ग्राहक तक्रार क्र. 53/2014
दाखल तारीख : 10/02/2014
निकाल तारीख : 17/06/2015
कालावधी: 01 वर्षे 04 महिने 08 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्रीमती वनमाला राजेंद्र कुंभार,
वय – 55, धंदा - घरकाम,
रा.वाठवडा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद, ... तक्रारदार.
वि रु ध्द
1. मा.झोनल मॅनेजर,
भारतीय जीवन बिमा निगम लि.
जीवन प्रकाश अदालत रोड,
औरंगाबाद, दुरध्वनी क्र.2333589.
2. मा.शाखाधिकारी,
भारतीय जीवन बिमा निगम लि.
शाखा उस्मानाबाद.
जीवनज्योती, उस्मानाबाद जनता बँकेसमोर,
उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रादारातर्फे विधीज्ञ : श्री. बी. ए. बेलूरे.
विप क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री. ए.एस. रणदिवे.
न्यायनिर्णय
मा.सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते, यांचे व्दारा:
अ) 1. तक्रारदार हा मौजे वाढवडा, ता. कळंब जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. तक्रारदाराचा मुलगा दिपक राजेंद्र कुंभार हे मौज वाढवडा येथे दि.18/10/2013 रोजी शेतामध्ये सर्पदंश होऊन जागीच मयत झाला व त्यांनतर त्याला दवाखान्यात नेण्याकरीता एकत्र आले असता मयत असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांचा अंत्यविधी शेतामध्ये करण्यात आला.
2) तक्रारदाराचा मयत मुलगा दिपक राजेंद्र कुंभार यांनी विप कडे त्यांच्या हयातीमध्ये पॉलिसी घेतलेली होती. त्या पॉलिसीचा क्र.985837634 असा आहे व त्यांचे वारस तक्रारदार ही आहे. तक्रारदाराचा मुलगा नामे दिपक राजेंद्र कुंभार हा विप चा ग्राहक होता. विप कडून पॉलिसी घेतल्यानंतर मयत दिपक राजेंद्र कुंभार हे विप कडे नियमितपणे त्यांचे हप्ते भरत होते व भरलेले आहेत. मयत दिपक राजेंद्र कुंभार यंनी वरील नमुद पॉलिसीचा हप्ता सहामाही हप्ता रु.12,122/- असून त्याचा टेबल क्र.149 - 80 व मुदत 18 वर्षे होती. सदरील पॉलिसीही sum assured चार लाख रुपये आहे व जर अपघातती मृत्यू झाला तर दुर्घटना हित लाभ म्हणून रु.8,00,000/- देण्याची जबाबदारी विप ने स्विकारलेली आहे. तक्रारदाराने सदर विमा क्लेमफॉर्म भरुन दिला असता विप ने दि.17/12/2013 रोजी पुर्वी दाखल केलेले कागदपत्रे व न देऊ शकणारी कागदपत्रांची मागणी करुन सदरील अर्ज फेटाळला तसेच चुकीचे व खोटे कारण देऊन तक्रारदार यांचा क्लेम नाकारला म्हणून प्रकरण दाखल करण्याचे कारण घडले. म्हणून विप क्र.1 व 2 यांचेकडून पॉलिसी क्र.985837634 या पॉलिसीचा दुर्घनाहित लाभ म्हणून रक्कम रु.8,00,000/- व बोनस व योग्य ती देयकासह तसेच व्याजासह तसेच मानसिक त्रासाबद्दल रु.10,000/- व अर्जाच्या खर्चाबद्दल रु.3,000/- दयावे अशी विनंती केली आहे.
ब) सदर प्रकरणी मंचामार्फत विप क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठविण्यात आली असता त्यांनी आपले म्हणणे दि.11/07/2013 रोजी दाखल केला तो खालीलप्रमाणे.
1. तक्रारदाराने आपले म्हणणे सबळ लेखी पुराव्यासह मंचासमोर सादर करणे जरुरी आहे. विमादार IRB Development Structure Pvt, Ltd. या कंपनीत कामाला आहेत असे नमूद केले होते. दिपक कुंभार यांनी तक ने नमूद केल्याप्रमाणे विप कडून पॉलिसी घेतली होती व तक्रारदार हे वारस म्हणून नोंदविण्यात आले होते हे मान्य आहे. विमेदाराचा मृत्यू अपघाती असेल व तसा सबळ कागदोपत्री पुरावा दावा तक्रारकत्यांने सादर केला तरच दुर्घटना हितलाभ देणे महामंडळाची जबाबदारी आहे. विमेदाराचा दि.18/10/2013 रोजी सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे तक्रारदार यांनी लेखी कळविले आणि विमा क्लेम व मृत्यूपत्र दाखल केले मात्र आवश्यक कागदपत्रे जसे की क्लेम फॉर्म् इ.(कंपनीकडून रजेचे प्रमाणपत्र) व अपघाती मृत्यू संदर्भातील पोलीस कागदपत्र दाखल केले नाहीत. तक यांनी रे.दि.दा.क्र.664/2013 दाखल केलेला असून उदयाप प्रलंबित आहे तसेच सदर दाव्याविषयी तक यांनी माहिती दडवून ठेवली आहे. तसेच तक्रार अर्जामध्ये ‘’ पॉलिसी रकमेबाबत इतर कोणत्याही न्यायालयात प्रकरण प्रलंबित नाही’’ असे खोटेपणाने नमूद केलेले आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार खोटी असून कागदपत्रा अभावी प्रलंबित असून पॉलिसी-दावा अद्यापही नाकारण्यात आलेला नाही. सबब प्रस्तुतची तक्रार खर्चासहित फेटाळण्यात यावी.
क) तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबत जोडलेली कागदपत्रे विप क्र.1 व 2 ने दाखल केलेले म्हणणे व उभयतांचा लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद यांचा एकत्रितपणे विचार करता न्यायिक निर्णयाच्या निष्कर्षासाठी खालील मुद्दे निघतात.
मुद्ये उत्तर
1) तक्रारदार व विप क्र. 1 व 2 यांच्यामध्ये ग्राहक व सेवा
पुरवठादार हे नाते आहे काय ? होय.
2) या न्यायमंचास सदरची तक्रार चालविण्याचे
कार्यक्षेत्र / अधिकार आहे काय ? नाही.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 व 2 :
तक्रारदाराने विप क्र.1 व 2 यांचेकडून जिवन विमा यांचे संदर्भात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराचा मुलगा दिपक राजेंद्र कुंभार यांची पॉलिसी विप क्र. 1 व 2 यांनी घेतल्याबद्दल विप क्र. 1 व 2 यांचीसुध्दा तक्रार नाही. तथापि मयत दिपक यांचे पत्नी व मुलगा यांनी दिवाणी न्यायालय यांचेकडे दिवाणी दावा 664/13 दाखल केला असून तसेच विप विरुध्द तक्रारदाराने पॉलिसी रक्कम देण्यास तुर्तातुर्त मनाई दिली आहे याबाबत लेखी म्हणण्यामध्ये विप ने निवेदन केलेले आहे. तसेच याबाबी तक्रारदाराने या मंचापासून लपवून ठेवल्या असून विप ने पॉलिसी रकमेबाबत कोणतेही प्रकरण न्यायालयात प्रलंबीत नाही असे खोटेपणाने नमूद केलेल असून तक्रारदाराचा अर्ज नामंजूर करण्यात यावा असे म्हंटले आहे. पॉलिसीबाबतचा निर्णय कागदपत्रांअभावी अनिर्णयीत असून पॉलिसीबाबत दावा अद्यापही नाकारण्यात आलेला नाही. कलम 11 नुसार दावा दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही म्हणून दावा फेटाळण्यात यावा असा आक्षेप नोंदविलेला आहे. या विप चा मुख्य आक्षेपाच्या अनुषंगाने तक्रारीची पहाणी केली असता तक्रारदार या न्यायमंचाचा ग्राहक या संज्ञेत येत असला तरी व विप क्र. 1 व 2 हे सेवा पुरवठादार म्हणून मान्य होत असले तरीही तक्रारदार हा न्याय मंचात स्वच्छ हाताने आलेला नाही हे स्पष्ट होत आहे यांचे कारण तक्रारदार म्हणून किंवा सहतक्रारदार म्हणून तक्रारदाराची पत्नी व त्याची मुले रेकॉर्डवर येणे गरजेचे होते ते तक्रारदाराने जाणीवपुर्वक लपवल्याचे निदर्शनास येते, याचे कारण चालू असलेला दिवाणी दावा या तक्रारदाराची पत्नी व मुलगी हा 1 पक्ष असून त्यांनी या दाव्याची माहीती होऊ न देणे किंवा कायदेशीर मार्गाने दावा मंजूर झाला तर मुलांना भवीष्यातील लाभापासून वंचीत ठेवणे हे तक्रारीमधील तक्रारदाराचा हेतू दिसून येतो त्यामुळे खोटी माहिती शपथपत्रव्दारे दिल्यामुळे किंवा जाणीवपुर्वक माहिती लपवून ठेवल्यामुळे याचसोबत दिवाणी दावा प्रलंबीत असून दुसरा दावा दाखल करणे व विप क्र.1 व 2 यांनी दिलेल्या म्हणण्यानुसार त्यांनी दावा फेटाळलेला नसल्यामुळे तक्रारीचे कारण न घडल्याचे दिसुन येते त्या कारणाने अधिकार क्षेत्राअभावी व न्यायीक मुद्यावर दावा फेटाळण्यात येतो.
आदेश
1) तक ची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद