तक्रार दाखल करुन, सामनेवाले क्र.1 व 2 यांनी बिनशर्त माफी मागावी व कोणता कायदा किंवा तरतुदी प्रमाणे तक्रारदारांचे क्रेडीटकार्ड ब्‍लॉक करण्‍यात आले होते, त्‍याचे स्‍पष्‍टीकरण देण्‍यात यावे. तक्रारदाराला मानसिक त्रासासाठी सामनेवाले यांनी एक रुपया व तक्रारीचा खर्च मागितला.

 

3.    सामनेवाले क्र.1 अ-नूसार तक्रारदार त्‍यांचे ग्राहक नाहीत. तसेच त्‍यांचे कार्यालय कांजूरमार्ग, येथे असून ते अंधेरी येथे नाही. तक्रारदार यांना संबंधीत क्रेडीटकार्ड दिल्‍याबाबत व त्‍याच्‍या वैधतेबाबत मान्‍य केले. तक्रारदार यांचे क्रेडीटकार्ड त्‍यांच्‍या व बँकेच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने, सुरक्षेकरिता ब्‍लॉक करण्‍यात आले होते. तक्रारदारांनी काही दिवस क्रेडीटकार्ड वापरल्‍यानंतर ते वापरणे बंद केले होते व त्‍यामुळे सुध्‍दा सुरक्षेच्‍या दृष्‍टीने क्रेडीटकार्ड ब्‍लॉक करण्‍यात आले होते. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना दि.12.08.2009  चे पत्र पाठविले होते, जे त्‍यांना दि.03.09.2009 ला प्राप्‍त झाले होते. क्रेडीटकार्ड नुतनीकरण केल्‍यानंतर, कायदयाप्रमाणे क्रेडीटकार्ड धारकांकडून पत्त्‍याबाबत पुष्‍टी करुन घेतात. कराराप्रमाणे सामनेवाले क्र.1 यांना दिलेले क्रेडीटकार्ड रद्द करण्‍याचा किंवा केव्‍हाही परत घेण्‍याचा अधिकार आहे व त्‍याकरिता नोटीस देण्‍याची गरज नाही. तक्रारदारांनी संबंधीत क्रेडीटकार्ड न वापरल्‍यामुळे उभयपक्षांच्‍या हितासाठी व सुरक्षेच्‍या कारणावरुन, ते रद्द केले होते. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार व सामनेवाले क्र.1 यांना एैकल्‍यानंतर, प्रकरण दि.27.10.2010 ला बंद केले होते. सामनेवाले क्र.1 यांनी सेवा देण्‍यात कोणताही कसूर केलेला नाही. सामनेवाले क्र.1 यांनी नेहमी मार्ग काढण्‍याचा प्रयत्‍न केला. क्रेडीटकार्ड ब्‍लॉक केल्‍यामुळे तक्रारदार यांना कोणताही मानसिक धक्‍का किंवा त्रास झालेला नाही व तक्रारदार यांनी काल्‍पनिक मानसिक त्रास झाल्‍याचे दिसते. तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी.

 

4.    सामनेवाले क्र.2 यांच्‍यानूसार त्‍यांची नेमणूक बँकींग लोकपाल योजना 2006 अंतर्गत झालेली आहे. बँकींग सेवेमधील वाद मिटविण्‍या करिता ही अंतर्गत व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. सामनेवाले क्र.2 हे ग्राहक संरक्षण कायदयाप्रमाणे सेवा पुरवठादार ठरत नाही. तक्रारदार व सामनेवाले क्र.2 यांच्‍यामध्‍ये सेवेबाबत कोणतेही करारपत्र झालेले नाही, त्‍यामुळे तक्रारदार यांची तक्रार सामनेवाले क्र.2 विरुध्‍द चालू शकत नाही. सामनेवाले क्र.2 यांनी त्‍यांना डिस्‍चार्ज करण्‍याबाबत दि.18.03.2011 ला अर्ज दाखल केलेला आहे.

 

5.    सदरहू प्रकरणामध्‍ये तक्रारदार व सामनेवाले क्र.1 यांनी त्‍यांच्‍या प्‍लीडींग्‍स व लेखी युक्‍तीवाद दाखल केले आहेत. प्रकरण तोंडी युक्‍तीवादासाठी लावण्‍यात आले होते. परंतु त्‍या दिवशी तक्रारदार हे गैरहजर होते, परंतु तक्रारदारांनी त्‍यांचा लेखी युक्‍तीवाद हाच त्‍यांचा तोंडी युक्‍तीवाद समजण्‍यात यावा असे लेखी युक्‍तीवादावर नमुद केलेले आहे. सामनेवाले क्र.1 तर्फे प्रतिनीधी वकील श्री.पिंटो निषाद हजर होते व त्‍यांनी त्‍यांचा लेखी युक्‍तीवाद हाच त्‍यांचा तोंडी युक्‍तीवाद समजण्‍यात यावा असे निवेदन केले.

सामनेवाले क्र.2 हे गैरहजर होते.  

 

6.    उपरोक्‍त बाबींवरुन खालील बाबी हया मान्‍य आहेत असे म्‍हणता येईल.

     सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना, क्रेडीटकार्ड क्र.4346781004535274 जे माहे  जुन, 2008 ते सप्‍टेंबर, 2009 पर्यंत वैध असलेले निर्गमीत केले होते. सदरहू क्रेडीटकार्ड जुलै, 2009 पासून ब्‍लॉक करण्‍यात आले होते.  

7.    सदर तक्रार निकाली काढण्‍या करिता खालील मुद्दे महत्‍वाचे ठरतात.

अ.) सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात कसूर केला आहे का?

अ.1)  तक्रारदार यांना निर्गमीत केलेले  क्रेडीटकार्ड माहे सप्‍टेंबर, 2009 पर्यंत वैध होते. परंतु सामनेवाले क्र.1 यांना कोणत्‍याही कारणास्‍तव जर ते क्रेडीटकार्ड ब्‍लॉक किंवा रद्द करायचे  होते तर, आमच्‍या दृष्‍टीने त्‍यांनी तक्रारदार  यांना पुर्व सूचना देणे आवश्‍यक होते. सामनेवाले क्र.1 यांनी  कोणत्‍या तरतुदी प्रमाणे त्‍यांनी तक्रारदार यांचे क्रेडीटकार्ड ब्‍लॉक केले याबाबत स्‍पष्‍टपणे नमुद केलेले नाही. नैसर्गिक न्‍यायाच्‍या दृष्‍टीने विचार करता, क्रेडीटकार्ड ब्‍लॉक किंवा रद्द करण्‍यापुर्वी क्रेडीटकार्ड धारकाला पुर्व सूचना देणे आवश्‍यक आहे. अन्‍यथा तो एखादया कठीण किंवा अवघड परिस्थिती मध्ये सापडू शकतो. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना क्रेडीटकार्ड निर्गमीत केले होते व त्‍यामुळे सामनेवाले क्र.1 हे तक्रारदार यांना दोष रहीत सेवा देण्‍यासाठी जबाबदार ठरतात. तक्रारदार व सामनेवाले क्र.1 यांच्‍यामधील हा वाद निश्चितपणे ग्राहक वाद ठरतो व तो ग्राहक मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येतो. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना नोटीस का दिली नाही याचे कोणतेही समाधानकारक कारण दिसून येत नाही. क्रेडीटकार्ड वापरात नसल्‍यामुळे नोटीस देणे सहज शक्‍य होते. क्रेडीटकार्ड तातडीने ब्‍लॉक करण्‍याचे कोणतेही कारण नमुद नाही.  सामनेवाले क्र.1 यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफियती मध्‍ये तक्रारदारांनी दि.12.08.2009 चे पत्र पाठविल्‍याबाबत नमुद केले आहे. परंतु त्‍या पत्राची प्रत त्‍यांनी प्लिडींग्‍स सोबत दाखल केल्‍याचे दिसून येत नाही, त्‍यामुळे सामनेवाले यांच्‍या या निवेदना बाबत पुष्‍टी होत नाही. तक्रारदार यांना क्रेडीटकार्ड ब्‍लॉक केल्‍यामुळे प्रत्‍यक्ष काही त्रास झाला किंवा नाही ही बाब गौण आहे. परंतु मुळात सामनेवाले क्र.1 यांनी पुर्व सूचना न देता क्रेडीटकार्ड धारकाचे कार्ड ब्‍लॉक केल्‍यास, ते निश्चितपणे सेवेमध्‍ये कसूर ठरतो. सेवा पुरवठा करणा-या संस्‍थेने संभाव्‍य बाबी लक्षात घेऊन, आपल्‍या ग्राहकांना सेवा देणे अपेक्षीत असते. ग्राहकांना त्रास किंवा नुकसान झाल्‍यानंतर, त्‍याची भरपाई करणे  हे अपेक्षीत नसते. तक्रारदार  यांना क्रेडीटकार्ड ब्‍लॉक  केल्‍यामुळे पत्र व्‍यवहार करावा लागला व तो अनावश्‍यक  व नक्‍कीच त्रासदायक  होता. मनस्‍ताप झाला तो वेगळा,  तक्रारदार यांच्‍या क्रेडीटकार्डची वैधता माहे सप्‍टेंबर, 2009 मध्‍ये संपणार होती. परंतु सामनेवाले यांनी ते अंदाजे दोन महिन्‍या पुर्वीच ब्‍लॉक केले. सबब, सामनेवाले क्र.1 यांनी सेवा देण्‍यात कसूर केला आहे हे सिध्‍द होते.

 

ब.) सामनेवाले क्र.2 व तक्रारदार यांच्‍यामध्‍ये ग्राहकवाद आहे का?

ब.1)  सामनेवाले क्र.2 हे बँकींग ओम्‍बडसमन आहेत. त्‍यांची नियुक्‍ती ही बँकींग लोकपाल योजना 2006 प्रमाणे झालेली आहे. बँकेच्‍या सेवे दरम्‍यान उदभवणा-या वादा करिता अंतर्गत बँकींग व्‍यवस्‍था म्‍हणून त्‍यांची नेमणूक केलेली आहे, त्‍यामुळे ते तक्रारदार यांचे सेवा पुरवठादार ठरत नाहीत किंवा तक्रारदार हे त्‍यांचे ग्राहक ठरत नाहीत. त्‍यांच्‍या सेवेसाठी तक्रारदारांनी काही मोबदला दिल्‍याचे दिसून येत नाही. सबब, आमच्‍यामते तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 विरुध्‍द दाखल केलेली तक्रार या मंचात चालू शकत नाही.

 

क.) ही तक्रार चालविण्‍याचा या मंचास अधिकार आहे का?

क.1) तक्रारदारांनी तक्रारीच्‍या शिर्षकामध्‍ये त्‍यांच्‍या राहण्‍याचा पत्‍ता सायन (पश्चिम), मुंबई-22 व सामनेवाले क्र.1 यांचा पत्‍ता चांदीवली, अंधेरी (पुर्व), मुंबई तर सामनेवाले क्र.2 यांचा पत्‍ता वरळी, मुंबई असा दिलेला आहे. तक्रारदार व सामनेवाले क्र.2 यांचा पत्‍ता या मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात  येत नाही. सामनेवाले क्र.1 यांचा पत्‍ता या मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येतो. सामनेवाले क्र.1 यांनी त्‍यांच्‍या प्लिडींग्‍समध्‍ये व लेखी युक्‍तीवादा मध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे की, त्‍यांचे कार्यालय अंधेरी येथे नसून ते कांजूरमार्ग  येथे आहे. ही तक्रार जेव्‍हा दाखल  झाली तेव्‍हा अंधेरी तसेच कांजूरमार्ग  ही ठिकाणे या मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात होती. तक्रारदार व सामनेवाले क्र.1 यांच्‍यामधील वाद हा सेवेबाबत  आहे व ही सेवा मोफत नसल्‍यामुळे तो ग्राहकवाद असून, या मंचास अधिकार प्राप्‍त होतो.

 

8.    तक्रारदार यांनी मानसिक त्रासासाठी फक्‍त एक रुपयाची मागणी केली आहे व सामनेवालेकडून बिनशर्त माफीची अपेक्षा ठेवली आहे. यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार  यांनी ही तक्रार पैशासाठी दाखल केलेली नाही. सामनेवाले क्र.1 यांच्‍या सेवेमध्‍ये व सेवेच्‍या गुणवत्‍ते मध्‍ये सुधारणा व्‍हावी  हा उद्देश दिसून येतो. सामनेवाले क्र.1 यांनी ही बाब लक्षात घेणे आवश्‍यक आहे असे आम्‍हास वाटते.

 

9.   वरील चर्चेनुरुप  व निष्‍कर्षावरुन आम्‍ही खालील आदेश पारित करीत आहोत.

 

10.   या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापुर्वी निकालात काढता येऊ शकली नाही.  सबब खालीलः-

                       आदेश

1.    तक्रार  क्रमांक 393/2010 ही अशंतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाले क्र.1 यांनी सेवा देण्‍यात कसूर केला आहे असे जाहिर करण्‍यात येते.

3.    सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे क्रेडीटकार्ड  सुचना न देता ब्‍लॉक केल्‍या बाबत बिनशर्त दि.31.07.2016 पर्यंत माफी मागावी अन्‍यथा दि.31.08.2016 पर्यंत रु.5,000/- (रुपये पाचहजार) तक्रारदार यांना अदा करावे तसे न केल्‍यास, त्‍या रक्‍कमेवर दि.01.09.2016 पासून द.सा.द.शे. 10 टक्‍के व्‍याज लागू राहील.

4.    सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासासाठी एक रुपया  दि.31.07.2016 पर्यंत अदा करावे.

5.    सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदार  यांना तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.5,000/- (रुपये पाचहजार) दि.31.07.2016 पर्यंत अदा करावे, न केल्‍यास त्‍यावर दि.01.08.2016 पासून द.सा.द.शे 10 टक्‍के व्‍याज लागू राहील.

6.    सामनेवाले क्र.2 विरुध्‍द तक्रार खारिज करण्‍यात येते.    

7.   आदेशाच्‍या प्रती उभयतांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍या.

8.  अतिरीक्‍त संच असल्‍यास, तक्रारदाराना परत करावे.

 

date:24/05/2016

 

 
 
[HON'BLE MR. M.Y.MANKAR]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.R.SANAP]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.