Maharashtra

Nashik

CC/187/2011

Shri Umesh Madanlal Shah - Complainant(s)

Versus

Regional Manager New India Insurance Co Ltd - Opp.Party(s)

Shri Anil Ahuja

30 Nov 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/187/2011
 
1. Shri Umesh Madanlal Shah
R/o Prince Palace Indrakund Panchawati Nashik
Nashik
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Regional Manager New India Insurance Co Ltd
Genuji Bhavan Near Hotel Wasco Nashik Rd. Nashik
Nashik
Maharashtra
2. The New India Insurance Co. Ltd Nashik Division
Gurunanak house 1st Floor Top Wasan Auto Mumbai naka Nashik 9
Nashik
Maharashtra
3. M.D.India helth care Services
Regional Office Flat No 14 1st Floor Belavista Co Opp Hsg Society Opp mazda Hotel Trimbak Naka Old Agra Rd. Nashik 2
Nashik
Maharashtra
4. M.D.India helth care services
Head Office S.No. 46/1 E Space A-2 Building 3rd Floor Pune Nager Rd. Wadgaon sheri Pune
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

(मा.सदस्‍या अँड.सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)

 

              नि  का      त्र                                  

 

अर्जदार यांना सामनेवालेकडून शस्‍त्रक्रिया व औषधोचारासाठी झालेला खर्च रक्‍कम रु.67,990/-व या रकमेवर दि.6/12/09 पासून 18% दराने होणारी व्‍याजाची रक्‍कम रु.16,307/- अशी एकूण रक्‍कम रु.84,307/-मिळावी, वर नमूद रक्‍कमेवर 18 टक्‍के दराने व्‍याज मिळावे, मानसिक त्रासाबाबत रु.20,000/- व नोटीस खर्चापोटी रु.2,500/- या अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

सामनेवाले यांनी पान क्र.24 लगत लेखी म्‍हणणे व पान क्र.25 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत.

अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.

 

मुद्देः

1.           अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय

2.           सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केली आहे काय?-नाही

3.           अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहे.

 

 विवेचनः

 

याकामी अर्जदार यांचे वतीने अँड.ए.जे.आहुजा यांनी युक्‍तीवाद केलेला आहे तसेच सामनेवाला यांचे वतीने अँड.आर.आर.सुराणा यांनी युक्‍तीवाद केलेला आहे.

अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून दि.15/12/2008 ते 16/11/2009 या कालावधीसाठी विमा पॉलिसी घेतलेली आहे ही बाब सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे कलम 3 मध्‍ये मान्‍य केलेली आहे.  अर्जदार यांनी पान क्र.5 लगत मेडीक्‍लेम विमा पॉलिसीबाबतची सर्व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व पान क्र.5 ची विमा पॉलिसीची कागदपत्रे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

     सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्र कलम 4 मध्‍ये विमा पॉलिसीचे शर्त क्र.4.4.6 अन्‍वये विमाधारकास तंबाखु खाण्‍याची सवय असल्‍यास (पुर्वइतिहास) व या रोगाचे अनेक कारणापैकी तंबाखु सेवन असे असल्‍याने नियमानुसार विमाधारकास नुकसान भरपाई देता येत नाही. सेवा देण्‍यात कमतरता केलेली नाही. असे म्‍हटलेले आहे.

     अर्जदार यांनी तक्रार अर्ज कलम 2 मध्‍ये त्‍यांना Carcinoma of the Buccal Mucosa चा त्रास होऊ लागल्‍याने डॉक्‍टरांचे कडे तपासणी केली व डॉ.राजेश मिस्त्री यांनी अर्जदार यांचेवर ऑपरेशन केले. असा उल्‍लेख केलेला आहे. ज्‍या आजारासाठी अर्जदार यांचेवर डॉ.राजेश मिस्त्री यांनी शस्‍त्रक्रिया केली, त्‍याबाबतची कागदपत्रे झेरॉक्‍स प्रती अर्जदार यांनी  पान क्र.6 लगत दाखल केलेली आहेत.  तक्रार अर्ज कलम 2 मध्‍ये आजाराचे जे स्‍वरुप दिलेले आहे व पान क्र.6 लगतचे वैद्यकिय उपचाराचे कागदपत्रामध्‍ये आजाराबाबत जो उल्‍लेख केला आहे त्‍याचा एकत्रीतरित्‍या विचार करता अर्जदार यांना सकृत दर्शनी कॅन्‍सरचा आजार झालेला होता हे स्‍पष्‍ट होत आहे. 

पान क्र.6 लगतचे कागदपत्रामध्‍ये अर्जदार यांचा पुर्व इतिहास या ठिकाणी अर्जदार यांना तंबाखु खाण्‍याची सवय होती असा स्‍पष्‍ट उल्‍लेख आहे.  याच ठिकाणी ही सवय 14 वर्षापासून बंद केलेली आहे असा उल्‍लेख हाताने लिहीलेला आहे.  परंतु तंबाखु खाण्‍याची सवय अर्जदार यांना होती ही बाब पान क्र.6 लगतचे उपचाराचे कागदपत्रामधील पुर्व इतिहास या ठिकाणी उल्‍लेख केलेल्‍या मजकुरावरुन स्‍पष्‍ट होत आहे.  तंबाखु खाण्‍यामुळे कॅन्‍सरसारखा आजार होण्‍याची सकृत दर्शनी शक्‍यता असते.

अर्जदार यांनी पान क्र.5 लगत विमा पॉलिसीचे कागदपत्र व विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्ती दाखल केलेल्‍या आहेत यामधील Permanent Exclusions  या 4.1 अटीमधील 4.4.6 यामध्‍ये Use of tobacco leading to cancer असा स्‍पष्‍ट उल्‍लेख आहे.

अर्जदार यांचे तक्रार अर्ज कलम 2 मधील आजाराबाबतचे कथन, पान क्र.6 लगतचे वैद्यकिय उपचाराची कागदपत्रे व त्‍यामधील पुर्वइतिहास याचा एकत्रीतरित्‍या विचार करीता तंबाखु खाण्‍याची सवय अर्जदार यांना होती हे स्‍पष्‍ट झालेले आहे.  यामुळे पान क्र.5 लगतचे विमापॉलिसीचे अटी व शर्तीमधील अट क्र.4.4.6 चा योग्‍यरित्‍या विचार करुन सामनेवाला यांनी अर्जदार यांचे विमाक्‍लेम बाबतीत योग्‍य तीच कार्यवाही केलेली आहे व यामुळे सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.

या बाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.

1. 3(2011) सि.पी.जे. राष्‍ट्रीय आयोग. पान 143. एल.आय.सी. विरुध्‍द  सतवंत कौर संधु

2. 3(2011) सि.पी.जे. राष्‍ट्रीय आयोग. पान 43. मायादेवी  विरुध्‍द  एल.आय.सी.

 

 

 अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्‍तीवाद  तसेच सामनेवाले यांचे लेखी म्‍हणणे, प्रतिज्ञापत्र,  त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्‍तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेली व वर उल्‍लेख केलेली वरिष्‍ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

    

                                                आ दे श

 

        अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले यांचेविरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे.

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.