जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 244/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 11/02/2010
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 20/02/2014
1. श्रीमती उषा मनोहर चव्हाण व इतर,
वयः सज्ञान, धंदाः घरकाम,
रा.आनंद कॉलनी, प्लॉट नं.9, अंमळनेर,
ता.अंमळनेर,जि.जळगांव. ........ तक्रारदार
विरुध्द
1. श्री.रविंद्र दहाड, दहाड प्रकाशन,
अ डिव्हीजन ऑफ दहाड एज्युकेशनल इन्स्टीटयुट,
402, बिझीलँण्ड, 776 ए सदाशिव पेठ,
पुणे 30 व इतर. ..... विरुध्द पक्ष.
कोरम –
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या
--------------------------------------------------
नि.क्र. 1 वरील आदेश व्दाराःश्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः तक्रारदार व त्यांचे वकील ऑगष्ट,2013 पासुन पुढे नेमलेल्या अनेक तारखांना सतत गैरहजर. तक्रारदाराने दि.7/7/2011 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाही. आज नेमलेल्या तारखेसही तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर. तक्रारदाराची सततची गैरहजेरी पाहता त्यांना तक्रार अर्ज चालविण्यात काहीएक स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,1986 च्या कलम 13(2)(सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या
निकाली काढण्यात येतो.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 20/02/2014.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.