निकालपत्र :- (दि.21.02.2011.(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या व सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे शेतमजूर असून दुग्ध उत्पादनाद्वारे आपला उदरनिर्वाह करतात. तक्रारदारांनी त्यांच्या म्हैशीचा रक्कम रुपये 10,000/- चा विमा मार्च 2007 मध्ये उतरविला होता. सदर विम्याचा कालावधी दि. 29.03.2007 ते दि.28.03.2010 असा होता व पॉलीसीचा नं.1706-06-3012-000001 असा आहे व सर्टिफिकेट नं. 1706-06-3012-000001/8394 असा आहे. तसेच, सदर म्हैशीचा बिल्ला नं.RGICL 51298MLDB असा आहे. सदरची म्हैस दि.08.01.2009 रोजी तापाने आजारी होती. तदनंतर तिचेवर पशुवैद्यकिय डॉक्टरांकडून उपचारही झाले, तथापि सदरची म्हैस दि.12.01.2009 रोजी मेली. त्याच दिवशी सदर म्हैशीचे संबंधित डॉक्टराकडून पोस्ट मॉर्टमही करण्यात आले आहे. तसेच, पंचनामा करणेत आला. तदनंतर तक्रारदारांनी सदर म्हैशीच्या विम्याची रक्कम मिळणेकरिता सामनेवाला यांचेकडे कंपनीच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसहीत सामनेवाला यांचेकडे दि.14.02.2009 रोजी क्लेम दाखल केला. तथापि, माहे मे मध्ये अचानकपणे सामनेवाला यांनी म्हैस मेलेची माहिती वेळेत न दिलेने सदरचा क्लेम नामंजूर करीत आहे असे कळविले. तक्रारदारांनी क्लेम मुदतीत दाखल केलेला आहे. सामनेवाला यांची विमा क्लेम नामंजूर करणेची कृती बेकायदेशीर आहे. सदरचा विमा क्लेम दि. 14.02.2009 सामनेवाला यांना देवूनही पत्रामध्ये ती तारीख 20.02.2009 अशी सामनेवाला यांनी नमूद केली आहे. सबब, सामनेवाला यांचेकडून विमा क्लेमची रक्कम रुपये 10,000/- व त्रासापोटी रुपये 15,000/- मिळणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत क्लेम फॉर्म दिलेची पोहोच, पशुवैद्यकिय अधिका-याचे प्रमाणपत्र दि.24.01.2009, म्हैशीचा शवविच्छेदन अहवाल दि.24.01.2009, इन्श्युरन्स पॉलीसी सर्टिफिकेट, ट्रिटमेंट सर्टिफिकेट, तक्रारदारांचे म्हैशीचा पंचनामा, सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.07.05.2009 रोजी पाठविलेले पत्र, मयत म्हैशीची छायाचित्रे इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांची म्हैस आजाराने मयत झाली याबाबतचे तक्रारदारांचे कथन चुकीचे आहे. तसेच, तक्रारदारांनी पॉलीसीच्या अटी व शर्तींचे पालन केले नसून त्यांनी त्यांचा क्लेम मुदतीत दाखल केलेला नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम पॉलीसीतील अटी व शर्तीनुसार नामंजूर केलेला आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांच्या म्हैशीचा मिवा सामनेवाला कंपनीकडे उतरविलेला होता ही बाब या मंचाचे निदर्शनास येते. सदरची म्हैस आजारी असल्याने तिच्यावर उपचार केलेचे दि.14.01.2009 रोजीचे तसे प्रमाणपत्र प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. तसेच, सदर म्हैस मेलेबाबतचा पंचनामा सरपंच, पोलीस पाटील व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी केलेला आहे. इत्यादीचे अवलोकन केला असता विमा असलेल्या म्हैशीचा मृत्यू दि.12.01.2009 रोजी म्हणजेच पॉलीसीचे कालावधीमध्ये झालेचा दिसून येतो. तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडे त्यांचा क्लेम हा दि.14.02.2009 रोजी दाखल केलेला आहे व त्याबाबतची पोच प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा क्लेम विहीत वेळेत दाखल केला नसल्याने नाकारलेला आहे. सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या दि.07.05.2009 रोजीचे पत्रात सदरची म्हैस दि.12.02.2009 रोजी मेलेबाबतची कागदपत्रे सामनेवाला यांना दि.20.02.2009 रोजी मिळालेचे नमूद केले आहे. तथापि, सदर बाबीचे खंडन करणारे तक्रारदारांनी शपथपत्र दाखल केले आहे. इत्यादी बाबींचा विचार करता तक्रारदारांनी त्यांच्या म्हैशीच्या विम्याचा क्लेम विहीत मुदतीत दाखल केलेचे दिसून येते. मुदतीत क्लेम दाखल करणेबाबतची सामनेवाला विमा कंपनीच्या पॉलीसीतील अट ही अनिवार्य (mandatory) नसून मार्गदर्शक स्वरुपाची आहे. सबब, सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा क्लेम न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. उपरोक्त विवेचनास हे मंच खालील पूर्वाधार विचार घेत आहे :- 2009 (1) CPR 302 - DELHI STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISION, NEW DELHI - General Insurance Co.Ltd. and Anr. Vs. Abhijit Saini and Anr. Consumer Protection Act, 1986 - Sec.2(1)(g) - Deficiency in service - Insurance claim - Repudiation of - Vehicle insured covering risk of damage and theft - Fell into deep gorge - Plea of insurer that agent played fraud and did not deposit the premium repelled - Insurer directly liable for all acts of omission and commission of their agent - Another plea raised by appellant that report of accident was belatedly lodged - To expect a person to rush to insurer to inform about the accident in case of a serious accident beyond prudence of common man - Unless occurrence or information given by the claimant is found afflicted with mala fide or falsehood, claim cannot be rejected. 2010 (3) CPR 484 - CHHATTISGARH STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, RAIPUR – ICICI Lombard General Insurance Co.Ltd. Vs. Smt. Rehmat Jahan & Ors. Consumer Protection Act, 1986 – Sections 14(1)(d), 15 and 17 – Insurance – Damage to car in accident – Repudiation of insurance claim on the ground that damages were manipulated by insured as well as intimation was late – Appellant directed by District Forum to pay Rs.3,78,193/- with 6% interest and compensation of Rs.3,000/- and cost of Rs.700/- - Matter was reported to Police immediately after accident – Oral intimation was immediately given to Insurance Company and later on, written claim application was filed – Since registered owner of vehicle died after some time, defence taken by Insurance Company, in respect of late intimation is not tenable – Collusion between three vehicles stood proved – Award made by District Forum based on report of surveyor – No interference called for in impugned award. (6) उपरोक्त संपूर्ण विवेचन विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्लेम रक्कम रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावी व सदर रक्कमेवर दि.12.01.2009 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याज द्यावे. (3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |